काही वर्षांपूर्वी नॉनस्टीकचं प्रचंड फ़ॅड आलं होतं आणि ते खूप आवडीचंही झालं होतं. त्याच सुमारास ऑफ़िसच्या वुमन्स नेटवर्कने एक सेमिनार ठेवला होता ज्यात नॉनस्टीक वापराचे बरेच तोटे सोदाहरण स्पष्ट केले होते...त्यानंतर मी स्वतः घरात नॉनस्टीक वापरायला बंद केलं..
मला त्यातलं जेवढं आठवलं ते या धाग्यात लिहिते आहे..जाणकारांनी अधीक प्रकाश टाकावा ही विनंती..
त्यांचं म्हणणं होतं की टेफ़्लॉन कोटिंग करताना जे रासायनिक वापरलं जातं ते ही भांडी अधीक उच्च तपमानाला असली की वातावरणात जे वायु सोडतं त्याने कॅन्सरपासून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं तसेच प्रत्यक्ष शिजत असलेल्या पदार्थावरही हे रसायन परीणाम करून अनेक घातक आजार लिव्हर डॅमेज वगैरे होऊ शकतं...आता अर्थात ते जे दुष्मपरीणाम होतात ते इतरही घटकांमधून आपल्या शरीरात जाऊन इजा करू शकतं पण जर तुम्ही रोजच्या रोज जर अन्न नॉन स्टीकमध्येच शिजवून खात असाल तर धोक्याची पातळी स्वतःच स्वतः वाढवल्यासारखं आहे. त्यामुळे हा एक बेसिक बदल मी माझ्या किचनमध्ये केला की सगळी नॉन स्टीक भांडी काढून टाकली आणि स्टील (८/१०) घेतलं. जमेल तिथे कॉपरबेस वालं (म्हणजे हीट डिस्ट्रिब्युशन चांगलं होतं असं म्हणतात)
आणि तव्यांच्या जागी आपला भारतातला एक लोखंडी आणि अमेरीकेतले कास्ट आर्यन (म्हणजे मला वाटतं बीडाचे) सध्यातरी यात काम होतं पण तरी काही ठिकाणी नॉन स्टीकची आठवण होतेच....आणि हे घरातलं नॉन स्टीक बंद करायचं कारण म्हणजे आपण शेवटी बाहेर जाऊन खातोच तर तिथे नॉन स्टीक वापरलं असणार तेवढं एक्सपोजर गृहीत धरून हा अतिरेक बंद केला आहे...
ज्यांना या विषयावर अधीक माहिती असेल त्यांनी नक्की इथे लिहा. किंवा मायाजालावर अनेक इंग्रजी साईट्सवर हीच माहिती आणखी व्यवस्थीत, शास्त्रीय भाषेतही उपलब्ध आहे .....वाचा आणि फ़ायदा करून घ्या..
आणि हो जर तुम्हाला वापरायचीच असतील तर काही लोकं म्हणतात की ही भांडी प्रचंड गरम करू नयेत आणि नुस्तीच तापवू नयेत...म्हणजे सुरुवातीलाच थोडं तेल/तूप/बटत काही तरी घालुन गॅस सीमवर ठेवूनच यात काम करावं ...अर्थात याने तोटे होत नाहीत असं मी वाचलं नाहीये..पण कदाचीत थोडं फ़ार कमी नुकसान होऊ शकत असेल...कल्पना नाही..
हे मी सगळं माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली (अॅज एक्सपेक्टेड) आमच्यावेळी आपले लोखंडी तवे, कढया होतं तेच सगळ्यात बेस्ट होतं..आजच्या पिढीसारखं आर्यनतरी कमी नसायचं आम्हाला...असो....
इति नॉनस्टीक काळे पुराण.....
आपण रेग्युलर वापरासाठी ज्या
आपण रेग्युलर वापरासाठी ज्या कढया (चकचकीत चंदेरी रंगाच्या) वापरतो त्या नक्की कशाच्या असतात? माझी समजूत होती की लोखंडाच्या असतात.
पितळ आणि तांबे कळते. पण हिंडालियम, लोखंड, अॅल्युमिनिअम इ. चे फोटो टाकणार का कुणी?
दुकानदाराला हार्ड अॅनोडाईज्ड भांडी हवीत असे सांगायचे का? (नवीन कढई घ्यायला जायचेच आहे तर काय प्रकारची द्या म्हणून सांगायचे?)
स्नेहा wolfgang puck च्या
स्नेहा wolfgang puck च्या सेटसाठी अभिनंदन. :)..अगं मी जेव्हा नॉन-स्टीक काढायला सुरूवात केली तेव्हा माझं स्वतःचं स्वयंपाकघरातलं कौशल्यही बेताचं होतं..म्हणून एक एक करून वेगवेगळी भांडी आली आहेत...आता मला वाटतं मनावर दगड आणि सगळ्या भांड्यावर एकदम सुरी आय मिन ट्रॅश कॅन फ़िरवला असता तर असाच एक छान सेटतरी आला असता..आता ही ८/१० भांडीही एक एक करून तशी महागडीच आहेत त्यामुळे ते अशक्य आहे....असो...तेव्हा कुणी हा धागा वाचत असेल तर एकदाच काय तो निर्णय घ्या आणि एक तुमचा आवडता सुंदर सेट पदरात आपलं ते स्वयंपाकघरात पाडून घ्या...:)
आणि हो ते नावाबद्दल..मला काहीच सुचत नव्हतं की मी अशा साइट्सवर येऊन काय करेन म्हणून घेतलेलं आहे आणि तसंही या धाग्यावर समजा खुद्द नॉन-स्टिक कंपनीवाले मला पकडायला आले तर नंतर याच नावाचं पळकाढू करता येईल नाही का....नाहीतर कुठेतरी प्रतिक्रियांमध्ये मी "वेका" वाचलं ते कसं आहे?? (आणि लाठी भी न टुटे...:)) बघते...नंतर...
निंबुडा, तुम्ही मायदेशात असाल तर बिडाची कढई पण मिळते का? नाहीतर मला वाटतं ते हिंडाल्को प्रकरण पण ठीक आहे...आईने दिलेला तवा चपातीसाठी तरी मस्त चालतोय....कढई जी चंदेरी चकचकीत असते ती मला नक्की माहीत नाहीये कसली पण ती लोखंडी नसावी कदाचित जर्मेनियम वगैरे असेल.... पण निदान नॉनस्टिक नाहीये...लोखंडी कढया कशा वापराव्यात यावर कदाचित दिनेशदा तुम्हाला काही सांगु शकतील....
आणि हो ते फ़ोडणीच्या पळीबद्दलच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांसाठी खास आभार कारण आईने फ़ार्र्फ़ार वर्षांपुर्वीच एक स्टीलची पण पळी मला दिलीय हे आताच लक्षात आलं....(बेसिकली ड्रॉवर्स वर्षानुवर्षे आवरले नाहीत किंवा सारखी घरं बदलली की सगळ्या वस्तू काढल्या नाहीत की स्वतःच्याच घरात असे शोध लावता येतात...) असो....पुराण पुरे...मी आता ही पळी वापरणार आहे आणि मग जमेल तेव्हा मायदेशातही आणखी भांडी शोधेन....:)
सेट घेण्याचा प्रॉब्लेम असतो
सेट घेण्याचा प्रॉब्लेम असतो की त्यातली मोठी मोठी भांडी रोजच्या स्वैपाकात जवळ जवळ लागतंच नाहीत. दोन तीन माणसांकरता भाजी करायची झाल्यास मध्यम आकाराची कढई पुरते जी त्या सेटमध्ये एखादीच असते. किंमतीच्या दृष्टीने नक्कीच फायदा होतो सेटचा.
श्रुती.. कोटिंग निघालेली
श्रुती.. कोटिंग निघालेली भांडी जमा करून जेंव्हाकेंव्हा भारतात जाईन तेंव्हा ती बॅगेत भरून घेऊन जाणं केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे !!!
२०,३० % डिस्काऊन्ट करता आधी १००% एक्सेस बॅगेज भरावं लागेल, उसका क्या!!! ..
मुंबई / ठाण्यात बिडाचा तवा
मुंबई / ठाण्यात बिडाचा तवा कुठे मिळेल ते पण सांगा.
हा धागा काढायच्या नुकताच आधी एक नॉनस्टीक तवा घेतला तेव्हा दुकानदाराला विचारले होते बिडाचा तवा आहे का. तर 'हि कुठून आली?' असा काहिसा चेहरा करत त्याने 'आता तसल्या गोष्टी आऊट डेटेड झाल्यात. बंद झाल्या मिळतच नाहीत' असे उत्तर दिले आणि नॉनस्टीक तवाच मला दिला!
सावली, कौपिनेश्वर
सावली, कौपिनेश्वर मार्केटमध्ये शोध घे बिडाच्या तव्याचा. कलेक्टर ऑफिसकडून जांभळी नाक्याला जाताना उजव्या बाजूला अशी दुकानं आहेत. तिथे अश्या जुन्या पद्धतीच्या पण आता दुर्मिळ झालेल्या वस्तू मिळून जातात.
ताई, त्याने दिला आणि तुम्ही
ताई, त्याने दिला आणि तुम्ही घेतलात?
अश्विनी आधी तिला ही ठिकाणं माहितीयेत का ते तर विचार.
आडो हो हो. अश्विनी, लक्षात
आडो
हो हो. अश्विनी, लक्षात आलं. जाईन तिथे आता.
मला वाटतं आता बिडाचे तवे पुन्हा इन फॅशन होउन त्यांची किंमत वाढणार आणि ब्रँडेड, स्पेशल हँडल वाले बिडाचे तवे बाजारात येणार!
मी घेतला कारण घरात खरच काही नाहीये. एक दिवस सपाट कढईत धिरडी आणि पोळ्या करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करुन वैतागुन भर उन्हात गेले आणि दिसलेला पहिला तवा घेतला. शिवाय इंडक्शन हिटर वर चालणाराच हवा होता.
सावली, प्रेस्टीजच्या
सावली, प्रेस्टीजच्या साईटवरच्या तव्याची (डाय-कास्ट) किंमत ८०० च्या आसपास दिसतेय. हँडलवालाच आहे तवा. म्हणजे किंमत ऑलरेडीच जास्त आहे.
आले का तसे पण? ! आता योग्य
आले का तसे पण? !
आता योग्य शोधाशोध करुन खरेदी करेन.
त्या साईटवर लोकेट अ स्टोअर
त्या साईटवर लोकेट अ स्टोअर ऑप्शन आहे, त्यात ठाण्याचं दुकान दिसलंच नाही मला डोंबिवली व कल्याणची दुकानं दाखवली.
सावली, त्याच ठिकाणी मला दगडी
सावली, त्याच ठिकाणी मला दगडी खल पण मिळाला होता. थोडेसे वाटण, दाण्याची
चटणी वगैरेसाठी मस्त आहे तो. आणि चव तर अप्रतिम येते.
लोखंडी कढई काळी कुळकुळीत दिसते. नेहमी तळण वगैरे करत असाल तर चांगली.
परतून केलेल्या पालेभाज्या, पिठले यासाठी चांगली. पण त्यात केलेला पदार्थ
गरम असतानाच दुसर्या भांड्यात काढून घ्या.
पावभाजी वाल्यांकडे असतो तो जाड तवा लोखंडीच असतो. डेरीमधे दूध आटवायला
लोखंडी कढयाच वापरतात. साखर फुटाणे, घीवर वगैरे मिठाई करायला पण लोखंडी
कढयाच वापरतात. चायनीज वाल्यांकडचा वोक असतो तो पण लोखंडी असतो आणि
चण्याच्या भट्टीवर चणे फोडण्यासाठी वापरतात ती कढई पण लोखंडीच असते.
त्यांच्या कामाला बाकीचे धातू चालण्यासारखे नसतात.
दगडी खल. ह्म्म आता जाणारच
दगडी खल. ह्म्म आता जाणारच तिकडे शोधाशोध करायला.
ठाण्यात आहे का नाही ते मलाही नाही माहित. पण या बाजारात शोधतेच
२०,३० % डिस्काऊन्ट करता आधी
२०,३० % डिस्काऊन्ट करता आधी १००% एक्सेस बॅगेज भरावं लागेल, उसका क्या!!! >>>>>>
अरे बापरे कु ठे राहता ? मि मुंबई मध्ये .एका दुकानात वाचले होते .....डीस्ट.
sandwich toaster चे कोटिंग
sandwich toaster चे कोटिंग पण घातक आहे का ?????...>>>>>> मला सांगा ना......
कोटींग कुठलेही घातकच असे वर
कोटींग कुठलेही घातकच असे वर लिहिले आहेच. सँडविच मेकर फार वापरला जातो का ?
मी अनेक घरात तो पडून राहिलेला बघितला आहे. तशी सँडविचेस तव्यावर पण चांगली होतात. मी आधी एक बाजू गुलाबी करुन घेतो. मग ती बाजू आत करुन, त्यात
चीज, भाज्या वगैरे भरायचे. मग दोन्ही बाजूने, मम्द आचेवर शेकायचे. फार वेळ लागत नाही.
@shrushti14@gmail.co@, stove
@shrushti14@gmail.co@,
stove top griddle तिथे मिळतं का बघ न?? ती जरा जड असते नं म्हणून आणली तरी सारखी काढली जात नाहीये...सॅंडविच मेकर अध्येमध्ये वापरत असशील तर ठीक असेल गं..मला वाटतं रोजच्या वापरातल्या गोष्टींची जास्त काळजी करावी..
डायकास्टचा तवा म्हणजे बिडाचा
डायकास्टचा तवा म्हणजे बिडाचा तवा का? (कृपया माझ्या अज्ञानाला हसू नये!)
तर माझ्याकडे डायकास्टचाच तवा आहे (हँडलवाला आणि प्रेस्टीजचा) आणि मी त्याला कोटिंगचा म्हणजे नॉनस्टीकचा तवा समजतेय. आता तीन वर्ष झाली तरी तो चक्क उत्तम परीस्थितीत आहे. नाहीतर आधी नॉनस्टिकचा तवा वर्षा-दीड वर्षातच खराब व्हायचा.
मंजूडी मलाही नाही माहीत पण
मंजूडी मलाही नाही माहीत पण बहुधा नसावं.
ओके. माझ्याकडे हा असा आहे.
ओके.
माझ्याकडे हा असा आहे.
हा असाच दिसतोय प्रेस्टीजच्या
हा असाच दिसतोय प्रेस्टीजच्या भारताच्या साईटवर. माझापण असाच फ्लॅट आहे फक्त कास्ट आयर्न.
डायकास्ट आणि कास्ट आयर्न मधला
डायकास्ट आणि कास्ट आयर्न मधला फरक कोणी जाणकार सांगू शकतील का? दोन्हींचे फायदे - तोटे इत्यादी पण सांगा.
मंजू हे बघ डाय-कास्टिंग. हे
मंजू हे बघ डाय-कास्टिंग.
हे वाचल्यावर डाय-कास्ट म्हणजे बिडाचा पण नाही आणि नॉन स्टिक पण नाही असं वाटतंय.
तिथे डाय कास्ट मधे लोखंडा
तिथे डाय कास्ट मधे लोखंडा व्यतिरिक्त धातू असे दिलेय.
बीडाचे तवे लोखंडाचेच असतात पण थोडेसे स्पंज सारखे असतात, भरीव
नसतात. आपटल्यास फुटतात. त्याचे आंबोळीचे तवे, आप्पेपात्र बघितले आहे.
सँडविच मेकर फार वापरला जातो
सँडविच मेकर फार वापरला जातो का ? ....>>> nahi
.सॅंडविच मेकर अध्येमध्ये वापरत ........>>>>>> ha mulala kadhi kadhi sand.toast karte teva...
गुलाबी करुन घेतो. मग ती बाजू आत करुन, त्यात
चीज, भाज्या वगैरे भरायचे. मग दोन्ही बाजूने, मम्द आचेवर शेकायचे. फार वेळ लागत नाही.>>> dineshda..ata ase karun bhagen ..thanks
डाय कास्ट, हार्ड अनोडाईज्ड,
डाय कास्ट, हार्ड अनोडाईज्ड, कास्ट आयर्न... किती ते प्रकार!! काही वर्षांनी हे ही तब्येतीला वाईट आहे म्हणून सांगितलं नाही म्हणजे मिळवली.
जुने ते सोने शेवटी.. लोखंडी
जुने ते सोने शेवटी.. लोखंडी तवे आणि मातीची भांडी
वर कुणीतरी सांगितल्यावर
वर कुणीतरी सांगितल्यावर वुल्फगँग पकची साईट, त्याची कास्ट आयर्नची भांडी बघितली. मस्त वाटताहेत. सेटही सुटसुटीत वाटतोय. ती ही डिशवॉशरला चालत नसतीलच ना? त्याला एनॅमल कोटींग आहे. त्याचे काही दुष्परिणाम नाहीत ना/का?
सायो, मी ही आमच्याइथल्या
सायो, मी ही आमच्याइथल्या साईटवर बघितली त्या भांड्यांना एनॅमल कोटिंग होते म्हणून मला घ्यावेसे नाही वाटले. कोटिंग असेल तर भांड्यातले आयर्न पदार्थात कसे उतरणार. शिवाय वरुन कृत्रिम लेयर असणे किती चांगले हा प्रश्न आलाच.
मी पकचा स्टीलचा सेट
मी पकचा स्टीलचा सेट घेतला,बहिणीने घेतल्यानंतर्..सॅम्स मधून स्वस्त पडतो बाकी ठिकाणांपेक्षा, आणि बॉक्स जपून ठेवायचा.काहीही प्रॉब्लेम आल्यास सरळ वापस करायचा..पण मला तरी काही अडचण आली नाही, आणि मी सरळ डिशवॉशर मधेच घालते..
Pages