घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो कंगारु ऑलमोस्ट माझ्या एव्हढा उंच दिसत होता दोन पायावर उभा राहिला तेव्हा.>>> बाप्रे! एवढा मोठा असतो?

केश्वी, काही काही फारच मोठे असतात. अगदी धुडच.. गाडीसमोर आला तर गाड़ी write off होऊ शकते..
(आता फारच कैच्या कै होतय. विपु करा :D)

असू दे कैच्याकै Wink तसाच बाफ आहे हा Proud

ह्यापेक्षा मोठे म्हणजे मिनी डायनोसोरच दिसत असतील. फक्त जरा क्यूट असे.

Lol
क्यूट फक्त ते लांबुन उडया मारताना दिसतात. जवळ आले आणि एकदम सावधान position मध्ये असले की मला तरी भितीच वाटते!

उंदीर परत आला कि काय म्हणून बाफ उघडला. कांगारू पासून सावधान लै अ‍ॅग्रेसिव ब्रीड आहे ते.
नव्या डेव्हलपमेंट मुळे त्यांचे हॅबिटॅट डिस्ट्रक्षन होत आहे. नॉट व्हेरी पर्यावरण स्नेही. त्या काकीकडे तक्रार नोंदव.

अमेरिकेतले मायबोलीकर
बेएरिआतले मायबोलीकर

या प्रकारचा "जनावरांच्या सानिध्यात राहणारे मायबोलीकर" असा एक धागा काढुन त्यावर आपापली दु:खे मांडावी काय?

ये Happy

Riddex नामक एक उपकरण मिळते. जे उंदीर आणि इतर जीव जंतूना sound frequency वापरून जवळ येऊ देत नाही...

एक दोन महिन्यांपूर्वी आमच्या शेजारी अचानक किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. मी जाऊन विचारलं तर म्हणे उंदीर आलाय. बघतो तर काय चिनी लोक दोन हातात दोन चॉपस्टि़क घेऊन जेवतात तसे शेजारचे महाशय दोन हातात प्रत्येकी एक झाडू घेऊन उंदीर 'पकडण्याचा' प्रयत्न करत होते. त्यांची दयनीय अवस्था पाहून मी त्यांच्या हातातून झाडू घेतला आणि त्वेषाने त्याच्यावर (म्हणजे उंदरावर, शेजार्‍यावर नव्हे) प्रहार करायला सुरवात केली. मग तो मेला.

काल रूममध्ये उंदीर शिरलाय Sad
एरवी पटकन सापडला असता पण रूम बदलणार असल्याने समान पसरलंय मी बेडच्या खाली त्यामुळे काहीच करता येत नाहीये. अजून १० दिवस तरी ह्याच रूम मध्ये काढायचे आहेत.
धुळीची प्रचंड allergy असल्यामुळे काम सांभाळूनच हे उंदीर प्रकरण संपवावे लागेल. तो उंदीर रोज संध्याकाळी येतो आणि रात्री जातो रूम बाहेर बहुतेक. Rat Kill ला दाद देत नाहीये.

धीर नाही होणार माझ्याच्याने चिकटलेला उंदीर उचलायला.
आत्ता कळतंय lab मध्ये उंदरांवर काम करणं ह्या उंदरांपेक्षा खूप सोपं असतं Lol

Kachra uchalta tya upasnyane chikatlela puttha uchlaycha thode man ghatt karave lagel pun te tya manane sope aahe karan melela uchalne tyahun kathin

चिकटलेला उंदीर उचलायचा नाही.. त्या उंदरासकट तो पॅड उचलायचा अन टाकुन द्यायचा.. मात्र चिकटल्यावर उंदीर जाम ओरडत असतो..

lab मध्ये उंदरांवर काम करणं ह्या उंदरांपेक्षा खूप सोपं असतं>>>>>> अगदी.. उंदीर लॅब मधे मोकाट सुटला तरी पकडणं कठीण जातं

चिकटलेला उंदीर उचलायचा नाही.. त्या उंदरासकट तो पॅड उचलायचा अन टाकुन द्यायचा.. मात्र चिकटल्यावर उंदीर जाम ओरडत असतो..>>

सहन होईल का? Proud

मध्यंतरी पेव्हर ब्लॉक्स टाकण्यासाठी रस्ते फोडल्याने उंदिर मोकाट सुटले होते. रोज रात्री एक तरी हजेरी लावून जायचा. रॅट किल, स्टिक पॅड, जालीम विष इत्यादी सर्व उपाय थकल्याने शेवटी हमखास यशस्वी पिंजरा आणला. त्यात पोळीचा तुकडा, गोडंतेल लावलेला पोळीचा तुकडा, उंदरासाठी खास आणलेली कांदाभजी अशी विविध आमिषं लावली तरी तो गावेना... रोज रात्री बटाटे आणि टपरवेअरच्या डब्यांची झाकणं कुरतडून जायचा नालायक Angry माझे सहा डबे वाया घालवले त्या बेअकली उंदराने Sad
शेवटी एकदा वैतागून बटाटाच लावला तर सापडला पिंजर्‍यात... एका मांजराचं एक वेळचं पोट भरलं. दुसर्‍या दिवशी रात्री ते मांजर दारात येऊन म्यॉंव म्यॉंव करत बसलं Lol

आता ग्रीलला जाळी बसवून घ्यायच्या विचारात आहे. काही नवीन कल्पना असतील तर सुचवा.

ग्रीलला ती कबुतरांची जाळी बसवणार असशील तर त्यातूनही उंदिर येईल. त्यापेक्षा खिडकी/दरवाजालाच डासांची जाळी असलेलं जास्तीचं दार बसव. त्या उंदरड्यांपायी उगाचच खर्चं Sad

एका मांजराचं एक वेळचं पोट भरलं. दुसर्‍या दिवशी रात्री ते मांजर दारात येऊन म्यॉंव म्यॉंव करत बसलं
आता ग्रीलला जाळी बसवून घ्यायच्या विचारात आहे. काही नवीन कल्पना असतील तर सुचवा.>>> त्याच मांजराला पाळून टाका :डोमा:, त्याचीही पोटापाण्याची सोय, आणि तुमचीही सोय ! हाकानाका Light 1

Pages