विणकामाचे काही नवीन पॅटर्न्स

Submitted by अवल on 8 April, 2013 - 01:10

नुकतेच काही नवीन विणले त्याचे हे फोटो

हा दोन सुयांवरचा, योक पद्धतीने केलेला जाळीच्या डिझाईनचा स्वेटर , टोपी आणि मोजे

IMG_5158 copy.jpg

हा मी तयार केलेला एक नवाच पॅटर्न. ब-याचदा बाळाला गुंडाळून घेतल्यावर शाल एकीकडे अन बाळ एकीकडे असे होते. फार सांभाळावे लागते. त्यावर हा उपाय. वरती टोपी अन त्यालाच जोडलेली शाल. पूर्वीची कापडी कुंचीच. जरा नव्या पद्धतीने Happy याला मी नाव दिलं "कॅपकेप"
डावी कडे गुंडाळल्या नंतर आणि उजवी कडे पूर्ण उघडल्यावर

IMG_5160 copy.jpg

आणि हे दोन फ्रॉक स्टाईल स्वेटर.

IMG_5156 copy copy.jpgIMG_5155 copy.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई गं...........कसले गोड आहेत हे सगळे पॅटर्न्स........ !!
एकदम टुमदार....सुबक.. !!
माझ्या डोळ्यासमोर हे घातलेली गोड गोड बाळंसुद्धा आलीत लग्गेच Happy

.

खरं तर नुसतं सुंदर म्हणून हात झटकता येत नाहीयेत.. या कामात खुप चिकाटी, कौशल्य आणि सुबकता सगळेच आहे. अगदी जाणवतेय ते.

Pages