Submitted by रसप on 16 July, 2013 - 04:02
शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?
घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?
रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?
बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?
कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?
मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत
तू नसल्याच्या
तक्रारींना
कुणाकडेही
कधीच मीही
मांडत नाही
कळले ताई ?
....रसप....
१६ जुलै २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/blog-post_16.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कविता आवडली !
कविता आवडली !
मस्तच..
मस्तच..
धन्यवाद सर्वांचेच ! भारती
धन्यवाद सर्वांचेच !
भारती ताई....
तुमचे प्रतिसाद नेहमीच खूप प्रोत्साहन देतात. मनःपूर्वक आभार..
रसप.... _/\_ अतिशय सुंदर
रसप.... _/\_
अतिशय सुंदर कविता
उताणा घडा क्लब <<<
उताणा घडा क्लब <<<
रसप , कविता खूपच
रसप ,
कविता खूपच आवडली.
शाळेला जाणारा लहान भाऊ व ताई डोळ्यासमोर उभा राहिले. शेवटचे कडवे एकदम हळवे करून गेले.
भारतीताई
वा! अगदी त्या वाटेवरुन त्या
वा! अगदी त्या वाटेवरुन त्या काळात नेलत. आणि हळुवार हळवा शेवट!
आवडली कविता.
छान जमलेय.... शेवटचे कडवे
छान जमलेय.... शेवटचे कडवे विशेष.
कविता लिहिताना माझ्या मनात
कविता लिहिताना माझ्या मनात फक्त माझी ताईच होती आणि मी तिला कवितेतून लिहित होतो. तेव्हा मला माहित नव्हतं की मी काय लिहितो आहे, ते कितपत चांगलं किंवा वाईट उतरणार आहे. माझे असे ठाम मत आहे की कवितेला किंवा कुठल्याही कलाकृतीला तिचा रसिकच विशिष्ट पातळी, स्थान देत असतो. अनेकदा माझ्याच कवितेची मलाच एक नवी ओळख काही प्रतिसादांमुळे झाली आहे. ही कविताही रसिक वाचकांच्या प्रतिक्रियांमुळेच माझीच मला नव्याने भेटली आणि हृदयाच्या खूप जवळची झाली आहे. मला कविता लिहिताना जितकं समाधान मिळालं, त्याहून कैकपटींनी अधिक आनंद ह्या प्रतिक्रिया व त्यांमुळे स्वतःच्याच कवितेला नव्याने भेटणं, ह्याचा झाला आहे. त्यासाठी सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो.
__/\__ __/\__ __/\__
कविता आवडली.. निरोप... पाऊल
कविता आवडली..
निरोप...
पाऊल माझे उचलत नाही
निरोप दे आता येते आई
परसदारिची सिंच ति वेल
रोज तयास येते सायलीचे फुल
निरोप द्या आता बाबा
कितिवेळ मनावर ठेवणार ताबा
येईल आठवण जेव्हा माझी
देवाला वहा सायलीची फुले ताजी
आठवशील तू जेव्हा मला
उघडून पाहा सायलीच्या फुला
निरोप घेते येते मी भाऊ
डब्यात ठेवला आहे आठवणींचा खाऊ
राजेंद्र देवी
खुप सुंदर कविता.
खुप सुंदर कविता.
व्व्व्वाह ! हृदयस्पर्शी ! मकस
व्व्व्वाह ! हृदयस्पर्शी !
मकस वर वाचली होती बहुतेक या अगोदर. माझी 'एक आठवण' http://www.maayboli.com/node/44299
ही कवितासुद्धा आपल्या मकसवरील चर्चेतून, आपल्या या फॉर्ममधल्या कवितांच्या प्रेरणेतूनच अवतरली आहे.
Thanks !!!
मस्तच !
मस्तच !
आवडली.
आवडली.
मला आठवे तेच नेहमी म्हणून
मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत
तू नसल्याच्या
तक्रारींना
कुणाकडेही
कधीच मीही
मांडत नाही
कळले ताई ?
फारच सुंदर
प्रतिसादास उशिराबद्दल क्षमस्व
प्रतिसादास उशिराबद्दल क्षमस्व ...
अप्रतिमच आहे कविता..!
सुंदरच ... आधीही वाचलीच
सुंदरच ... आधीही वाचलीच होती.. पु.ले.शु!
धन्यवाद !
धन्यवाद !

Pages