काही वर्षांपूर्वी नॉनस्टीकचं प्रचंड फ़ॅड आलं होतं आणि ते खूप आवडीचंही झालं होतं. त्याच सुमारास ऑफ़िसच्या वुमन्स नेटवर्कने एक सेमिनार ठेवला होता ज्यात नॉनस्टीक वापराचे बरेच तोटे सोदाहरण स्पष्ट केले होते...त्यानंतर मी स्वतः घरात नॉनस्टीक वापरायला बंद केलं..
मला त्यातलं जेवढं आठवलं ते या धाग्यात लिहिते आहे..जाणकारांनी अधीक प्रकाश टाकावा ही विनंती..
त्यांचं म्हणणं होतं की टेफ़्लॉन कोटिंग करताना जे रासायनिक वापरलं जातं ते ही भांडी अधीक उच्च तपमानाला असली की वातावरणात जे वायु सोडतं त्याने कॅन्सरपासून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं तसेच प्रत्यक्ष शिजत असलेल्या पदार्थावरही हे रसायन परीणाम करून अनेक घातक आजार लिव्हर डॅमेज वगैरे होऊ शकतं...आता अर्थात ते जे दुष्मपरीणाम होतात ते इतरही घटकांमधून आपल्या शरीरात जाऊन इजा करू शकतं पण जर तुम्ही रोजच्या रोज जर अन्न नॉन स्टीकमध्येच शिजवून खात असाल तर धोक्याची पातळी स्वतःच स्वतः वाढवल्यासारखं आहे. त्यामुळे हा एक बेसिक बदल मी माझ्या किचनमध्ये केला की सगळी नॉन स्टीक भांडी काढून टाकली आणि स्टील (८/१०) घेतलं. जमेल तिथे कॉपरबेस वालं (म्हणजे हीट डिस्ट्रिब्युशन चांगलं होतं असं म्हणतात)
आणि तव्यांच्या जागी आपला भारतातला एक लोखंडी आणि अमेरीकेतले कास्ट आर्यन (म्हणजे मला वाटतं बीडाचे) सध्यातरी यात काम होतं पण तरी काही ठिकाणी नॉन स्टीकची आठवण होतेच....आणि हे घरातलं नॉन स्टीक बंद करायचं कारण म्हणजे आपण शेवटी बाहेर जाऊन खातोच तर तिथे नॉन स्टीक वापरलं असणार तेवढं एक्सपोजर गृहीत धरून हा अतिरेक बंद केला आहे...
ज्यांना या विषयावर अधीक माहिती असेल त्यांनी नक्की इथे लिहा. किंवा मायाजालावर अनेक इंग्रजी साईट्सवर हीच माहिती आणखी व्यवस्थीत, शास्त्रीय भाषेतही उपलब्ध आहे .....वाचा आणि फ़ायदा करून घ्या..
आणि हो जर तुम्हाला वापरायचीच असतील तर काही लोकं म्हणतात की ही भांडी प्रचंड गरम करू नयेत आणि नुस्तीच तापवू नयेत...म्हणजे सुरुवातीलाच थोडं तेल/तूप/बटत काही तरी घालुन गॅस सीमवर ठेवूनच यात काम करावं ...अर्थात याने तोटे होत नाहीत असं मी वाचलं नाहीये..पण कदाचीत थोडं फ़ार कमी नुकसान होऊ शकत असेल...कल्पना नाही..
हे मी सगळं माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली (अॅज एक्सपेक्टेड) आमच्यावेळी आपले लोखंडी तवे, कढया होतं तेच सगळ्यात बेस्ट होतं..आजच्या पिढीसारखं आर्यनतरी कमी नसायचं आम्हाला...असो....
इति नॉनस्टीक काळे पुराण.....
वेका, तुम्ही इलेक्टिक कॉईल वर
वेका, तुम्ही इलेक्टिक कॉईल वर वापरता का हे ग्रिडल ?
म्हणजे ribbed surface खाली गेला तरी नीट तापतं का ?
मी gas आणि इलेक्र्टीक
मी gas आणि इलेक्र्टीक दोन्हीला वापरल आहे. सुरूवातीला मिडियम हाय ठेवते मग तापलं ़की थोडी कमी आच ़करते. सेमच वाट्लं दोन्हीकडे.
थँक्स वेका.
थँक्स वेका.
खुपच छान महिति....माझ्या नोन
खुपच छान महिति....माझ्या नोन स्टिक तव्याचि पार वाट लाग्लिये..तरिहि सर्रस दोसे,,चपात्या कर्ते..हे वाचुन खुप खुप सन्ताप आलय माझ्य अज्ञानाचा..
हि लिन्क मधे जे कूक्वेअर दिले आहेत ते चान्ग्ले अस्तिल क?..म्हन्जे ह्याल देखिल कोटिन्ग आहेच तरि...??
http://www.prestigesmartkitchen.com/home-cookware-anodised
आनि आज सग्ळच वाचुन काढलय...खुप कफ्युज झालेय...बाजारत जाउन नेम्के काय मागु..?
पातेले..तवा...कढएइ ...फुचुरा..कि आनि कहि...प्लिज कुनि चिडु नका....सग्ळच वाच्लय..पन डोक गोल गोल फिरतय... .मागच्या आठ्वध्यात बेत होता सेट आनय्चा ..नोन स्टिच्क चा..बरा झाल हा धाग वाचला...
दीपमाला, मी हार्ड अनोडाइज्डला
दीपमाला, मी हार्ड अनोडाइज्डला कोटींग केलेली भांडी स्वतः वापरली नाहीत. नेटवर काही माहिती मिळते का ते तपास.
पुन्हा एकदा हाच धागा वाच आणि ठरव तुला काय परवडतंं ते. वरती फ्युचुराचा उल्लेख आहे ते पण चेक कर.
मी हार्ड अनोडाइज्डला कोटींग
मी हार्ड अनोडाइज्डला कोटींग केलेली भांडी स्वतः वापरली नाहीत >> मला पण हाच प्रश्न होता. भांडी आणि उपकरणांच्या धाग्यावर विचारले असता उत्तर मिळाले नाही. नेटवर मला तरी सापडले नाही काही उत्तर. अशी भांडी रोज भाजी/आमटी करण्यासाठी वापरावीत का?
माझं पर्सनल मत जर पुन्हा
माझं पर्सनल मत जर पुन्हा नॉनस्टीक कोटींग आहे तर बाकीचे सगळे नियम लागू होणारच नं? You decide for yourself
मी हल्लीच स्टेनलेस स्टील
मी हल्लीच स्टेनलेस स्टील भांडयांचा छानसा कुकिंगसेट घेतला. हा धागा वाचुन चांगली टिफाल कंपनीची विकत घेतलेली नॉनस्टीकची भांडी थोडयाफार स्क्रॅच आल्यामुळे वापरायला आवडत नव्हती. उगाच जेवणात काहीतरी रासायनिक बदल होईल या भितीने.
दीप - मलाही ही माहिती नविन
दीप - मलाही ही माहिती नविन आहे, असे कसे आपण आजूबाजूला बघत नाही, वाचत नाही याचा माझाच संताप मला येतो आहे.
You decide for yourself >>>
You decide for yourself >>> हम्म्म.. ते तर आहेच म्हणा
स्टिलबद्दल रिसर्च करणे चालू आहे. धन्यवाद वेका!
तमिळ चानेलवरच्या पाकृती
तमिळ चानेलवरच्या पाकृती मातीच्या भांड्यांत करतांना दाखवतात ,फोडणीसुध्दा .नॉनस्टिकचा हट्ट कशाला ?
कुझिनार्टची स्टे कुल हँडलवाली
कुझिनार्टची स्टे कुल हँडलवाली स्टीलची भांडी मस्त आहेत. हे असे.
मि चाल्ल्ले
मि चाल्ल्ले सासरि.विशाखापटनम..... आन्ध्रा मधे जाड जुड भान्डि मिळतात....लोखन्डि तवा आनेन.. अर्थात..नौरोबाला मान्य असेल तर... सासु कडे आहे मस्तच लोखन्डि तवा...मि गेले कि तो बजुला ठेव्ते आनि नोन स्टिक काढ्ते.. आगाउपनाच माझा म्हनाय्चा..... तिथे इतर भान्डि पन छान मिळतात..स्टिल देखिल rough n tough असत..बघुया..कप्ड्यान्न मधे कोम्ब्ता आलि तर..गड जिन्क्ला म्हनय्चा..
निवा, दीप माल शाळेत्ल्या मैत्रिनि म्हनाय्च्या...मस्त वाट्ला..:) सग्ळ्यान्ना..धन्यवाद..
confusion हि confusion है..solution का पता नहि
नॉनस्टिकचा हट्ट कशाला
नॉनस्टिकचा हट्ट कशाला ?
<<<<
आता हल्ली नॉनस्टिकचे तोटे आहेत हे समजले, नाही तर अजुनही मला नॉनस्टिक आवडतं वापरायला कारण लग्नानंतर नविन नविन असताना सर्व स्वयंपाक करताना व त्याचा सराव व्हायला नॉनस्टिकच्या भांडयांमुळे खुप मदत झाली. कोणताही पदार्थ भांडयाला न चिकटता बनविता येतो जसे झुणका,पोळ्या,डोसा.... ही भांडी साफ करायला देखील सोपी पडतात.
http://www.amcsa.co.za/produc
http://www.amcsa.co.za/products/overview/cookware_sets
हि लिंक सापडली cookware साठी . . स्टील आहे.हेवि आहे..जाड पन आहे ..check if any1 wants to buy.
मि फारच मनावर घेतलय.
मी नुकताच हॉकिन्स फ़्युचुराचा
मी नुकताच हॉकिन्स फ़्युचुराचा नॉनस्टिक तवा घेतला. त्याच्या बरोबरच्या पुस्तिकेत त्यांनी म्हटले आहे की त्याचे थोडे कोटिंग निघाले तरी तो तवा वापरण्यासाठी सेफ़ आहे. ते कोटिंग ' इनर्ट' आहे आणि पोटात गेले तरी ते हार्मलेसली बाहेर पडते. याचा अर्थ ते टेफ़्लॉन कोटिंग नसते का? कुणाला माहिती आहे का?
http://www.cancer.org/cancer/
http://www.cancer.org/cancer/cancercauses/othercarcinogens/athome/teflon...
इब्लिस, तुम्ही दिलेल्या
इब्लिस, तुम्ही दिलेल्या लिंकसाठी धन्यवाद! ती वाचून मला असं वाटलं की टेफ़्लॉन कोटिंग पोटात जाणंसुद्धा फार धोकादायक नाही. मग नॉनस्टिक कोटिंग निघालेली भांडी वापरू नयेत असं का म्हणतात?
हे सगळे वाचून मी अता सीरॅमिक
हे सगळे वाचून मी अता सीरॅमिक कोटींग असलेली भांडी आणली आहेत. टेफ्लॉनपेक्षा सीरॅमिकचे कमी दुष्परीणाम आहेत असे वाटते.
रच्याकने, पुण्यात मिळतात का सीरॅमिक कोटींग असलेली भांडी ?
कास्ट आयर्न चा हा सेट घेतलाय,
कास्ट आयर्न चा हा सेट घेतलाय, सुपर आहे. बिर्यानी, थालिपीठं, मसाल्याच्या भाज्या, सुपर डुपर चव.
प्रीती, मी पण घेतलाय एक तवा
प्रीती,
मी पण घेतलाय एक तवा पण त्याला आधी सिझन करावं लागतं ना... तू आपल्या पध्दतीने केलंस कि इकडच्या पध्दतीने? कुठली जास्त चांगली आहे? माझ्या तव्याला आधी डोसे चिकटत होते. आता परत बघावं लागेल करुन.
हो का प्रिती? घरी त्यातला
हो का प्रिती? घरी त्यातला फक्त तवा आहे, त्यावर दोसे चांगले होतात. भाजीसाठी भांडे आणायचा मोह होतोय.
नॉनस्टीक तवा घरात नसल्यामुळे ऑमलेट करायला नेहमीच प्रश्न. शेवटी, ceramic nonstick पॅन्स आणले. एक ऑमलेटला, १ पोळ्याना, १ डोसे करायला. छान आहेत.
सध्यातरी फार महाग सेट नाही आणला.
पण कोणाला उत्कृष्ट दर्जाचे घ्यायचे असतील तर scanpan किंवा Zwilling J.A. Henckels ह्यांचे २ पॅनचे सेट मिळतात ते पहा. त्यांचे रिव्ह्यु उत्तम आहेत पण किंमत देखील जबरदस्त आहे.
अजुन भर्पुर कंपन्यांचे आहेत बेड बाथ वर.
मनी, हे प्रीसिजन्ड आहेत.
मनी, हे प्रीसिजन्ड आहेत. वापरुन झाले की धुऊन तेलाचा कोट लाऊन ठेवायचे.
सुनिधी, ceramic nonstick पॅन्स लिस्ट्मधे आहे
प्रीति, ह्यातल्या तव्यावर्
प्रीति, ह्यातल्या तव्यावर् पोळ्या होतात का चांगल्या? की पोळ्यांकरता वापरायचे नाहीत?
सायो, मी पोळ्या नाही गं
सायो, मी पोळ्या नाही गं केल्या ह्यावर. माझ्याकडे लोखंडाचा ह्या पेक्षा हलका तवा आहे, तोच वापरते.
प्रीति, तुझ्या सेटमध्ये
प्रीति, तुझ्या सेटमध्ये दिसतोय तसाच कास्ट आयर्नचा फक्त तवाच मी घेतलाय. आणि त्यावर दोनदा पोळ्याही केल्या आहेत. पहिल्या एक दोन पोळ्या बर्या होतात कारण टेंप.चा अंदाज यायला वेळ लागतो आणि हा तवा तापतोही पटकन. पण चांगल्या होतात. परवा डोसेही केले होते.
मी ह्या तव्यावर पोळ्या
मी ह्या तव्यावर पोळ्या करते, पण अजुन दोसे नाही जमले मला. एनी टिप्स?:-)
प्रत्येक डोशानंतर किचन
प्रत्येक डोशानंतर किचन टॉवेलने हलका तेलाचा हात लावून घ्यायचा. गॅसचं गणित जमेपर्यंत पहिले एक दोन डोसे वाया जायची शक्यता आहे.
स्नेहा, ह्या म्हणजे कास्ट
स्नेहा, ह्या म्हणजे कास्ट आयर्न का?
तवा लो फ्लेमवर तापवायचा. मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायचा. मग डोसा घालायचा.
वापरून झाला की (नेहमी) तेलाचा हात लावून ठेवायचा. जास्त घासाघास करायची नाही.
येस, कास्ट आयर्नच. धन्यवाद,
येस, कास्ट आयर्नच. धन्यवाद, सायो आणि स्वाती..मी ट्राय करून बघीन आता.
Pages