घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंतर त्याने उंदराने कुरतडलेल्या नळीचा अवतार आम्हाला दाखवला तेव्हा काय घडू शकले असते याची कल्पना येऊनच घाम फुटला होता.>>>>>>. Proud

अवांतर : यावरुन घाटात फुटला घाम हे आठवले. धम्माल आहे. प्र तर लै भारी.... Lol

कोल्ह्याची लघवी ऑनलाईन मिळते. >>> बघा कोल्ह्याचं नशीब , नाहीतर मोरारजी आणि पाणीपुरीवाल्या भैयानंतर माणसाला कोणी साधं विचारलही नाही. Proud
त्यांना पैसे देऊन करणी करवून घेणारे बरेच जण पुण्यात आहेत. >>> हायला खरं की कायं ? Lol

एक विशेष सुचना हिंदूना गोमुत्र प्रिय आणि पवित्र वाटते, गोमुत्राचे महत्व कमी करण्यासाठी को(ल्हा)मुत्रचा प्रसार करण्याचे आंग्लख्रिश्र्च* धर्मप्रसारकांचे षडयंत्र असु शकते -असा ,गापै, खवचटखान, भास्कर यांचे तर्फे जनहितार्थजारी

सर्वच प्राण्यांचे मुत्र एकाच रंगाचे एकाच वासाचे असते त्यात कोणताही रंग नसतो इतके ते निर्मळ असते ,त्यात भेद करणे हा आरेएसचा अजेंडा आहे- रँग्लर जामोप्या ,इब्लिस, भरत मयेकर,कीरणू(णा)(णे)(याके) यांचे तर्फे जनहीतार्थ जारी. Wink Light 1 Biggrin

अहो कसली गाय आणि कसला कोल्हा कॉम्प्युटरच्या वेडापायी अमेरिकेत आलो तर इथेहि गांधी सावरकर वाद आहेच भारतीयांनी केलेच काय आहे आजपर्यंत डेन्मार्कमधून होलस्टेनचे मुत्र मागयची आणि जपानकडून डीजी'पी' तंत्रज्ञान घ्यायची वेळ आपल्यावर येणार आहे यालाच कंटाळून मी देश सोडला जगं मिथ्या ब्रहम सत्यम हेच खरे. Light 1 इति..झक्की

gela ka?

रँग्लर जामोप्या ,इब्लिस, भरत मयेकर,कीरणू(णा)(णे)(याके) यांचे तर्फे जनहीतार्थ जारी.

Proud

आमच्या हॉस्पिटलात उंदीर कंडोमचे बॉक्स पळवतात.

Proud

आमच्या हॉस्पिटलात उंदीर कंडोमचे बॉक्स पळवतात. >>> बघा उदंराना जे कळत ते आपल्या जनतेला अजुन कळत नाहीये Proud

कुठल्या प्राण्याच्या मुत्रामुळे विविध आजार होतात, आजचा दिव्यमराठी वाचा !

अहो सुमेधाजी,
काय झाले त्या उंदराचे? गेला की नाही?

लोकांनी एवढ्या तत्परतेने प्रतिसादांवर प्रतिसाद दिलेत, जरा कळू द्या की काय झाले ते. Happy

एकविसाव्या शतकातला टेक्नोसॅव्ही उंदीर अन्यधान्य, पोती ,प्लास्टीक याबरोबरच 'बॅण्डविड्थ' देखिल खाऊ शकतो ,हे या लांबट धाग्यामुळे सिद्ध झालेय. Biggrin

तुम्ही स्वर्णप्राश या आयुर्वेदिक औषधाबद्दल ऐकले आहे का? हल्लीच झालेल्या संशोधनानुसार रोज चार थेंब स्वर्णप्राश जर मध आणि गायीच्या तुपातून प्राशन केलेत तर तुमच्या घरातले सर्व उंदिर नाहीसे होतात. वर बोनस म्हणून तुमची स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती देखिल वाढते.
मात्र हे औषध उंदराच्या हाती लागणार नाही एवढी काळजी घ्या हं, नाहीतर त्याचीही शक्ती कायच्याकाय वाढून तो तुम्हालाच घरातून हाकलून देईल.

Happy धागा हनुमानाच्या शेपटीसारखा वाढतोय.

लोकहो, त्या उंदराला तसाच सोडून मी गेले काही दिवस गावाला गेले होते त्यामुळे ही सगळी करमणूक मिस केली.

गावाला जाताना आईडिया हीच होती की कदाचित उंदीर पळून तरी जाईल आणि मग हॉरर मुव्ही प्रमाणे त्याच्या कधीही प्रकट होणाचे टेन्शन रहाणार नाही. तो जर मेला असेल तर वास येईल व मग ते सगळे प्रकरण मी नसल्यामुळे नवराच निस्तरेल आणि मग मी परत येइपर्यंत सगळे ठिकठाक होईल. गावाला पोचल्यापासून उंदराचे स्टेटसे अपडेट्स घेत होते. पण गेले ४ दिवस उंदराने दर्शन दिले नाही. त्यामुळे आता तो गेलाय असे वाटून नॉर्मल वागायला सुरुवात केली आहे. आता सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे.

बादवे, घरात पाऊल टाकल्या टाकल्या तो वास आलाच्...मग शोधाशोध केल्यावर उंदीर नसून टोपलीतले २ बटाटे सडले आहेत असे समजले....कधी हा सगळा हॉरर शो संपणार आहे...देव जाणे.

म्हणजे तुम्ही उंदराला घराबाहेर काढण्याऐवजी उंदराने तुम्हाला घराबाहेर काढले म्हणा Lol

Pages