निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
नाही गं, असं काही नाही.
नाही गं, असं काही नाही. डोक्या बि़क्याला हात नाही लावला. तू जर प्रथमच बघत असशील तर कसं लक्षात रहाणार? गुलाबी कॅशिया पण बघितला.
फोटो नंतर जरा सावकाशीने टाकेन.
शोभे ५ ते १० फोटोंच काय मि.
शोभे ५ ते १० फोटोंच काय मि. इंडीया झालय?>>>>>>>>>>>>नाही. हे वृक्ष फक्त पाहिले फोटो नाही काढले.
गुलाबी कॅशिया पण
गुलाबी कॅशिया पण बघितला.>>>>>>>>हो.हो. त्याचा तर सडाच पडत होता. आपण त्याच्या खाली असतो तर, आपच्यावर पुष्पवृष्टी असं सांगता आलं असतं
फोटो नंतर जरा सावकाशीने टाकेन.>>>>>>सावकाश टाक.
झकरांदाचा हा हिरवा / जांभळा
झकरांदाचा हा हिरवा / जांभळा प्रॉब्लेम आमच्याकडे येत नाही, कारण झाड एकतर हिरवं तरी असतं नाहीतर जांभळं तरी ! आपल्याकडे आपलं उगाच जांभळी तीट लावल्यासारखा फुलतो तो.
शोभा, बहारो फुल बरसाओ, असं गाणं म्हणायचं ना ! पण हा ब्राऊनीया एवढ्यातंच सुकला कसा ? तजेलदार फुले असतात त्याची.
प्रज्ञा राग नाही, पण खरेच गेली अनेक शतके जेवढी वाट लागली नसेल तेवढी आपल्या पिढीने वाट लावलीय.
अर्थात मी निराश नाही, जाणीव झालीय हे महत्वाचे. यापुढे आपण काळजी घेणार आहोतच.
दिनेश दा..
दिनेश दा..
__________/\____________
शोभा, बहारो फुल बरसाओ, असं
शोभा, बहारो फुल बरसाओ, असं गाणं म्हणायचं ना !>>>>>>>>>>.हो विचार तोच होता. पण नंतर मला
सरजी गाली बरसाए ............. असं म्हणाव लागल असतं
वर्षू, बघितलं ना आम्ही कित्ती
वर्षू, बघितलं ना आम्ही कित्ती आठवण काढतो ते !
शोभा, शांकली काय दोघीच नि.ग.
शोभा, शांकली काय दोघीच नि.ग. गटग करून आल्या का? मला पत्ता पण नाही ?:अओ:
थांकु थांकु सर्वांना.. मी पण
थांकु थांकु सर्वांना..
मी पण तुम्हा सर्वांची, इथल्या फुलाफळांची,झाडांची खूप्प आठवण काढत असते.. मग देशापासून आपण इतकं दूर आहोत या गोष्टीची जाणीव तितकी टोचत नाही..
माझी ,हिरवी बोटं (ग्रीन फिंगर्स) असलेली मोठी बहीण आश्चर्य करत असते कि मला आजकाल बरीच झाडं,फुलं ओळखायला कशीकाय ओळखू यायला लागलीयेत..
शोभा, शांकली काय दोघीच नि.ग.
शोभा, शांकली काय दोघीच नि.ग. गटग करून आल्या का? मला पत्ता पण नाही ?>>>>>>>>>..अग्, सद्ध्या तुला वेळ नाही ना? म्हणून नाही विचारल.
पण सुरंगीच झाड कुठे आहे ते नक्की माहित आहे. दाखवेन मी तुला.
ही माझी १०० वी पोस्ट आहे. (नंतर कळलं :फिदी:)
सुरंगी फुलली..आता एफ्.सी.
सुरंगी फुलली..आता एफ्.सी. रोडची चक्कर मारणे आले..आधीच दर्शन घडलं फोटोमधून हे नशीब वेगळं..
शांकलीताई मला ज्यावेळी नीलमोहोर माहीत नव्हता त्यावेळी मस्त चकवलं होतं त्याने मला..खाली फुलं पडलेली तर दिसतायत्;वर बघितलं तर नुस्ताच पानांनी भरलेला गुलमोहोर.. नंतर मैत्रिणीने नीट दाखवलं..
दिनेशदा, तुमच्याकडे हा फोटोचा प्रश्न येत नाही कारण निसर्ग तुमच्यावर मुळात प्रसन्न आहे..
आणि डेक्कन कॉर्नरवरच्या पांचाळेश्वर मंदिराच्या मागे कैलासपती मस्त फुललाय..
१०० पोस्ट झाल्या पण ! छान
१०० पोस्ट झाल्या पण ! छान !
खरंच सध्या मी फारच बिझी आहे. आजच अधून्-मधून ईथे येतेय.
पण कुठे फिरून आलात ते तरी सांग.
झकरांदा हा मूळातला दक्षिण
झकरांदा हा मूळातला दक्षिण आफिकेतला. पण केनयातही मस्त फुलतो आणि साऊथ आफ्रिकेतही. त्या मानाने नायजेरियात नीट फुलत नाही. माझा आणि शापित गंधर्व असे दोन बीबी आहेत इथेच.
बालगंधर्व च्या आवारात पण कैलाशपति आहे. नीट बघितले तर प्रत्येक झाडाच्या फुलाच्या रंगात थोडा थोडा फरक असतो. मोतिया ते किरमिजी पर्यंतच्या शेडस दिसतात. अगदी मोठी अशी कळी घरी आणली तरी फुलते पण फुलल्यावर मात्र फार काळ टिकत नाही.
याचे कैलाशपति हे नाव गेल्या १५/२० वर्षातच मराठीत रुळलेय. पुर्वी त्याला सर्रास नागचाफा म्हणत. आम्ही लहानपणी तो मधला भाग म्हणजे नाग आणि त्याखालचे शिवलिंग एकमेकांना दाखवत असू.
गुलमोहोराच्या कळ्या उकलून त्यातल्या पुंकेसरांनी लढाई करत असू. म्हणजे ते एकमेकात अडकवायचे आणि ओढायचे, कुणाच्या हातातला तुटतो ते बघायचे. असाच खेळ भिंतीवरच्या शेवाळ्याच्या दांड्याचा. मग उंबराच्या पानावरच्या गाठी फोडून त्यातली पाखरे "मुक्त" करायचा खेळ. आम्हाला खरेच वाटायचे, ती पाखरे आत कैद झाली आहेत असे. त्या वयातल्या नजरेला असे बारीक बारीक बरेच दिसायचे.
दिनेशदा, दुसर्या पानावर
दिनेशदा, दुसर्या पानावर टाकलेल्या फोटोतील वेलीचा / फुलाचा अजून एक फोटो आहे. पण सोमवारी टाकीन. फुल तोडता येणार नाही. बघीन कोणी मदत केली तर.....
आज बोरिवली बाजारात गेले होते. छान टवटवीत सुरंगीचे गजरे मिळाले.
ओले काजू पण होते.... ४० रुपये वाटा... एका वाट्यात जेमतेम अर्धे अर्धे केलेले १०-१२ काजू..... नकोच म्हटले.
ईथे या सगळ्याची खूप चर्चा झाली होती.
होळीचा / धुलवडीच / रंगपचंमीचा सण अगदी जवळ आला आहे. पण...........................
अपुरा पाउस .... खोल-खोल गेलेली पाण्याची पातळी ..... महानगरांचा पाण्याचा बेसुमार उपसा...... गावा-गावात पाण्यासाठी वण-वण ... पाण्याच्या कंपन्यांकडे मात्र पाणी ............. तुम्हीच ठरवा होळी कशी खेळायची???? का खेळायची????
आपल्या सर्वांना अजान वृक्ष
आपल्या सर्वांना अजान वृक्ष आणि आळंदी हे समीकरण माहीत आहे. पण हा पुण्यात पण सुखेनैव नांदतोय. एस पी कॉलेजच्या आवारात मेन गेट ने आत गेल्यावर दो बाजूंच्या पार्किंगमधे ह्याचे दोन वृक्ष आहेत. याची फुलं मात्र खूप अल्पजीवी असतात. मात्र आकाराने आणि रूपाने 'चांदणफूल' हे नाव याला अगदी योग्य वाटेल.
आणि ह्या कळ्या....
शांकली,कसली गोड फुलं आहेत..
शांकली,कसली गोड फुलं आहेत.. धरतीवरच्या चांदण्या खरंच..
वर्षूतै धन्यवाद...
वर्षूतै धन्यवाद...:स्मित:
जागूच्या घरच्या बागेतील अजुन
जागूच्या घरच्या बागेतील अजुन काही प्रचि
नारळ
कैर्या
अबोली
हादगा (शेंग आणि फुले)
हादग्याची फुले
शांकली, अजानवृक्ष फुलाचा फोटो
शांकली, अजानवृक्ष फुलाचा फोटो मस्तच
मला प्रत्यक्ष बघायचय हे
जरूर जिप्सी. तू यादी करून
जरूर जिप्सी. तू यादी करून ठेव. आपण त्या त्या वृक्षांची भेट घ्यायला नक्की जाऊ.
तू यादी करून ठेव. आपण त्या
तू यादी करून ठेव. आपण त्या त्या वृक्षांची भेट घ्यायला नक्की जाऊ.>>>>>डन!!!!
Sagalyanche abhinandan.
Sagalyanche abhinandan.
वॉव... जागुली चं घर नेहमीच
वॉव... जागुली चं घर नेहमीच प्रसन्न, टवटवीत असेल या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात..
काल भोसरीमधे एका परिचीतांच्या
काल भोसरीमधे एका परिचीतांच्या परसबागेत स्वर्गीय नर्तकाने दर्शन दिले, बोगनवेलीवर बांधलेली शिंजीराची घरटी पिल्लांसहीत पहायला मिळाली. हिरव्या चाफ्याची वेल पहिल्यांदाच पाहिली.
त्यांच्याशी मायबोली बद्दल चर्चा केल्यावर समजले की तो सुद्धा मायबोलीकर आहे, त्याला दर महिन्याला मायबोलीचे पत्रक मिळते पण तो फारसा इथे येत नाही. आता त्याच्या कडून कालचे फोटो लवकर मिळतील तेव्हा इथे टाकेन.
सुप्रभात
सुप्रभात मंडळी.........
आईच्या ९०व्या बड्डे साठी सांगलीला गेले होते. त्यामुळे इथलं हळूहळू वाचतेय!
भावाच्या बागेतले काही फोटो......
बेलाच्या झाडाला लटकलेली
बेलाच्या झाडाला लटकलेली बेलफळं.........
पोटाच्या छोट्या मोठ्या विकारांवर रामबाण उपाय......बेलफळाचा मुरांबा, जो वडील करून ठेवायचे!
घरावर ७/८ नारळी ची झाडं छत्र चामरं ढाळतात!
मानुषी, मस्त आलेत फ़ोटो. अग,
मानुषी, मस्त आलेत फ़ोटो. अग, चिक्कू तर कित्ती मोठे आहेत. कोकणची आठवण आली.
ऐ वॉव.. मानुषी.. सर्वात आधी
ऐ वॉव.. मानुषी.. सर्वात आधी तुझ्या आईला खूप खूप शुभेच्छा.. खूप आनंद झाला..
आणी तुझ्या माहेरच्या घरातील झाडं,फळं किती सुरेख..
दिनेशदा - कोडी ती पण तुम्ही
दिनेशदा - कोडी ती पण तुम्ही आम्हाला घालणार. झालेच तर मग. जरा शशांकच्या पुढील विनंतीस मान द्या -
उदा. अंकगणितावर आधारित माधुरी दिक्षीतचे फेमस गाणे कुठले, इ.....
बाकी सर्व फोटो मस्त. २-३ पाने एकदम वाचायची आहेत आज.
जिप्सी, फोटो नेहमीप्रमाणे
जिप्सी, फोटो नेहमीप्रमाणे छान.
मानुषी.. सर्वात आधी तुझ्या आईला खूप खूप शुभेच्छा.. खूप आनंद झाला..+१
दिनेशदा, दुसर्या पानावर टाकलेल्या फोटोतील वेलीचा / फुलाचा अजून एक फोटो आहे.....
Pages