Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
अरे, ती Man Hair ची कसली नवी
अरे, ती Man Hair ची कसली नवी जाहिरात आली आहे. बियरची आहे का शॅम्पूची? तो माणूस कसला तोंड वासून वासून बोलतो.
सध्याची एशियन पेण्ट्सची
सध्याची एशियन पेण्ट्सची जाहिरात मला खूप आवडते. एक आर्मी ऑफिसर आपल्या नवपरिणित बायकोला घेऊन आपल्या घरी येतो, ती...
http://www.youtube.com/watch?v=b_u5C749aKQ
ललिता+१
ललिता+१
lol lalita, ti jahiraat
lol lalita, ti jahiraat sadhya aamchyakade partyaadhye vinodacha vishay aahe.
सध्याच्या मला आवडलेल्या
सध्याच्या मला आवडलेल्या जाहिराती-
१) अॅक्सिस बँक- जिंदगी की राहपर कोई अकेला नही चलता.
२) फाईव्ह स्टार- 'पिताजी की पतलून' घेऊन रमेश आणि सुरेश घरी येतात...
३) फ्लिपकार्ट- ती लहान मुले चॅनलवाले, मंत्री, पत्रकार वगैरे बनून चर्चा करतात
४) होन्डा अमेझ- बंदर क्या जाने अद्रक का स्वाद
५) फिलिप्स सीएफएल लाईट्सच्या नव्या जाहिराती.
प्राची, आम्ही आपली सिव्हिलियन
प्राची, आम्ही आपली सिव्हिलियन माणसं, आम्हाला आपली आवडते ती जाहिरात
बाकी, याच नियमानं पेस्टिसाईड क्षेत्रातला माझा नवरा गुडनाईट कॉईल्सच्या (आणि एकंदरच मॉस्क्विटो रिपेलण्टसच्या) जाहिरातींची जाम खिल्ली उडवतो.
एशियन पेण्ट्सची जाहिरात मस्त
एशियन पेण्ट्सची जाहिरात मस्त आहे अगदी. हीरवीण क्लोज-अप मधे मला तरूण आशा पारेख सारखी वाट्ते.
Manju mhanate tase- Aalwachi
Manju mhanate tase- Aalwachi khaaj aalwalach mahiti.
that fadnis homes
that fadnis homes advertisement is irritating. bal radate, bayako navaryachya thobadit marate
security jorat shitti maroon kantopi ghaloon jhopun jato. kahihi total lagat nahi
Aalwachi khaaj aalwalach
Aalwachi khaaj aalwalach mahiti >>>
अगदी!
बिनू, थॅक्स. खरंच पाणी आलं
बिनू, थॅक्स. खरंच पाणी आलं डोळ्यांतून
>>Aalwachi khaaj aalwalach
>>Aalwachi khaaj aalwalach mahiti
हे आज पहिल्यांदा ऐकलं
बाकी दक्षिणा, त्या जाहिरातीबद्दल अनुमोदन
एशियन पेन्टची जाहिरात पाहिली.
एशियन पेन्टची जाहिरात पाहिली. आवडत होती, इतक्यात प्राची आठवली. आणि आवडता आवडता राहिली
अॅक्सिस बँकची सुंदर आहे जाहिरात. ते ज्या पद्धतीने वर्तुळ पूर्ण करतात ते छान.
फडणीस प्रॉपर्टीजची अॅड खरंच बंडल आहे अगदीच.
आँ??? नक्की काय म्हणायचंय
आँ??? नक्की काय म्हणायचंय तुला पूनम?
फडणीसची खरंच बंडल आहे
फडणीसची खरंच बंडल आहे अगदीच.
>>
'अॅड' शब्द पण लिही ग मध्ये ..... भावना दुखावल्या जातायेत आमच्या (फडणीसांच्या)
मला असं म्हणायचंय की तुझ्या
मला असं म्हणायचंय की तुझ्या कॉमेन्टमुळे मला ती जाहिरात समजली आणि त्यामुळे आवडली नाही
पण ईमोशन्स टार्गेट करणे हेच जाहिरातीचं काम असतं. त्यामुळे २ घरं अधिक एशियन पेन्टने रंगली तर आश्चर्य वाटायला नको
अर्र! सॉरी सॉरी! करते बदल.
अर्र!
सॉरी सॉरी! करते बदल.
फाईव स्टार ची नवी अॅड भन्नाट
फाईव स्टार ची नवी अॅड भन्नाट आहे.. नयी फाईव स्टार और भी जादा मुलायम है..नही सॉफ्ट है...फाट्ट्ट्टट्ट्ट्ट!!!
फ्लिपकार्ट- ती लहान मुले
फ्लिपकार्ट- ती लहान मुले चॅनलवाले, मंत्री, पत्रकार वगैरे बनून चर्चा करतात>>>> खरच मस्त अॅड आहे.
इतक्यात प्राची आठवली. आणि
इतक्यात प्राची आठवली. आणि आवडता आवडता राहिली >>>
tya faDNis walyaMna
tya faDNis walyaMna jahiratitoon nakki kay suchit karayacha ahe, tech kalat nahi. :ao:
आता ती फडणीस प्रॉपर्टीजची
आता ती फडणीस प्रॉपर्टीजची अॅड पुन्हा पाहणार मी. पाहू डोक्यात काही प्रकाश पडतो का ते.
>>फ्लिपकार्ट- ती लहान मुले चॅनलवाले, मंत्री, पत्रकार वगैरे बनून चर्चा करतात
तो मुलगा तर डिट्टो अर्नाब गोस्वामीसारखा दिसतो आणि बोलतो. फ्लिपकार्टच्या सगळ्याच अॅड्स मला आवडतात.
मित्रांनो, मेट्रिक्स सिम
मित्रांनो, मेट्रिक्स सिम कार्डच्या नव्या जाहिराती पाहिल्या का? भन्नाट आहेत.
आपला जितेन्द्र जोशी इमिग्रेशन ऑफिसर बनून लोकांना मेट्रिक्स सिम वापरायचे फुकटचे सल्ले देतोय. खटकेबाज संवाद आहेत. एकूण चार जाहिराती पाहिल्या.
सही प्रकार आहे एकंदर !
लले मस्त आहे ग एशियन पेंट्स
लले मस्त आहे ग एशियन पेंट्स ची जाहिरात
फ्लिपकार्टच्या सगळ्याच अॅड्स
फ्लिपकार्टच्या सगळ्याच अॅड्स मला आवडतात.>> मोदक!!
एशियन पेंट्स ची जाहिरात मस्त!!! नवर्याला चिक्कार इमोशनल ब्लॅकमेल करून झालं यावरून!!! काल वैतागून म्हणाला तुझ्या घरासारखा गोंधळ पसारा आपल्या इवल्या घरात कसा घालू?? आणि सतत तर माहेरच्या आठवणी ताज्या करायला पळतेस... मग???
जितेन्द्र जोशी झक्कास वाटतोय इमिग्रेशन ऑफिसर म्हणून!!!
फाईव्ह स्टार सॉफ्ट वाल्या पण मस्त.
एक मोबाईल प्लॅनची आहे बहुदा आठवत नाही कुठली ते... पण बस स्टॉपवर एक गृहीणी मुलीला शाळेत सोडण्यासाठी वाट पाहत असते. एक कॉर्पोरेट महीला मोबाईलवर वैताग वैताग करत खटपटत असते. ती गृहीणी आपला मोबाईल देऊ करते. कॉर्पोरेट वाली म्हणते इमेल करना है तुम्हारे फोन में नहीं रहेगा... ती म्हणते.. क्यु? इमेल हैं ना...
काही काही अॅड्स चा आशय लक्षात राहतो, वेगळेपणामुळे पण प्रॉडक्ट नाही राहत लक्षात...
काल वैतागून म्हणाला तुझ्या
काल वैतागून म्हणाला तुझ्या घरासारखा गोंधळ पसारा आपल्या इवल्या घरात कसा घालू??>>>
नविन युनियन बँकेची कार लोनची
नविन युनियन बँकेची कार लोनची जाहीरात जाम बोर मारते, किती आगाउ executive !
आता नवरा , बायकोच्या वाढदिवसासाठी कार बूक करणार म्हणजे surprise असणार , एवढा थोडा विचार नको का करायला ! रच्याकने , नवरा जाम cute आहे .
मॅजिक मसाल्याच्या (???) नविन जाहिराती आवडतात .
जाने क्या जादू है ...जबरदस्त चित्रण आहे भाज्यांचं
सध्या 'डिओडरंट' या
सध्या 'डिओडरंट' या उत्पादनाच्या सर्वच्या सर्व कंपन्यांच्या जाहिराती वात आणत आहेत. फुस्सकन स्प्रे मारला की आल्या पोरी. एवढा कल्पनादरिद्रीपणा इतर कुठल्याच उत्पादनाच्या जाहिरातींमधे पाहिला नाही.
नाही म्हणायला फॉग वाल्यांनी गॅसवाला-बिनागॅसवाला असे एक नवीन दालन उघडले आहे.
काही काही अॅड्सचा आशय लक्षात
काही काही अॅड्सचा आशय लक्षात राहतो, वेगळेपणामुळे, पण प्रॉडक्ट नाही राहत लक्षात... >>> अगदी!!
फुस्सकन स्प्रे मारला की आल्या पोरी. >>>
वाक्यात नवीन काही नाहीये, पण वाचून पुन्हा एकदा फुस्स्कन हसू आलं.
सध्या 'डिओडरंट' या
सध्या 'डिओडरंट' या उत्पादनाच्या सर्वच्या सर्व कंपन्यांच्या जाहिराती वात आणत आहेत. फुस्सकन स्प्रे मारला की आल्या पोरी. एवढा कल्पनादरिद्रीपणा इतर कुठल्याच उत्पादनाच्या जाहिरातींमधे पाहिला नाही.
नाही म्हणायला फॉग वाल्यांनी गॅसवाला-बिनागॅसवाला असे एक नवीन दालन उघडले आहे>>>> ज्ञानेशजी अगदी खर आहे. 'डिओडरंट' फक्त पोरी पटवण्यासाठीच लावायचा असा समज हळु हळु नव्या पिढीत पसरत जातोय.
Pages