घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेला असेल तर नक्कि कोणत्या उपायाने गेला हे विचारता येईल की>>>> पायाने नाही स्वतःच्याच पायाने गेला असेल

आता ह्यावर (उंदरावर) गाणे होउन जाउ देत! ह्यात सर्वांन्नी सहभागी व्हा! येत्या गणेशोत्सवात त्याचे कार्यक्रम करू!

" उंदराSSSरें! फेंदरित यें रे मिशिला......" (मयुरा रें च्या चालीवर)!

अजुन येउ देत !

परवा एका फेसबुकमित्राच्या एका गझलेवर त्याच जमीनीत शेर सुचला होता

चालुनी थकलात हो बाप्पा किती
आपला उंदीर कोठे राहिला ...
~ इति वैवकु

सुमेधाजींया घरी ~इति बाप्पा

>>सुमेधा तुझं नशिबच फळफळलंय गं. :फिदीफिदी: >>>+१
कितीतरी चांगली माहिती असलेले धागे प्रतिसादाशिवाय पडून राहिलेत. पण कबुतर, सुतारपक्षी आणि उंदीर पळताहेत. अशीच उदंड प्रसिद्धी लाभो ही इच्छा. Happy

आधी fast scoring असलेला हा धागा आता acumulating mode मध्ये जाऊन ५०० पूर्ण करेल का अशी उत्सुकता लागली आहे. त्यात माझा थोडासा सहभाग देखील. Happy

सुमेधाचा चांगलाच टाईमपास झाला असेल ( आधी उंदरामुळे आणी मग ) भाच्यामुळे.:फिदी:

उंदीरमामा उंदीरमामा काय करता?

गुळ मी खातो, कागद मी कुरतडतो
सुमेधाच्या घरी रहातो सुखाने आता..:खोखो:

प्राची सारखे गेला का असे विचारु नको, आधीच ट्रिपल सेंच्युरी झालीय आता ५०० कडे घोडदौड करुया.:फिदी: टाकचीक टाकचीक...

.

बहुतेक गेला. कारण अजूनही दर्शन नाही दिले त्यानी..म्हणजे गेल्या शुक्रवारपासून दर्शन दिलेच नाही. एवढे दिवस लपून राहणार नाही बहुतेक तो....तरी थोडी भिती आहेच अजून.

टेरेस वर स्वच्छंद फिरणार्‍या आणी परवानगी शिवाय तुळशीची रोपे खातो असा संशय असलेल्या उन्दीर मामाना कसे पळवावे म्हणुन इथे मोठ्या आशेने आले..
नि एक एक प्रतिसाद वाचुन... हसुन हसुन पुरेवाट झाली.....

Pages