निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
यावेळेस जांभळे / रेडे करवंद
यावेळेस जांभळे / रेडे करवंद मिळणार नाहीत पण पाऊस मात्र मनसोक्त मिळेल.
कदाचित, मद्यधुंद लोकांच्या सहवासाचा पण लाभ होईल.. पण आपण मात्र त्यांना दूर ठेवू.
अनिल, कोल्हापूरहून तूझ्या गावाला ( पावसाळ्यात ) जायला किती वेळ लागतो ? त्यानुसार वेळा ठरवू.
धन्स शांकली ! साधना ....
धन्स शांकली !
साधना .... गणपतीचे स्वयंभु मंदिर जेराडी ईन्टर्नॅशनल हॉटेल पासुन जवळ आहे. आम्ही चालतच गेलो होतो मंदिरापर्यंत. तुला कदाचीत माहीत असेलच ... तुला फोटी पाठवते मी मग लक्शात येईल.
शशांक, दादाजींबद्दलच्या
शशांक, दादाजींबद्दलच्या माहितीबदल धन्यवाद. त्याचं श्रेय त्यांना मिळालं हे वाचल्यावर बरं वाटलं.
राता तांदूळ दिसायला लाल, चविला गोड. अगदी सुरवातीला तर आमची त्याच तांदळाची शेती होती. भाकर्याही राता तांदळाच्या आणि भातही. भात लाल व्ह्यायची. <<<< जागू, याची भातकुंडे काळी असतात का? आमच्याकडे याला 'मासाड भात' म्हणतात. आम्ही पण या भाताची लागवड करायचो. भातकुंडं काळी आणि सडलेला तांदुळ लालसर गुलाबी. अगदी जिव्हाळ्याच्या नातलगांना भेट म्हणून देण्यासाठी याची एक कणगी लिंपून (सीलबंद) ठेवली जायची. हल्ली हे बियाणे नजरेला पडेनासे झालेय.
आजच्या लोकसत्तात मारुती
आजच्या लोकसत्तात मारुती चित्तमपल्लींचा लेख आहे.निसर्गातील सुक्ष्म निरीक्षणे व
पावसाळ्यापूर्वी निसर्गात होणा-या बदलांवर लेख आहे.
ही लिंक -
http://www.loksatta.com/lokrang-news/maruti-chitampallis-article-on-natu...
ओळखा पाहू - हे चिमुकलं झुंबर
ओळखा पाहू - हे चिमुकलं झुंबर कशाचं आहे?
Kiti sundar........
Kiti sundar........ Konachyatari kalya ki kaay
Aaj purn divas tufaan paus.
Aaj purn divas tufaan paus.
Mumbapurila pavsane zodapale......... Udyachi headline
गजानन, निलगिरीचं
गजानन, निलगिरीचं (युकॅलिप्टसचं) आहे का ते झुंबर?
गौरी, होय. नीलगिरीचंच आहे.
गौरी, होय. नीलगिरीचंच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लहानपणी आमच्या क्वार्टरमध्ये
लहानपणी आमच्या क्वार्टरमध्ये निलगिरीचं मोठ्ठं झाड होतं. उन्हाळ्यात अंगणात झोपलं, की शेजारी ते रात्री वेड्यासारखं वार्यावर डोलतांना दिसायचं. या झुंबराच्या टोप्या वाळल्यावर गळून पडतात, त्या आम्ही गोळा करून त्याच्या माळा बनवायचो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Gauri aamhi pan aadhi
Gauri aamhi pan aadhi nilgirichya topyanche gajare karun te kesat malayacho.
Ithe pan aaj bharpur paus suru aahe.
दिनेशदा, जागू, गौरी मी काहिच
दिनेशदा, जागू, गौरी मी काहिच वाचलं नाही.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा!! मस्त योजना आहे
व्वा!! मस्त योजना आहे कोल्हापूर - आंबोलीची... नक्की आवडेल यायला. प्लान थोडा आधी कळला म्हणजे ठरवता येईल.
काल रात्रीपासून पाउस लागला आहे. छान गारवा आला आहे.
आजच्या लोकसत्तात मारुती चित्तमपल्लींचा लेख आहे.निसर्गातील सुक्ष्म निरीक्षणे व
पावसाळ्यापूर्वी निसर्गात होणा-या बदलांवर लेख आहे. >>>> हे सांगायलाच आले होते. ......
"वृक्षांनधील बदलांतूनही पावसाळ्यापूर्वीचे काही संकेत स्पष्टपणे मिळतात.... मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणर्या गोडांबा म्हणजे बिब्याच्या झाडाल बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवार्याचे संकेत देतो. बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो. आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात सरळ रेषेत उभे राहताता दिसू रागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे. ....."
खरोखरच निसर्ग समजून घ्यायला हवा.
खरंच मस्त आहे तो लेख. कात्रण
खरंच मस्त आहे तो लेख. कात्रण जपूण ठेवणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुप्र निगकर्स! गटगचे बेत
सुप्र निगकर्स! गटगचे बेत चाललेत ना दिनेशदांबरोबर? कोल्हापूर, आंबोली, अनिलचं गाव.......... मज्जा करा.!
आम्ही नगरकर्स खूष आहोत कारण प्रचंड पाऊस चालू आहे.
थोडं अवांतर........शनि. संध्या. रोजच्या प्रमाणे पोहोण्यासाठी पुलात उतरलो आणि १० मि. पोहोलो नाही तर काय प्रचंड पाऊस झोडपायला लागला, वाटलं रोजचा कोटा पूर्ण करूनच जाऊ. पण पोहोणं अशक्य झालं. अती पावसात जसं टूव्हीलरवरून जात असलो तर कधी कधी थांबावच लागतं तसं झालं अगदी सांगलीला पावसाळ्यात कृष्णेत पोहायचो ती आठवण झाली.
सुप्रभात. आज ऑफिसला जॉइन
सुप्रभात.
![](https://lh6.googleusercontent.com/-86yb82SBy64/UaeYx00nQAI/AAAAAAAAGRk/QX0GXpI-JUg/s800/IMG_1207.JPG)
आज ऑफिसला जॉइन झाले. मनावर थोड राधा कशी राहील ह्याच दडपण आहे. पण तिला माहेरी ठेवले आहे. तिथे लहान मुलिंमध्ये चांगली खेळेल ह्या तर्काने.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज भरपुर पाउस पडला त्यामुळे गाडीपण नाही आणता आली. मस्त साठलेल्या पाण्यात डुबुक डुबुक करत बस पकडली.
जागु, तुला मस्त सुट्टी मिळाली
जागु, तुला मस्त सुट्टी मिळाली भरपुर..
जिप्स्यी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषी पण पाऊस पडत असताना पोहायला खुप मजा येते ना? मला खुप आवडायचे पण आमच्या इथे खुप पाऊस अस्ला की पुल बंद ठेवायचे,...
नमस्कार, माझ्याकडचे वडाचे झाड
नमस्कार,
माझ्याकडचे वडाचे झाड साधारण दोन अडीच फुट वाढले होते. तेव्हा मागे साधारण फेब मधे एका लिंकवरची झाडाची उंची कमी करण्याची माहिती वाचली. त्यात उंच झाडाच्या खोडाला मधुनच मुळे फुटवायची आणि तिथुन कापुन ते झाड जमिनीत लावायचे असे तंत्र होते.
त्याप्रमाणे साधारण १० इन्चावर मार्किंग केले . मग तिथे एक सेमी भागातल्या खोडाची वरची सुकलेली पातळ साल सर्व बाजुंनी काढली. त्यावर ओली माती लावली एक प्लॅस्टीकचा तुकडा घेऊन त्याने हा भाग गुंडाळला वरुन आणि खालुन कापडाच्या चिंधीने ( दोरीने खोडाला इजा होईल असे वाटुन ) बांधले. रोज पाणी घालताना हा भागही ओला होईल असे पाणी घातली. खुप उन्हात दोन्ही वेळेस पाणी दिले. मागच्या आठवड्यात हे प्लॅस्टीक काढुन पाहिले तर मस्त नविन मुळे फुटली होती. आता त्या मुळांच्या खालुन झाड कापले आणि नव्या कुंडीत लावले की झाले. ( झाडाची उंची कमी झाली!! ) मी मात्र झाड कापुन जुन्या खोडाला अगदी चिकटून लावले. म्हणजे जुने खोड आणि नवे खोड दोन्ही मिळुन एकच झाड होईल.
शिवाय अंजिर गटातील झाडाला खोडालाही आधार मुळे फुटण्यासाठी हे तंत्र वापरता येते. अगदी जमिनी जवळच्या खोडाच्या भागाला वाळलेल्या पानांनी झाकुन ( मल्चिंग ) ठेवले तरीही तिथे आधारमुळे फुटतात.
सावली, मस्तच. फोटो टाक ना
सावली, मस्तच. फोटो टाक ना जमलं तर.
जागू दडपण घेऊ नको. राधा शाणी
जागू दडपण घेऊ नको. राधा शाणी मुग्गी आहे:स्मितः
साधना ......पावसात मजा येते पोहायला पण आमच्या कडे इतका पाऊस कुठे की अगदी आमच्या पोहोण्याच्या वेळेत पडेलच! पण शनी. इतका कोसळला की पोहोणं बंद करावं लागलं. अगदी थपडा बसत होत्या. पण ती पण मज्जाच!
सावली सगळं डीटेलवार लिहिलेलं वाचून मस्त वाटलं! मलाही आता आंब्याच्या झाडाला कलम करायचंय. नीट माहिती काढून मगच करीन.
वा सावली, छान प्रयोग. फायकस
वा सावली, छान प्रयोग. फायकस कूळातील सर्वच झाडावर हा प्रयोग करता येईल.
आपल्याकडे निलगिरीची एकच जात लावलेली दिसते. मी स्वतः सिडनी आणि ऑकलंडला त्याच्या वेगवेगळ्या जाती बघितल्या. एकाला भडक केशरी आणि एकाला गर्द गुलाबी फुले आली होती.
इथे अंगोलात, आणखी एक दोन वेगळ्या जाती बघितल्या. एकीला तर चक्क ओडोमॉस सारखा सुगंध येतो. मी त्याची पाने आणून कपड्यात, बूटात ठेवतो.
आपल्याकडच्या निलगिरींना छोटी फले लागतात, त्यांचे भोवरेही छान होतात.
रच्याकने, युकॅलिप्टस अशा अडनिड्या नावाचे भारतीय करण न होता, आपल्या पर्वतावरून या झाडाचे नाव ठेवण्यात आलेय.
माझे तिकिट बूक झाले कि कळवतोच.
सावली मस्तच गं..
सावली मस्तच गं..
थँक्यु. फोटो नाहीत कारण
थँक्यु.
फोटो नाहीत कारण प्रयोग यशस्वी होईल का ते माहित नव्हते. पण पुन्हा करेन तेव्हा फोटो काढुन ठेवेन.
इतर खोडापासुन झाडे लावत्या येणार्या सर्वच झाडांचे करता येईल असे वाटतेय. करुन पहायला हवे.
मानुषी, किमान तीन ते चार महिने लागतात मुळे फुटायला. आंब्याची कलमं करायची मात्र काहितरी स्पेशल पद्धत असणार. व्यवस्थित शोधुनच कर.
काल भर पावसात इथे येऊरच्या डोंगरावर गेले होते. रस्ता डांबरीच आहे. मात्र जिथे जिथे ऑस्ट्रेलियन बाभळीची झाडं होती त्या झाडाखाली शेंगा पडल्या होत्या आणि भरपुर फेस पसरला होता. या शेंगातुन फेस येतो का? यबद्दल कोणाला काही माहिती आहे का?
मात्र जिथे जिथे ऑस्ट्रेलियन
मात्र जिथे जिथे ऑस्ट्रेलियन बाभळीची झाडं होती त्या झाडाखाली शेंगा पडल्या होत्या आणि भरपुर फेस पसरला होता
बहुतेक हो. मीही या फेसाबद्दल कुठेतरी वाचलेले.
निलगिरी पर्वताचे नाव या
निलगिरी पर्वताचे नाव या झाडांवरुन पडले असा मला भ्रम होता कारण झाडाची ओळख आधी झालेली आणि पर्वताचे नाव भुगोलाच्या पुस्तकातच वाचलेले. ही झाडे दिसली की त्यांच्यामध्ये निळाई शोधत बसायचे. त्याची करडी दिसणारी पाने बहुतेक लांबुन निळी दिसत असावित अशा स्वतःच स्वतःशी शोध लावायचे.
जेव्हा निलगिरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला तेव्हा हा भ्रम दुर झाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा... मस्तच की सावली.
अरे वा... मस्तच की सावली.
जागुडे, मग घरी किती वेळेस फोन केलास आज???![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा... निलगिरी वृक्षामुळे जमिनीचा पोत बिघडतो असं ऐकलय. हे कितपत खरं आहे?
निलगिरीचे झाड जमिनीतले आणि
निलगिरीचे झाड जमिनीतले आणि आसपासचे पाणी खेचुन घेते असे वाचलेय. त्यामुळे काही वर्षात जमिन नापिक बनते असे वाचलेत.
विकीवर याची माहिती वाचत
विकीवर याची माहिती वाचत असताना ऑस्ट्रेलियातल्या निलगिरी पर्वताचे नाव या झाडांमुळे पडलेय असे वाचले.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
निलगिरी वृक्षाच्या आसपास छोटी
निलगिरी वृक्षाच्या आसपास छोटी झुडुपं वाढु शकत नाहीत. हे मी पाहिलय.
मी एका ठिकाणी वाचले होते कि
मी एका ठिकाणी वाचले होते कि भारतात ह्याची लागवड प्रामुख्याने निलगिरी पर्वता वर झाल्या मुळे ह्या झाडाचे नाव निलगिरी पडले …। जाणकारांनी ह्या संबंधी अधिक माहिती द्यावी
Pages