आर गॉर्जच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आपण र्होन ग्लेशियरकडे जाणार आहोत. या साठी आपल्याला
ग्रिमसेल पास, फुरका पास इथून जावे लागणार आहे. ग्लेशियर नुसती लांबूनच नाही बघायची तर अगदी तिच्या पोटातल्या निळाईत शिरायचे आहे.
इथे आपल्याला एकावर एक अशी दोन धरणे लागणार आहेत. त्या धरणाच्या बॅकवॉटरमधल्या बेटावर आपण जाऊ.
इथे आणखी एक मजेशीर गोष्ट कळली. इथे खालच्या धरणातले पाणी एकदा वीजनिर्मिती झाल्यावर परत वरच्या धरणात पंपाने नेतात. आता यात आपल्याला काहीतरी खटकणारच कारण पंपासाठी परत वीज वापरावी
लागणार. पण ज्या काळात वीजेची मागणी जास्त असते त्या काळात असे पंपाने वर पाणी नेणे त्यांना परवडते कारण त्या पीक अवर्स मधे वीजेचा दरही जास्त असतो. शिवाय असे केल्याने पाणी गोठत नाही.
त्या दोन धरणावरचे एक सरोवर मात्र हिवाळ्यात गोठते. या उन्हाळ्यातही आपल्याला तिथे हिमनग दिसतील.
स्विसमधल्या ग्लेशियर एक्स्प्रेस बद्दल वाचले असेलच. तिचा एकंदर प्रवास साडेसात तासाचा असल्याने आपल्याकडे तेवढा वेळ नाही. ( नाव जरी एक्स्प्रेस असले तरी ती तशी संथपणेच जाते आणि ती ज्या परीसरातून जाते तिथले प्रत्येक दृष्य देखणे आहे. यू ट्यूबवर तो प्रवास आहे. )
सध्या जी ग्लेशियर एकस्प्रेस आहे ती आधुनिक आहे आणि तिचा बराचसा प्रवास बोगद्यातून होतो. पण एक
फायदा असा कि ती वर्षभर चालू असते. त्या पुर्वीची ग्लेशियर एकस्प्रेस जमिनीवरून जात असे पण ति केवळ उन्हाळ्यात म्हणजेच २/३ महिनेच चालत असे. आधुनिक ट्रॅक बनल्यावर जुनी मोडीत निघाली पण तिचे ट्रॅक्स शाबूत होतेच.
स्विसमधल्या हौशी लोकांना तिची फार आठवण येत असे म्हणून त्यांनी मोडीत निघालेली इंजिन्स, व्हीएटनाम वरुन परत आणली आणि केवळ हौसेखातर ( अर्थात केवळ उन्हाळ्यात, आणि वीकेंड्सनाच ) ती परत चालवली जातेय.
ती जिथे संपत असे तिथेच ही ग्लेशियर संपत असे पण आता, ती थोडी मागे सरकलीय.
हे आहे ते धरण. यापले पाणी शेवाळामूळे नाही तर खनिजांमूळे हिरवे दिसतेय.
हे वरचे धरण
आपण त्या धरणावरच्या बेटावर आहोत. पुर्वी कामगारांसाठी बांधलेले हॉस्टेलचे आता हॉटेल जालेय.
धरणाच्या पाण्याच्या पातळी पर्यंत जायची सोय आहे. धरणाच्या सुरक्षिततेचा फारसा बाऊ केलेला दिसत नाही.
कदाचित छुपे कॅमेरे असतील.
वर जायचा रस्ता
बर्फाचे तळे
तळ्याचा रम्य परीसर
तळ्यातला हिमनग. याच्या पाठीवर बसून सफरीवर निघावे असे वाटतेय ना ?
तिथेच खालच्या पातळीवर आणखी एक सरोवर आहे.
इथे फार रेंगाळता येणार नाही, पावसाची लक्षणे दिसताहेत आणि आपल्यावर पार तिकडे जायचे आहे.
वरुन दिसणारी र्होन नदी
शिट्ट्या वाजवून हे साहेब आपले स्वागत करतात
रस्त्याला समांतर जाणारा दिसतोय तो जुन्या ग्लेशियर एक्स्प्रेसचा ट्रॅक.
र्होन ग्लेशियरचे प्रथम दर्शन. असे एखादे दृष्य मी आयुष्यात कधीतरी प्रत्यक्ष बघेन, असे माझे स्वप्न होते.
वरुन काळीकबरी दिसणारी हि ग्लेशियर पोटात अथांग निळाई बाळगून आहे. ( आपण जाणार आहोत तिथे. )
खाली जायला अत्यंत सुरक्षित अशी वाट आहे. ( वाट सोडली नाही तरच )
इथे आपण जरा रेंगाळू, दूरवरचे दृष्य मनात साठवून घेऊ.
बर्फाच्या अंतरंगात एक प्रकारची अल्गी वाढते आणि तिच्यामूळे बर्फाला असा सुंदर गुलाबी रंग येतो.
ग्लेशियरच्या पोटात एक गुहा केली आहे. चक्क १०० मीटर्स आत जाऊ शकतो आपण. हातात हातमोजे मात्र लागतील.
पायाखाली भक्कम आधार आहे.
हा तिथला नैसर्गिक रंग आहे. मी फ्लॅश वापरलेला नाही. ( तो माणूसही खरा आहे )
वाटेला कठडा नाही पण अवघड चढावर अगदी सहज एकमेकांना हात दिला जातो. तिथल्या जादुई वातावरणात, समोर दिसणारी प्रत्येक व्यक्ती मित्र होऊन जाते.
पहिल्या फोटोत लक्षात आले नसेल तर आता नीट बघा. या सर्व गुहेवर पांढर्या कापडाचे आच्छादन आहे.
अर्थात सुरक्षिततेसाठी. आपल्या आणि ग्लेशियरच्याही !
आणि त्या परीसरातही अशी देखणी फुले फुललेली आहेत. अगदी त्या वाटेवरच !
तिथे एक सुंदर हॉटेलही आहे. इथे बसून आपण मस्तपैकी हॉट चॉकलेट पिऊ.
तिथले सुंदर फर्निचर
हि बस एका जर्मन हौशी ग्रुपची आहे. आत सर्व सुविधा आहेत आणि तो ग्रुप हि बस घेऊन थेट हिमालयापर्यंत येत असतो.
बघा पावसाने गाठलेच आपल्याला.
परत एकदा र्होनचे दर्शन !
हाऊ ग्रीन इज दॅट व्हॅली
अप्रतिम .....फक्त बघत रहावेसे
अप्रतिम .....फक्त बघत रहावेसे वाटते..
मस्त प्रचि. फुरका पास पण छान
मस्त प्रचि.
फुरका पास पण छान आहे. बायकर्स च्या आवडीचा. तिथले काही ब्रिजेस आणि डोंगराच्या कपारीत असलेले दुसर्या म.युद्धातले रिट्रिट कॅम्प्स पण पहाण्यासारखे. मी शोधून टाकते प्रचि.
काय बोलणार? धन्यवाद!
काय बोलणार? धन्यवाद!
हो इन्ना, सायकलस्वार सगळीकडेच
हो इन्ना, सायकलस्वार सगळीकडेच दिसतात. तिथे सायकल कुठलेही भाडे न भरता वापरायला मिळतात. वापरुन झाल्या कि स्टँडवर ठेवून द्यायच्या. तसे फोटो पण आहेत पण फोटोंचा अतिरेक होईल, म्हणून नाही टाकत.
वाह ! मस्त आहेत प्रचि.. निळा
वाह ! मस्त आहेत प्रचि.. निळा रंग कसला जबरी आहे !
मस्त. ग्लेशियरच्या पोटातली
मस्त.
ग्लेशियरच्या पोटातली निळाई तर सुंदरच ... मला ही अशी निळाई एव्हरेस्टला कुठेच नाही दिसली
मस्त
मस्त
वॉव! दिनेशदा.. मस्त सफर
वॉव! दिनेशदा.. मस्त सफर घडवलीत .. माझं ड्रीम प्लेस आहे हे.. कधी जाणार काय माहिती
ग्लेशियरची गुहा मस्तच. ती
ग्लेशियरची गुहा मस्तच. ती पांढरी-पिवळी फुलं पण छान.
सुंदर
सुंदर
मस्तच दिनेशदा!! तुम्ही
मस्तच दिनेशदा!!
तुम्ही कोणत्या एक्स्प्रेसने प्रवास केलात जुन्या की नव्या?
सुरेख आहेत सगळेच फोटो !
सुरेख आहेत सगळेच फोटो !
युकेत असताना स्वित्झर्लंडला जाऊ जाऊ म्हणत गेलोच नाही. त्यावेळी तिथले जे फोटो पाहण्यात आले ते बघून जावे असे तीव्रतेने वाटलेही नाही. हे फोटो बघून मात्र जायला हवे होते असे वाटतेय
मस्त फोटोज. आवडले. सफर जोरदार
मस्त फोटोज. आवडले. सफर जोरदार चालू आहे तुमची.
निळाई मस्तच.
निळाई मस्तच.
खुपच सुरेख प्रकाश चित्रे
खुपच सुरेख प्रकाश चित्रे .निसर्गाच्या विविधतेचि हिच तर खरी कमाल. जणु नभ धरतिवर उतरले.
अप्रतीम फोटो! ग्लेशियरातली
अप्रतीम फोटो! ग्लेशियरातली निळाई मस्तच!
ब्रेथटेकिंग!!!!श्वासरोधक!!!!स
ब्रेथटेकिंग!!!!श्वासरोधक!!!!स्पीचलेस!!!!
मस्त निळाई. सुंदर फोटोज.
मस्त निळाई. सुंदर फोटोज.
मस्त
मस्त
अहाहाहा!! अप्रतिम...
अहाहाहा!! अप्रतिम...
वा! मस्त. जायलाच हवे.
वा! मस्त. जायलाच हवे.
सुंदर! फुलं खूपच छान आली
सुंदर! फुलं खूपच छान आली आहेत. ग्लेशियरच्या निळाईकडे बघत रहावसं वाटतयं. खूप छान माहिती न फोटो दिनेशदा. पुन्हा धन्यवाद
खुप सुंदर फोटो.... मलाही आता
खुप सुंदर फोटो.... मलाही आता जावेसे वाटायला लागले
अतीशय सुरेख आहेत प्रकाश
अतीशय सुरेख आहेत प्रकाश चित्रे.
ग्लेशीयरच्य पोटात जायला आवडले.
सर्व फोटो सुंदर!! निळा रंग
सर्व फोटो सुंदर!!
निळा रंग अद्भुत आहे!पण एवढा निळा कशामुळे होत असावा?
खुप सुंदर फोटोज , धन्यवाद !
खुप सुंदर फोटोज , धन्यवाद !
मस्त फोटो! गुहा आवडली. Basel
मस्त फोटो! गुहा आवडली.
Basel ला गेला की नाही?
मस्त, मस्त, मस्तच.
मस्त, मस्त, मस्तच.
दिनेशदा, अप्रतिम. त्या
दिनेशदा, अप्रतिम. त्या कबर्या रंगाच्या पोटातला निळा रंग दाखवणारा फोटो अतिशय आवडला.
दिनेशदा अतिशय सुरेख आहेत
दिनेशदा अतिशय सुरेख आहेत सगळेच फोटो. हॅट्स ऑफ टू यू.
Pages