नॉनस्टिकची काळी बाजू

Submitted by वेका on 22 March, 2012 - 18:04

काही वर्षांपूर्वी नॉनस्टीकचं प्रचंड फ़ॅड आलं होतं आणि ते खूप आवडीचंही झालं होतं. त्याच सुमारास ऑफ़िसच्या वुमन्स नेटवर्कने एक सेमिनार ठेवला होता ज्यात नॉनस्टीक वापराचे बरेच तोटे सोदाहरण स्पष्ट केले होते...त्यानंतर मी स्वतः घरात नॉनस्टीक वापरायला बंद केलं..
मला त्यातलं जेवढं आठवलं ते या धाग्यात लिहिते आहे..जाणकारांनी अधीक प्रकाश टाकावा ही विनंती..

त्यांचं म्हणणं होतं की टेफ़्लॉन कोटिंग करताना जे रासायनिक वापरलं जातं ते ही भांडी अधीक उच्च तपमानाला असली की वातावरणात जे वायु सोडतं त्याने कॅन्सरपासून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं तसेच प्रत्यक्ष शिजत असलेल्या पदार्थावरही हे रसायन परीणाम करून अनेक घातक आजार लिव्हर डॅमेज वगैरे होऊ शकतं...आता अर्थात ते जे दुष्मपरीणाम होतात ते इतरही घटकांमधून आपल्या शरीरात जाऊन इजा करू शकतं पण जर तुम्ही रोजच्या रोज जर अन्न नॉन स्टीकमध्येच शिजवून खात असाल तर धोक्याची पातळी स्वतःच स्वतः वाढवल्यासारखं आहे. त्यामुळे हा एक बेसिक बदल मी माझ्या किचनमध्ये केला की सगळी नॉन स्टीक भांडी काढून टाकली आणि स्टील (८/१०) घेतलं. जमेल तिथे कॉपरबेस वालं (म्हणजे हीट डिस्ट्रिब्युशन चांगलं होतं असं म्हणतात)
आणि तव्यांच्या जागी आपला भारतातला एक लोखंडी आणि अमेरीकेतले कास्ट आर्यन (म्हणजे मला वाटतं बीडाचे) सध्यातरी यात काम होतं पण तरी काही ठिकाणी नॉन स्टीकची आठवण होतेच....आणि हे घरातलं नॉन स्टीक बंद करायचं कारण म्हणजे आपण शेवटी बाहेर जाऊन खातोच तर तिथे नॉन स्टीक वापरलं असणार तेवढं एक्सपोजर गृहीत धरून हा अतिरेक बंद केला आहे...
ज्यांना या विषयावर अधीक माहिती असेल त्यांनी नक्की इथे लिहा. किंवा मायाजालावर अनेक इंग्रजी साईट्सवर हीच माहिती आणखी व्यवस्थीत, शास्त्रीय भाषेतही उपलब्ध आहे .....वाचा आणि फ़ायदा करून घ्या..
आणि हो जर तुम्हाला वापरायचीच असतील तर काही लोकं म्हणतात की ही भांडी प्रचंड गरम करू नयेत आणि नुस्तीच तापवू नयेत...म्हणजे सुरुवातीलाच थोडं तेल/तूप/बटत काही तरी घालुन गॅस सीमवर ठेवूनच यात काम करावं ...अर्थात याने तोटे होत नाहीत असं मी वाचलं नाहीये..पण कदाचीत थोडं फ़ार कमी नुकसान होऊ शकत असेल...कल्पना नाही..

हे मी सगळं माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली (अ‍ॅज एक्सपेक्टेड) आमच्यावेळी आपले लोखंडी तवे, कढया होतं तेच सगळ्यात बेस्ट होतं..आजच्या पिढीसारखं आर्यनतरी कमी नसायचं आम्हाला...असो....
इति नॉनस्टीक काळे पुराण.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोसे करुन पाहिलेत का? काय होते? हा तवा जाम तापतो त्यामुळे मध्यम आचेवरच गरम करावा. मग थोडे तेलाचे थेंब टाकुन चमच्याने ते पसरुन आम्ही दोसे करतो. पुर्ण तवाभर नाही करत. बरोबर होतात...

मी सर्वात अज्ञानी... आपण आधी वापरायचो त्या अ‍ॅल्युमिनीअमच्या कढया का नाही वापरायच्या? कुणी सांगेल का मला?... मीही हे सगळे आजच वाचतेय ... आणि स्वतःच्या अज्ञानाचा संताप येतोय... कालच फ्युच्यूराची कढई घेवून आले... हे सगळे वाचून आता पुन्हा अ‍ॅल्युमिनीअमची भांडी वापरावीशी वाटताहेत... पण त्याचेही काही तोटे आहेत का?

मी असं ऐकलय की कोटीन्ग निघालेली नॉन स्टिक भांडी री-कोटींग करून मिळतात. (पुण्यात) कोणी केली आहेत का?

ज्यांच्याकडे इंडक्शन गॅस आहे ते कुठला तवा वापरतात? अमेरिकेत किंवा भारतात मिळत असेल तरी चालेल.
सध्या मी नॉनस्टिकच वापरतेय (नकोय खरं तर), तो बदलायचा आहे मला.

मी स्वयंपाकाला स्टिलची भांडी वापरतेय सगळीच्या सगळी (कढई, पातेली वगैरे) हे ओके ना?

आधीच्या हॉकिंस कोंट्युरा चं कोटिंग निघु लागलं म्हणुन मी कालच हॉकिंस चा नवीन हिंड्यालियम चा कुकर घेतला... नकोच ती कोटिंग केलेली भांडी.. मी तर कुंभाराकडुन मातिची मडकी विकत घ्यायचं म्हणतोय..! Uhoh

हिंडालियम? यात मुख्यत्वे अ‍ॅल्युमिनियम असतं, आणि ते आरोग्यासाठी बरं नाही, असा माझा समज आहे.
या धाग्यावरही अ‍ॅल्युमिनमचा उल्लेख झालाय.

तेच ना... त्यात घरात कॅन्सर सर्वाईव्हर असल्याने मला अजिबात रिस्क घ्यायची नाहीये.
हिंडालियम आणि कोटींगची भांडी नकोच.
बाकी स्वयंपाकासाठी स्टीलची कढई, पातेली वगैरे वापरतेय मी, डोसा आणि पोळी साठी काय वापरावं हा गहन प्रश्न आहे..

मूर्ख ग्लास टॉप चा तवा Angry

दिनेशदा, मातीचा तवा सिजन्ड करावा लागतो का? घेण्याच्या विचारात आहे. लोखंडी तवा घेतलाय पण त्याच्या वर काही केल्या जमत नाहीये. डोसे होतात फक्त व तेलही खूप लागतं

बाकी स्वयंपाकासाठी स्टीलची कढई, पातेली वगैरे वापरतेय मी, डोसा आणि पोळी साठी काय वापरावं हा गहन प्रश्न आहे..>>>
कास्ट आयर्न चा तवा वापरुन पहा. पोळी साठी आणि डोसा साठी. डोसा अगदी छान सुटुन येतो. तवा प्लेन असतो त्यामुळ कॉन्केव्ह तव्यासारखा प्रॉब्लेम येत नाही. फक्त तापमान व्यवस्थित अ‍ॅडजस्ट कराव लागत नाहीतर चपाती करपते पटकन.आणि व्यवस्थित हाताने धुवून ठेवायचा गार झाल्यावरच. मशीन मध्ये नाही.

एक शंका : हार्ड अ‍ॅनोडाईज्ड भांडी का नाही वापरायची ? अ‍ॅल्युमिनिअम वर कोटींग म्हणुन का ?

चपातीसाठी लोखंडी तवा मिळतो. बिडाचं भिडं मिळतं.
ग्लास टॉपवर हे चालणार नाहीत का? >>> नाही ना , म्हणून तर घोडं आडतंय Sad

मी वापरलाय ग्लासटॉपवर कास्ट आयनचा तवा. काही अडचण आली नव्हती.
>> कुठुन घेतलेलं? लिंक आहे का? फोटो टाकू शकाल का कसा आहे ते

रीया, ग्लास टॉप म्हणजे इलेक्ट्रीक ना? मग त्यावर काहीही चालतं की. फक्त फ्लॅट बॉटम असलेलं बरं नाहीतर डुगडुगत हिंदकळत रहातं.

थँक्स सीमा. लगेच ऑर्डर करते Happy

सायो , अगं नाही.. कॉपर वगैरे चा बेस असलेली भांडी तर अजिबातच चालली नाहीत ( इलेक्ट्रिकल म्हणजे ते अपेक्षित असावं) पण एक भारतातुन आणलेल्या कॉईल वर चालणार्‍या कढया खालून जळल्या Sad

मी केला हा वरचा ऑर्डर, आता आला की बघते जमतोय का Happy आयेम सो हॅपी, बरेच दिवस डोक्याला भुंगा लागलेला Happy

कदाचित ही चर्चा आधी झाली असेल, पण आता वाचायला खरोखर वेळ नाही. मी मिटिंगमध्ये आहे आणि नवरा शिकागोवरून निघाला आहे, त्यामुळे त्याला 3-4 तासात हो किंवा नाही उत्तर हवं आहे.

त्याला मी काही स्टोन pans आणायला सांगितले होते. त्याने अल्युमिनियम बेस सिरॅमिक कोटेड सेटचा फोटो पाठवला आहे. मला सांगा सिरॅमिक पॅन्स वापरणं योग्य की अपायकारक? त्याचा कोट किती टिकतो (सिलिकॉनचे डाव चमचे वापरते आणि जंटल वॉशची योग्य काळजी घेतली जाते) त्याचा कोट निघायला लागल्यावर ती pans लगेच फेकावी लागतात का? आणि सगळ्या प्रकारचं ( आंबट, गोड, कोरडं, तेलकट) ही pans चांगली असतात का?

पुढे येणारे प्रतिसाद वाचू शकेन पण उत्तर देऊ शकणार नाही, म्हणून सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आताच आभार मानते Happy

Pages