आयुष्याचे विषय

Submitted by डॉ अशोक on 21 July, 2013 - 13:54

आयुष्याचे विषय

इतिहासातील तह-कलमांनी
मनात गुंता झाला
टुंड्राच्या अभ्यासाने
भुगोल वेडा झाला!

बीज-गणितातील "क्ष" ही
राक्षसातील वाटून गेला
नाते त्रिज्येशी भूमितीत
परिघाशी "पाय" अडला !

गणितातील शून्याचे
असेच काही झाले
गुणपत्रिकेतच त्याचे
स्थान पक्के झाले!

हायड्रा अमीबा प्राणीशास्त्रातले
भिंगातूनही ना दिसले
अल्गी-फंगी वनस्पती कां ते
शास्त्रानेही ना सांगितले !

शाळेचे ना कुठल्या विषयाचे
आयुष्याशी नाते होते
आयुष्याचे सगळे-सगळे
विषय वेगळे होते !

डॉ अशोक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

कविता रुचली नाही.
मला तर सगळे विषय आवडायचे - तह-कलमे आवडायची , भुगोल आवडायचा, गणित/भूमिती तर सगळ्यात आवडते विषय, शास्त्र शिकताना मजा यायची त्यामुळे असेल कदाचित..

आयुष्याचे सगळे-सगळे
विषय वेगळे होते !<<< आवडले.

मागे असाच एक शेर होता माझा, 'वाडा' या गझलेतील!

घेतली तालीम ज्याची ते कुठे घडते
पोचतो जेथे तिथे भलताच आखाडा

धन्यवाद

शाळेचे ना कुठल्या विषयाचे
आयुष्याशी नाते होते
आयुष्याचे सगळे-सगळे
विषय वेगळे होते ! >>>> ह्म्म्म..... हे विचारात पाडणारं आहे.