निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
आमच्याकडे पण.. पण फक्त
आमच्याकडे पण.. पण फक्त खारघरात. तिकडच्या सोसायटीतली मुले पावसात अगदी गिल्ला करत होती. परत बेलापुरात आले तर जरासे शिवार शिंपुन गेल्यासारखा पाऊस येऊन गेला होता.
जागु, फुगे मस्त आहेत, अगदी पारदर्शक वाटताहेत.
दोन / तीन दिवस मला यायलाच
दोन / तीन दिवस मला यायलाच जमले नाही, मस्त चर्चा चालली आहे. नेवराचे झाड राणीच्या बागेत मगरींच्या तलावाजवळ आहे, खुप बरसते ते. दुसरे किंग्ज सर्कलजवळ मानव सेवा संघाच्या जवळ होते, अजून असेल.
शेवाळाला दूर्गा भागवतांनी ( संस्कृत काव्याचा संदर्भ देत ) "गंधर्वाचे अन्न" म्हंटले आहे.
रुद्राक्षाचे झाड राणीच्या बागेतही आहे पण त्याखाली कधी रुद्राक्षे पडलेली दिसत नाहीत, अर्थात तिथले लोक नक्कीच गोळा करत असतील
जिप्सी ती फळे बहुतेक गोड्या
जिप्सी ती फळे बहुतेक गोड्या आंबाड्याची आहेत. याचे गोव्यात रायते करतात. यात आंबट आणि गोडे असे दोन प्रकार असतात. साधारण श्रावणात फळे येतात बाजारात.
दुसरे किंग्ज सर्कलजवळ मानव
दुसरे किंग्ज सर्कलजवळ मानव सेवा संघाच्या जवळ होते,
नव्या मुंबईत भरपुर आहेत. एक अतिविशाल झाड रिलायन्स डिएकेसीच्या बाजुला आहे, ते बहुतेक रस्तारुंदीत जाणार. त्याच्या आजुबाजुची सग़ळी झाडे गेली आणि हे एकटेच रस्त्याच्या मध्यभागी उभे आहे. मी सिवुड्सला फिरायला गेले असताना अशेच आजुबाजुला पाहत चाललेले. अचानक लोंब्या दिसल्या, म्हटले हे काय ? अलभ्य लाभ कि काय??? जवळ जाऊन पाहते तो काय जेमतेम ६ फुटाचे बारकुंडे झाड. पण याला दीर्घायुष्य लाभणार आहे, सिवुड्सचे रस्ते मुळातच भरपुर रुंद बनवलेले आहेत. तिथे रस्तारुंदी प्रकल्प यायला अजुन ५० वर्षे लागतील.
जागू, त्या फुग्याच्या फळाचा
जागू, त्या फुग्याच्या फळाचा फोटो रुणुझूणू ने टाकला होता. तिला श्रीलंकेत दिसली होती पण ती विषारी असतात असे तिने लिहिले होते. मला केनयात आणि न्यू झीलंडमधेही दिसली होती. आपल्याकडे पण असतात हे माहित नव्हते.
झाडांची तोड करण्यासाठी
झाडांची तोड करण्यासाठी नगरपालिकेची परवानगी लागते. तशी न घेता तोडली तर तो दखलपात्र गुन्हा ठरतो. असा कायदा ( निदान कागदोपत्री तरी ) आहे.
आता शहरातील लोकांना पण "चिपको" आंदोलन करावे लागणार.
झाडांची तोड करण्यासाठी
झाडांची तोड करण्यासाठी नगरपालिकेची परवानगी लागते. तशी न घेता तोडली तर तो दखलपात्र गुन्हा ठरतो. असा कायदा ( निदान कागदोपत्री तरी ) आहे
जिथे महापालिकाच झाडे तोडतेय तिथे काय करणार??? रस्ते बनवणे कोणाच्या अख्यतारीत येते मला माहित नाही, पण वाशीपासुन सुरू करुन थेट कळंबोलीपर्यंत रस्तारुंदीकरण चालु आहे आणि त्या भानगडीत गेल्या वर्षभरात कमीतकमी हजारभर मोठ्ठी वाढलेली झाडे तरी गेली आहेत. मध्यम झाडांचे तर विचारु नकाच, त्यांची गणना होतच नाहीय. ही झाडे कोणी किती भावाने विकली याची माहिती आरटीआय अॅक्टखाली मागवली तर अतिशय मनोरंजक (की मनोभंजक??) माहिती समोर येईल.
एका दृष्टीने रस्तारुंदीकरण योग्यच आहे, आधी जागा होती, झाडे लावली. आता रस्ता कमी पडतोय तर तेव्हा त्या लावलेल्या झाडांना दुर करुन रस्ता वाढवावा लागणारच. दुसरा पर्याय नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेचा तरी वृक्षारोपण करणे आणि लावलेली रोपे जगवण्याचे प्रयत्न करणे यात बराच पुढाकार आहे.
आता शहरातील लोकांना पण
आता शहरातील लोकांना पण "चिपको" आंदोलन करावे लागणार.
असं नाही होणार ना.... चिपको आंदोलन करण्यासाठी आधी त्या झाडाला घेरुन उभे राहावे लागेल आणि तितकीही जागा आता मुंबईत शिल्लक नाहीय. मुंबईत रस्त्यावरुन गाडी चालवणे म्हणजे कुठल्याही क्षणी शेजारचा गाडीवाला आपली गाडी घासुन पुढे जाईल ही शक्यता लक्षात घेऊन, आपले गाडीवरचे प्रेम शक्य तितके पातळ करुन चालवणे होय. (आपली गाडी कोणी घासली तर किती दु:ख होते हे ज्याचे त्यालाच ठाऊक. )
आला आला आला पाऊस आला. काय
आला आला आला पाऊस आला. काय गडगडतय. दचकलेच मी. पण आनंद झाला. आता जोरात पाउस येईल. या कुणाला भिजायच असेल तर इकडे.
झाडांची तोड करण्यासाठी
झाडांची तोड करण्यासाठी नगरपालिकेची परवानगी लागते. तशी न घेता तोडली तर तो दखलपात्र गुन्हा ठरतो. असा कायदा ( निदान कागदोपत्री तरी ) आहे>>>> मध्यंतरी अशीच झाडं कमी होताना दिसली म्हणूनच ही कविता लिहिली होती.
http://www.maayboli.com/node/42491
आला आला आला पाऊस आला. काय
आला आला आला पाऊस आला. काय गडगडतय. दचकलेच मी. पण आनंद झाला. आता जोरात पाउस येईल. या कुणाला भिजायच असेल तर इकडे.
पुण्यात सध्या मेघ गर्जना चालु
पुण्यात सध्या मेघ गर्जना चालु आहेत,आभाळ पहिल्यांदाच असं भरुन आलं आहे, काही भागात पाऊस कोसळत आहे, कुणीतरी फोटो टाका इथे ....
कुणीतरी फोटो टाका इथे
कुणीतरी फोटो टाका इथे ....>>>>>>>>>>>>माझ्याकडे आला, की मग मी डकवेन.(फ़ोटो)
न येताच परत गेला पाऊस.
न येताच परत गेला पाऊस.
काजव्यांची चमचम सुरू.
काजव्यांची चमचम सुरू.
http://epaper.esakal.com/sakal/3Jun2013/Normal/PuneCity/Pune1Today/index...
व्वा, शोभे! आजच वाचली ही
व्वा, शोभे! आजच वाचली ही बातमी!
अरे ते पहिल्या पावसाच्या वेळेस दिसणारे लाल रेशमी किडे कुणाला दिसले असतील तर फोटो टाका. आठवण येतेय त्या किड्यांची
वा ! वा ! पावसाची बातमी
वा ! वा !
पावसाची बातमी वाचल्यावर मलाच इथे भिजल्यासारखे वाटले
आता मला दर रविवारी त्या अंबाडीला भेटल्याशिवाय चैन पडत नाही. काल जरा सेफ्टी शूज, जाडसर जीन्स वगैरे घालून गवतात शिरलो. तर असे मस्त फोटो मिळाले.
( या बोंडाच्या पाकळ्यांचेच सरबत करतात. )
मस्त दिसताहेत बोंडे.. शोभे,
मस्त दिसताहेत बोंडे..
शोभे, तुला पावसाने का फसवले? इथे तर आलाय..
मला गावाकडे (गेल्या महिन्यात
मला गावाकडे (गेल्या महिन्यात झालेल्या मोठ्या पावसानंतर) ऊसाच्या पानावर रात्री काही काजवे चमकताना दिसले,२-३ बघायला /पकडायला जवळ गेलो तर चमकण एकदम बंद,सगळे गायब, पुन्हा १०० फुटांवर जाऊन थांबलो तर पुन्हा चमकणं सुरु, त्यांना आपली चाहुल लागत असेल कि डोळ्यांना दिसत असेल ?
या बोंडाच्या पाकळ्यांचेच सरबत करतात.
किती वर्षापासुन अंबाडी बघतो आहे, खातो आहे, पण याच्या बोंडा पासुन सरबत बनवता येतं, हे मला माहितीच नव्हतं, किती हे आमचं अज्ञान ! अजुन कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत..
नदीकाठी बाजुला पाण्यात याची थोडी उंच झाडे भिजवत घातलेलं पाहिलयं, दोर करण्यासाठीच असेल !
अनिल, काजवे आपल्या
अनिल,
काजवे आपल्या "हि"च्यासाठी तो सिग्नल देत असतात. तू मधेच आलास तर राँग नंबर लागला म्हणत असतील.
कधी कधी काही सुरवंटदेखील असा प्रकाश सोडतात. ते पानाखाली लपत असतील.
आंबाडीचा वाख वळतात हे खरंय. आणि मला लाजवू नकोस रे, तुम्हा लोकांना थेट मातीचा अनुभव आहे.
त्याच बागेतील हा "लेटलतिफ"
त्याच बागेतील हा "लेटलतिफ" बहावा. दरवर्षी सगळ्या बहावांचा बहर ओसरायला लागला कि हा फुलायला लागतो.
प्रचि ०१
प्रचि ०२
थोड्या वेगळ्या अँगलने बहावा
प्रचि ०३
प्रचि ०४
आणि हि आमची हिरानंदानी बाग
आणि हि आमची हिरानंदानी बाग
जिप्सी नेमानं बागेत जायला
जिप्सी नेमानं बागेत जायला लागला काय?
बहाव्याचा पहिला फोटो अप्रतिम!
बहाव्याचा पहिला फोटो अप्रतिम! फार आवडला.
जिप्सी, अभिनंदन! पण तुम्ही अजूनही फुलांचे फोटो काढताय?!
मामी, मृण्मयी हि बाग
मामी, मृण्मयी
हि बाग ऑफिसच्या मागेच आहे. यात बरीचशी दुर्मिळ झाडे लावली आहे आणि त्याची योग्य ती काळजी घेतली जाते. अंजनीच झाडही पहिल्यांदा मला इथेच दिसलं. मामी, या बागेत एक निसर्ग गटग करूया.
जिप्सी अभिनंदन ! फुलांचे फोटो
जिप्सी अभिनंदन ! फुलांचे फोटो काढणे हे निमित्त असेल ना बागेत जायचे आजकाल
अरे जिप्स्या पण हल्ली तू ऑफिस
अरे जिप्स्या पण हल्ली तू ऑफिस सुटल्यावरच जात असशील ना? की मधून पण ? आता फोटो अजुन जास्त फुलायला लागलेआहेत बाकी.
हे शेरबागेतील अजुन एक वेगळे फुल.
मेधा, जागू अरे जिप्स्या पण
मेधा, जागू
अरे जिप्स्या पण हल्ली तू ऑफिस सुटल्यावरच जात असशील ना? की मधून पण ?>>>>>नाही ना आमची "बाग" हापिसापासुन चिक्कार लांब आहे.
अरे मग अजुन चांगलच तुला तुच
अरे मग अजुन चांगलच तुला तुच जात अशशील कुठेतरी मध्यभागी बागेला भेटायला
हा मिरचीचा एक प्रकार.
जागू हे फ्युशिया आहे . या
जागू हे फ्युशिया आहे . या फुलाच्या नावाने रंग पण असतो. नेलपॉलिश, लिपस्टिकचे वर्णन करताना वापरतात .
Fuchsia is a vivid reddish or pink color named after the flower of the fuchsia plant,
itself named after the German scientist Leonhart Fuchs
Pages