निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभे कच्चा टोमॅटो आहे ना तो?

आणि मी टाकलेल्या फळांना आणि शेंगांना कोणीच का ओळखत नाही???????????????????????

डोळे फिरवू नको. अडकतील ते. >>>> शोभा Lol

मी टाकलेल्या फळांना आणि शेंगांना कोणीच का ओळखत नाही? >> जागुताई टेंन्शन नही लेने का
अस कोड टाकल की मला विपुत उत्तर पाठवनेका. मी लगेचच सांगेन Happy Wink

नितीन... :हाहा:.........जागू मलापण विपूत सांग उत्तर!! Happy

अवघड आहे गं... फुलांचा फोटो आहे का यांच्या? पण कदाचित तिवस म्हणून एक फॅबॅसी फॅमिलीतलं झाड असतं त्याच्या शेंगा बर्‍याचश्या या शेंगांसारख्या दिसतात. फुलं करंजाच्या फुलांसारखी असतात.

Common name: Sandan • Hindi: सन्दन Sandan, तिन्नास Tinnas • Kannada: bettahonne, huli, karimutale, karimuttala • Malayalam: malavenna, nemi, totukara • Marathi: kalapalas, tanach, tewas • Nepali: सन्दन Sandan • Oriya: bandano • Sanskrit: Akshaka, Ashmagarbhaka, Atimuktaka, Bhasmagharba • Tamil: Naநரிவெஂகை vengai, atimuttam, cakkirini • Telugu: తెల్లమొతుకు Tellamotuku atimuktamu, badanegi
Botanical name: Desmodium oojeinense Family: Fabaceae (Pea family)
Synonyms: Dalbergia oojeinensis, Ougeinia oojeinensis, Ougeinia dalbergioides

जागू - हीच ती फुले, शेंगा आहेत का बघ बरं जरा.

सध्या डॉ. अनिल अवचट यांचं 'शिकविले ज्यांनी' हे पुस्तक वाचतिये. त्यात जिऑलॉजिस्ट डॉ. बी.एम.करमरकर यांच्याकडे ते जिऑलॉजीचा अभ्यास करत असतात; तेव्हा लोणार-सरोवराबद्द्ल डॉ. करमरकरांनी सांगितलेली माहिती...

'हे सरोवर कसं तयार झालं याविषयी मतभेद आहेत. 'लातुशे' नावाच्या जिऑलॉजिस्टनं ते प्रथम रिपोर्ट केलं. त्याचं म्हणणं असं की, अवकाशातून प्रचंड आकाराची शिळा-अ‍ॅस्टेरॉइड- आदळल्यानं हे झालं. आणि तेच स्पष्टीकरण सगळीकडे रूढ झालं आहे. याचं उदाहरण म्हणून हे सगळे 'अ‍ॅरिझोना' मधल्या अशाच सरोवराकडे बोट दाखवतात. आणि त्याची थियरी इथं लागू करतात.'
'ही थियरी चूक आहे. एक कारण म्हणजे एवढ्या वेगानं ती शिळा जेव्हा आदळली असेल, तेव्हा इथल्या खडकांची केवढी मोडतोड व्हायला पाहिजे, ती कुठंय? काचेवर काही आदळलं की काच जशी फुटते, तिला जसे तडे जातात, तसे इथल्या खडकाला पडलेत का? दाखवा. ते तसे दिसत नाहीत. खडकाचा भुगा होतो, त्याचं चिन्ह नाही. बरं, जी शिळा आदळली तिचं काही चिन्ह दाखवा, तेही दिसत नाही. अ‍ॅरिझोनाच्या त्या खड्ड्यात लोखंड आणि निकेल सापडतं, तसं इथं नाही. टाटा कंपनीनं इथं खूप खोलवर ड्रिल-होल्स घेतली होती. त्यांत कुठंही लोखंड निकेलचा पुरावा नाही. हे लोक म्हणतात, ते उडून गेलं असेल. ते उडून जायला काय वाफ आहे? काहीजण म्हणतात, ती शिळा तिरपी आदळली असली पाहिजे. म्हणून तिथं लोह, निकेल सापडत नाही.
तिरपी आदळली असेल तर हा खड्डा लंबवर्तुळाकार पाहिजे. तो परफेक्ट वर्तुळाकार कसा? '
हे ज्वालामुखीचं मुख असावं असं वाटतं. ह्या म्हणण्याला बरेच पुरावे दाखवता येतात. ज्वालामुखीमुळे निर्माण होणारा 'ब्रेशिया' इथं सापडतो.(मला (डॉ. अवचटांना) सरांनी हा ब्रेशिया खडक शिकवला होता. ज्वालामुखीचा स्फोट होतो, आधीच्या खडकाचे तुकडे उडतात आणि ते या नुकत्याच पसरलेल्या लाव्हात येऊन पडतात आणि त्यात गुंतून पडतात. तो हा ब्रेशिया.) नंतर ज्वालामुखी साधारणपणे एका नळीतून बाहेर येतो, तरी बर्‍याचदा वर येताना त्याला शाखा फुटाव्यात तशा इतर नळ्या तयार होऊन त्यांतूनही लाव्हा बाहेर येतो. तशी तिथे आसपास छोटी तळी आहेत. एवढंच काय, तिथं,ज्वालामुखीची राखही सापडते. कुणी तिथे लवणासुराचं मंदीरही बांधलंय आणि ती राख म्हणजे त्या वेळच्या यज्ञकुंडातील राख आहे असं तिथले लोक सांगतात.'
सरांच्या मते गाणगापूरला भस्माचा डोंगर आहे, ती ज्वालामुखीची राख आहे. सर म्हणाले, ' निसर्गातलं हे आश्चर्य बघायचं सोडून लोक हे काय करतात बघा ना!'

शांकलीजी छान माहीती -
अवकाशातून प्रचंड आकाराची शिळा-अ‍ॅस्टेरॉइड- आदळल्यानं लोणार-सरोवर झालं शालेय अभ्यासात सुद्धा हेच शिकवतात पण यावर नक्कीच संशोधन व्हायला पाहीजे.

सर्वांना होळी पौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

दिनेशदा, आज सकाळी तुमची आठवण आली होती. हल्ली मला जाग येते ती ’कुहू कुहू’ ने . कोकिळ आणि कोकिळा इतके विविध आवाज काढत होते. मला वाटले, तेव्हा तुम्ही असतात तर त्यांचा काय संवाद चाललाय ते तुम्हाला समजले असते. आणि मग मलाही. Happy

दिनेशदानी सांगितला तसा जकारांडा स्पायसर कॉलेजच्या आवारात दिसला, पुर्ण जांभळा. कुणी तिथून जात असेल तर पहा. ब्रेमेन चौकाच्या एंडला आहे तो.

जो_एस, थोड्या दिवसांनी जॅकरांडा कंन्टोन्मेंट भागात पण पहायला मिळेल.
मानुषी, आम्ही लावली एकदाची झाडं कुंडीमध्ये.

शांकली, या लोणार सरोवराबाबत बरेच उलटसुलट वाचले आहे. ( आपल्या बी ने तिथले फोटो टाकले होते. मी फक्त नागपूर मुंबई विमानप्रवासातच ते बघितले आहे. )

त्यातले पाणी खारट असले तरी ते आपले नेहमीचे मीठ नाही ( NaCL ) पण बर्‍याच कालापासून ते तीर्थक्षेत्र आहे. त्यात काही गोड्या पाण्याचे प्रवाह विलीन होतात तरी ते खारेच राहिले आहे.

भस्माच्या डोंगराबाबत माहित नाही पण आंध्रामधे ज्वालापूरम नावाचे गाव आहे तिथे २ मीटर उंचीचा राखेचा थर आहे. तो इंडोनेशिया मधे प्राचीन काळी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा मानतात. त्या थराखाली अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत आणि तशीच त्या थरावरही... याचा अर्थ त्या पुर्वी तिथे मानव वस्ती होती. त्या नंतरही होती. ही दोन्ही हत्यारे एकाच प्रकारची असल्याने, त्या उद्रेकातही तो मानवसमूह तगून राहिला,
असाही अंदाज करता येतो.

अरे वा ..........स्वाती! लागली का झाडं?
माझ्या अंगणातल्या दोडका, घोसाळं, दुधी , कारलं टोमॅटो, सगळी झाडं फुटभर उंच झाली आहेत.
आता त्यांची काही तरी नीट व्यवस्था करावी लागणार आहे. कारण सगळे वेलच आहेत. टोमॅटो सोडून.

.

सुप्रभात मंडळी
सध्या अंगणातल्या कडुलिंबावर दोन मस्त भारद्वाजांमधे घुत्कारांची जुगलबंदी चालू आहे. काय मस्त घुमवतात आवाज! दोघेही भारद्वाजच आहेत पण गायन शैली अगदी वेग्वेगळ्या घराण्यांची वाटते.
दुसरा भारद्वाज पहिल्याचा अगदी शब्द पडू देत नाही.

पिकासावरून इथे फोटो डकवण्याचा प्रयत्न चालू आहे.(वरची पोस्ट ट्रायलरूपी आहे.) मदतपुस्तिकेतून मदत घेतली आहे.
पण अजूनही इथे लिंक न दिसता डायरेक्ट फोटोच कसा दिसेल ते उमगत नाहीये...(घोर अज्ञान!)
प्रयत्न चालू ठेवीन.

मानुषी, पिकासा आणि गुगल+ merge झाल्याने थोडा प्रॉब्लेम येतोय. जर तुमचे पिकासा अकाउंट गुगल नसेल (उदा. याहू व इतर) तर हा प्रॉब्लेम नाही येत. जर जीमेल असेल तर पिकासाची लिंक थेट गुगल+ ला जातेय. Happy

Pages