हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स

Submitted by शूम्पी on 23 August, 2013 - 12:44

फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १ च्या शेवटी अ‍ॅडमिन यांची सब कॅटेगरी करायची सूचना वाचली म्हणून हा वेगळा धागा काढते आहे. तिथे लिहिल्याप्रमाणे शोधायला सोपे जाइल कदाचित.

हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स बाबतच्या गप्पा इथे मारुया (का?) . वेगळा धागा ऑलरेडी असेल तर आंगा म्हणजे हा उडवते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला Vera Bradley टाइपच्य क्विल्टेड हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स भारतात कुठे मिळतील याची माहिती हवी हवी होती
ब्रॅड नेमच हवे असं अजिबात नाही किंबहुना त्या परवडणार नाहीत म्हणून ही शोधाशिध Happy
त्या टाइपची असल्याशी कारण.

कोणाला माहित आहे का पुण्यामुंबईतली दुकानं?

मी गेली ७ वर्ष बॅगिटच्या बॅग्ज वापरतेय. पण त्या फारच टिकतात. म्हणून आता फालतूच्या २-३ एकदम घेऊन आलटून पालटून वापरायच्या असं ठरवलंय Proud

पण त्या फारच टिकतात>> Rofl

अगं मी माझ्यासाठी विचारत नाही. सध्या इथे टीन एजर्समध्ये Vera Bradley च्या बॅग्ज वापरायची फॅशन आहे. दिसायला त्या मस्तच आहेत पण प्राइस टॅग परवडणेबल नाही.
http://www.verabradley.com/category/Category/Backpacks/876/pc/638.uts
इथे बघ . त्यांची डिझाइन्स मला एकदमच भारतीय वाटली. म्हणून म्हटलं चौकशी करावी पुण्या मुंबैत अशा टाइपच्या बॅगा कुठे मिळतात ते.

शूम्पी
पुण्यात जस्ट बॅग्स आणि ड्युन फार फेमस आहे. माझा अनुभवही चांगला आहे. तिथे नवनवीन स्टाईलच्या पर्सेस, बॅग्स नेहेमी मिळतात. विशेषतः जस्ट बॅग्समधे. बाकी मॉलमधे वेगवेगळ्या ब्रॅन्डची दुकानं आहेत.

शूम्पी, दुकानांबद्दल माहित नाही. पण अश्या प्रकारच्या बॅग्ज मी औरंगाबादला घरगुती बॅग्ज, साडी कव्हर्स आणि इतर वस्तू बनवणार्‍या एका काकूंकडे बघितल्या होत्या. त्यांच्याकडे बॅग्जमध्ये इतकी जास्त व्हरायटी नव्हती त्यावेळी (४-५ वर्षांपूर्वी). पुण्या-मुंबईत पण असतिलच कोणी ना कोणी.

तिथल्या डिझाइन्स मस्त आहेत तू दिलेल्या लिंकवरच्या. त्या काकूंना दाखवून स्वतः थोडं डिझाईन करून बनवून घ्यायला पाहिजेत. मला त्यांच्याकडून लॅपटॉप साठी बॅग बनवून घ्यायची होती, पण यावेळी झालंच नाही जाणं.

इथल्य मानुषी, अवल वैगरे पण अश्या बॅग्ज मस्त बनवू शकतिल. Happy

I dont know about this brand but there is a UK brand called Accessorize. Shops are on all airports and malls. great stuff. It stocks all the stuff loved by teen girls. including jewellery,
backpacks, iphone covers and little pens and stuff.

छानच आहे धागा... सर्व प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज... बेल्ट, हॅट, हेअर अ‍ॅक्सेसरीज, वगैरे बद्दलही इथेच याच धाग्यावर चर्चा होणारेय की फक्त हँडबॅग्ज पर्सेस क्लच डिझायनर बटवे वगैरे...

पर्सेस च्या ब्रँडबद्दल नवीन माहीती मिळतेय... नाहीतर बरं डिझाईन आणि आवाक्यातलं वाटलं की उचल पर्स! माझी उडी टॅन, आर्मी ग्रीन, कॉफी ब्राऊन, पर्पल, ऑफव्हाईट, मॉव्ह या कलर्स पुढे गेली नाहीय. बरं चांगली मोठ्ठी तीन चार कप्पेवाली... त्यात डब्बा, पाण्याची जाडजूड बाटली, झालंच तर नोटपॅड, सतराशे साठ(अर्ध्याहून अधिक वेळेवर बंद असलेले) पेन्स, फेसवॉश, एखादी लिप्स्टीक, लिपबाम वगैरे, काजळपेन्सील, पावडर, कंगवा असं सटरफटर मेकअप साहित्य मावेल अशी आणि पावसाळ्याच्या दिवसांत २ फोल्ड (३ फोल्ड धोका देते बर्‍याचदा मुंबईच्या पावसात!) छत्री मावेल अशी मिनी बॅगच घेऊन जाते ऑफीसला. बाहेर जायला छोटीशी अडकवायची पर्स... (ही हल्ली हल्लीच नाहीतर आधी तो ऑफीसवाला झोळणाच सगळीकडे! माबोच्या फॅशन धाग्याची कृपा Happy ) अगदी काखेत लपून जाईल इतकी छोटी त्यात मेकअप सामान, छोटी पाण्याची बाटली, छोटा बिस्कीटपुडा, पास, मोबाईल, वॉलेट असं हाताशी लागेलसं सामान राहील अशी.

लग्नाकार्यात जायला जरी मरी डिझायनर बटवा/ क्लच घ्यायचं बरेच दिवस मनात घोळतंय...!!! नवरा माबोला शिव्या घालतोय त्याच्या साध्या सरळ फ्याशनीच्या नावानेच फ्या फ्या उडणार्‍या बायकोला पार बिघडवून टाकल्याबद्दल Proud

पण पर्स अपटू डेट ठेवणं, नको तो कचरा वेळच्यावेळी हातावेगळा करून सर्व वस्तू जागच्या जागी आपापल्या कप्प्यात ठेवणं खूप कंटाळवाणं काम आहे... चार चार कप्प्यांचा झोळणा असला तरी, आयत्या वेळी पास दाखवतानाचा, घराच्या चाव्या आणि मोबाईल वाजला तर तो शोधतानाचा गोंधळ असतोच! सुट्टे पैसे, पास, मोबाईल, चाव्या इत्यादी सगळा सुट्टा बाजार हाताशी लागेल असा बाहेरच्याच कप्प्यात डंप करते शक्यतो Proud

<<चार चार कप्प्यांचा झोळणा असला तरी, आयत्या वेळी पास दाखवतानाचा, घराच्या चाव्या आणि मोबाईल वाजला तर तो शोधतानाचा गोंधळ असतोच<< +१०००० अगदी अगदी. मी वैतागुन जात होते. चार अगदी सारख्या कप्प्यांची पर्स होती तेव्हा.
त्यात मी लेफ्टी. डाव्या खांद्यावर पर्स लटकवुन डाव्या हाताने, उजवीकडुन डावीकडे उघडत जाणारी चेन... मग अजुनच गोंधळ. ! Sad
कंडक्टर जवळ यायच्या आतच पैसे हातात तयार ठेवण्याची माझी सवय होती. पण या प्रकारामुळे वेळ लागत होता.

अशा वेळी, पर्स ऑरगनायजर्स मिळतात ते वापरावेत. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक महत्वाच्या वस्तूसाठी कप्पा असाइन करुन ठेवावा आणि त्यातच वस्तू ठेवाव्यात मग वस्तू पटकन सापडतात.
घराच्या दारापाशी गेल्यावर किल्लीसाठी अख्खी पर्स कोणी धुंडाळत बसले तर डोक्यात जाते.

अरे वा.. मस्त धागा.. ड्रीमगर्ल म्हणतेय त्याप्रमाणे खरच समोर आली छान वाटली आणि सगळं सामान मावेल पण तरी दिसायला थोडीफार स्टायलीश असेल अशी पर्स घेत होती मी पण. त्यातून सध्या बरेच वेळा जस्ट बॅग्स आणि ड्युन मधून घेते मी पर्स... चांगल्या टिकतात...

मी पण ४ कप्पे वालीच घेते आणि किल्ली औषध आणि मोबाईल यासाठी असाईन्ड कप्पे असतात. बाकी सर्व आत कोंबलेलं असतं.

माझ्या खुप पर्स झाल्या पण आतले गबाळ तसेच ::ड:
सध्या कीचेन एक स्टील्ची बांगडी आहे बाहेर गेले की हातात घालते तेवढी स्टाईल होते
बा़ई आर्धी पर्स पिल्लाच्या सामानात भरुन आसते , बाकी काय कुठे ठेवलय हे डोक्यात असल्याने पटकन सापडते

इथल्य मानुषी, अवल वैगरे पण अश्या बॅग्ज मस्त बनवू शकतिल.
>>>>>>>>> अल्पना Blush .........
असो......पण खरंच माझ्या लेकीने जेव्हा माझ्या पिशव्या/पर्सेसचे फोटो पाहिले , तेव्हा तिने मला लगेच व्हेरा ब्रॅडलेची लिंक पाठवली आणि माझ्या प्रत्येक सिमिलर बॅगेची किंमतही.
चक्क ७०० $, १२४०$ इ.इ.
आणि मी बर्‍याच पिशव्या तर रेग्युलर शिवणातून उरलेल्या कापडातून शिवलेल्या होत्या.
मला सगळ्यात गंमत वाटली की आपण उरलेल्या कापडाचे चौकोनी किंवा वेगवेगळे आकार कापून पिशव्या/दुपटी/क्विल्ट्स(गोधडी) शिवतो. तर अमेरिकेत असे कापलेल्या तुकड्यांचेच सेट मिळतात त्याला चार्म्स(?) म्हणतात. ते सेट्स आणायचे आणि आवडेल ते कॉम्बिनेशन करायचं.
शूम्पी पुण्यात ड्यून नावाचं एक दुकान आहे. तिथे पर्सेस बटवे हॅन्डबॅगा अशी खूप व्हरायटी आहे.

अरे व्वा! माबो वरच्या पिशव्याक्वीन्स लक्षातच आल्या नाहीत माझ्या.

मानुषी ताई, घेणार का ऑर्डरी?

कुठे आहे ते ड्यून दुकान? पुण्यात गेले की तिथे नक्की चक्कर टाकीन.

खरं आहे तुमचं मानुषीताई, माझी आई पण पूर्वी अशा छान मस्त फॅशनेबल बॅग्ज् शिवायची आणि मी जेव्हा हे वेरा ब्रॅडली चं फॅड ऐकलं/पाहिलं तेव्हा आईला तेच म्हणाले होते की अजून पण तुला शिवायची इच्छा असेल तर किती स्कोप आहे Wink

माझी तर ३ कप्प्याची छोटी बॅग आहे.. कप्पे असाईन्ड .. नो गबाळ अ‍ॅट ऑल.. पण दुसरं कोणी (बॉफ्रे) बॅगेत हात घातलं की ते सोडुन सगळं जग बाहेर आणुन ठेवतात .. नि वर 'पोरींच्या बॅगेत काहीही सापड्त.. हत्तीपण बसेल घातला तर' Proud

वेरा च्या डिझाईन्स सारखी साडी होती आईकडे .. शोधुन सांगते शिवायला

ड्रीमगर्ल .. बांद्राला मी घेतले होते क्लचेस खुप सारे रु १०० पर पीस Happy

सध्या माझ्या डोक्यात साईड बॅग्जच खुळ शिरलयं .. कॅज्युअल नि सेमी पार्टी टाईप्स.. मस्त नि स्वस्त ठिकाणे सांगा

मानुषी ताई, तुम्ही ऑर्डर घेणार असाल ना तर माझा एक लॅपटॉप पाऊच, एक आयपॅड पाऊच आणि किमान एक बॅगपॅक टाईप आणि एक मोठ्ठी बास्केट टाईपची बॅग अश्या चार बॅग्जची तरी आधी घ्याच ऑर्डर. Happy

बांद्राला मी घेतले होते क्लचेस खुप सारे रु १०० पर पीस >>>>>> वाव चनस. नक्की कुठे घेतलेस ग?

http://www.holii.in/ इथे लेदरच्या पण Paisley डिझाईन्सच्या बॅग्ज मिळतील. या शॉपर्स स्टॉप मध्ये, पँटलून्स, लाईफस्टाईलसारख्या दुकानांत असतात. शिवाय त्यांची स्वतःचीही स्टोअर्स आहेत.

इथे जावून पहा, http://www.brahmin.com/handbags?category=13

( मला वाटते आधीही मीच दुसर्‍या धग्यावर ह्याची लिंक दिली होती... कारण मला दोन अश्या भेटी (ईकडून मिळाल्या) मिळाल्या त्या खूपच मस्त वाटल्या.. व योग्य वापर होत्तोय...

नवर्‍यनी अशी ब्रॉउन दिलीय.. सेम. आतम्ध्ये कप्पे छान आहे... बॅगवाल्यांचे स्टेट्मेंटच आहे... where function meets fashion..
मला तरी मस्त वाटल्या..

मस्तानी.. अगं लिंकिंग रोड वर.. जरी स्टोन वाल्या नि प्लेन पण मिळ्तात <<<<< आताच भारतातून परत आले. २ वर्श तरी थांबाव लगणार Sad

पुण्यातलं जस्ट बॅग्ज मस्त आहे. १००रु पासून पार २-३ हजारांपर्यन्त पर्सेस, बॅग्ज मिळतात. जास्त पण असतील पण मिरवायला घेण्याच्या पर्सेस, बटवा टाईप, किंवा क्लच असे ५०० पर्यन्त मस्त मिळतं तिथे.
मला तर भारतवारीमधे फार आवडलं.
मुंबईला एअरपोर्टला येताना धारावीपाशी थांबायची फार इच्छा होती पण उशीर झाला होता आणि मुंबईच्या ट्रॅफिकचा भरवसा नाही म्हणून खरेदीला थांबू नाही शकलो. Sad

Pages