Submitted by रसप on 16 July, 2013 - 04:02
शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?
घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?
रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?
बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?
कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?
मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत
तू नसल्याच्या
तक्रारींना
कुणाकडेही
कधीच मीही
मांडत नाही
कळले ताई ?
....रसप....
१६ जुलै २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/blog-post_16.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात है.... रणजित -
क्या बात है....
रणजित - इतक्या कमी शब्दात इतकी प्रभावी मांडणी - हॅट्स ऑफ दोस्ता ...
मस्तंच. सहीच. आमचंच बालपण
मस्तंच.
सहीच.
आमचंच बालपण डोळ्यांसमोर उभं केलंत.
शेवटचे कडवे तर खासच!
क्या बात है जितू विषयही
क्या बात है जितू
)
विषयही कित्ती क्यूट आशयही
निर्यमकी कविता या प्रकारात आता तू मास्टर झाला आहेस अगदी (तरी "रोज होत असू" ऐवजी "रोज व्हायचो" असे केलेस तरी चालेल
सुंदर जमलीये …. अर्थात
सुंदर जमलीये …. अर्थात
"रोज होत असू" ऐवजी "रोज
"रोज होत असू" ऐवजी "रोज व्हायचो">> मान्य !
वृत्तभंगच आहे तो ! बदल करतोय.
धन्यवाद वैभू..
छानच
छानच
जबरदस्त....
जबरदस्त....
छानच!
छानच!
अतीव सुंदर!!
अतीव सुंदर!!
खूप छान! शेवटचं कडवं टची
खूप छान! शेवटचं कडवं टची
छान! आवडली!
छान! आवडली!
रसप , दिल तोड दिया !
रसप , दिल तोड दिया !
आयुष्याच्या
या रस्त्यातून
अर्ध्यातून तू
जाशील सोडून
घेतल्याविना
परवानगीही
कायमचे अन
दूर कुठेही
नव्हते माहीत
मलाही राजा
जगणे होईल
अशीही सजा ..
हे एका ताईकडून, तिच्या अकाली कायमचे सोडून गेलेल्या पाठच्या भावासाठी.रडवलेत.
___/\___
___/\___
पुन्हा पुन्हा वाचावी
पुन्हा पुन्हा
वाचावी ऐशी
कविता लिहिली
झुळझुळणार्या
झर्यासारखी
वाहत गेली
मनावरुन ती
रसप तुमची
कविता आणिक
शैली तुमची
फार भावली
जाणवले का?
सुंदर! उताणा घडा क्लबची एकही
सुंदर!
उताणा घडा क्लबची एकही प्रतिक्रिया अश्या कवितेवर नाही हेही अपेक्षितच!
धन्यवाद ! सानीजी... सुंदर
धन्यवाद ! सानीजी... सुंदर प्रतिसाद!
वा वा वा... निव्वळ अप्रतिम !
वा वा वा... निव्वळ अप्रतिम !
वा वा रणजित! मस्त कविता!!
वा वा रणजित! मस्त कविता!!
आवडली!
आवडली!
सुन्दर.
सुन्दर.
रसप, भारतीतै रडवलंत...
रसप, भारतीतै रडवलंत...
भारती !!!
भारती !!!
कविता आवडली.
कविता आवडली.
जबरी आहे कविता!
जबरी आहे कविता!
रसप, आवडली कविता. भारती...
रसप, आवडली कविता.
भारती...
प्रचंड आवडली भारती
प्रचंड आवडली
भारती
वा, सुरेख
वा, सुरेख
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !

रसप, काल भावनेच्या भरातला
रसप, काल भावनेच्या भरातला प्रतिसाद होता.. खूप काही आठवले अन उचंबळले, माझा राजस देखणा मराठी फिल्मचा हीरो आठवला .सर्वांचे आभार सहवेदनेबद्दल.
आता कवितेच्या आकृतीबंधाबद्दल, जो अमेझिंग आहे.त्याला डोंगरातल्या छोट्या पायवाटेवरून दुडदुडत चाललेल्या छोट्या ताई- भावाच्या गतीचीच लय आहे. ही लय आपल्यालाही त्यांचे बाळबोट पकडून आपल्या भूतकाळात नेते इतकी प्रभावी आहे.
कवितेला यमकाच्या कधीकधी जाचक वाटणार्या बंधनातून सोडवणे सोपे नाही. अन तिच्या घाटदार सौंदर्यात बाधा न येऊ देता हे करणे अजूनच कठीण.तुम्हाला ते जमले आहे.
उत्तरोत्तर अनेक सूक्ष्मभव्य आशय असेच प्रकट करत रहा
कविता आवडली..
कविता आवडली..
Pages