Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चॉकलेट ओतताना डायरेक्ट
चॉकलेट ओतताना डायरेक्ट धुतलेली सॅटीन रिबन टाकली. व्यवस्थीत झाल्या राख्या
भिजवलेली चणाडाळ आहे, सध्या
भिजवलेली चणाडाळ आहे, सध्या फ्रीजमधे ठेवली आहे पाण्यातच घालून. काल भिजवली आहे. आता आज त्याच काहीतरी करायलाच हवय. एक मोठी जुडी पालक आणि गाजरंही आहेत घरात. चणाडाळ वाटून पालक-गाजर घालून काही कबाब/कटलेट वगैरे जास्त घोळ न घालता बनवता येतील का? रेसिपी द्यावी कृपया.
इतर अजून काय करता येईल त्या भि.च.डा.चं. जास्त वेळ नाही सध्या हातात किचकट, न माहीत असलेलं काही करायला. तेव्हा सोप्यात सोपं सुचवा कृपया.
वाटली डाळ कर की शर्मिला. वडे
वाटली डाळ कर की शर्मिला.
वडे कॅटेगरीतलेच हवे असेल तर डाळवडा कर.
वाटली डाळ छान पर्याय आहे. पण
वाटली डाळ छान पर्याय आहे. पण ती खूप परतत बसावी लागते मोकळी व्हायला. डाळवडा करताना अजून काय काय घालतात? म्हणजे इतर कोणत्या डाळी, उडीद वगैरेही भिजवू का?
चणाडाळ + हि मि / लाल मि + मिठ
चणाडाळ + हि मि / लाल मि + मिठ असं थोडं मिक्सरमधे वटुन घे. वरतून कडिलिंब्+मोहरी+हिंग+सुकी लाल मिरची यांची चरचरीत फोड्णी त्यावर कोथिंबीर आणि हवे तर दही..... असा मस्त चटका कर.... भात्/पोळी/ब्रेड कशाबरोबरही छान लागतो... वुसता सुद्धा
मस्तच ग लाजो. करते हा चटका.
मस्तच ग लाजो. करते हा चटका. पण अगं डाळ खूप आहे. भिजायच्या आधी दोन वाट्या होती. त्यामुळे डाळवडा किंवा तत्समचीही झटपट कृती सांग.
डाळ + पालक वाटुन त्यात थोडे
डाळ + पालक वाटुन त्यात थोडे पिठ + मिठ + तिखट + लसूण वगैरे घालुन धिरडी. किसलेलं गाजर + टॉम तुकडे / लिंबू+साखर्+मिठ यांचे कचुंबर
यस धिरडी. हे कसं सुचलं नाही
यस धिरडी. हे कसं सुचलं नाही मला? चला, तळकट घाट घालायचा वेळही वाचला. धन्यवाद लाजो.
पिठ म्हणजे तांदळाचं घालू की पुन्हा चण्याचंच?
.
.
कदाचित पिठ लागणार ही नाही...
कदाचित पिठ लागणार ही नाही... आधी एखादं घालुन बघ... चिकटायला लागले तर मग तांदूळ/चणा कुठलही घालं
चॉकलेट ओतताना डायरेक्ट
चॉकलेट ओतताना डायरेक्ट धुतलेली सॅटीन रिबन टाकली.
<<
त्या रिबिनीचा रंग जातो भरपूरदा, म्हणून कॉटन थ्रेड म्हटला होता. पिल्लू कंपनी खुश झाली ना?
लाजो डाळ + पालक वाटुन त्यात
लाजो
डाळ + पालक वाटुन त्यात थोडे पिठ + मिठ + तिखट + लसूण वगैरे घालुन धिरडी. किसलेलं गाजर + टॉम तुकडे / लिंबू+साखर्+मिठ यांचे कचुंबर....एक्दम सही!
शर्मिला, धिरडी कशी झाली होती?
शर्मिला, धिरडी कशी झाली होती?
धिरडी मस्त झाली आहेत. मी
धिरडी मस्त झाली आहेत. मी त्यात गाजरही किसून घातले. पालक, गाजर, लसूण, हिरवी मिरची. खमंग झाले एकदम. पिठ घालावं लागलं. मी मुगाचं पिठ घातलं. सोबत पुदिन्याची चटणी दही घालून. लाजो धन्यवाद. आता चटक्याकरता वेगळी डाळ भिजवीन.
(आणि उद्या किंवा लवकरच फ्रीजमधे काय काय साहित्य आहे ते इथे लिहिनच. मला ही आयड्या भारी आवडलीय. माझी क्रिएटिव्हिटी मेन्यू ठरवण्यात अगदीच एकसुरी होऊन जाते, अनेकदा ब्लॅन्कही. तुझे आणि इतरांचे सल्ले माझं स्वयंपाकघर जरा रंगतदार बनवतील
)
डाळ कशी वाटलीस? भरड का गंध?
डाळ कशी वाटलीस? भरड का गंध?
पुरणपोळी करायची ना.
पुरणपोळी करायची ना.
पुरणपोळी झाली गेल्या रविवारी.
पुरणपोळी झाली गेल्या रविवारी. श्रावणात एकदाच. जास्त लाड नाहीत
वरदा डाळ फार भरड नाहीवाटली, पण गंधही नाही. जरा रवाळ लागेल हाताला अशी ठेवली. आणि कन्सिस्टन्सी दाट ठेवली, धिरडी जाडसरच होतील अशी.
Next time you can try kadhi
Next time you can try kadhi Gole - grind the dal coarse without any water. Add fine chopped ginger, green chillie, curry leaves , salt . Mix well and make balls the size of a small lime. Make kadhi with buttermilk and when kadhi come to a rapid boil add the daal balls gently and let it simmer for 5 minutes. Eat with steaming hot rice garnished with takatali mirchi..
खिमा घेउन त्याचे शामी कबाब
खिमा घेउन त्याचे शामी कबाब करता येतील. खिमा शिजवून मिक्सर म धून फिरवून घेतो तेव्हा त्यात ती भिजवलेली डाळ घालायची.
काल 'गार्लिक-पोळी' केली,
काल 'गार्लिक-पोळी' केली, दिनेशदांच्या 'गार्लिक-ब्रेड'वरून प्रेरणा घेऊन. मस्त लागली.
पुरणपोळी झाली गेल्या रविवारी.
पुरणपोळी झाली गेल्या रविवारी. श्रावणात एकदाच. जास्त लाड नाहीत >> शर्मिला
इकडे घराच्या बाजूला भरपूर अळू
इकडे घराच्या बाजूला भरपूर अळू उगवलेले आहे. पण बाजारात मिळत नाही.
खायचा अळू कसा ओळखायचा?
प्राची, फोटो टाकू शकशील का?
प्राची, फोटो टाकू शकशील का?
खायच्या अळूचा देठ पांढरट
खायच्या अळूचा देठ पांढरट हिरवा असतो.वडीच्या अळूचा देठ काळा असतो.तसेच पानांचेही!
स्पेसिफिकली अळूबद्दल नव्हे,
स्पेसिफिकली अळूबद्दल नव्हे, पण खाण्यायोग्य भाजी असेल तर जनावरे वासाने ओळखून खातात. गुरे तोंड लावीत नाहीत अश्या वस्तू सहसा खाण्यायोग्य नसतात.
गायी गुरांना पान तोडून खाऊ घालून पहा. त्यांनी खाल्ले तर खाण्यायोग्य नक्कीच आहे.
भेँडीची भाजी बुळबुळीत होउ नये
भेँडीची भाजी बुळबुळीत होउ नये म्हणुन काय करायचे? मी आदल्या दिवशी धुउन, पुसुन, पुर्ण कोरडी झाल्यावर चिरुन फ्रीजमधे ठेवते व दुसर्या दिवशी करते. लगेच करायची असल्यास काय करायचे?
फोटो काढावा लागेल मंजू. उद्या
फोटो काढावा लागेल मंजू. उद्या टाकते.
इब्लिस, धन्यवाद.
बुलबुळीत होवू नये म्हणून
बुलबुळीत होवू नये म्हणून भेंडीमध्ये काहीतरी आंबट घालतात. मी लिंबु किंवा आमचुर पावडर घालते आणि नेहेमीच्या भाज्यांपेक्षा जरा जास्त वेळ परतते.
अस्मिता१, भेंडीच्या भाजीला
अस्मिता१, भेंडीच्या भाजीला तार सुटू नये म्हणून काहीतरी आंबट घालावे भाजीत. उदा. आमसुले, चिंच, आमचूर, लिंबूरस वगैरे.
धुउन, पुसुन, पुर्ण कोरडी
धुउन, पुसुन, पुर्ण कोरडी झाल्यावर चिरुन फ्रीजमधे ठेवते व दुसर्या दिवशी करते. लगेच करायची असल्यास काय करायचे?>>>>>>>>>>>फ्रीजमधे न ठेवता भांड्यात झाकून बाहेरच ठेवून द्या.सकाळी लगेच फोडणीला
टाका.कोकम(आमसोले ) टाका.
Pages