विविध­ दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य

Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. 'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेर सोडून इतर मासिकांच्यात पण येतंय माबोकरांचं साहित्य.
ललिचं लिखाण येतंय स्त्री मधे हल्ली रेग्युलरली. सदर असं नाही पण १-२ महिन्यांच्या अंतराने असतोच लेख तिचा स्त्री मधे. या फेब्रुवारीच्या स्त्री मधे पण आहे.
त्याची दखल कुठे घ्यायची?
धाग्याचं नाव बदलल्यास कसे?

सर्वांचं अभिनंदन. माझ्या आईनंही फेब्रुवारीच्या माहेरमधले लेख वाचून मला फोन करून विचारलं.

नीरजा... Happy ('स्त्री' मधल्या लेखांची नोंद मी त्या-त्या मायबोली लिंकवर केलेलीच आहे.)

धाग्याचं नाव आधी 'शुभेच्छा' असंच होतं. पण ते आता आहे तसं करण्यात आलं. आशूने नाही बदललं आणि ते Happy 'शुभेच्छा' बाफ असल्यास सर्वांना शुभेच्छा, सर्व कारणांसाठी शुभेच्छा एकाच जागी देता येतील असाच ह्या धाग्याचा उद्देश होता.

ललिता, अभिनंदन Happy

अरे मी कधी म्हणलं आशूने बदललं म्हणून?
केवळ 'माहेर' मासिकापुरता धागा ठेवायचा तर मग ज्यांचं ज्यांचं जिथे जिथे छापून येईल तेवढे धागे करावे लागतील म्हणून एकुणात 'नियतकालिकात माबोकरांचे साहित्य' असे नाव केल्यास बरे होईल ना?
एवढंच म्हणतेय मी.
आता ज्याच्या हाती पावर आहे त्याला पटल्यास त्याने बदलावे... Happy

'शुभेच्छा' बाफ असल्यास सर्वांना शुभेच्छा, सर्व कारणांसाठी शुभेच्छा एकाच जागी देता येतील >>>>
Uhoh मग वाढदिवस आणि तत्सम कारणांसाठीही इथेच शुभेच्छा येतील मग.. काही भरवसा नाही.

आणि आधी 'अभिनंदन' असं शीर्षक होतं गं या बाफचं Happy

बर सूचना मागे.
माहेर सोडून इतर मासिके, दैनिकांसंदर्भाने वेगळा धागा काढण्याबद्दल विचारते अ‍ॅडमिनना.

कालच 'माहेर'चा फेब्रुवारीचा अंक वाचला. इथे वाचलेल्या कथा परत वाचल्यावरही आवडल्या. पूनम, आशू, चिनूक्स आणि मिनोती...अभिनंदन आणि शुभेच्छा!

असे कळले आहे की 'माहेर' च्या मार्च अंकात 'नीधप, अश्विनीमामी, चिनूक्स, श्रद्धा, पूनम, मानुषी, अनिशा या मायबोलीकरांचे लिखाण आहे आणि संकल्प द्रविड यांचे मुखपृष्ठ आहे.

सर्वांचे हार्दिक अभिनंदन. Happy

आशू- प्लीज धाग्याच्या डोक्यावर हे टाकशील?

ललिता- हार्दिक अभिनंदन.

प्लीजच ते लेटेस्ट माहेरचे मुखपृष्ठ पण टाका ना, काय देखणे आहे.

सर्व लेखक/लेखिकांचे आणि मुखपृष्ठकाराचे अभिनंदन.

छानच Happy

संकल्पाने केलेलं हे 'माहेर'चं मुखपृष्ठ -
maher_march2011 copy.jpg

'स्त्रियांचं राजकारण' अशी अंकाची मध्यवर्ती संकल्पना होती. 'वायांग कुलीत' या इंडोनेशियन बेटांवर लोकप्रिय असणार्‍या बाहुल्यांच्या छायानाट्याच्या शैलीतलं हे चित्र आहे.

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

मस्तच मुखपृष्ठ आहे. पुन्हा अभिनंदन सर्वांचे!

इन लाइटर मूड...

स्त्रियांचं राजकारण>>> माहेरलाही या विषयाची दखल घ्यावीशी वाटलीच शेवटी! Lol

आताच 'माहेर'चा मार्चचा अंक बघितला. संकल्प द्रविडचे अत्यंत सुंदर आणि कल्पक मुखपृष्ठ बघून खूप छान वाटले. Happy

त्याशिवाय खालील मायबोलीकरांचे लेखन या अंकात आहे.

'चाकोरीबाहेर' या सदरात-
'अफलातून रंगभूषा 'विक्रम'कार गायकवाड' - संवाद (चिनूक्स)

'स्त्रियांचं आणि स्त्रियांमधलं राजकारण'- या 'माहेर'च्या या महिन्याच्या 'थीम'ला अनुसरून-
'कर्ता' - कथा (मानुषी)
'या मालिकेतील सर्व पात्रे घटना काल्पनिक नाहीत' - ललित (श्रद्धा)
'आतली गोष्ट' - लेख (नीधप)
'साहित्यातील बाई' - लेख (अनिशा)
'स्त्रियांमधील राजकारणाची एक अपूर्ण मीमांसा' - लेख (अश्विनीमामी)
'काबीज' - कथा (पूनम)

या सर्व मायबोलीकरांचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.:)

अरे व्वा!! सह्हीच Happy

सगळ्यांचे अभिनंदन Happy आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

या कथा, लेख इथेही टाका म्हणजे आम्हालाही वाचायला मिळतिल Happy

Pages