सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Vacancy नावाचा सिनेमा पाहिलाय कुणी?? एका मोटेल मधे राहायला आलेल्या जोडप्यावर गुदरलेले भितीदायक प्रसंग. खूप चांगला चित्रित केलेला सिनेमा. मिळाला तर जरुर पहा.

"द रिपींग" ह पण मस्त आहे या मध्ये एक सायंटिस्ट एका गावामध्ये अनाकलनीय घटनांचा शोध लावण्या साठी जाते आणी मग पुढे मस्त रहस्य आहे सुपरनचरल हॉरर फिल्म आहे

'द रिपिंग' सिनेमा मलाही खुप आवडला.
तसा 'द आय(the eye)' हा पण इंग्लिश सिनेमा खुप छान आहे. यामध्ये एक अंध मुलगी, ऑपरेशन करुन डोळे बसवल्यावर घडणार्‍या घटना आधिच पाहु शकते. आणि तिला भुते ही दिसतात.
यावर आधारीत एक हिंदी सिनेमाही होता, उर्मिलाचा. काय बरे नाव होते त्याचे?.....

हा! 'नयना' तोही मस्त जमलेला पिक्चर आहे.

मी मध्यंतरी कोणता तरी सिनेमा पाहिला होता टिव्हीवर. तिथे काही विद्यार्थी कोणत्या तरी दुसर्‍या देशात गेलेले असतात, तिथे त्यांना खूप त्रास दिला जातो, हात पाय वगैरे कट केले जातात अशी काय्तरी कथा होती.. बेक्कार घाण होता >> हॉस्टेल हा cult classic धरला जातो ग.

इथे चक्क rosemary's baby बद्दल कोणीच लिहिले नाहिये ? तो formula नंतर बरेचदा वापरला गेला पण जेंव्हा रोमन पोलान्स्कीने हा सिनेमा काढला तेंव्हा त्यासारखाच तोच होता. हा एक बघण्यासारखा अनुभव आहे. त्याच्याबद्दल काहिही न वाचता सिनेमा पहाच.

असामी
एक कम्युनिटी जी शैतान ची पुजा करत असते.. ते एका त्या बाईला मुदादाम बाळाला जन्म द्यायला लावतात..ह्यात तिचा नवरा पण सामील असतो.. आनि शेवटी ते बाळ जन्माला येतेच अस काही स्टोरी आहे का ????
खुप आधी पाहिला होता हा सिनेमा.. आता फारस नीट आठ्वत नाही...

अजुन एक असाच एक सिनेमा आठ्वत नाही..फक्त एक शॉट आठ्वतो.. एक मुलगी एका घरात अडकलेली अस्ते.. किती ही प्रयन्त केला तरी ती बाहेर पडु शकत नाही.. प्रचंड प्रयत्नानंतर ती घराच्या बाहेर पडुन अंगणात पोहोचते.. आनि मेन गेटजवळ जाऊ लागते.. तिथे एक भिंत असते छोटी,, आनि त्याला छोट भोक पडलेले असत..ति सहज म्हणुन त्या भोकातुन पलिकडे पाहते .. तर ती पुन्हा त्या घरातच अडकलेली अस्ते.. हा थोडा जुना पिक्चह्र आहे.. मी शाळेत असताना पाहिला होता.. कोणाला काही माहिती असेन तर प्लीज सांगा...

असामी, तुम्ही सांगितलेला चित्रपट इंटरेस्टिंग वाटतोय. पहायला पाहिजे.

अंकु तुम्ही सांगितलेल्या चित्रपटाचे नाव ठावुक नाही; पण त्यावरुन दुसरा एक चित्रपट आठविला 'triangle' त्यामध्ये त्या नायीकेला एकाच प्रोसेस मधुन सतत जावे लागते. आपल्यालाच टेंशन येते पाहुन.

rosemary's baby ... हा एक बघण्यासारखा अनुभव आहे.
+१००

तसाच द शायनिंग.
माझे हे दोन ऑलटाइम क्रीपी फेव्हरिट्स.

ईथे 'द अ‍ॅमिटीव्हीले हॉर्रर' बद्दल कोणीच लिहले नाही? .....ती सत्यघटनेवर आधारीत असलेली कदाचीत जगात सर्वात जास्त गाजलेली घोस्ट स्टोरी आहे .
http://www.imdb.com/title/tt0384806/

वॅम्पायर्सवर आधारीत जॉश हार्नेटची '३० डेज ऑफ नाईट' देखील एकदातरी मस्ट वॉच अशीच आहे
http://www.imdb.com/title/tt0389722/

मधुरीता
नाही तो वेगळा चित्रपट आहे..त्यामधे ती सारखी त्या जहाजावर अडकलेली असते.. कशीतरी घरी पोहोचते.. परत तेच,..... मी जो म्हण्तईये तो वेगळा आहे

मंडळी, ४ जुलैपासून दर गुरुवारी रात्री ११ वाजता मुव्हीज नाऊ वर हॉरर चित्रपट दाखवणार आहेत म्हणे.

मी अजुन मनोरमा पाहिला नाही.अभय आनि रायमा असलेल्या मनोरमा विषयी च बोलत आहात ना तुम्ही.. की अजुन जुना कुठला आहे का पिकचर सेम नावाचा ???

अनेक उत्तमोत्तम हॉरर सिनेमांच्या लिस्टसाठी सर्वांनाच मनापासून धन्यवाद!

१९५३ मध्ये आलेला हाऊस ऑफ वॅक्स हा सिनेमा पाहिला आहे का कोणी? या सिनेमातला मुख्य व्हिलन जिवंत माणसांच्यावर उकळलेलं मेण ओतून त्यांचे पुतळे बनवतो आणि त्याचं प्रदर्शन मांडतो! निव्वळ अप्रतिम आणि थरारक असा सिनेमा आहे हा!

एक्झॉर्सिस्टबद्दल अनेकांनी आधीच बोलून झालं आहेच!

रत्नदीप हा गिरीश कर्नाड , हेमामालिनी अभिनित आणि बासुदा दिग्दर्शित सिनेमा.

श्रद्धांजली हा ही असाच एक वेगळा सिनेमा आहे राखीचा.

अर्रे वा हा धागा वर आला का Lol

आता नुकतेच पाहिलेले चित्रपट:
the shining
the sixth sense

se7en
the silence of the lambs
hannibal
red dragon
psycho

सगळेच लय भारी आहेत.

===
वरती 'मनोरमा सिक्स फीट अंडर' बद्दल एक दोन प्रतिसाद दिसताहेत मी पाहिलाय कळलेला आणि आवडलेला. china town ची कॉपी होता म्हणे. तो पण बघेन....

आत्ताच सगळी पानं परत वाचून काढली.
पान क्र ४ वर हे रत्न मिळालं:

वाट पहाते पुनवेची.. अलका कुबल पुढच्या जन्मात निशिगंधा वाड होते..
>>>>
बोम्बला , म्हणजे काय? निदान सई ताम्हणकर म्हणून तरी जन्म घ्यायचा.दोन्ही जन्म पुच्याटच

Submitted by बाळू जोशी. on 16 March, 2012 - 22:56

Biggrin

पान क्र ३:

"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स" आणि याच टीमचा पुढचा "हॅनिबॉल" दोन्हीही अशा कथानकावरीलचे उत्कृष्ट आणि प्रेक्षकाला जागेवर खिळवून ठेवणारे चित्रपट >> 'हॅनिबाल' सिनेमा 'सायलेंस ऑफ द लँब्स' चा पुढचा थेट 'भाग असा नाही म्हणता येणार. तो फक्त 'लेक्टर' ह्या व्य्क्तीरेखेला ग्लोरिफाय करतो.
एड नॉर्टन आणि राल्फ फाईन्सच्या 'रेड ड्रॅगन' ला 'सायलेंस ऑफ द लॅंब्स' चा सिक्वल म्हणता येईल.
Submitted by असामी on 16 March, 2012 - 20:52
एड नॉर्टन आणि राल्फ फाईन्सच्या 'रेड ड्रॅगन' ला 'सायलेंस ऑफ द लॅंब्स' चा सिक्वल म्हणता येईल. >> त्यातही अॅन्थोनी हॉपकिन्स आहे नि हा sequel नसून "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स" चा prequel आहे रे. बहुधा ह्यातच तो कवटी उघडून मेंदू खातो हा सीन आहे.
Submitted by हायझेनबर्ग on 16 March, 2012 - 21:13
हो , पुस्तकांच्या क्रमाप्रमाणे 'रेड ड्रॅगन' प्रीक्वल म्हणता येईल, यातच त्याला पहिल्यांदा जेरबंद करतात.
पण सिनिमे त्यांनी ऊलट्या क्रमाने बनवले.
मेंदू खाण्याचा सीन बहूधा ज्युलियाने मूरच्या 'हॅनिबाल' मधे(ही) आहे.
प्रचंड गोरी, ज्युलिआने नव्हे सीन्स Happy
Submitted by हायझेनबर्ग on 16 March, 2012 - 21:13

>>>>>

पुस्तकांचा क्रम: red dragon, the silence of the lambs, hannibal, hannibal rising

चित्रपटांचा क्रम: manhunter, the silence of the lambs, hannibal, red dragon, hannibal rising

manhunter आणि red dragon एकाच पुस्तकावर बेतलेले आहेत.

मेंदू खाण्याचा सीन hannibal मधे आहे.

Pages