स्विस सहल - भाग १/२ इन टु द आल्प्स - र्‍होन ग्लेशियर

Submitted by दिनेश. on 12 August, 2013 - 05:00

आर गॉर्जच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आपण र्‍होन ग्लेशियरकडे जाणार आहोत. या साठी आपल्याला
ग्रिमसेल पास, फुरका पास इथून जावे लागणार आहे. ग्लेशियर नुसती लांबूनच नाही बघायची तर अगदी तिच्या पोटातल्या निळाईत शिरायचे आहे.

इथे आपल्याला एकावर एक अशी दोन धरणे लागणार आहेत. त्या धरणाच्या बॅकवॉटरमधल्या बेटावर आपण जाऊ.
इथे आणखी एक मजेशीर गोष्ट कळली. इथे खालच्या धरणातले पाणी एकदा वीजनिर्मिती झाल्यावर परत वरच्या धरणात पंपाने नेतात. आता यात आपल्याला काहीतरी खटकणारच कारण पंपासाठी परत वीज वापरावी
लागणार. पण ज्या काळात वीजेची मागणी जास्त असते त्या काळात असे पंपाने वर पाणी नेणे त्यांना परवडते कारण त्या पीक अवर्स मधे वीजेचा दरही जास्त असतो. शिवाय असे केल्याने पाणी गोठत नाही.

त्या दोन धरणावरचे एक सरोवर मात्र हिवाळ्यात गोठते. या उन्हाळ्यातही आपल्याला तिथे हिमनग दिसतील.

स्विसमधल्या ग्लेशियर एक्स्प्रेस बद्दल वाचले असेलच. तिचा एकंदर प्रवास साडेसात तासाचा असल्याने आपल्याकडे तेवढा वेळ नाही. ( नाव जरी एक्स्प्रेस असले तरी ती तशी संथपणेच जाते आणि ती ज्या परीसरातून जाते तिथले प्रत्येक दृष्य देखणे आहे. यू ट्यूबवर तो प्रवास आहे. )

सध्या जी ग्लेशियर एकस्प्रेस आहे ती आधुनिक आहे आणि तिचा बराचसा प्रवास बोगद्यातून होतो. पण एक
फायदा असा कि ती वर्षभर चालू असते. त्या पुर्वीची ग्लेशियर एकस्प्रेस जमिनीवरून जात असे पण ति केवळ उन्हाळ्यात म्हणजेच २/३ महिनेच चालत असे. आधुनिक ट्रॅक बनल्यावर जुनी मोडीत निघाली पण तिचे ट्रॅक्स शाबूत होतेच.

स्विसमधल्या हौशी लोकांना तिची फार आठवण येत असे म्हणून त्यांनी मोडीत निघालेली इंजिन्स, व्हीएटनाम वरुन परत आणली आणि केवळ हौसेखातर ( अर्थात केवळ उन्हाळ्यात, आणि वीकेंड्सनाच ) ती परत चालवली जातेय.
ती जिथे संपत असे तिथेच ही ग्लेशियर संपत असे पण आता, ती थोडी मागे सरकलीय.

हे आहे ते धरण. यापले पाणी शेवाळामूळे नाही तर खनिजांमूळे हिरवे दिसतेय.

तेच धरण

हे वरचे धरण

आपण त्या धरणावरच्या बेटावर आहोत. पुर्वी कामगारांसाठी बांधलेले हॉस्टेलचे आता हॉटेल जालेय.

धरणाच्या पाण्याच्या पातळी पर्यंत जायची सोय आहे. धरणाच्या सुरक्षिततेचा फारसा बाऊ केलेला दिसत नाही.
कदाचित छुपे कॅमेरे असतील.

वरुन येणारा प्रवाह

वर जायचा रस्ता

बर्फाचे तळे

तळ्याचा रम्य परीसर

तळ्याचा परीसर

तळ्याचा परीसर

तळ्यातला हिमनग. याच्या पाठीवर बसून सफरीवर निघावे असे वाटतेय ना ?

तिथेच खालच्या पातळीवर आणखी एक सरोवर आहे.

इथे फार रेंगाळता येणार नाही, पावसाची लक्षणे दिसताहेत आणि आपल्यावर पार तिकडे जायचे आहे.

वरुन दिसणारी र्‍होन नदी

शिट्ट्या वाजवून हे साहेब आपले स्वागत करतात Happy

रस्त्याला समांतर जाणारा दिसतोय तो जुन्या ग्लेशियर एक्स्प्रेसचा ट्रॅक.

र्‍होन ग्लेशियरचे प्रथम दर्शन. असे एखादे दृष्य मी आयुष्यात कधीतरी प्रत्यक्ष बघेन, असे माझे स्वप्न होते.

वरुन काळीकबरी दिसणारी हि ग्लेशियर पोटात अथांग निळाई बाळगून आहे. ( आपण जाणार आहोत तिथे. )

खाली जायला अत्यंत सुरक्षित अशी वाट आहे. ( वाट सोडली नाही तरच Happy )

इथे आपण जरा रेंगाळू, दूरवरचे दृष्य मनात साठवून घेऊ.

बर्फाच्या अंतरंगात एक प्रकारची अल्गी वाढते आणि तिच्यामूळे बर्फाला असा सुंदर गुलाबी रंग येतो.

ग्लेशियरच्या पोटात एक गुहा केली आहे. चक्क १०० मीटर्स आत जाऊ शकतो आपण. हातात हातमोजे मात्र लागतील.

पायाखाली भक्कम आधार आहे.

हा तिथला नैसर्गिक रंग आहे. मी फ्लॅश वापरलेला नाही. ( तो माणूसही खरा आहे Happy )

वाटेला कठडा नाही पण अवघड चढावर अगदी सहज एकमेकांना हात दिला जातो. तिथल्या जादुई वातावरणात, समोर दिसणारी प्रत्येक व्यक्ती मित्र होऊन जाते.

पहिल्या फोटोत लक्षात आले नसेल तर आता नीट बघा. या सर्व गुहेवर पांढर्‍या कापडाचे आच्छादन आहे.
अर्थात सुरक्षिततेसाठी. आपल्या आणि ग्लेशियरच्याही !

आणि त्या परीसरातही अशी देखणी फुले फुललेली आहेत. अगदी त्या वाटेवरच !

तिथे एक सुंदर हॉटेलही आहे. इथे बसून आपण मस्तपैकी हॉट चॉकलेट पिऊ.

तिथले सुंदर फर्निचर

हि बस एका जर्मन हौशी ग्रुपची आहे. आत सर्व सुविधा आहेत आणि तो ग्रुप हि बस घेऊन थेट हिमालयापर्यंत येत असतो.

बघा पावसाने गाठलेच आपल्याला.

परत एकदा र्‍होनचे दर्शन !

हाऊ ग्रीन इज दॅट व्हॅली Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ हो हो हो - काय अप्रतिम नजारा आहे निसर्गाचा.... आणि तुम्ही तो टिपलायही मस्तच ....

आभार दोस्तांनो, बेसल प्रमाणेच जिनिवा, रिगी, फिलाट्स राहिलेच. ते पुढच्या ट्रिपमधे करीन. नाहीतरी परत जायला निमित्त हवेच ना ?

पुढच्या भागात मानवाच्या चिकाटीचे प्रतीक असलेल्या, डेव्हिल्स ब्रिजला आपण भेट देणार आहोत.

व्वा! अप्रतिम! Happy
गुलाबी रंगाचा बर्फ़, निळी गुहा, निळाई, हिरवाई, हॊटेल, फ़र्निचर, सर्व फ़ारच सुंदर! आणि हे सगळे आम्हाला इथे बसून बघायला मिळाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद! Happy

<<व्वा! अप्रतिम!
गुलाबी रंगाचा बर्फ़, निळी गुहा, निळाई, हिरवाई, हॊटेल, फ़र्निचर, सर्व फ़ारच सुंदर! आणि हे सगळे आम्हाला इथे बसून बघायला मिळाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद!<< +१०००००००

Pages