निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली, अभिनंदन. आता दोन तीन महिने रोपे जपावी लागतील, मग चांगली जागा बघून जमिनीत लावावी लागतील.

माझी पणजी, आईची आजी निष्णात वैद्य होती. ती घरीच गुळवेलीचे सत्व करत असे. पण तिचा वारसा आमच्या घराण्यात कुणी चालवला नाही. ती खुप वर्षे जगली. शेवटी शेवटी तर खेड्यापाड्यातले लोक तिला पाठंगुळीवर घेऊन जात असत, आपल्या लेकिसुनांची सोडवणूक करण्यासाठी.

माझ्या मोठ्या बहीण भावाचा जन्म तिच्याच हातचा. माझ्यावेळी मात्र ती हयात नव्हती.

डॉ. डहाणूकर पण शेवग्याचे गुणगान करत असत. पण खरं सांगू ज्यांच्या दारी शेवगा असतो, त्यांना तो खायचा कंटाळा येतो.

०००

गुलबक्षी / सावर / बोगनवेल या तिन्हीमधे हेच तीन रंग कॉमन असतात. योगायोग असावा !

००००

अरे वा, माझे गाववाले भेटले तर. मी जवळजवळ ४५ वर्षे राजापूरला गेलोच नव्हतो ( अजून गंगा बघितली नाही ) गिरीराज एकदा मला मुद्दाम घेऊन गेला होता. उन्हाळ्यावर अंघोळ केली आणि धोपेश्वराला जाऊन आलो. तिथल्या पुजार्‍याने फार अगत्य दाखवले होते. परत कधी जायला मिळतेय ते बघू.

<<<<प्रज्ञाचे झाड प्रज्ञापेक्षा उंच झालेय.>>>:) दिनेशदा, मी झाडाची उंची १ १/२ आहे फूट म्हणजे दीड फूट, साडेपाच फूट नाही Wink
मी सुचना लगेच अंमलात आणलीसुद्धा. Happy कडिपत्त्याचा शेंडा खुडून टाकला.
जागू, तुझ म्हणणं खरं आहे ग, पण झाड गॅलरीत कुंडीत लावले आहे ना, त्यामुळे जरा विस्तार झाला तर बरे.

शेवग्यामध्ये भरपूर कॅल्शिअम असते असे आमचे डॉक्टर सांगतात. आणखीही तीन जिन्नस कॅल्शिअमसाठी त्यांनी सांगितले होते. त्यापैकी नाचणी आपल्याला माहितच असते. तिसरा बहुतेक मेथी होता. चौथा आठवत नाही.
पण शेतकरी लोक शेवग्याचे पीक सहसा घेत नसत. पीक खूप आले तर तेही अशुभ समजत. (बहुधा अपशकुन मानतात.) याबाबतीत शरद पवारांसंबंधीचा एक उल्लेख एका वर्तमानपत्रातल्या एका लेखात वाचला होता. श्री शरद पवारह हे वैयक्तिक रीत्या अत्यंत प्रागतिक विचारांचे आहेत आणि ते अंधश्रद्धाळू नाहीत हे पुष्कळांना ठाऊक असेलच. त्यांनी इतर फळझाडांबरोबर शेवग्याच्या लागवडीला जोरदार प्रोत्साहन दिले होते. पण शेवगा किफायतशीर असूनही शेतकरी लागवडीसाठी तितकेसे उत्सुक नव्हते. तेव्हा त्यांनी स्वतः त्यांच्या एका शेतात मोठी लागवड केली. पुढे योग्य मशागतीमुळे पीक खूप आलेले पाहून काही शेतकरी मित्र धास्तावले आणि ती सगळी लागवड तोडून टाकण्यास सांगू लागले. पण पवारांनी अर्थात तसे केले नाही. (तेव्हा ते बहुधा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर ते दिल्लीत गेले ही उन्नती समजायची की अवनती?) आता कदाचित शेतकर्‍यांचे समज बदलले असतील.

हीरा,
मी हा खुलासा जावेद अख्तर यांच्या लेखनात वाचला आहे. शेवगा म्हणजे हिंदीत सहजन कि फली. सहजन म्हणजे सामान्यजन. पाने, फुले, शेंगाच नव्हे तर मूळे पण खाण्याजोगी. जवळजवळ वर्षभर उपलब्ध असतात.
त्यामूळे त्याची शेती करुन नये आणि अर्थातच व्यापार करु नये असा संकेत. पण ती बांधावर लावावीत आणि
सर्वसामान्य लोकांना सहज येताजाता, विनामोबदला उपलब्ध व्हावीत हा हेतू.

अगदी आताआतापर्यंत कुणी शेवग्याची शेती करत नसत. कोकणात तर हे झाड मुद्दामहून लावू नये ( लावणार्‍याचे आयुष्य कमी होते ) असाही समज होता.

मजा म्हणजे इथे अंगोलात शेवग्याची भरपूर झाडे असली तरी कुणीही स्थानिक त्याची पाने वा शेंगा खात नाहीत.

हो गं शांकली
पंचे आणि गंगावालं ते हेच राजापूर. गंगा आली तेव्हा आम्ही गेलो होतो २/३ वेळा. पण त्याच्यामागचं शास्त्रीय कारण , स्पष्टीकरण काही समजलं नाही. कुणाला माहिती आहे का? दिनेशदा आजीचं वाचून कौतुक वाटलं.
शेवगा आमच्या दारात होता. कचरा खूप व्हायचा म्हणून बांधकामाच्या वेळी काढून टाकला. पण मी आठवड्याच्या भाजीत शेवग्याच्या शेंगा न चुकता आणते.
असं महणतात की जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना शेवग्याने कॉम्पेनसेट होतं.
परवा माळी येऊन बागेची मशागत करून गेला. आता बाग अगदी जावळ काढलेल्या बाळासारखी गोड दिसतेय.
आणि जागू.....(कुठे गेली ही?).........चांद्रयानाचं बुकिंग कॅन्सल बरं!
माळ्याने सैरावैरा पळणार्‍या फुटव्यांना पकडून चांगलं मार्गी लावलंय. आता अगदी चांगलं वळण लावलंय सगळ्या वेलांना.

Jagu mast rangaliyet ti fule. Sundar.
shankali, gulvel mhanaje amrut. Aayyurvedat khup mahatva aahe tiche.

Dineshda, tumachi panaji gr8. Salute
manushi Kay he changali long holidays chi sandhi vaya ghalavalis Wink

राजापुरची गंगा पण एक निसर्गाचा चमत्कार आहे. कातळात खोदलेली १४ कुंडे एरवी कोरडी असतात. पावसात पण त्यात पाणी साचत नाही.
पण गंगा आली की एका क्रमाने ही कुंडे भरतात. प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमानपण वेगळे असते.

हो ना गमभन.......... स्पष्टीकरण या गंगेचं? मोनाली.......>>>>>>>>. Kay he changali long holidays chi sandhi vaya ghalavalis >>>>>>>>>>>>>+१००

राजापुरची गंगा पण एक निसर्गाचा चमत्कार आहे. कातळात खोदलेली १४ कुंडे एरवी कोरडी असतात. पावसात पण त्यात पाणी साचत नाही.
पण गंगा आली की एका क्रमाने ही कुंडे भरतात. प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमानपण वेगळे असते.>>>>>>>>>कोकणात राहून पण कधी जाता आले नाही. Sad
एकदा गंगा गेल्यावर गेले होते. तेव्हा कुंडात थोडे थोडे पाणी होते. पण उन्हाळ्यावर जाऊन आलो. Happy

नगरजवळच्या खेड्यात गेलो होतो.
तिथला गोठा.....

गोठ्यात वर सुकवायला ठेवलेले शेतातले लसूण

गोठ्यातलं कडबा कुट्टीचं यंत्र

बरेच वाचायचे राहुन गेले होते.. .हुस्श आता संपले...
राजापुरची गंगा आली होती त्यावेळी एका वर्षी गेले होते, गंगेचे पाणी अगदी जरासं घेऊन बाकी स्नान दुसरयाच पाण्याने घडलं होतं , मी सगळयात लहान असल्याने बाकीच्या बायांनी अगदी समरसुन अंघोळ घातली मला...
तिथुन गगनगिरीगडावर पण गेलेलो.. Happy
पण त्यावेळी पण प्रश्न पडलेला ही गंगा अचानक येते कशी???

<<शेवग्यामध्ये भरपूर कॅल्शिअम असते असे आमचे डॉक्टर सांगतात.<, +१
मुळव्याधीमधे शेवग्याच्या पाल्याची भाजी खायला सांगतात.
दिनेशदा... शेवगा अंगणात पुढे लाउ नये असं आई म्हणायची. परसात लावलेला चालतो. शेवगा आणि पपई ही झाडं आतुन पुष्कळशी पोकळ असल्याने असं म्हणतात, असं वाटतं.
आमच्या मागच्या दारी भरपुर पपईची झाडं होती. पण फळांच्या वजनाने मोडुन पडायची.

कोकणात शेवग्याचे झाड फक्त म्हातारी मंडळीच लावत असत. लावणा-याचे आयुष्य झाड घेते असा समज होता. Happy आता अर्थातच हा समज उरला नसेलच.. माझ्या लहानपणचे जग जरा जास्तच बावळ्ट होते Happy

शांकली बाळ रोपांसाठी अभिनंदन.
'सांज मल्लिगे' खुप सुंदर नाव आहे ग.

गुलबक्षी हे ऊर्दु नाव आहे का ?
नितीन काल माझ्या मनात हाच प्रश्न आला आणि डोळ्यासमोर मुसलमान मोहल्यातील बक्षी कॉम्प्लेक्स आल. Lol

मी कढीपत्ता फोडणीत टकतेच पण तो खाल्ला जावा म्हणून वाटणात पण टाकते. अगदी माश्याच्याही त्याने स्वादही चांगला येतो आणि पोटातही जातो.

दिनेशदा ग्रेट पणजी.

डॉ. डहाणूकर पण शेवग्याचे गुणगान करत असत. पण खरं सांगू ज्यांच्या दारी शेवगा असतो, त्यांना तो खायचा कंटाळा येतो.

हे विधान माझ्यासाठी लागू होत नाही. आमचा शेवगा मोहाचा आहे. जेव्हा जेव्हा येतो तेंव्हा रोज आमच्या जेवणात असतो. घरातलेही सगळे आवडीने खातात. मी तर शेंगा घालता येतील अश्या भाज्या, आमट्या करते मुद्दाम.

दिनेशदा तुम्हाला मी शेंगा दिलेल्या त्याची चव पाहीलीत का?

प्रज्ञा तुझ्या कढीपत्याला शुभेच्छा. बर झाल तातडीने उपाय केलास तो.

चांद्रयानाचं बुकिंग कॅन्सल बरं!

मानुषी आता मला पण कराव लागेल. मी एक खराब झालेला जिबूड झाडाखाली टाकला होता. त्यातील सगळ्या बिया रुजल्या आहेत एकत्र. उद्या फोटो टाकते.

फोटो छान आहेत ग.

अजुन एक गावाकडची अंधश्रद्धा शेवग्याच्या झाडाच्या फांद्या पण ज्याच्या घरात गुरे आहेत ते जाळत नाहीत. का माहीत नाही.

शेवग्याला डिंक लगेच येत. बाळंतीणीला शेवग्याच्या पाल्याची भाजी खायला देतात. खुप उष्ण व कॅल्शिअम असते म्हणून. आमच्याकडे पाचवीच्या नैवेद्यात ही भाजी लागतेच. ते नैवेद्य नंतर बाळंतीणीने खायच असत.

पण अवनी, निसर्गामुळे, त्याच्या प्रेमामुळे सगळ्यांची अशीच अवस्था होते हे खरंय. बाय द वे, तुला आणि तुझ्या नव्या पाहुण्यांना खूप सार्‍या शुभेच्छा!! सर्व मंडळी तुझ्या बागेत रमून राहूदेत ही सदिच्छा.. त्यांच्या पाठोपाठ निरनिराळे पक्षी पण येऊंदेत.. आणि तुमचा परिसर आनंदाने भरून जाऊंदे........स्मित +१

मला एक माहिती हवी आहे. माझी एक इथली (अमेरिकन) मैत्रिण इतक्यातच TIFR, मुंबई ला जाऊन आली. तिने तिथे एक झाड पाहिले. खाली फोटो टाकला आहे. तिला त्याचे नाव हवे आहे. मी तसा थोड फार चेक केलं, पण एक तर तो फोटो तेव्हढा चांगला नाहीये आणि दुसरं म्हणजे त्या झाडाला पारंब्यासदृष्य दिसतंय, ते जरा गोंधळात टाकणारं आहे. >>>>>>> हे तर माझेच ऑफिस. आत्तासुद्धा खिडकीतून पहात आहे. याच्या मागे वडाचे झाड आहे. त्याच्या पारंब्या दिसत आहेत. वर्षभर हे झाड हिरवेगार आणि फुललेले असते. फुले पांढरट गुलाबी आहेत. फुल पडताना गोल गोल फिरत उभे खाली येते. बससाठी उभे राहिल्यावर अशी पडणारी फुले पहाताना मजाच येते. पण एकूण झाडाखाली फार कचरा होतो. फोटोतल्या माळीबाई रोज सकाळी तासभर हे लॉन झाडत असतात. घारी, बगळे, कावळे यावर बसताना पाहीले आहेत.

माझे अग्यान (how to write dyaneshwaratala dya) की मला याचे नाव माहीत नाही. कफ परेड रोडला अशी झाडे आहेत पण ती लहान आहेत.

जग फारच लहान आणि गोल आहे म्हणून TIFR चा फोटो नि.ग.वर पहायला मिळाला.

हं.........शेवगा आणि कढिलिंब याना खूपच मेडिसिनल वॅल्यू आहे.
'सांज मल्लिगे' खुप सुंदर नाव आह?+ १००
जागू जिबूड काय आहे? ...........

रविवारी पुण्याला गेले होते. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. एक्सप्रेस हायवेवर जाता येता बहावाची साथ होती. पुण्यात झकारंदाही ओळखता आला.

मुंबईतला बहावा पानांसह फुललेला आहे तर पुण्याकडे जाताना पाहीलेला निष्पर्ण... फक्त फुलेच फुले.... अगदी सोनसळी अभिषेक....
सध्या नेव्ही नगर मुंबई मधल्या बहव्याचा शेंड्याकडचा भाग फुललेला आहे आणि खालच्या भागातली फुले गळून छान हिरवी पाने आली आहेत.

ऑफिसच्या दारात बहावा आहे. जेव्हा नेव्ही नगरचे बहावे हिरवे होतील तेव्हा हा फुलेल. पण याची फुले पांढुरकी असतात. पांढरा बहावा असतो का?

हो जिप्सी शेवग्याच्या शेंगातल्यामोठ्या बीया शिजल्यावर मस्त क्रन्ची लागतात. जून शेंगा आणल्या तर त्या चांगल्या शिजवाव्या लागतात.

जिप्सि, व्वा! मस्त. असाच आहे बहावा... ऑफिसच्या दारातला.

तुमचा पळस पाहून आठवले. मागच्या आठवड्यात कांदिवली बाजारात एका गुजराथी बाईकडे राय आवळे, विलायती चिंचा आणि टोपलीभर पळसाची सुकलेली फुले होती. अशी फुले विकायला प्रथमच पाहीली.

जागुताई Lol
बहावा आणि ताम्हणाच्याबाबतीत मी फार नशीबवान आहे.
सोसायटीच्या आसपास बहाव्याची बरीच झाडे आहेत अगदी रस्त्यावर खंडोबाच्या नावानं चांगभलं म्हणुन
हळद भंडारा उधळावा तशी बहाव्याच्या फुलांची रास पडलेली असते.
वार्‍याच्या झुळकी बरोबर गरगरत खाली येणार्‍या फुलांना पहाण्याचा आगळा आनंद मिळतो.
बहाव्याच एक झाड घेरासुस गडावर आहे ते कदाचित कुण्या पक्षाची मेहरबानी असु शकते.

ऑफिसला येताना रस्त्यावर ताम्हण फुललेला दिसतो, पण त्याला पाहुन डोळे तुप्तच होत नाहीत.
किती पाहिल तरी कमीच Happy

जिप्स्या मलापण डिट्टो Sad

मला शेवग्याच्या बिया नाही आवडत. >>>>>>>>>>.मला फ़ार आवडतात. शेवग्याच्या फ़ुलांची भाजी आम्ही लहानपणी खूप खाल्ली आहे. शेंगांची भाजी पण मला आवडते. मी शेंगा चावून चावून खाते. छान लागतात. Happy

अगदी रस्त्यावर खंडोबाच्या नावानं चांगभलं म्हणुन
हळद भंडारा उधळावा तशी बहाव्याच्या फुलांची रास पडलेली असते.>>>>>>>>>पर्फेक्ट वर्णन!!! Happy

आता पुण्यात तामण पण फुलायला लागली आहे. टिळकरोडवर पंडित शोरूम पाशी फूटपाथवरची तामण मस्त फुलली आहे. आता सारसबागेकडे लक्ष ठेवायला पाहिजे. तिथली, शिवाय आदमबागेपासची तामण सुद्धा फुलण्याच्या बेतात असावी.

Pages

Back to top