निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून दोन महिने आहेत, पावसाला>>>>>>>>>>>>>मी पावसाची अगदी आतुरतेने वाट पहातेय. का ते ओळखलच असेल तुम्ही. Happy

ही फुलं कोणती????

२/३ दिवस झाले. माझ्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर ही एक वेल आहे. आणि माझं परवा परवा लक्ष गेलं हिच्या कडे. आज मात्र न राहवून तिची एक छोटी फांदी तोडली आणि फोटो काढले. मी प्रथमच बघितली ही! फुलं थोडीफार गंभारी (शिवण) च्या फुलांशी (एक पाकळी लांब जीभ काढून दाखवल्या सारखी असल्यामुळे) मिळती जुळती वाटली.

IMG_2444.JPG

ही पानं....

IMG_2448.JPG

आणि फुलं पडून गेल्यावर असं दिसतं (हा भाग प्रॉमिनंट दिसतो वेलीवर)............

IMG_2452.JPG

शांकली, भीमाची वेल म्हणून एक वेल असते तिची फुले अशी असतात पण ती फारच मोठी असतात.
आणि कँडल ट्री म्हणून एक झाड असते ( त्याच्या शेंगा मेणबत्तीसारख्या असतात आणि त्या खोडालाच लागतात ) त्याची फुले साधारण अशी असतात, पण ते झाड असते.
गंभारीची ती बाहेर आलेली पाकळी गर्द चॉकलेटी रंगाची असते. पण हि फुले बघितल्यासारखी वाटताहेत.

.... आणि नाही गाणे ते नाही, त्या बीबी वर पण कुणाला अजून सुचलेले नाही. शशांक हि एकमेव आशा आहे.

दा, मी इथे फोटो टाकले आणि मग फ्लॉवर्स ऑफ इंडियावर शोधलं. पॅरट्स बीक असं नाव आहे हिचं. पण एक महत्वाची गोष्ट पण समजली, की हिच्या पानांचा रस पायावरच्या एक्झिमावर लावतात. व्हर्बिनॅसी कुळातली आहे ही वेल. (त्यांनी खूप मोठं झुडुप म्ह्टलंय! पण आपल्याला काय फरक पडतो त्याने? वेलीसारखं वाढलंय आधार घेऊन म्हणून मी वेल म्हटलं इतकंच!)

गाण्या बाबत हे 'विचार'(!) करताहेत. Happy

रच्याकने दोन्ही पानांवरील सगळे फोटो सुंदर!!

जागू, बोगनवेलीचा फोटो बघून एकदम फ्रेश वाटतंय!! खूप सुंदर आहे फोटो... Happy

दिनेशदा,
मागच्या निगच्या धाग्यावर स्वाती आंबोळेनी अंदाज मांडला होता की मिरची भारतात ३ शतका पेक्षा नक्कीच जुनी आहे. पण दोन्ही धाग्यांवर तुमच्या मते:
"भारतीयाना अतिप्रिय असलेली मिरची केवळ तीन शतकांपुर्वी भारतात आली," अन "शिवाजी महाराजांच्या काळात मिरची नव्हतीच"..
तर जरा (३ मिनिटं) शोधाशोध केल्यावर हे सापडले:
.....Chili became popular in Portuguese. In 1498, the Portuguese explorer Vasco-da-Gama reached Indian shores bringing with him the pungent spice.
http://www.chilly.in/origin_of_chili.htm

.

.... आणि नाही गाणे ते नाही, त्या बीबी वर पण कुणाला अजून सुचलेले नाही. शशांक हि एकमेव आशा आहे. >>>> अजून काहीतरी क्लू द्या दिनेशदा....

शशांक तिथे उत्तर दिलेय. ( आता स्वतःच्या कपाळावर हात मारुन घ्याल, दोघे.)

०५/००८

जास्मिन कुळातील फुलात ( जाई, जुई, सायली वगैरे ) सुगंध असला तरी रंग नसतातच. तर शशांक आणि शांकलीने एक प्रयोग करायचा ठरवले. यातल्या अनेक वेलींचा संकर करुन त्यांनी प्रयोगशाळेत एक वेल वाढवली.
आणि त्यांच्या प्रयोगांना यश आले. सुगंध आणि रंग यांचा अनोखा मिलाप असलेले फुल आले त्या वेलीला. इतकेच नव्हे तर एकाच फुलात, अनेक रंग दिसू लागले.

अर्थात ते फुल बघायला, नि.ग. वरचे सगळे शशांक शांकलीच्या घरी गेले. सर्वांनी त्या फुलाचे अनोखे रंग बघून, नवल केले. वर्षूला मात्र मनात असूनही येता येत नव्हते. तिने जिप्स्याला फोटो पाठवायची विनंती केली..

मग सगळ्यांना लक्षात एक गोष्ट आली. त्या दोघांनी हि वेल, प्रयोगशाळेत, कृत्रिम प्रकाशात वाढवली होती.
तिला प्रकाश अजिबात सहन होत नसे. अगदी एक नाजूक फांदी जर दिवसा प्रकाशाकडे नेली तरी कोमेजत असे. रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही प्रयोग अयशस्वी ठरला. त्यामूळे जिस्प्सी फ्लॅश वापरायला घाबरत होता.
पण वेलीच्या मनात काय होते, हे ती गाण्यात कसे सांगेल ?

उत्तर :
सैंया जाओ जाओ, मोसे ना बोलो
अब ना मोहे सताओ,

फ़ुलसी मोरी छोडो कलाई
छेडो ना मुझको, ओ हरजाई
प्रीत कि करके बतिया छोडो, हटो

सुरज दिन के, रात के चंदा
डालो ना मोपे, किरनोंका फ़ंदा
झुमत घुमत मोरे द्वारे दिना

चित्रपट > झनक झनक पायल बाजे
गायिका > लता
संगीत > वसंत देसाई
कलाकार > संध्या आणि गोपीकृष्ण
राग > देस

या गाण्यात लताने अप्रतिम कारागिरी केली आहे, खास करुन समारोप करताना. एखादी ठुमरी गावी तशा हरकती आणि मुरक्या आहेत. ( ऐकले नसेल तर जरुर ऐका. )
राग आहे देस / देश- या रागाचे उदाहरण म्हणून हे गाणे संगीत सरीता मधे नेहमी लावत ( मामी परदेशी / मयेकर देशात. असा संदर्भ )

सैंया या शब्दावरुन, गेल्या भागात जिप्स्याने खुप छळले होते. ( हम ख्यून का बदला ख्यून से लेते है )
चित्रपटात, संध्या, गोपीकृष्णला जेवायला वाढताना हे गाणे आहे. जेवणात जिलेबी, म्हैसूर असे पदार्थ आहेत. ( हा जेवणाचा आणि गोडाधोडाचा संदर्भ ) जोधा अकबर मधेही असा प्रसंग आहे. ( ती वाढत नाही ) असेच एक
म्हणजे जेवायला वाढतानाचे / भरवतानाचे गाणे मौशुमी आणि जितेंद्रचे पण आहे. बाकी चित्रपटात गाजर का हलवा / बादाम कि खीर.. असे प्रसंग असतातच. पण या प्रसंगातली गाणी आठवत नाहीत.
( सैंया आणि देस राग या संदर्भाने शोधले असते, तरी नक्कीच सापडले असते. )

वेल घेतली, म्हणून वेलीचे नाव आलेच पाहिजे असे नव्हते. पण सूरज / चंदा हा संदर्भ होताच.
गोपीकृष्णने नंतर नायकाची भुमिका केल्याचे आठवत नाही. दोघांनी एकत्र तर नाहीच नाही. गोपीकृष्ण मला
वाटतं पडद्यावर शेवटचे, रझिया सुलतान मधे दिसले ( शुभ घडी आयो रे गाण्यात. गायक - बेगम परवीन
सुलताना आणि दिलशाद हुसेन )

या चित्रपटाने ( झनक झनक पायल बाजे ) तिकिटबारीवर यश मिळवले होते.

हुश्श !

दिनेशदा, ______________________/\_______________________. Happy

सुदुपार,

ही फुलं कोणती????
शांकलीजी,
तुम्हालाही चक्क असा प्रश्न (कधी कधी) पडतो, हे वाचल्यावर मला थोडं हायसं वाटलं,जीवात जीव आला !

दिनेशदा,
______________________/\_______________________.
Happy

दिनेशदा - एवढे अवघड कोडे ???
मला तर हे गाणेही पूर्ण (विशेषतः शब्द) माहित नाहीये - ऐकताना जास्त करुन सूर-ताल इकडेच लक्ष जाते - त्यामुळे या गाण्याचा मुखडा जरी दिला असता तरी मला ओळखता आले नसते ........

अस्ली अवघड अवघड कोडी घालू नका हो - साधी साधी -सोपी सोपी चालतील .....
उदा. अंकगणितावर आधारित माधुरी दिक्षीतचे फेमस गाणे कुठले, इ. Wink Happy

http://www.youtube.com/watch?v=tnMN7azLwrg

शशांक / आर्या ऐकण्यासारखे गाणे आहे हे. शिवाय नैन से नैन नाही मिलाओ, या गाण्यातील, गवतांना बांधलेल्या ( कृत्रिम ) रंगीबेरंगी फुलांचाही संदर्भ होताच. या निमित्ताने एका सुंदर गाण्याचे शब्द माहित झाले Happy

नैन से नैन नाही मिलाओ - >>>>> बागेश्री रागातले ना ? फारच गोड गायले आहे, कांपोझ पण काय सुंदर केलंय !! वाह....

वरील सर्व फोटो मस्त आहेत.
दिनेशदा, त्या कोड्याबाबत 'त्या बिबीवर ' म्हणजे कोणत्या बीबीवर. सध्या मला माबोवर यायला फार जमत नाही आणि मग कसलेच संदर्भ लागत नाहीत Uhoh
आज २३ मार्च- 'हवामान दिन' आमच्या ऑफिसमधे आज अगदि जत्रा असते. दिवसभर एवढी वर्दळ असते. शाळांच्या ट्रिप, पालक, कुटुंबासहित आलेले कुटुंबवत्सल गृहस्थ ------ मजा येते. आज नेमका शनिवार असल्याने मला सुट्टी आहे. Happy

हवामानाचे वाट्टोळे केल्यावर, हवामान दिन साजरा करायची वेळ आलीय Happy

शशांक बहुतेक मालगुंजी आहे तो, अनारकलीमधले, जाग दर्दे इष्क जाग, पण त्या दोघांनी / त्याच रागात गायलेले गाणे.

या बीबीवर हे अवांतर नाहीत, सातही स्वर आपल्याला निसर्गातूनच मिळालेले आहेत !

रूमाल ,टाकून ठेवते...बारावा भागही पूर्ण वाचला नाही. Sad

सगळे फोटो मस्त Happy
तो पिवळा सोनटक्का पाहून आणि जाम खाऊन जमाना गुजर गया असं वाटतंय Sad

वाह..तेरावा भाग.. Happy
हा नीलमोहोर..नीट दिसतच नाही त्याचा निळा रंग आकाशापुढे.. अगदी मिसळून गेलाय त्या रंगात..खाली पडलेली फुलं बघूनच काय तो अंदाज घ्यायचा त्याचा.. Happy
Rut5197.jpg

मला आत्ताच शांकलीने निसर्ग सहल घडवली.
१. सुरंगी.


२. ब्राउनिया.

३. वावळ.

४. आंबा .

५.सिता अशोक. ६.कैलासपती. ७. बारतोंडी. ८. मारखामिया Proud (बरोबर ना शांकली.) ९. फॉक्स टेल आणि १०. वाळूंज , आणखी ३-४ झाडे दाखविली पण नावे मी विसरले. Sad . (शांकली क्षमस्व :अओ:)

सुसंध्याकाळ.

सावरीची शेंग.

शोभा अग फोटो मोठ्या साईझ मध्ये टाक आणि अर्धे दिसतच नाहीत.

शोभे, इतक्या पटकन तू फोटो पण टाकलेस? ३ आणि ४ नं चा वावळ आहे. पशुपती नै, कैलासपती. आणि मिया को मार नै, मारखामिया!! आपण वाळुंज पण बघितला.

अनिल, अहो हा निसर्ग इतका विशाल आहे की त्यातलं खूप कमी आपल्याला माहित असतं.

जागू, सावरीच्या शेंगेचा फोटो मस्त आलाय.

अबोली, नीलमोहोर काय गोड दिसतो नै? पण निळं-हिरवं काँबिनेशन मुळे जरा हा फोटोचा प्रॉब्लेम येतोच (अर्थात जिप्सी, दिनेशदा, जागू हे अपवाद आहेत.)

शोभा अग फोटो मोठ्या साईझ मध्ये टाक आणि अर्धे दिसतच नाहीत.>>>>>>>ए बघ की मोठ्या साईजमध्येच आहेत. हल्ली ना तुला काहीही दिसत्/दिसत नाही. Proud

शांकली, तू डोक्याला हात लावला असशील ना, माझ्या वरचा पराक्रम पाहून.(येवढ दाखवल्या/सांगितल्यावर पण चुकाच. ) Uhoh
अग, तुझ्याकडचे फोटो डकव ना ते जास्त छान आलेत. Happy

शोभे ५ ते १० फोटोंच काय मि. इंडीया झालय?

आता ही कसली शेंग त्याच वेशवीच्या डोंगरावरची.

Pages