''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्यात साठवून घेऊ लागलो. ''आम्हाला फोटू दाखवा ना!''च्या त्यांच्या गजरात शाळेपर्यंत येताना आजूबाजूच्या बकाल वातावरणाने मनावर आलेली किंचित मरगळ आपोआप झटकली जाऊ लागली. त्यांचे निरागस हसू आणि दंगा बघून आपल्या येण्याचे सार्थक झाले आणि ह्या मुलांसाठी आणखी काहीतरी केले पाहिजे हीच भावना मनावर तरंगत राहिली.
मायबोलीकर साजिरा, केदार, मो आणि मी गेल्या गुरुवारी खास वेळ काढून पुण्याच्या बुधवार पेठेत भर वेश्यावस्तीत चालविल्या जाणार्या व सावली सेवा ट्रस्ट तर्फे मदत केल्या जाणार्या नूतन समर्थ विद्यालयातील मुलांना भेटायला गेलो होतो. आपल्या संयुक्ता सुपंथ उपक्रमातून गेली दोन - तीन वर्षे आपण ह्या ना त्या प्रकारे या मुलांना शिक्षणासाठी मदत करत आहोत. या वस्तीत राहणार्या व व्यवसाय करणार्या वेश्यांच्या मुलांना या शाळेत इयत्ता सातवी पर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. बरीचशी मुले याच पार्श्वभूमीची असतात आणि खूप विचित्र आणि खडतर असते त्यांचे हे जगणे! आपले वडील कोण हे या मुलांना माहित नसते. आई वेश्या व्यवसायात असल्यावर त्या व्यवसायात असणारे शोषण अनेक प्रकारे ह्या मुलांच्या वाट्यालाही येते. रात्री ही मुले रस्त्यावर असतात. पहाटे तीन-चार च्या पुढे कधीतरी त्यांना घरात घेतले जाते. उपेक्षा, कुपोषण, उपासमार, व्यसने, कुसंगती, शिवीगाळ, अत्याचार, संघर्ष व असुरक्षिततेच्या दुष्टचक्रातून - तसेच वेश्याव्यवसायाच्या किंवा गँगवॉर-गुन्हेगारी जगताच्या फेर्यातून या मुलांना बाहेर काढायचा एकच मार्ग म्हणजे त्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर, समाजात मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे.
नूतन समर्थ विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच दुपारची पोळी-भाजी आणि नाश्त्याला सरकार तर्फे दिली जाणारी खिचडी किंवा उपमा मिळतो. या मुलांच्या रात्रीच्या जेवणाची बर्याचदा वानवाच असते. उपासमार ही ठरलेली! सावली सेवा संस्थेकडून मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेष, स्वेटर, रेनकोट, दप्तर, इतर काही गरजेचे कपडे व वस्तू घेऊन दिल्या जातात. तसेच शाळेच्या काही शिक्षकांचे पगारही केले जातात. वर्षातून एकदा या मुलांचे स्नेहसंमेलन आयोजित करणे, त्यांना पिकनिकला घेऊन जाणे, त्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, पपेट शो इत्यादी कार्यक्रम हेही केले जातात. ह्या मुलांना शिक्षणात रुची वाटावी व स्वतःच्या हिमतीवर पुढे येऊन, चांगले शिक्षण घेऊन त्यांना अर्थार्जन करता यावे व समाजात मानाने जगता यावे यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न घेते.
आपल्यातील काही मायबोलीकर या मुलांना आर्थिक किंवा वस्तूरुपाने मदत दर वर्षी आवर्जून करतातच! परंतु त्या शिवाय आणखी कशा प्रकारे मदत करता येईल असा आमचा विचार चालला असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व सावली संस्थेच्या भाटवडेकर बाईंनी ''मायबोलीकरांपैकी कोणी या मुलांना दर शनिवारी येऊन स्पोकन इंग्लिश (बोली इंग्लिश) शिकवू शकेल का?'' असे आम्हाला विचारले.
तर इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी शाळेत जाऊन स्पोकन इंग्लिश शिकवायचे आहे. वेळ साधारण सकाळी अकरा ते बारा अशी असेल. कधी मुलांच्या व शाळेच्या सोयीनुसार पंधरा-वीस मिनिटे अलीकडे किंवा पलीकडे. आपल्यातले अनेक मायबोलीकर शनिवारी सुट्टीवर असतात. आपल्या वेळातला मौल्यवान वेळ या मुलांसाठी काढून त्यांना स्पोकन इंग्लिश शिकवू शकतात व त्यांचा इंग्रजीतून बोलण्याचा सराव घेऊ शकतात.
शाळेने अशी विनंती करण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर एका संस्थेमार्फत या मुलांना सहा महिने स्पोकन इंग्लिश शिकविले जात होते. येणार्या शिक्षिका मुलांशी इंग्रजीतूनच संवाद साधत व फ्लॅश कार्ड्स, गेम्स इत्यादी माध्यमांतून मुलांना सहज, हसत-खेळत, त्यांच्या कलाकलाने इंग्रजी बोलायला शिकवित होत्या. मुलांचे इंग्रजी त्यानंतर बरेच सुधारले व त्यांच्या आत्मविश्वासातही चांगला फरक दिसून आला. त्यामुळे शाळेला या वर्षीही मुलांना स्पोकन इंग्लिश स्वयंसेवा धर्तीवर शिकविणारे शिक्षक हवे आहेत. शाळा मराठी माध्यमाची आहे. संपूर्ण शालेय वर्षात (जुलै / ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४) या मुलांना शिकवायचे आहे.
आपल्यातील कोणी मायबोलीकर जर या मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवू इच्छित असतील तर कृपया ह्या बाफावर तसे कळवावे व मायबोली संपर्कातून आपला संपर्क क्रमांक, खरे नाव, आपण देऊ शकणारा वेळ इत्यादी तपशील कळवावेत. लवकरच आपल्याशी संपर्क साधला जाईल. स्पोकन इंग्लिश खेरीज आपण शालेय अभ्यासक्रमातील इतर कोणत्या विषयांबद्दल या मुलांना अनुभवी मार्गदर्शन करू इच्छित असाल तर तसेही कृपया कळवावे. आपल्यातील प्रत्येकाचा सहभाग व योगदान हे अनमोल असणार आहे!
शाळेचा पत्ता : नूतन समर्थ विद्यालय, सोन्या मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २.
अशा उपक्रमात भाग घेताना एक
अशा उपक्रमात भाग घेताना एक लक्षात नेहमी ठेवावे लागेल की त्यांना मदत हवीये उपकार नाही. आपण जे करतो ते आपल्या समाधानासाठी(ही) असते. >>>> अत्यंत महत्वाचा विचार...
मी टीसीएस च्या सीएसआर तर्फे
मी टीसीएस च्या सीएसआर तर्फे 'एकलव्य' ह्या सारखंच काम करणार्या रेणू गावस्करांच्या संस्थेतल्या मुलांना एक वर्षभर इंग्लिश शिकवलंय. वेळ थोडीशी गैरसोयीची आहे. आपण सर्व भेटल्यास आणि काही मार्ग निघाल्यास ठरवता येईल.
अरे वा! इतके भरभरून प्रतिसाद
अरे वा! इतके भरभरून प्रतिसाद वाचतानाच खूप छान वाटत आहे. सर्वांना खूप धन्यवाद!
विजय देशमुख, महागुरु, स्वाती२ -- तांत्रिक स्वरुपाची मदत लागल्यास तुम्हाला नक्कीच हाक देऊ!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हर्पेन - तुझ्या मित्रमंडळींपैकी कोणी तयार असेल तर तसे कळव प्लीज.
माधव, तुम्ही पुण्याला येणार असाल तेव्हा कळवा.
आशुतोष०७११, मुग्धमानसी - ये ब्बात! तुमचे नाव नोंदवून घेत आहे.
शैलजा, फोनची वाट पाहत आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हर्षलसी, आपल्याला बोलून ठरविता येईल. मुलांना गणितातील गमतीजमती किंवा शास्त्रातील गमतीजमती असेही काही शिकायला आवडेल.
केलाय, उचल
केलाय, उचल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार, तुझा अनुभव इथे शेअर
केदार, तुझा अनुभव इथे शेअर केल्याबद्दल खूप थँक्स. तुम्ही तिघांनी त्या शाळेला व मुलांना पहिल्यांदाच भेट दिली... पहिल्या दर्शनात मलाही जरा धक्के बसले होते. तेव्हा सोबत रुनी होती. नंतर कितीतरी दिवस ती शाळा व शाळेची मुले डोळ्यांसमोरून हलत नव्हती.
आपल्याला भेटलेल्या त्या मुलीबद्दलही अगदी अगदी. बारावी उत्तीर्ण झालेल्या त्या मुलीच्या वागण्या-बोलण्यात जो आत्मविश्वास दिसत होता तो त्या वस्तीतील मुलामुलींना फार प्रेरणादायी वाटणारा आहे. तिच्यासारखे होण्यासाठी ती मुलं मग संघर्षमय परिस्थितीतही मानसिक बळ मिळवतात, स्फूर्ती घेतात.
तुम्ही तिघे वरच्या मजल्यावरचे वर्ग पाहायला गेला होतात तेव्हा ती मुलगी माझ्या शेजारीच बसली होती. तिथे नुकतीच दहावी पास झालेली त्या शाळेची माजी विद्यार्थिनी तिच्यापाशी आली. हातात एक सिमकार्ड होते आणि ते वापरता येण्यायोग्य आहे अथवा नाही हे त्या दहावीपास मुलीला हवे होते. तिने या 'ताई'पाशी ते सिमकार्ड चेक करून पाहायची मागणी केली. मग ह्या 'ताई'ने अतिशय सहजपणे, शांत स्वरात ते सिमकार्ड कुणाचे आहे, या छोट्या मुलीला सिम वापरून कुणाशी बोलायचे आहे वगैरे चौकशी केली. त्यांचे ते कम्युनिकेशन इतक्या शांतपणे चालू होते, की दोन हात दूर बसलेल्या माणसालाही त्या काय बोलत आहेत हे कळले नसते.
ह्या मुली स्वतः तर स्वतःची जबाबदारी घेतच आहेत, शिवाय आपल्याबरोबर वस्तीतील इतर मुलामुलींनाही जबाबदारीने वागण्याचा, आयुष्यात शिक्षणाने पुढे जाण्याचा धडा घालून देत आहेत.
आतापर्यंत नोंदविलेली नावे :
आतापर्यंत नोंदविलेली नावे : साजिरा, मुग्धमानसी, आशुतोष०७११, शैलजा.
साजिरा व शैलजाचे संपर्क तपशील माझ्याकडे आहेत. आशुतोष व मुग्धमानसी, तुमचे तपशील प्लीज कळवाल का? आपण सगळे लवकरच शनि/रवि भेटायचे ठरवूयात. शाळेच्या मुख्याध्यापिकांशी बोलून व आपापसांत भेटून पुढचा आराखडा ठरविता येईल.
हर्षलसी, तुझाही संपर्क
हर्षलसी, तुझाही संपर्क क्रमांक प्लीज कळवशील का?
अरुंधती, संपर्क क्रमांक
अरुंधती,
संपर्क क्रमांक ई-टपालातुन कळवलाय.
मी तुम्हाला ई-मेल करते.
मी तुम्हाला ई-मेल करते.
खुप छान उपक्रम.. खुप कौतुक
खुप छान उपक्रम.. खुप कौतुक वाटतं तुम्हा सगळ्यांचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या उपक्रमाला भरभरुन शुभेच्छा
मी राहायला कसबा पेठेत आणि
मी राहायला कसबा पेठेत आणि शनिवारी मला सुट्टी असते. तेव्हा मला या कामात मदत करायला नक्की आवडेल.
- पिंगू
खूप छान उपक्रम! सहभागी
खूप छान उपक्रम!
सहभागी सर्वांचेच कौतुक!!
धन्यवाद आशुतोष व मुग्धमानसी.
धन्यवाद आशुतोष व मुग्धमानसी. लवकरच तुम्हाला संपर्क करेन.
पिंगू, तुमचे संपर्क तपशीलही कळवून ठेवाल का?
मंजूडी व माधुरी१०१, थँक्स!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अकु - 'मैत्री' परिवारातील
अकु - 'मैत्री' परिवारातील सदस्याकडून तुला आज एक फोन येईल.
तुमच्या कामासाठी मनापासून
तुमच्या कामासाठी मनापासून शुभेच्छा ….!
हर्पेन, मीमराठी, धन्यवाद.
हर्पेन, मीमराठी, धन्यवाद.
छान उपक्रम.. उपक्रमाला
छान उपक्रम.. उपक्रमाला शुभेच्छा.
छान उपक्रम. मुंबईमधे
छान उपक्रम.
मुंबईमधे प्रेरणासाठी अशाच वस्तीमधे काम करण्याचा तिथे व्यक्तीमत्व विकासाबद्दल शिकवण्याचा अनुभव आहे. सध्या उपक्रमात येणे शक्य नाही, तरी काही मदत हवी असेल तर अवश्य करेन.
अकु, अत्यंत चांगला उपक्रम. मी
अकु, अत्यंत चांगला उपक्रम.
मी भारतात असतो तर नक्कीच भाग घेतला असता.
मला आणखी एक सुवचावेसे वाटतेय. या मुलांना शिकलेल्या भाषेचा सरावही हवा. त्यासाठी देशातील किंवा परदेशातील मायबोलीकरांनी फोनवर किंवा स्काईपवर त्यांच्याशी फोनवर बोलल्यास कसे वाटेल ?
हा संवाद त्यांचा त्यांनीच म्हणजे मुलांनीच साधायचा.
अतिशय स्तुत्य
अतिशय स्तुत्य उपक्रम!!!
मनःपूर्वक शुभेच्छा!
मी मुंबईत असल्याने जमणार नाही
मी मुंबईत असल्याने जमणार नाही पण र चालणार असेल तर फेसबुक वर बाकीच्या ग्रुप वर ही माहिती शेयर करू का ?मायबोलीकर नसणाऱ्या लोकांकडूनही मदत मिळू शकते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान उपक्रम!
सहभागी सर्वांचेच कौतुक!!
खरोखर खूप चांगला उपक्रम....
खरोखर खूप चांगला उपक्रम.... कौतुकास्पद!
खूप छान उपक्रम. सहभागी
खूप छान उपक्रम.
सहभागी सर्वांना शुभेच्छा !
खुपच कौतुकास्पद
खुपच कौतुकास्पद उपक्रम!
शुभेच्छा!
अरे वा ! छान उपक्रम. माझाही
अरे वा ! छान उपक्रम. माझाही हात वर.
जोडीने गणित, इभूना, मराठी, व्यक्तिमत्व विकास (मागचा एक छोटासा असाच अनुभव आहे - सृष्टि बरोबरचा) हे विषयही ही चालतील.
अकु, तुझ्याकडे माझा फोन नंबर आहे; हो ना?
आवडेल यात सहभागी व्हायला. पण
आवडेल यात सहभागी व्हायला. पण शनिवारी वर्किंग आहे. शिकवण्याचं म्हणाल तर अॅप्टिट्युड मॅथ्स आणि शालेय संस्कृत शिकवण्याचा अनुभव आहेच (कारण तेच प्रोफेशन आहे), पण इंग्लिश शिकवण्याचा काहीच अनुभव नाहीये. तरी तेही शिकवायला जमेलच असं वाटतंय. पण वेळेमुळे प्रत्यक्ष शिकवणे जरी जमले नाही तरी बॅकस्टेज म्हणून काम करायला आवडेल. 'इच्छा आहे' हे सांगू इच्छितो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान उपक्रम. अनेक शुभेच्छा
खूप छान उपक्रम. अनेक शुभेच्छा आणि सहभागी होणार्यांचे कौतुक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व शुभेच्छा देणार्यांना
सर्व शुभेच्छा देणार्यांना खूप थँक्स.
दिनेशदा, सूचना नोंदवून घेतली आहे. शाळेतील सोयींनुसार व शाळाप्रमुखांच्या परवानगीने जे काही शक्य असेल ते करायचा प्रयत्न निश्चितच करू.
अवल, आनंदयात्री, थँक्स. अवलचा फोन, इमेल माझ्याजवळ आहे. आनंदयात्री, संपर्कातून फोन क्रमांक कळवलात तर आपल्याशी संपर्कात राहता येईल.
सुजा, सध्या मायबोलीकरांमधून या मुलांना शिकवण्यासाठी पुरेसे स्वयंसेवक मिळतील असे दिसते आहे. तरी, या उपक्रमाबद्दल लोकांना कळावे असे वाटत असेल तर नक्कीच शेअर कर फेबुवर लिंक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरु, माझ्या पुण्यातील एका
अरु, माझ्या पुण्यातील एका नातेवाईक मुलीने मोस्टली ऑगस्टपासून शनिवारी हे काम करायची इच्छा दाखवली आहे. अजून काही दिवसांनी तिने तिचा फोन नंबर तुला द्यायला सांगितलं आहे कारण तिची सद्ध्याची कमिटमेंट थोडे दिवसात पुर्ण होईल.
अश्विनी, तुझ्याकडे माझा फोन
अश्विनी, तुझ्याकडे माझा फोन नंबर आहे ना? तिला जसे जमेल तेव्हा मला कॉन्टॅक्ट करायला सांगशील का? संपर्कातून प्लीज तिचे नाव वगैरे तपशील कळवशील का? थँक्यू सो मच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages