आजच चित्रपट पाहिला आणि खरे तर हे माझे आजचे फेसबूक अपडेट आहे जे मजाक मजाक मध्ये परीक्षण लिहिल्यासारखे मोठे झाले म्हणून मायबोलीवर सुद्धा टाकतोय.
तसेच असेल तर रसप यांच्याच धाग्यात का नाही टाकलेस, वेगळा धागा काढायचा शहाणपणा का?? असा प्रश्न वाचकांना पडू शकतो तर विनम्रपणे सांगू इच्छितो की हे परीक्षण निव्वळ चेन्नई एक्स्प्रेसचे नसून यात उघड उघड शाहरुख खान लपलाय जो नक्कीच एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.
______________________________________________________
चेन्नई एक्सप्रेस ..!!
आजच पाहिली, दादर स्टेशनवर नाही हं, तो जोक जुना झाला, थिएटरमध्येच पाहिली. सुरुवातीपासूनच जी सुसाट सुटते ती दोन-अडीज तासांचे मनोरंजन करूनच थांबते. प्रवासाच्या आठवणी काही रेंगाळत नाहीत मात्र जो काही टाईमपास होतो तो पैसा वसूल आहे. भले मग तुम्ही २००-२५० रुपयांचे तिकिट घेऊन मल्टीप्लेक्समध्ये का बघत असानात.. किंबहुना चित्रपटात जी निव्वळ अप्रतिम लोकेशन्स दाखवली आहेत त्याचा पुरेपूर आनंद मोठ्या पडद्यावरच..! खास करून सुरुवातीच्या एका सीनमध्ये जेव्हा ट्रेन दिपीकाच्या गावच्या पूलावर अर्धवर्तुळाकारात थांबते तेव्हा पाठीमागून कोसळणार्या शुभ्र धबधब्याच्या पार्श्वभूमीवर आकाशातून टिपलेले दृश्य.. अहाहा.. लाजवाब!
रोहित शेट्टीचा सिनेमा असला तरी हिरो अजय देवगण नसल्याने अॅक्शन त्यानुसारच अतिरेक टाळून.. तसेच रोमान्सचे बोलाल तर शाहरुख असूनही बर्यापैकी गाळून.. ज्याचा अंदाज आधीच येतो जेव्हा तो चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रामाणिकपणे आपले वय वर्षे चाळीस कबूल करतो..
तर चित्रपट निखळ विनोदी या सदरात मोडतो.. पण नर्म हलकेफुलके विनोद हा प्रकार आजकाल कालबाह्य झाल्याने फूल टू मॅड कॉमेडी चालते.. शाहरुखच्या कॉमिक टायमिंगवर कोणाला डाऊट नसावा मात्र दिपिकाने देखील सुखद धक्का दिला आहे. शाहरुख असूनही ती तितकीच लक्षात राहते यातच सारे आले. अर्थात याचे श्रेय दिग्दर्शकाला देखील ज्याने तिलाही समान स्कोप दिला आहे.
काही ठिकाणी चुरूचुरू संवाद आणि कोलांट्या उड्या मारायच्या नादात शाहरुख ओवरअॅक्टींग करून जातो मात्र या सगळ्यात तितक्याच टाळ्या आणि हसेही वसूल करतो. तामिळी लोकांना संशय येऊ नये म्हणून शाहरुख अन दिपिकाचे हिंदी गाण्यांच्या चालीत हिंदीत संवाद बोलणे हा कॉमेडीचा अगदी फ्रेश प्रकार आणि तूफान जमलाय. बाकी शाहरुखचे तामीळ बोलणे आणि इतर प्रासंगिक विनोद इथे सांगण्यात मजा नाही, ते स्वताच बघा. पण एक मात्र आहे, विनोदाची जमलेली भट्टी पाहता येत्या काळात "शाहरुख - रोहित शेट्टी" जोडीचा किमान एकतरी असाच मसालापट येणार हे नक्की. कारण शाहरुखचे वाढलेले वय त्याच्या चेहर्यावर झळकते म्हणून आता जब तक है जान तब तक ये खान पुन्हा रोमांटिक चित्रपट करेल असे काही वाटत नाही, अॅक्शन चित्रपट हा काही त्याचा बाज नाही, चकदे-स्वदेश सारखे चित्रपट वरचेवर बनत नाहीत आणि कलात्मक चित्रपट सुपरस्टार करत नाहीत.. तर राहता राहिली कॉमेडी जिचे त्याच्यात उत्तम पोटेंशिअल आहे.
चित्रपटातील ईतर कलाकारांबद्दल मला फारसे भाष्य करायचे नाही कारण सारे शेप साईज कलर अन ड्रेसमध्ये एकसारखेच वाटतात, उगाच एकाचे नाव घेतले अन दुसर्याचे नाही तर त्याला वाईट वाटायचे.
चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचे झाल्यास पहिली दोन गाणी चांगली तर नंतरची दोन थोडीफार बोअर मारतात. पाचवे गाणे देखील बोअरच आहे पण ते चित्रपट संपल्यावर लागते हेच काय ते समाधान. तरीही लोक खुर्च्या सोडत नाहीत कारण एकंदरीत सर्वच गाण्यांचे चित्रीकरण सुरेख आहे.
अश्या चित्रपटांचे परीक्षण देताना वापरतात तो, "डोके बाहेर ठेऊन गेलात तर निखळ मनोरंजन होईल" टाईप टिपिकल डायलॉग यालाही लागू होईल (बाकी डोके आत घेऊन जायचे असते अश्या चित्रपटांना किती लोक जातात हा एक सर्वेक्षणाचा विषय आहे) असो, हे खरे आहे कारण चित्रपटाची कथा चार वाक्यांचीच आहे, जी मी इथे तुम्हाला सांगितली तरी चित्रपटाच्या रसग्रहणावर जराही फरक पडणार नाही. हा काही एखाद्या सुप्रसिद्ध लेखकाच्या नावाजलेल्या कांदबरीवर आधारीत चित्रपट नाही तर स्टोरी काय, कशी, याचा आतापासूनच जास्त लोड घेऊ नका.
आता रेटींग - जर तुम्ही एसआरके चे पीएसपीओ पंखे असाल तर तुमच्यासाठी म्हणून रेटींग फोर स्टार (****) ..... चला, फोर अॅण्ड हाल्फ घ्या, माझ्या बापाचे काय जातेय.. पण जर तो तुम्हाला आवडत नसेल.., खरे तर असे बरेच जण बोलतात पण त्यातले कित्येक दुसर्यांना फसवत असतात तर कित्येक स्वतालाच.., पण तरीही तो तुमच्या डोक्यात जात असेल तर चुकूनही जाऊ नका.. कारण चित्रपटात असा एकही सीन नाही ज्यात तो तुम्हाला पडद्यावर दिसणार नाही.. तर उगाच निसर्गसौंदर्य वा दिपिकाचे सौंदर्य बघायला म्हणून जाऊन स्वताच्या जीवाला त्रास करून घेऊ नका.
तळटीप - या चित्रपटाचे परीक्षण देण्याच्या नावाखाली काही शाहरुखद्वेष्टींचे आकसाने भरलेले मत तुम्हाला आंतरजालावर इथेतिथे फिरताना मिळेल, तर त्याला गंडू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मजा नाही आले तर मी पैसे परत मिळवून देईन, तिकिट तेवढे जपून ठेवा !
*** टर्मस अॅंड कंडीशन अप्लाय - बोले तो हि ऑफर फक्त शाहरुखच्या चाहत्यांसाठी आहे
जाता जाता ---- एकाच गोष्टीचे वाईट वाटते, माझे ईंग्लिश चांगले नसल्याने हे लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. तर बॅडलक शाहरुख खान.. तरी शाहरुखचे मराठी भाषिक चाहते हे स्टेटस शेअर करू शकतात, माझी पूर्वपरवानगी घ्यायची आवश्यकता नाही
- तुमचा अभिषेक
त्याचा सिनेमा बरेचदा
त्याचा सिनेमा बरेचदा त्याच्यामूळेच सुसह्य असतो हे कसे नाकारणार ?
>>>>>>>>
प्रचंड सहमत..
फिर भी दिल है हिंदुस्तानी मला एक नंबरचा टुक्कार सिनेमा वाटूनही आणि तसा तो खरेच असूनही त्याच्यामुळे बघितला जातो. मोहोब्बते सारखा एखादा सिनेमा फक्त तो स्क्रीन वर येतो तेव्हाच बघवतो.. अशी बरीच उदाहरणे देता येतील.. मात्र एकदमच बंडलबाज सिनेमा असेल आणि मुळात त्याचाच रोल एंटरटेनिंग नसेल जसे जब तक है जान, तर मात्र सिनेमा बोर होतोच.. मी सोडला अर्धवटच.. तर डॉन-२ च्या वाटेलाही गेलो नाही..
असो, धागा चेई चा आहे आणि त्यात मात्र तो चौफेर सुटलाय.. आणि म्हणूनच शाखाच्या चाहत्यांसाठी मस्ट सी !
उद्या तुम्ही मुकेश आणि मेहदी
उद्या तुम्ही मुकेश आणि मेहदी हसनमध्येही अशीच काही तुलना केलीत तर आश्चर्य वाटणार नाही. >> तुमच्या मते दोघांपैकी कोणाला गाता येत नाही नक्की ?
मुकेश ला गाणे येते ?
मुकेश ला गाणे येते ?
.
.
मन्ना डे किशोर कुमार, आणि मोहम्मद रफी....... हे त्रिमुर्ती सोडले तर... गाणे गाण्याची कला लोप पावली...आजकाल गाणे हे म्हणतात .....
मुकेश ला गाणे येते ? >> कधी
मुकेश ला गाणे येते ? >> कधी आपल्याला झेपत नसेल त्याचे गाणे असा विचार करून पाहिला आहेस का ?
उदयन आता तुम्ही चुकलात.
उदयन आता तुम्ही चुकलात. मुकेशमध्ये भलेही बर्याच कमतरता असतीलही, भलेही तो (सॉरी इथे ते असे आदरार्थी म्हणायला पाहीजे) रफी, मन्नाडे आणी किशोरच्या मागे असेल पण पूर्ण black & white जमाना त्यानेच आणी त्याच्या गाण्यानेच गाजलाय हे कधीही विसरु नका.
किती उत्तमोत्तम गाणी हवीत तुम्हाला? राज, देव आणी दिलीप या त्रयींना त्यानेच आधी आवाज दिलाय हे का विसरता तुम्ही? मुकेश शिवाय राज कपूर अशी कल्पना करुन बघा जरा. आजकालच्या फडतुस आणी दुसर्या दिवशीच स्मरणातुन निघुन जाणार्या गाण्यांमध्ये किती तुम्हाला लक्षात रहातात ते सांगा.
आश्चर्य वाटले मला, तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती. तसे तुम्हाला बाकी राजकीय आणी सामाजीक ज्ञान आहे, पण यात तुम्ही नक्कीच घसरलात.
गाडी शहारुख कडुन गाण्यांकडे कशी घसरली?:अओ:
मला तरी मुकेश झेपला नाही
मला तरी मुकेश झेपला नाही कधी........यात काय चुकले...:अओ:
.
.
.
मो. रफी आणि मन्ना डे यांच्या गाण्यात जी डीपनेस होती.. ती मला दिसली नाही.... मो.रफी यांचे बैजुबावरा ऐका..या " ओ दुनिया के रखवाले" . अनावश्यक तान..पॉझ . कुठे ही मला तरी वाटला नाही... तसेच किशोर कुमारच्या बाबतीत..
मला वैयक्तिक नाही आवडला या त्याची गाणी नाही मनाला भिडली त्यात काय ?
पूर्ण black & white जमाना त्यानेच आणी त्याच्या गाण्यानेच गाजलाय हे कधीही विसरु नका. >>> गाजु द्या ना... मी त्या जमान्यातला नाही आहे... तरी सुध्दा मला मन्ना डे आणि रफी आवडतात...
आजकालच्या फडतुस आणी दुसर्या
आजकालच्या फडतुस आणी दुसर्या दिवशीच स्मरणातुन निघुन जाणार्या गाण्यांमध्ये किती तुम्हाला लक्षात रहातात ते सांगा. >>>>
मी आजच्या गाण्यांबद्दल काय लिहिले ते जरा ...लक्ष देउन वाचा... ... तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही..
मग इथेच तर सगळी गोम आहे की.
मग इथेच तर सगळी गोम आहे की.:स्मित: किशोरकुमार माझा अतीशय आवडता गायक्,त्याबरोबरच मन्नाडे पण. तरीही मुकेशचीच गाणी ऐकत मी मोठी झाले. मी तरी कुठे त्या जमान्यातली आहे?
अहो जसे तुम्हाला जसा मुकेश आवडत झेपत नाही तसेच आम्हाला शाहरुख आवडत झेपत नाही.:फिदी:
बहुतेक सर्व पंख्यांची मारामारी अशीच चालत रहाणार्.:फिदी:
जाऊ द्या. चांगले ते घ्यावे, वाईट ते टाकावे. शाहरुख आवडत नसला तरी चेई आवडतो. तसेच तुम्ही मुकेश आवडत नसला तरी त्याची गाणी जरुर ऐका.:स्मित:( जबरदस्ती नाही )
>> डीपनेस उदयन.., तुम्हाला
>> डीपनेस
उदयन.., तुम्हाला डेप्थ म्हणायचं होतं का?
आ.न.,
-गा.पै.
गामा ........आम्ही इंग्लंड
गामा ........आम्ही इंग्लंड मधले न्हाई हो... जरा चुकभुल होईलच...;)
आमास्नी लहानपणापास्न इंग्रजी येत न्हाई
मला वैयक्तिक नाही आवडला या
मला वैयक्तिक नाही आवडला या त्याची गाणी नाही मनाला भिडली त्यात काय ? / मला तरी मुकेश झेपला नाही कधी........यात काय चुकले...>> काहीच बिघडले नाही त्यात पण मग "मुकेश ला गाणे येते ? " ह्यात नक्की काय अभिप्रेत होते मग ? खर तर तुम्हाला नाहि झेपत मुकेश ह्यात मुकेचा तोटा नसून झालंच तर तुमचेच नुकसान आहे हे कधी तरी उमजेल तुम्हालाही.
चला मुकेश ला गाणे
चला मुकेश ला गाणे येते.......ते गाणे माझ्या मनाला भिडत नाही......... अशी दुरुस्ती करतो
रश्मी, १००% सहमत (मुकेश
रश्मी,
१००% सहमत (मुकेश विषयी). किशोर, रफी आणि मुकेश हे तिघेही आपापल्या प्रांतात श्रेष्ठ आहेत. परवाच एक जुना कार्यक्रम पुन:प्रक्षेपित झाला - त्यात लक्ष्मीकांत यांनी मुकेश यांच्याविषयी काही दुर्मिळ गोष्टी सांगितल्या, आणि काही गाण्यांचे मुकेशने कसे सोने केले आहे ते आवर्जून सांगितले.
माझ्या पहिल्या नोकरीत आमच्या office मध्ये एक नायर नावाचा officer होता. एकदा त्याने आम्हा ४-५ नवीन मुलांना "मुकेश च्या गाण्यांतील दुर्मिळ जागा आणि त्याची गाणी कशी ऐकावीत" ह्यावर फार आवेगाने lecture दिले होते. "वक्त करता जो वफा" ह्या गाण्याचा सुरवातीचा भाग परत परत ऐकवला होता. ते सर्व इतक्या वर्षांनी परत आठवले :).
फक्त हे सर्व मी माझ्या बायकोला पटवून देऊ शकत नाही :). ती मुकेशची "रडका" ह्या एका शब्दात बोळवण करते.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
सॉल्लिड विषयांतर झाले
सॉल्लिड विषयांतर झाले आहे.......... त्यासाठी सॉरी..!!
उदयन.., >> गामा ........आम्ही
उदयन..,
>> गामा ........आम्ही इंग्लंड मधले न्हाई हो... जरा चुकभुल होईलच...
तुमच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन आम्ही मराठी भाषेस एक नवा शब्द बहाल करू इच्छितो. खोलवा हा तो शब्द आहे. त्याचा अर्थ डीपनेस होतो. डेप्थ = खोली, तर डीपनेस = खोलवा. गोडी/गोडवा तसं खोली/खोलवा. (गोडी/गोडवा ला स्वीटनेस नामक एकच इंग्रजी प्रतिशब्द आहे.)
कसा वाटला माझा नजराणा? (शिव्या घालण्यापूर्वी प्रेरणा तुमच्याकडून घेतलीये हे लक्षात असू द्या बरंका! ;-))
आ.न.,
-गा.पै.
त्यात तो लुंगी डान्स
त्यात तो लुंगी डान्स आहे.....कोणी गायलंय ते गाण? मुळात हल्ली इतकी सुमधूर गाणी ऐकायला मिळतच नाहीत हो....
{ इथे डोक्यावर हात मारणारा स्माईली कसा आणायचा ? }
आजच चेन्नै एक्स्प्रेस पाहिला.
आजच चेन्नै एक्स्प्रेस पाहिला. सिनेमा खूप मस्त आहे.
टिपीकल कमर्शिअल सिनेमा. डोक्याला कुठेही ताप नाही.
शाहरुख - दिपीका फॅन्स साठी मस्ट वॉच. दिपीका ने रोल चांगला पेललाय. ती जास्त भाव खाउन जाते असे मला वाटले.ती या चिनेमात दिसतेही ही छान.शाहरुख ने ही ओव्हर अॅक्टिंग अगदी कमी केली आहे . अतार्किक गोष्टी बर्याच कमी आहेत. आजच १५० कोटी क्रॉस केल्याचे वाचले.
मला का आवडला -
१.सर्व लोकेशन्स अप्रतिम.
२.फोटोग्राफी उच्च दर्जाची.टॉकिजला दॄष्याची भव्यता मस्त जाणवते. (काही ठिकाणी एरियल व्ह्यूज्,ट्रेन खालून
कॅमेरा लावणे , कॅमे-यावर ट्रेन धडाडत येणे ई)
३.चुरचुरीत संवाद.कॉमेडी ची बाजू ओके. (फर्स्ट हाफ टॉकिज नुसतं हसत होतं) .
४.लहान मुले व पालक दोन्ही वर्गातला क्राऊड एंजॉय करू शकेल असा.(कथानकात वाव असूनही कुठेही
प्रौढांसाठीचे सीन्स नाहीत.धबधबा, गाव ,शेत ,हिरो हिरॉईन एकाच खोलीत अशा ठिकाणी कथानक घडत
असूनही धबधब्याखाली धोतरापेक्षा पातळ साडीत हिरॉईन भिजत नाही , असहाय्य हिरॉईन चा कुणीही
गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत नाही.अंगप्रदर्शन / बीभत्स सीन्स / किसींग् / बेड सीन्स नाहीत. गुडघ्यापर्यंत
काष्ट्याच्या नऊवारी साड्या नेसणार्या गांवक्या गो-या नाहीत.
५.सर्व कलाकारांचा अभिनय चांगला.
६.वेगवान हाताळणी.
तितली गाणे सुंदर .शेवटचा लुंगी डान्स ही मस्त.
एकूणच मस्त, फ्रेश वाटले चैए बघून.
शाहरुख , दिपीका , शेट्टी कॉम्बो रॉक्स !
(तळटीप - मी शा.खा ची डाय हार्ड पंखा नाही . )
deepness! I am reaching face
deepness! I am reaching face palm rather early in the day. lol
ही गाणी ऐकून बघा.
चीनों अरब हमारा हिंदोस्ता हमारा
मैं तो दीवाना दीवाना
जाने क हां गये वो दिन
दोस्त दोस्त ना रहा.
त्यात तो लुंगी डान्स
त्यात तो लुंगी डान्स आहे.....कोणी गायलंय ते गाण? मुळात हल्ली इतकी सुमधूर गाणी ऐकायला मिळतच नाहीत हो.>>>>>>>>>>>>>>>>>>>. यो यो हनी सिंग ने गायलय ते गाणं.....
गेल्या रविवारीच
गेल्या रविवारीच बघितला.....ब्ल्याक ने तिकीट घेउन....दूसर्यान्दा.. :हाहा:.. खुप आवडला..... फुल एन्टर्टेन्मेन्ट....
चेन्नई एक्स्प्रेसच्या
चेन्नई एक्स्प्रेसच्या निमित्ताने -
शाहरुख हल्ली मला आवडत नाही, शाहरुखचा मला रागही येत नाही, त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त वाईटच वाटते, आणि राग आला तर स्वताचाच येतो कि कधीकाळी मला शाहरुख आवडायचा.
हो खरेच आवडायचा, अगदी दिलवाले दुल्हनिया पासून, वा त्याच्याही आधी राजू बन गया जंटलमॅन पासून.
त्याची कभी हा कभी ना मधील भुमिका मला भावली होती, त्याचा चमत्कार मला आवडला होता.
बाजीगर मध्ये त्याने निगेटीव्ह भुमिका केली होती, निष्पाप शिल्पा शेट्टीला मारले होते तरीही तोच हिरो वाटला होता.
डर मध्ये तर माझ्यासाठी तोच एक हिरो होता. या पोराने सनी देओल सारख्याला अगदी खाऊन टाकला हे मनापासून आवडले होते.
अगदी अंजाममध्येही माधुरीपेक्षा त्याच्याबद्दलच मला जास्त वाईट वाटले होते.
जो नकारात्मक भुमिका करतानाही आवडावा असा, त्याला कुछकुछ होता है, दिल तो पागल है, किंवा येस बॉस सारख्या सिनेमांत बघणे सुख होते.
हे सुख मोहोब्बते आणि फिरभी दिल है हिंदुस्तानी सारख्या टुक्कार सिनेमातही उपभोगले, तर त्याचा बादशाह हि प्रचंड हसवून गेला होता.
त्याने करण जोहारबरोबर केलेले सिनेमे कल हो ना हो आणि कभी खुशी कभी गम ची देखील पारायणे झालीत.
मला त्याचा राज ही आवडला होता मला त्याचा राहुल हि आवडला होता.
अश्या लार्जर दॅन लाईफ की काय म्हणतात त्या भुमिका सुपर्रस्टारनाच शोभतात असेच नेहमी वाटायचे.
पण त्याच जोडीने त्याचे स्वदेश आणि चकदे सारखे चित्रपट देखील माझ्या फेवरेट लिस्टमध्ये होते.
अरेच्छा... म्हणजे अगदी कालपरवापर्यंत मला आवडायचा की शाहरुख..
अध्येमध्ये काही सिनेमे गंडायचे त्याचे पण तो काही देव नव्हता.. माणूसच होता..
पण माणूस असला तरी सुपर्रस्टार होता, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा सामान्य कलाकारांपेक्षा जास्तच होत्या..
आजकाल नेमक्या त्याच फसू लागल्या आहेत..
हि सुरुवात नक्की कुठून झाली माहीत नाही मात्र मागे नजर टाकता त्याचा शेवटचा आवडलेला सिनेमा शोधावा लागतो..
अन हे शोधताना डोळ्यासमोर येतात ते जब तक है जान, डॉन, रावण, रब ने बना दी जोडी, इत्यादी इत्यादी....
.................. आणि आता हा आलाय, चेन्नई एक्स्प्रेस !
बॉक्स ऑफिसवर शेकडो करोडोंच्या घरातले घवघवीत यश घेऊन !
शाहरुख सुद्धा खुश अन त्याचे चाहतेही यातच समाधान मानून चूप !
पण खरेच हा शाहरुखचा चांगला सिनेमा आहे जे वरच्याप्रमाणे मला आठवावेसे वाटावेत, तर याचे उत्तर नाही असेच मिळते.
‘अपयश हि यशाची पहिली पायरी असते’ असे म्हणतात तर इथे चेन्नई एक्स्प्रेसचे यश हि शाहरुखच्या अपयशाची पहिली पायरी ठरण्याची भिती मला वाटतेय.
या चित्रपटाच्या तिकिट खिडकीवरील यशाचा तो आणि त्याचे चाहते जो आनंद व्यक्त करत आहेत तो त्याचे आधीचे चित्रपट पाहताना जो आनंद गवसलेला त्यासारखा अवीट नक्कीच नाही.
यापुढे रोहित शेट्टीच काय डेविड धवन बरोबर देखील त्याचे गोविंदा आणि शक्ती कपूर छाप दोन-चार चित्रपट आले तरी नवल वाटणार नाही. आणि ते सुपरहिट गेले तरीही नवल वाटणार नाही. पुढे कदाचित डेड एण्ड नसेल मात्र त्याचा रस्ता फसलेला आहे एवढे नक्की. या रस्त्यावर त्याला यू-टर्न मारायच्या संधीही असतील मात्र तेव्हा ते धाडस तो करतो कि नाही आता हेच बघायचे आहे. इन्शाल्लाह कदाचित माझे हे गणित चुकवून त्याने तो टर्न लवकरच घेतलाही असेल, आणि असे झाले तर ते मला आवडेलच... कदाचित शाहरुख पुन्हा आवडू लागेल..
जाता जाता, त्याच्याच एका चित्रपटातील, डिडिएलजे मधील डायलॉग आठवला ---
मेरी मां हमेशा मुझे एक बात कहा करती थी, जो मै आज तक नही भूला
बेटा, जिंदगी के हर मोड पे तुम्हे दो रास्ते मिलेंगे. एक सही, एक गलत..
गलत रास्ता बहोत आसान होगा, तुम्हे अपनी तरफ खीचेगा..
और सही रास्ता बहोत मुश्कील होगा, उसमे बहोतसी मुसीबते, बहोतसी परेशानिया होगी..
अगर तुम गलत रास्ते पे चलोगे, तो हो सकता है तुम्हे शुरुवात मे बहोतसी कामयाबी मिले, बहोत खुशीया मिले..
मगर अंत मे तुम्हारी हार होगी..
और अगर सही रास्ते पे चलोगे, तो भलेही तुम्हे शुरुवातमे कदम कदम पर ठोकरे मिले. मुसीबतोंका सामना करना पडे, परेशानीया हो..
मगर अंत मे, हमेशा जीत होगी..
अब आप हि बताईये मॉं जी, मेरा रास्ता सही या गलत...!!
बस्स आज त्याला एवढेच सांगावेसे वाटतेय... तू गलत रास्ते पे निकल पडा है मेरे दोस्त ..! लौट आ .. !!
यो यो हनी सिंग ने गायलय ते
यो यो हनी सिंग ने गायलय ते गाणं..... >>>>>>>>>>>>>>>>> उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद!!! पण अनिश्का, मी उपहासाने विचारत होते. ते गाण कुठल्याच दृष्टीने सुमधूर नाहीये.
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद!!!
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद!!! पण अनिश्का, मी उपहासाने विचारत होते. ते गाण कुठल्याच दृष्टीने सुमधूर नाहीये.>>>>> हो अगं...पण डिस्क मधे उड्या मारयच्या कामी येतात त्याचे सॉन्ग्ज......सुमधुर तर चुकिचा शब्द आहे या गाण्यांसाठी......
रि आणि इतर शा
रि आणि इतर शा फॅण्स...
मागच्याच आठवड्यात गोकाकला (कर्नाटकात आहे) गेलो होतो.
तिथे सिन्गल स्क्रीन थेटरला लागला होता हा चित्रपट.
तिकिटे घेण्यासाठी बरीच गर्दी दिसली.
फोटु काढणार होतो तोवर आमची गाडी पुढे गेली देखील..
"लोगोकी ट्रेन छूट जाती है, आज
"लोगोकी ट्रेन छूट जाती है, आज तुम्हारी वजह से मेरा प्लॅटफॉर्म छूट गया..."
"तुमे मई जईसा कहती हूँ वैसा करनी पडेगी"
"तो अब तक मेरी बहोत चल रही थी ना?"
टोटल आज पुन्हा पाहिला. लौकरच माझ्या "कधीही पाहू शकतो" कॅटेगरीत जाणार हा
फारेण्ड, इसी बात पर मिलाओ
फारेण्ड, इसी बात पर मिलाओ हाथ! माझ्या त्या कॅटेगरीत ऑलरेडी गेला आहे.
मी ऑलरेडी ३ दा बघितला आहे
मी ऑलरेडी ३ दा बघितला आहे
मी फक्त आणि फक्त दिपीकासाठी
मी फक्त आणि फक्त दिपीकासाठी पाहीला...
चेन्नई नंतर पिक्चर आला का रे
चेन्नई नंतर पिक्चर आला का रे कुठचा शाहरुखचा ?
नसेल तर ओगस्ट टू ऑगस्ट .. २०१३ - २०१४ .. एक वर्ष एकही चित्रपट नाही
दिवाळीत येतोय "हॅप्पी न्यु
दिवाळीत येतोय "हॅप्पी न्यु ईयर".
Pages