विविध­ दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य

Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. 'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मित्रांनो. Happy एवढ्या शुभेच्छा बघून काय वाटतंय ते शब्दांत नाही सांगता यायचं. मधल्या काळात माझ्या बंद पडलेल्या लिखाणाची पुन्हा नव्याने सुरुवात मायबोलीमुळेच झाली आहे. तिचे किती आभार मानावेत तेही कळत नाही आहे.
पन्नास वर्षे जुन्या आणि तितकीच वर्षे स्वतःचा खास वाचकवर्ग सांभाळून असलेल्या 'माहेर'ने नव्या रुपात वाचकांसमोर जायचं ठरवलं, त्यासोबत नवा, फ्रेश फील असलेले लिखाण आणि वेगळ्या शैलीचे लेखक समाविष्ट करायचं ठरवलं तेव्हा 'मायबोली'वरचे लेखक त्यांना नवीन 'माहेर'साठी योग्य वाटले, यातच काय ते आलं. फेब्रुवारीचा अंक जानेवारीपेक्षाही चांगला येणार, शिवाय त्यात आणखी काही मायबोलीकर लेखक दिसतील अशी आशा आहे.

सर्वांचे मनापासून पुन्हा आभार मानतो. Happy

इथे लिंक दे की आशू डी.>>>
आभासी जालावरून साहित्य 'प्रिन्ट'मध्ये येणं ही खूप मोठी अचिव्हमेन्ट आहे!>>> हे वाच की मीनु. Uhoh

सिंडे नक्की आणतो. Happy

माझी "हाऊसकीपर" ही कथा "मिळून सार्‍याजणी" च्या जानेवारी २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे..
हीच कथा इथे माबोवरही आहे.

जयश्री, एच एच, मामी, नी, अगो, रूपाली सर्वांचे आभार.
आणि मामी, अंक पाठवते पाहिजे तर पण संयुक्तामधेच "मिळून सार्‍याजणी" त लिंक दिली आहे.

अभिनंदन. महत्त्वाचे म्हणजे लेखकूंचे फोटो पण आहेत.

चिनुक्सच्या लेखात शेवटच्या पानावर त्याचे चिंतनात्मक भाष्य आहे ते खूप चांगले उतरले आहे. श्र ची कथा पण खूप अस्वस्थ करून गेली. चमन व साजिरा च्या कथा पण छान उतरल्या आहेत.

'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे.

या सार्‍यांच हार्दिक अभिनंदन. Happy

साजिर्‍या मस्त बातमी...
पुनम्,आशुडी, चिनुक्स आणी मिनोती.... चौघांचे ही हार्दीक अभिनंदन...

अभिनंदन पब्लिक Happy लगे रहो सभिच्च...मस्त वाटतय आपल्यापैकीच लोकांच लिखाण प्रकाशित झाल्याच वाचून.

आशूडी, पूनम, चिन्मय,मिनोती........खुप्प खुप्प अभिनंदन Happy

Pages