Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्ट्रेस बस्टर धागा ! रिया
स्ट्रेस बस्टर धागा !
रिया कविता मस्त
इतरांच्याही प्रतिक्रिया मजेशीर.
भारी आहेत प्रतिसाद सगळे अजुन
भारी आहेत प्रतिसाद सगळे
अजुन एक उपाय , त्याला दररोज मायबोलीवरची एक कविता ( आयडी नव्हे) ऐकवायची . सुरुवात 'पाणी लावुन हजामत ' पासुन करा.
२००८ मधे बिहारच्या
२००८ मधे बिहारच्या आरोग्यमन्त्र्यान्नी उन्दराचा आहारात सामावेश करण्याचे पोट्तिडकीचे आवाहन जनतेला केले होते.
उन्दराचा आहार हा अधिक प्रोटिनयुक्त, चवदार, स्वादिष्ट असतो असा त्यान्चा दावा होता... त्यामुळे रॅट करी, रॅट कढाई, रोस्टेड रॅट, रॅट राईस, रॅट टिक्का मसाला असे मेनू हॉटेलात/ खानावळित बघायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. पशुपालन करणारे उन्दरान्च्या शेतीचा धन्द्यासाठी विचार करु शकतात...
सन्दर्भासाठी लिन्का देत आहे.
http://www.indianexpress.com/news/bihar-restaurants-to-serve-rat-meat-as...
http://www.alarabiya.net/articles/2008/08/18/55065.html
अजुन एक उपाय , त्याला दररोज
अजुन एक उपाय , त्याला दररोज मायबोलीवरची एक कविता ( आयडी नव्हे) ऐकवायची .
----- कविता कुणाची एकवायची हे पण सान्गा आता...
अॅडमीन - हा धागा घर पहावे बान्धुन मधे हलवता येणार का ह्यावर विचार व्हावा असे वाटते. रहाण्यासाठी नवे/ जुने घर घेणार्याना अशा समस्याना सामोरे जावेच लागणार आहे, आणि सर्व घरासबन्धी माहिती एकत्र मिळेल.
>> "कांची नरद राजा" हो हो, हे
>> "कांची नरद राजा"
हो हो, हे मीही पाहिलंय.
दमुन झोपलेत वाटत सगळे. आता
दमुन झोपलेत वाटत सगळे. आता सुमेधाचा उंदीर बाहेर आला असेल
रीया.. लाजो ... महान! मस्त
रीया.. लाजो ... महान!
मस्त दंगा चालूहे.
सुमेधा वरील कोणत्या उपायाकरता
सुमेधा वरील कोणत्या उपायाकरता कोणते संरक्षक आवरण वा शस्त्र वापरावे या विचारात असताना, तो बाफनायक, शेपटी सांभाळत "बाप्पा, मला वाचवा" म्हणत पळून गेला असावा.
भयानक उपाय नि धम्माल प्रतिसाद
भयानक उपाय नि धम्माल प्रतिसाद
आमच्याकडे मागच्याच आठवडयात उंदीरमामा आले आहेत.. आतापर्यंत रात्री निर्धास्तपणे काचा उघडया ठेवून झोपत होतो.. पण त्यादिवशी दुपारी खिडकीला लावलेल्या मच्छरदाणीच्या जाळीला पाडलेले भोक दिसले नि आमच्या काळजात धस्स झालं.. आत उंदीर बाहेर की घरात हे कळायला मार्ग नव्हता.. चाहूल पण लागत नव्हती म्हटले रात्री उघडयावर टोमॅटो ठेवून बघूया मग काय ते कळेल.. रात्री जाग घेतली तर फ्रिजमधून कसलातरी आवाज यायला लागला.. म्हटले झाले कल्याण.. हा घुसला फ्रिजच्या इंजिनात ! नीट आवाज घेत असतानाच खिडकीच्या काचेजवळ लक्ष गेले.. तर पल्ल्याड उंदीरमामा कुरतडून तयार केलेल भोक शोधताना दिसले.. नशिब त्याच दिवशी जाळी काढून काच ओढून घेतली होती.. आता त्या खोलीची काच बंदच असते.. पण तो उंदीरमामा आता दररात्री त्या खिडकीच्या बाहेर असणार्या गॅलरीत उच्छाद मांडून जातोय.. जल्ला शौचालयच समजून बसलाय गॅलरीला.. परवा तर दोरीउडया मारायलाच की काय म्हणून त्याने नॉयलॉनच्या दोरीचा तुकडा पण आणून ठेवलाय..
त्याचा लौकरच बंदोबस्त करेन म्हणतो तर दुसर्या दिवशी सकाळीच गॅलरीत कसली तरी घाण पडलेली दिसली.. सध्या पाउसही जोरदार त्यात ते रात्रीचे उंदीरमामा.. रोज सकाळी आवाज करतच काच उघडून गॅलरी तपासावी लागतेय.. साफसफाईचे काम होतेच.. आता ही घाण वेगळी दिसली म्हणून बायकोने एका छोट्या काठीने उचलायला गेली तर .... अंग वेटोळे करुन उपडी पडलेली पाल पटकन उडी मारुन सरळ होते काय नि बायको किंचाळते काय.. ! जल्ला ती पाल काय हलेना.. अर्धमेली होउन पडली होती. हिला पण जीव द्यायला आमचीच गॅलरी मिळाली काय म्हणून वैतागलो. जवळ गेलो तर परत तडफडत उडी मारत उपडी झाली. मग मी उडी मारली.. बायको हसायला लागली तेव्हा म्हटले पायात ट्रेकींगचे शूज असते तर पायानेच धुडकावली असती ! मग आम्ही दोघांनी मिळून पाल-हटाव मिशन सुरु केले.. ती ढिम्म पाल हलायला तयार नव्हती.. त्यात सारखी उपडीच राहत होती..य्याक.. हटवण्याच्या प्रयत्नात शेपटी वेगळी झाली नि रक्त रक्त झाले.. श्या सक्काळीच असले उद्योग करायचे ते पण नाश्त्याअगोदर.. ! सरतेशेवटी वैतागून बायकोने मग 'मग'च्या 'मग' तिच्यावर पाणी ओतून अंघोळ घालायला सुरवात केली नि तशी ती अर्धशुद्धीत असलेली पाल पळायली लागली.. जल्ला सगळी गॅलरी जलमय झाली मग कुठे तीला बाहेर ढकलून दिली.! काम संपले पण त्यादिवशी नाश्ता काही पोटात गेला नाही.. शिवाय कामावर जायला उशीर झाला ते वेगळे.. आता ''उंदीरमामा-हटाव' मिशन हाती घ्यावे म्हणतोय.. नशिब हे सगळे गॅलरीतच सुरु आहे.. खिडकीची काच बंद ठेवतोय म्हणून निभावतेय..
मस्त धागा माझ्या घरी
मस्त धागा
माझ्या घरी घुसलेल्या उंदराची आठवण आली
सगळे किराणा थोडा खाउन पठ्या स्टील च्या टाकीत शीरला अन त्याच वेळी [की जरा पुढे -मागे]
मी त्या टाकी वर ५ किलो गहु असलेली पिशवी ठेवली ,२ दिवस होता आत...
आत फक्त भांडी होती प्लास्टीकची कुरतडुन खाल्ली मग नवर्याला तशीच टाकी बहेर न्याय ला सांगितली
तेव्हा कुठे धुम ठोकली मामाने
>>परवा तर दोरीउडया मारायलाच
>>परवा तर दोरीउडया मारायलाच की काय >> योरॉक्स, तुझ्यासारखा उडीबाबा प्रयोग करायचा असेल त्याला
Mahaaaan..
Mahaaaan..
Mahaaaan..
Mahaaaan..
मजेशीर प्रतिसाद
मजेशीर प्रतिसाद
उंदीर हिंदी भाषिक असेल आणि
उंदीर हिंदी भाषिक असेल आणि इग्नोरास्त्र टाकत असेल, तर हे म्हणा,
सारी रात हम
डर डर के जग लिये
एक पल तो अब हमे सोने दो
सोने दो.
मा मा मा मा, मा मा मा मा मा मा, मा मा मा मा,उंदीर, मा मा मा मा ...
Give me some ratkill
Give me some bread
Give me another chance
I wanna kill em once again
इस 'धागे' को सुझावों
के बहारोंने सजायॉ
रिश्वत देना को खुद
माबोकरों ने सिखाया
'गपगुमानं' बाहर आओगे तो दूंगी चावल-कढी, वरना मार पडी.
पूरा दिन तो गया
श्याम भी गयी
सनडे को तो हमे
सोने दो सोने दो...
आमच्या घरातला फ्रीज कालपासून
आमच्या घरातला फ्रीज कालपासून बिघडलंय. जोरात आवाज करतोय. उंदराला तो आवाज ऐकवायचा का? धूम पळत सुटेल
मला टू अँड फ्रॉ भाडे दिल्हे
मला टू अँड फ्रॉ भाडे दिल्हे तर मी कुत्रे घेउन येइन.
१)आमचे कुत्रे हाउंड जातीचे असून आ ज पावेतो १०० च्या वर उंदरांची शिकार त्यांनी केल्हेली आहे.
२) शिकारीनंतर चा पसारा आवरणार नाही.
३) उंदीर मेल्यावर त्याला बा हेर टाकणार नाही.
ब ट सिरीअसली, त्या तसल्या उंदीर नाचलेल्या ओट्यावर के लेल्या पोळ्या खाल्या जातात? इट इस नॉट हाय जिनिक? भाजी आमटीत तो नाचून गेला असला तर?
<३.खायच्या किंवा तो कुरतडु
<३.खायच्या किंवा तो कुरतडु शकेल अशा वस्तु शक्यतो सुरक्षित फडताळात ठेवणे.>
आमच्याकडे उंदराने टेलिफोनची, काँप- मॉडेम जोडणारी, स्पीकर्सची अशा वायर्स आम्हाला फुकटात कापून दिल्या होत्या. त्यामुळे काही काळ आमचा जगाशी संपर्क तुटला होता.
सकाळच्या शांततेत माळ्यावरून खुडबूड ऐकू आली, तेव्हा माळ्यावरच्या एक रिकाम्या खोक्यात तो असल्याचे कळले. त्याला खोक्यासकट महापालिकेच्या कचर्याच्या डब्याशी सोडून आलो. दोन तासांत खोका तिथून गायब झालेला दिसला.(आम्हाला परत हवा होता असे नाही).
अजुन चालुच्चै का ? उंदिर
अजुन चालुच्चै का ?
उंदिर मारायच्या वड्या पेपर प्लेट मधे ठेवा. आज भी वो फेके हुए टुकड़े नहीं उठाते।
ऑनेस्टली पेस्ट कंट्रोल वाल्यांची आईडिया आहे.
.........
.........
असले बाफ वाचून अॅडमिन काय
असले बाफ वाचून अॅडमिन काय म्हणत असतील>>> त्यांनाही हसु हवच की.
पाली भाषा
gela ka?
gela ka?
मायला... एक उंदीर तो काय,
मायला... एक उंदीर तो काय, किती त्या पोश्टी त्यावरून!!! द्विशतक झालं सुद्धा!
मायला... एक उंदीर तो काय,
मायला... एक उंदीर तो काय, किती त्या पोश्टी त्यावरून!!! >>> असू द्या हो, नेहमी डोंगर पोखरून उंदीर काढतो. इथे उंदीर वरून डोंगर काढतोय. जरा चेंज!
पाली भाषा, कांची नरद राजा या
पाली भाषा, कांची नरद राजा
या कांची नरद राजाची कथा मला माहित आहे. घरात शिरलेल्या पालीला बाहेर् कसे काढावे असा बीबी आला की मी तिथे ही कथा लिहिणार.
अमावस्येच्या रात्री- ज्या
अमावस्येच्या रात्री- ज्या प्रहराला माणसाचे पांघरलेल्या लांडग्यात (वेअरवुल्फमध्ये) रुपांतर होते>>>>>> इथे अमावस्या ऐवजी पौर्णिमा हवय ना???????
इथे उंदीर वरून डोंगर काढतोय.
इथे उंदीर वरून डोंगर काढतोय. <<
उंदरावर डोंगर घडवतोय म्हणायचंय का सिमंतिनी?
फ्रेंच कुलकर्णी, घराच्या आसर्याला येणारे पाल उंदरादी समस्त प्राणिजन हा विषय द्विशतकच काय पंचशतकांचं पोटेन्शियल असणारा विषय आहे. मधे अशीच एका बाफ कबुतरशंभरी पार झाली होती.
हो हो नी... वाचलंय मी
हो हो नी... वाचलंय मी ते...!!! हा बाफ पण करेल बहुधा पंचशतक, सध्याच्या याच्या वेगावरून तरी वाटतयं
उंदरावर डोंगर घडवतोय
उंदरावर डोंगर घडवतोय म्हणायचंय का सिमंतिनी?>> :फिदीफिदी:
कोल्ह्याची लघवी ऑनलाईन मिळते.
कोल्ह्याची लघवी ऑनलाईन मिळते. १००% शुद्ध आहे , भेसळ नाही असे म्ह्टले आहे,
http://www.predatorpee.com/Merchant2/merchant.mv?Screen=PROD&Store_Code=...
Pages