मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hello Friends,

Sorry, my language toggle system is not active some how..........

There use to be an add, of Nescafe...... it was an add of almost 5 minutes.......some people riding on an elephant, I don't remember it completely,
can any one help me in recollecting it please ?

Another one used to be so good with this small song...... How are things with you ? Do I see a welcome in your smile, lets sit & talk a while, in the one world of Nescafe...........! ! ! !

Advertisements....... first used to be a bit emotional, then I think Colgate came in by providing knowledge to its ( would be ) customers, then came adds with providing education,,,, still going on with a little bit of common sense added into it.

सध्याच्या त्या स्टुडण्ट ऑफ द ईयर मधल्या तिडप्यांच्या ( दोघांचं जोडपं तस तिघांचं तिडपं ) अ‍ॅड्सही आवडत आहेत ++११११
हा हा मै crazy हुं

अरे, संस्कारांचा काय संबंध.
ज्यात त्यात संस्कार संस्कार करत तांडवनृत्य कशाला?
Proud
आमच्यात संस्कार संस्कार करत कथकली करतात Wink << [हा विनोद आहे]
जोक्स अपार्ट.

त्या अ‍ॅड मधे सारूक नस्ता तर आवडली अन भिडली असती कदाचित. कि ब्वा फ्रूटी इतकी टेम्प्टिंग की लाज लज्जा सोडून माणूस फ्रूटी पिऊ लागतो. पण तो सारूक मुळातच इतका निर्लज्ज अन इरिटेटिंग आहे, की त्याला पाहून ही कन्सेप्ट काही केल्या डोक्यात उतरत नाही ब्वा.

जसं पूर्वी सारूक मुळे सँट्रोवाले सगळे उद्धट अन माठ असतात अशी कन्सेप्ट तयार होत होती, तसंच हे निगेटिव्ह इम्पॅक्ट करतंय.

स्प्राईट ची व्हॉयलीन टीचर वाली जाहिरात मस्त आहे.....
ती टीचर तनु वेडस मनु मधली आहे ना ?????... मराठी आहे का ती ????

ती तनिष्क ची आताची अ‍ॅड मस्त आहे, बहिणीचे लग्न ठरलेय भाऊ तिला कानातले आणून देतो, बहिण विचारते तु मुझे अभीसे मिस कर रहा है?.... आवडली ती अ‍ॅड, लो बजेट ज्वेलरीची आहे.

Cadbury ची IPL वाली जाहिरात नाही आवडली. नवरा IPL बघायला लवकर येतो 'घर जल्दी आने का शुभारंभ'. नवरा IPL साठी लवकर घरी येतोय, आपल्यासाठी किँवा घरच्यांसाठी नाही, तरी ती बाई खुष? म्हणजे घरच्यांपेक्षा IPL महत्वाचे?

मी पण तनिष्क च्या अ‍ॅड बद्दल लिहायला आले होते.. खुप आवडली ती जाहीरात मला!
बहिण आणि भाऊ ... दोघांतलं नातं मस्त दाखवलं आहे!

हॅवेल्सची नवी अ‍ॅड काही आवडली नाही. आई वडिल निधर्मी असतील तरच मुलाला धर्मनिवडीचं स्वातंत्र्य मिळू शकतं. घरात एखाद्या धर्माचं आचरण होत असेल तर तेच संस्कार घेऊन मूल मोठं होणार. मग जन्माच्या वेळी त्याचा धर्म काहीही लिहा.

मला idea mobile chi आई आणि मुलाची जाहिरात खुप आवडली - mobile exchange
आईला कुणाचा phone येत नाही

मला टाटा स्काय एच डी ची जाहिरात पण मस्त वाट्ली..भारत्-पाक मॅच असते. जेल मधले अ-भारतीय गुंड त्यादीवशी जेल मधुन पळुन जाण्याचा प्लॅन आखता कारण भारतीय जेलर असतो.
पण नेमक जेलर त्यांना पकड्तो... तेव्हा गुंड विचारता , भारतीयांनी भारत्-पाक मॅच बघण कस काय सोड्ल.. म टाटा स्काय एच डी याला रेकॉर्डर आहे असे दाखवता Happy

कसलीच सुंदर आहे ग ही अ‍ॅड!
जितक्यांदा पाहिली तितक्यांदा टचकन पाणी आलं डोळ्यातून!
हॅट्स ऑफ ज्याने कोणी बनवली त्याला!
म हा न अ‍ॅड आहे!

कसलीच सुंदर आहे ग ही अ‍ॅड!
जितक्यांदा पाहिली तितक्यांदा टचकन पाणी आलं डोळ्यातून!+१

दक्षिणा...

एक पोलिस हवालदार आपल्या मुलीला शिकवुन आयपीएस ऑफिसर बनवतो, तिची बदली नेमकी त्याच्याच पोलिस स्टेशनमध्ये होते. तिच्या स्वागतासाठी आयोजलेल्या परेडमध्ये बाप तिला सॅल्युट करतो आणि ती जवळ जाऊन - त्याचा हात खाली करते आणि त्यालाच एक कडक सॅल्युट मारते.

(राज यांच्या कमेंटमधुन साभार)

ती तनिष्क ची आताची अ‍ॅड मस्त आहे, बहिणीचे लग्न ठरलेय भाऊ तिला कानातले आणून देतो, बहिण विचारते तु मुझे अभीसे मिस कर रहा है?>>>> फारच मस्त आहे ती.

Pages