निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
हिरा खुप सुंदर दिसत आहेत हे
हिरा खुप सुंदर दिसत आहेत हे बोन्साय. फोटो थोडे मोठे नाही का होणार?
अजुन एक कोड मला उत्तर माहीत नसलेल.
धन्यवाद सर्वांना. हे पुस्तक
धन्यवाद सर्वांना. हे पुस्तक खरोखरच खूप वाचनीय आहे. मिळाले तर जरूर वाचा.
जागू ही कानफुटी आहे. हे झुडूप होते ना? याच्या त्या हिरव्या ब्रॅक्ट्स मधून पांढरट गुलबट मिश्र रंगांची छोटी छोटी फुलं बाहेर येतात.
आपल्याकडे नावं खूप गमतीशीर ठेवतात...एक कानफुटी तर दुसरं कपाळफोडी!! आणखी एकाचं नाव दातपाडी तर तिसर्याचं माकडशिंगी!!
शांकली खूप सुंदर उतारा.
शांकली खूप सुंदर उतारा. पुस्तक वाचलं पाहिजे.......बाकी अवचटांची बहुतक पुस्तकं वाचली आहेत.
ही पिवळ्या रंगाची बेरी आणि ती
ही पिवळ्या रंगाची बेरी आणि ती इतक्या हिरव्यागार ताज्या पानांपासून बनवलेल्या द्रोणात ठेवलेली असताना पाहून मला फार आनंद झाला. हल्ली अशी द्रोणातली फळे, जिलेबी, खायचे अनेक पदार्थ मिळेणासे झाले आहेत. मिळालीच तर गावाकडे मिळतील. शहरात तर डिस्पोजेबल्सची रेलचेल जास्त आहे. नकोसे वाटते अन्य त्या थर्मोकॉल पासून बनवलेल्या प्लेटांमधे आणि बाउल्समधे. रच्याक्याने ह्या पिवळ्या बेरीजला काही खास नाव आहे का?
दिनेशदा, शांकली - तुमची सगळी पाने वाचलीत. मन आनंदून गेल!!!! लताचे ते झनक झनक मधे गाणे ऐकले. कुसुंबी नावाचे झाड असते हे कळले. दिनेशदा, एक करा मला ऐनाचे झाड दाखवा एकदा. जर चित्र डकवले इतर तर प्लीज विपूमधे मजकुर लिहा
मला का कुणास ठाऊक, पण बोन्साय
मला का कुणास ठाऊक, पण बोन्साय का प्रकार पटत नाही, ही एक प्रकारची झांडावर केलेली क्रुर चेष्टा वाटते.
<<दिनेशदानी सांगितला तसा
<<दिनेशदानी सांगितला तसा जकारांडा स्पायसर कॉलेजच्या आवारात दिसला, पुर्ण जांभळा. कुणी तिथून जात असेल तर पहा. ब्रेमेन चौकाच्या एंडला आहे तो.<<
अरे व्वा... जोएस! स्पायसर कॉलेजच्या मागच्या बाजुलाच जुनी सांगवी आहे. आता नक्की जाऊन बघेन जॅकरांडा.
सुप्रभात. शांकली कानफुटी
सुप्रभात.
शांकली कानफुटी चांगले नाव आहे.
बी आमच्याकडे ऐनाची झाडे भरपूर आहेत. मी माहेरी गेले की फोटो काढून आणेन. ह्या बेरी पहिल्यांदाच पाहील्या.
मला का कुणास ठाऊक, पण बोन्साय
मला का कुणास ठाऊक, पण बोन्साय का प्रकार पटत नाही, ही एक प्रकारची झांडावर केलेली क्रुर चेष्टा वाटते. >>>>> गिरीकंद, पु लं ना पण हा बोन्साय प्रकार अजिब्बात आवडत नसे - एखाद्या हाफ चड्डीतील छोट्या मुलाला भरघोस पांढर्या दाढीमिशा फुटलेल्या पाहिल्या तर कशा वेदना होतील मनाला तशा वेदना आपल्याला होतात असं त्यांनी लिहून ठेवलं आहे ........
....पण अखेर - ज्याचा त्याचा दृष्टिकोन असे म्हणावेसे वाटते ....
मला का कुणास ठाऊक, पण बोन्साय
मला का कुणास ठाऊक, पण बोन्साय का प्रकार पटत नाही, ही एक प्रकारची झांडावर केलेली क्रुर चेष्टा वाटते
हे असे अज्जिबात नाहीय. मलाही आधी असेच वाटायचे पण बोन्सायची माहिती मिळवत गेले तसा हा गैरसमज दुर झाला. झाडाला अतिशय काळजीपुर्वक लहान केले जाते पण त्याची वाढ खुंटीत करुन नाही तर त्याच्या आकारावर नियंत्रण आणुन. पुर्ण वाढलेले एखादे झाड जसे दिसेल, त्याचे निसर्गचक्र, जसे पानगळती, फुले, फळे येण्याचा मोसम इत्यादी सगळ्या गोष्टी बोन्सायमध्ये जशाच्या तशा उतरतील याची काळजी घेतली जाते. बोन्सायमध्ये जर मुळ झाडाचे सगळे गुणधर्म उतरले नाहीत तर त्याला खरे बोन्साय म्हणत नाही, मग भले ते आकाराने लहान झालेले असो.
एडेनियमला बोन्सायच्या रांगेत का बसवतात हे कळत नाही. त्याला उलट pseudo bonsai म्हणतात. बोन्सायच्या प्रदर्शनात त्याला सौंदर्यवृद्धीसाठी ठेवणे ठिक आहे, पण ते बोन्साय नाही.
जागू, फोटोवर क्लिक केले की
जागू, फोटोवर क्लिक केले की एन्लार्ज करून मूळ लिंकवर जाता येते आणि तिथेही उजव्या कोपर्यात क्लिक करून आणखी एन्लार्ज होते आणि त्याच्या डाव्या कोपर्यात क्लिक करून पूर्ण स्क्रीनभर एन्लार्ज होते.
@ शशांक, मलाही असेच वाटत असे. पण आता असे लक्षात येते की मानवाने स्वतःच्या कल्याणासाठी किंवा स्वार्थासाठी निसर्गात भरपूर ढवळाढवळ केलेली आहे. कधी अनैसर्गिक संकराने वनस्पतीचे गुणधर्म म्हणजे आकार, रंग, रूप, चव बदलून टाक तर कधी त्यातले घटकच बदल,(शेंगदाण्यात जास्त तेल निर्माण कर, भातात वाय्टॅमिन ए घाल) फळे तोडण्यास सोपे जावे म्हणून उंचीच कमी कर, भाताच्या उंच वाढणार्या जाती वार्यापावसात जमिनीवर लोळण घेतात म्हणून तायचुंग सारखी बुटकी जात निर्माण कर, असे अनेक उद्योग आणि धंदे मानव करीत आला आहे .मग निव्वळ दृष्टिसुखासाठी वनस्पतींना सुंदर आकार दिले तर फारसे कुठे बिघडले, असा एक दृष्टिकोण बनला आहे.
साधना, सहमत आहे. बारा बारा
साधना, सहमत आहे. बारा बारा वीस वीस वर्षे मेहनत करावी तेव्हा कुठे वनस्पतीची एक सुंदर कलाकृती आकाराला येते. या प्रकारात त्याचे 'जीन्स' बदलत नाहीत. निगा राखणे बंद केले की ती वनस्पती तिचा लाइफ्-स्पॅन संपेपर्यंत मूळ स्वरूपात वाढू शकते.
ह्या निग बाफाचे किती कौतुक
ह्या निग बाफाचे किती कौतुक करु आणी किती नको असे मला नेहेमी होते, पण शब्दच सुचत नाहीत म्हणून नुसतीच डोकावुन जाते. प्रचंड मोठा निसर्ग ह्या चिमुकल्या बाफात सामावलाय्.:स्मित:
सर्वच जण आपआपल्या परीने निसर्गातली रत्ने माणके वाटत असतात.
हिरा त्या बोन्सायमधला शेवटच्या कुंडीतल्या फोटोतले ते पांढरे झाड पाहुन असे वाटतेय, की जणू पांढरे शुभ्र मांजर शीर्षासन करतेय, खाली डोके वर पाय्.:फिदी:
हीरा, तुम्ही म्हणताय तेही
हीरा, तुम्ही म्हणताय तेही खरेच आहे.
पण एका दृष्टीने विचार केल्यास प्रत्येक प्राणी जिथे राहतो तिथे त्याने त्याला सोयीस्कर होईल अशा प्रकारे निसर्गाचा वापर करुन घेतलाय. फ्लेमिंगो चिखल वापरुन घरटी करतात तर पक्षी पाने, काटक्या वापरुन घरटी करतात. त्यांचे या घरट्यांमधले राहणे वर्षातल्या काही काळापुरते मर्यादित असल्याने निसर्गाची कायमस्वरुपी हानी न होता त्यांचे काम भागत गेले.
मानवाचे एका जागी राहणे प्रदीर्घ काळाकरता असल्याने त्याने तसा विचार करुन निसर्गाला वापरले. आणि त्यात निसर्गाची हानी झाली. ही हानी डोळ्यांसमोर होत असतानाही त्याने फक्त स्वतःचा विचार केला. जे आहे ते फक्त आपलेच राहायला हवे हा हव्यास मानवाने आपल्या जीन्समध्ये घुसडुन घेतला आणि मग इतर कुणाचाही विचार न करता फक्त स्वतःपुरती पाहणे अनिवार्य झाले.
हे होणे ह्याला मानवाने प्रगती हे नाव दिले. मानवाच्या मते ही प्रगती झाली नसती तर तो आजही गुहेमध्येच असता.
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करु जाता प्रगती कधी खुंटली आणि अधोगती कधी चालु झाली हे माझ्या लक्षात येत नाही. निसर्गात नांदणा-या इतर सजिवांचे निरिक्षण केले असता, ज्या दिवशी मानवाने भटकेपणा त्यागुन, एका जागी निवारा बांधुन, तिथले नैसर्गिक खाद्य संपल्यावर, तिथल्या जमिनीवरचे जंगल नष्ट करुन त्यावर स्वतः बीजारोपण करुन धान्य काढायला सुरवात केली तिथुनच त्याच्या अधोगतीची सुरवात झाली असे म्हणायला पाहिजे. पण ते तर प्रगतीचे पहिले पाऊल आहे असे आपण मानतो.
हा सगळा विचार डोक्यात आला की डोक्याचा भुगा होतो.
बी,जागु, सुंदर फोटो आणि
बी,जागु,
सुंदर फोटो आणि माहिती !
आपल्याकडे नावं खूप गमतीशीर ठेवतात...एक कानफुटी तर दुसरं कपाळफोडी!! आणखी एकाचं नाव दातपाडी तर तिसर्याचं माकडशिंगी!!
आणि उंदीरमारी ..:हाहा:
आपल्याकडे नावं खूप गमतीशीर
आपल्याकडे नावं खूप गमतीशीर ठेवतात...एक कानफुटी तर दुसरं कपाळफोडी!! आणखी एकाचं नाव दातपाडी तर तिसर्याचं माकडशिंगी!! >>> उंदीरमारी राहीली ना
वा अनिल शेम टु शेम
वा अनिल शेम टु शेम
बोन्झाय, हे पण निसर्गातून
बोन्झाय, हे पण निसर्गातून प्रेरणा घेऊनच केलेले आहे. जिथे डोंगर कपारीत झाडे उगवतात तिथे मूळांना वाढायला कमी जागा असते, तिथे हि झाडे तग धरतात आणि नैसर्गिक बोन्झाय तयार होते.
हा डेझर्ट रोझ, निसर्गात वाढतो तो अश्याच कठीण परिस्थितीत. त्यामूळे त्याचा मूळ आकारच तसा असतो.
कुंडीमधे वाढवलेला असतो त्यापेक्षा बराच विस्तार असतो त्याचा. ओमानमधल्या सलालाह च्या समुद्रकिनार्यालगत एक खुप मोठा पर्वत आहे. त्याच्या माथ्यावर रस्त्याने जाता येते. तिथे भरपूर आहेत हि झाडे, आणि फुलतातही भरभरून.
बी नक्कीच. ऐनाचे झाड ( खोड ) साधारण पेरूसारखेच असते. पाने लहान असतात. त्या बेरीज मात्र मस्त. ( मला साबुदाण्याचा एक प्रकार वाटला. )
त्या झकरांदा ( हा खरा उच्चार ) चा फोटो काढा बरं का !
जशी कानफुटी असते तशीच पानफुटी पण असते !
आता मी किलांबा या टाऊनशिप मधे
आता मी किलांबा या टाऊनशिप मधे रहायला आलोय. तिथला निसर्ग काल टिपला. पुढच्या आठवड्यात फोटो टाकतो.
दिनेशदा...एवढ्या झपाट्याने
दिनेशदा...एवढ्या झपाट्याने घरं बदलताय???
नमस्ते मंडळी ! सगळी पानं
नमस्ते मंडळी ! सगळी पानं वाचली नाहियेत अजून ह्या धाग्यावरची. पुण्यातल्या पु. ल. देशपांडे उद्द्यान, सिंहगड रस्ता ह्या 'जॅपनीज' बागेचे हे काही फोटो. म. न. पा. (महानगर पालिका) चा इतर कारभार ढिसाळ आहे पण पु.लं. च्या नावाची बाग मात्र त्यांच्या सारखी प्रसन्न, सदाबहार केली आहे.
मोठ्ठी बाग आहे. आत्ता त्याचे २ विभाग तयार आहेत. एकात सगळीकडे हिरवळ , चालण्याचे मार्ग, वेग्वेगळी झाडं, मासे, कृत्रिम धबधबा आणि पाण्याचे पाट खेळवले आहेत. दुसर्यात वृंदावन गार्डन (मैसूर) सारखी छोटी छोटी कारंजी आहेत. तिसरा तयार होतोय.
ता. क. :
१. बाग म्हणलं तरी इथे लहान मुलांसाठी काहीही खेळणी नाहीयेत आणि हिरवळीवर जाऊ देत नाहीत अजिबात सो मुलं बोर होतात खूप. मोठ्यांसाठी मात्र चालायला आणि स्वच्छ हवेत वेळ घालवायला चांगली जागा आहे.
२. फोटोज मोबाईल मधे काढले आहेत तेव्हा गोड मानून घ्या
३. ऑलरेडी कोणी इथे ह्या उद्यानाचे फोटो टाकले असतील ह्या बागेचे तर सॉरी फॉर रीपीटींग.
वा शकुन मस्त फोटो, ही दुसरी
वा शकुन मस्त फोटो, ही दुसरी बाग पाहीली नव्हती.
हा पहा
हा पहा कॅशिया
http://www.maayboli.com/node/42159
शकुन फोटो मस्त आलेत. माझ्या
शकुन फोटो मस्त आलेत. माझ्या मुलीला दाखवेन आता या सुट्टीत. पण हिरवळीवर जाऊ देणार नसतील तर जरा जपुनच जावे लागेल. लहान मुलांना पळापळी खूप आवडते ना.
उन्हाळ्यात डोळ्याला गार वाटले फोटो पाहुन.
छान आहे बाग.. बागेत वाहते
छान आहे बाग.. बागेत वाहते पाणी असणे हि चिनी आणि मोगल बागेची खासियत.
मला ही बाग खूप दिवसांपासून
मला ही बाग खूप दिवसांपासून पाहायची आहे. आता नक्कीच लवकर जाणार.
जागु,बी मस्त फोटोज शांकली,
जागु,बी मस्त फोटोज
शांकली, झाडाना नाव ठेवल्यासारखी नाव आहेत...
शकुन, अरे व्वा अशी बाग म्हणजे फ्रेश ऐअर.. ह्म्म्म.. पोराना बोअर होईल कदाचित...
शांकली, माहितीपूर्ण उतारा
शांकली, माहितीपूर्ण उतारा आहे, अवचटांच्या पुस्तकातला. ह्या पुस्तकाबद्दल माहिती नव्हतं. त्यांची बरीच पुस्तकं वाचलीयेत. मी फॅनच आहे त्यांच्या लिखाणाची.
शकुन, खूप छान फोटो आहेत त्या बागेचे. मी काही वर्षांपूर्वी ही बाग पाहिली होती तेव्हा एवढी चांगली नव्हती. आता खूपच छान केली आहे.
सुप्रभात. हिरा दिसले फोटो
सुप्रभात.
हिरा दिसले फोटो
शगुन सुंदर आहे बाग. एकदा पुणे दर्शन करायचे आहे. तेंव्हा पाहू जमत का ते.
शकुन, बागेचे छान फोटो !
शकुन,
बागेचे छान फोटो ! बहुतेक इथे प्रथमच आले,आणखी (असतील तर) येऊ देत.
बागेत मुलांचा विचार केला गेला नाही, हे खरंच ! हिरवळ फक्त पहायला ठेवली आहे, मुलांना तरी त्यावर खेळु दिलं
पाहिजे असं वाटतं
बी, त्या बेरीज फारच मस्त
बी, त्या बेरीज फारच मस्त दिसताहेत, पण ते द्रोण मला जास्त आवडले. कारण पानांचा किती सुबक आणि नेटका केलेत ते. आहे ते साहित्य वापरून नेमका उपयोग केलाय नै! शिवाय नंतर परत खत तयार व्हायला मदत.
शकुन फोटो सुंदर आलेत. ते ४ नं च्या प्रचि तलं झाडं काय सुंदर आहे नै? गोड दिसतंय अगदी!!
जागू, ही उक्शी पण त्या वेशवीच्या डोंगरावरची का? कुठंय हा वेशवीचा डोंगर?
शुगोल, धन्यवाद. मी पण अवचटांच्या पुस्तकांची एसी आहे
Pages