निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजमितीला २६ महिने झाले असं बघितलं, तर दर दोन महिन्यांनी एक या हिशेबानी भाग काढले गेले असं झालं!! मला वाटतं मा बो वरचा हा विक्रम असावा. Happy

अभिनंदन!
<<<बाराहजारी मनसबदार झालो आपण सगळे >>> वा, छान शब्द आहे हा ! पण मग आपल्याला मानाचा जरी- पटका कोण देणार ? Wink
शांकली, गणित फारच पक्क दिसतंय ! Happy

नि ग च्या तेराव्या भागानिमित्त नि ग प्रेमींचे अभिनंदन!!!!
सध्या स्प्रिंग बहरतोय ,क्वांग चौ मधे जिकडेतिकडे,' बहारों फूल बरसाओ' चा मौसम सुरु आहे सध्या!!!थंडी बर्‍यापैकी निवळलीये... जस्ट प्रसन्न,कूल्कूल वातावरण आहे सध्या!!!

१३ व्या भागानिमित्त सर्व निसर्गप्रेमींचे हार्दिक अभिनंदन!!!!

इन मीन तीन, गौरी, जिप्सी - मस्त आहेत सर्व फोटो.....

नि.ग.च्या १३व्या भागाबद्दल अभिनंदन!!!!

ऑफिस मधल्या माळ्यांनी केलेली एक रचना!!!!
1.jpg

पुष्परचनेत केळ्फुलाचा सही वापर...........
फोटो मित्राकडून साभार.

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् |
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ||९|| श्रीमद भगवतगीता अ. १० ||

जैसी कमळकळिका जालेपणें| हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें| दे राया रंका पारणें| आमोदाचें ||१२७||
तैसेंचि मातें विश्वीं कथित| कथितेनि तोषें कथूं विसरत| मग तया विसरामाजीं विरत| आंगें जीवें ||१२८||
ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें| नाहीं राती दिवो जाणणें| केलें माझें सुख अव्यंगवाणें| आपणपेयां जिहीं ||१२९||

कमळ पूर्ण उमलल्यावर त्यातील सुगंध सहज आसपास पसरतो आणि गरीब असो वा श्रीमंत दोघांनाही त्या सुगंधाचा सारखाच लाभ होतो.
भगवंताच्या अंतरंग भक्ताचे असेच असते - त्याच्या अंतरंगातील प्रेम असेच उफाळुन बाहेर येते आणि त्याच्या आसपासच्या कोणालाही त्याचा सहज व सारखाच लाभ होतो.
ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ इ. कोणाही संतांचे वाङ्मय वाचताना आपल्या मनात सहजच सात्विक भावाचे का भरते येते याचे स्पष्टीकरणच जणू माऊलींनी या ओव्यातून दिले आहे.

वॉव १३व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेरीतांचे अभिनंदन. हा उन्हाळा सुंदर सुंदर व रंगीबेरंगी फुलांनी नटलेला व सजलेला जावो. Happy

माझ्याकडुन एक जरा डोके चालवा:
गोविंद गोपाळ हे दोघे बंधु, जेवीत होते वरण भात...... पोटात घ्यावा रस पिंपळीचा.

तर वरील श्लोकातील (मला समजलेला) अर्थ असा की, जास्त जेवण झाले की, ते पचण्यास पिंपळीचा (म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या नक्की कोणत्या भागाचा??) रस घ्यावा.

याबद्दल कोणी अजुन सविस्तर माहिती देईल का?

संदर्भ - मागच्या आठवड्यात मुलगा पिंपळीचा रस आहे का? मला थोडा दे म्हणुन मागत होता. मला कळेना नक्की काय हवेय त्याला. तर म्हणे मला जेवण जास्त झालेय तर आता मला पिंपळीचा रस हवा. सर्वप्रथम मी गार ..... मग माझी शोधाशोध सुरु की त्याला हे कुठुन कळाले, तर त्याने वरील श्लोक म्हटला, तो असे अर्थ काढतो हा प्रकारच मला नवीन. त्याने माझ्या डोक्यात किडा सोडलाय. मला उत्तर हवेय आता. ते मग मी त्याला कळेल समजेल असे सांगेन नंतर. म्हणजे त्याचे समाधान होईल. कारण आत्ता तरी, ओवा खाल्यावर पण बरे वाटेल म्हणुन मी त्याला गप्प केलाय पण परत हा प्रश्ण येईल केव्हातरी. माझी तेव्हा तयारी हवी.

गुगललेली मदत - The fruits of this tree are also used as laxative and to prevent constipation. These fruits also help promote digestion.

मदत करा.

सुप्रभात.

ह्या रवीवारी संध्याकाळी आम्ही वेशवी ह्या गावातील डोंगरावर गेलो होतो. तेथील काही फोटो हळू हळू टाकते.
ही फळे कसली ? झाडाला एकही पान नव्हते.

जिप्स्या तुझ्या फोटोग्राफिने आमच्या जामच्या फळांना न्याय दिलास Lol

तो कबुतरचा फोटो फार सुंदर आहे.

मोनाली Lol ही मुल अशीच डोक चालवतात.

शशांकजी सुंदर उतारा.
मधु तुमचे माळी कलाकार आहेत अगदी.
गौरी, नितीन सुंदर फोटो.

दिनेशदा मस्तच वाक्य लिहीलत.

आशुतोष सुंदर आहेत सुगरणी.

जिप्स्या.. काय सुर्रेख फोटो काढलाहेस कबुतराचा... आणी जागु कडल्या फळांचा.. वाह!!! दिल बाग बाग हो गया!!! Happy
आशुतोष, बया चा पिवळा रंग मस्त ब्राईट आलाय.. परफेक्ट!!! , मधु,सुंदर सजावट.. त्या माळीदादांना थांकु सांग आमच्याकडूनही.. Happy
जागु.. फळांचा फोटू गोड आहे.. कसली फळं आहेत ही??? ( ऐ बाई .. प्लीज कोडी नकोस ना घालू!!! Uhoh )

जागू - ही फळं फायकस कुळातील वाटताहेत - नक्की नाव सांगणं कठीण आहे - पानांअभावी .....

फळं फोडून पाहिलीस का - उंबर / वडांगळं प्रकारातील आहेत का हे बघितलं का ??

मोनालि, पिंपळी / लेंडी पिंपळी ही साधारण मिरीच्या चवीची औषधी आहे. पाचक असते. पूर्वी जेवणात तिखटपणासाठी वापरत असत. सुकवलेली मिळते औषधी दुकानात. पण फार तीक्ष्ण असल्याने वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
अनेक पाचक औषधात ती असते. नर्सरीतही उपलब्ध असते. ( धारावीला निसर्गौद्यानात आपण बघितली होती. )

इथे मी काढलेला पिंपळीचा फोटो आणि माहिती आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/134037.html?1193663153

माहिती परत इथे पोस्ट करतोय.

भारतीयाना अतिप्रिय असलेली मिरची केवळ तीन शतकांपुर्वी भारतात आली, त्यापुर्वी आपल्याकडे तिखटपणासाठी, मिरी आले याबरोबरच पिंपळीचा उपयोग केला जात असे.

अत्यंत औषधी अश्या या वनस्पतिचा आपल्याला अलिकडे मात्र विसर पडत चालला आहे.
Pepper longum असे याचे शास्त्रीय नाव. याच्या वेली असतात व आधाराने वर चढत जातात. पाने ५ ते ८ सेमी लांब व हृदयाकृति असतात. यात जुन पाने रुंद व कोवळी पाने लांबट असतात.

सप्टेंबर महिन्यात याला वरच्या फोटोतल्याप्रमाणे उभट शेंगा लागतात. या जुन झाल्या कि त्याला पिंपळ्या म्हणतात.

या झाडाचे मुळ इंडोनेशिया असले तरी भारतभर याची लागवड केली जाते. याच्या पेरावर छोटे छोटे कंदही लागतात आणि ते कंदही औषधी आहेत.

पिंपळी चवीला खुपशी मिरीसारखीच लागते. यामधे पाईपरीन, पिंपलटिन, पायपरोलॅक्टम ए आणि बी, पायपोराडीओन अशी अनेक अल्कलाईड्स असतात.
लहान मुलाना दुध पचावे तसेच बल मिळावे म्हणुन वर्धमान पिंपळी प्रयोग केला जातो. ( यात दुधात क्रमाक्रमाने जास्त पिंपळ्या उकळुन, ते दूध प्यायला देतात. )

इतकेच नव्हे तर कफ़, दमा, वात, खोकला, ताप, मूळव्याध, मेदोरोग, उदरशूल, अपचन, अपस्मार, कुष्ठरोग, काविळ अश्या अनेक विकारात पिंपळी वापरतात.

अरे व्वा.. लिंक वर टिचकी मारली आणी केव्हढातरी खजाना हाती आपलं डोळ्यासमोर आला.. Happy
मज्जा आली वाचताना.. Pepper longum व्यतिरिक्त अजून ही कितीतरी माहिती मिळाली..
दिनेश दा धन्स!!!

ह्या रवीवारी संध्याकाळी आम्ही वेशवी ह्या गावातील डोंगरावर गेलो होतो. तेथील काही फोटो हळू हळू टाकते.
ही फळे कसली ? झाडाला एकही पान नव्हते. >>>>>

Brahma's Banyan, forest sandpaper fig, rough banyan, sand paper fig • Marathi: करवत karvat •
Botanical name: Ficus exasperata Family: Moraceae (Mulberry family)

हे झाड असावे बहुतेक .......

वर्षू, तूमच्याकडे अंजीरे असतात का ? भुमध्य समुद्राजवळची खासियत आहे ती. इराण / मस्कत मधल्या वाळवंटात पण होतात आणि न्यू झीलंडच्या समुद्रकिनार्‍यावर पण. ( दोन्ही कडची तोडून खाल्ली आहेत. )

दिनेशदा _________/\__________
लेकाला उत्तरे द्यायला मला तयार केलेत. Happy (सद्ध्या तरी फक्त याबाबत, अब आयेंगे ब्रेक के बाद Wink )
रच्याकने, गुगलल्यावर पिंपळी म्हणजे पिंपळ असे दाखवत आहेत Uhoh व त्याच्या उपयोगात वर मी पेस्टल्याप्रमाणे - पचनासाठी फळांचा उपयोग सांगीतला आहे.
लेटेस्ट आम्ही पसायदानाच्या अर्थामागे लागलोये. स्पेशली - 'भुतांपरस्परे जडो मैत्र जीवांचे' ह्या ओळीतील भुत या शब्दावर स्वारी अडकली व मला कामाला लावले.

Pages