विविध­ दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य

Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. 'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. वाचते.
गेल्या वर्षभरात कुणाचे कुठे छापूनच आले नाही की वाचले नाही की वाचल्यावर उल्लेखनीय वाटले नाही Wink

.

ह्या माहिन्याच्या माहेरच्या अंकात शोनू आणि नंदिनी ह्यांच्या कथा आल्या आहेत. चिन्मयचा अन्नं चा लेख आहेच. शोनूची 'बेनझिर' ही कथा आहे. नंदिनीच्या कथेचं नाव आठवत नाहीये. नंदिनीच्या आधी वाचलेल्या कथांपेक्षा वेगळा विषय आहे.

माहेरच्या अंकात साहित्य छापून आल्याबद्दल ह्या सर्व लेखकांचे अभिनंदन. Happy

माहेरच्या दिवाळी अंकात चिन्मय, साजिरा आणि वरदा ह्यांचे लेखन येणार आहे असं जाहिरातीत वाचलं त्याबद्दल त्यांचे आगाऊ अभिनंदन. लेख वाचल्यावर लिहिनच... Happy

मटातर्फे पत्र लिहिण्याची स्पर्धा / उपक्रम घेतला होता. माझ्या लेकीने (इरा देवकुळे) शेक्सपीअरला पत्र लिहिले होते. ते आज मटामध्ये छापून आले आहे.

शोनूतै, नंदु अभिनंदन! चिन्मयला किती वेळा करणार? Happy तरीपण, अभिनंदन :):)
नताशा, इराचं मनापासून कौतुक.

नंदिनीच्या कथेचं नाव आठवत नाहीये. नंदिनीच्या आधी वाचलेल्या कथांपेक्षा वेगळा विषय आहे.
>> सालंकृत नाव आहे.

धन्यवाद पराग आणि चिन्नू.

नताशा, इराचे अभिनंदन.

मी नताशा,
अगं मी वाचले की ते पत्र! सहावीत आहे ना तुझी मुलगी इरा! छान लिहिले आहे. आणि तिने एवढ्या लहान वयात शेक्सपियर वाचला म्हणजे कमालचं आहे. हुशार आहे की तुझी लेक. Happy अभिनंदन.

युनिक प्रकाशनच्या विशेष पर्यटनपर अंक " मुशाफीरी " ( सध्या स्टॉलवर आहे ) माझा ऑस्ट्रिया वरील प्रवासवर्णनपर लेख आला आहे.मासिकातील शेवटचा लेख.

एकुणात माहेरवर माबोकरांचं अतिक्रमण झालंय म्हणायला हरकत नसावी Proud

पराग, आगाऊ अभिनंदनाबद्दल आगाऊ धन्यवाद. म्हणजे नंतर लेख आवडला नाही तरी चालेल... अक्षरशः तगादा लावून लिहून घेतल्याने बर्‍यावाईटाचे निम्मे श्रेय चिनूक्सास हे आधीच सांगून ठेवते.

मी नताशा - इथे लेकीच्या लेखाची लिंक दे ना..

वरदा, चिन्मय, साजिरा, रेव्ह्यु, नताशा हार्दिक अभिनंदन. Happy
माझा एक लेख येणार आहे एका दिवाळी अंकात. प्रकाशित झाला की सांगेन.

रैना, रेव्यु - अभिनंदन Happy

मध्यंतरी माझा एक आर्किऑलॉजीशी संबंधित सर्वसामान्य वाचकांसाठी लिहिलेला नागर्जुनकोन्डा उत्खननावरचा लेख हेरिटेज इंडिया नामक त्रैमासिकात प्रसिद्ध झाला. अर्थातच हे पोटभरू पातळीवरचं लिखाण आहे, साहित्य नव्हे

सर्व होतकरूना/ मित्राचे/हितचिंतकांचे अभिनंदन
लौकरच माझी
१) आर्ट ऑफ वॉर वरील भाष्य
२) यू कॅन सेल- शिव खेरा-भाषांतरित
३) मजेत जगा- डीअन पांडे -भाषांतरित
४) आयुर्वेदिय गर्भसंस्कार- इंग्रजीत भाषांतर (प्रकाशित)
५)स्टीव्ह जॉब्झ- संकलित
६) बिजिनेस स्ट्रॅटेजी- इंग्रजी
ही पुस्तके प्रकाशित होत आहेत
झाल्यावर आणखी सविस्तर कळवेन

चिन्नु, नंदिनी, रैना धन्यवाद.

माधवी_नयनीश - हो हुषार आहे. माझ्यावर गेली आहे ना:)
वरदा, मेधा - लेकीच्या लेखाची लिंक नाहीये. स्कॅन कॉपी इथे चिकटवीन.

रेव्यु - अभिनंदन. तुझी जरा कमीच पुस्तके प्रकाशित होत आहेत Happy

माहेरचा अन्नपूर्णा विशेषांक वाचला..
नंदिनी आणि जागूचे लेख आहेत यंदाच्या अंकात.. नंदिनीचा ख्रिसमस फराळाबद्दलचा लेख भारी आहे.. मस्त माहिती आणि एकदम तोंपासो पदार्थांची यादी.. Happy
जागूच्या बालपणीच्या शेती विषयक आठवणींबद्दलचा लेख फार सुंदर झालाय ! शेतातलं सगळं वातावरण अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं..

अंकात लेख छापून आल्याबद्दल दोघींचेही अभिनंदन..
(जागूचा चुलीबद्दलचा लेख अन्नपूर्णा विशेषांकात जास्त शोभला असता का? )

तसच अंकात आर्चिस काशीकर नावाच्या मुलाचा लेख आहे.. तो आपल्या काशीचा मुलगा का?

धन्यवाद.

पराग चूलीवरचा लेख लोकसत्तामध्ये प्रसारीत झालेला असल्यामुळे तो माहेर मासीकात देता आला नाही.

Pages