अननसाचा व्हि नेक/ बोट नेक पोंचू

Submitted by अवल on 18 March, 2013 - 00:08

वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा हा फोटो दाखवला

1363165008292.jpg

आणि विचारले असे करता येईल का? आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात Happy
नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते.

1363165008444.jpg

मग जरा स्वतःचेच डोके चालवले. थोडे प्रयोग केले, थोडी उसवाउसव झाली पण प्रयत्न सोडला नाही. जमलेले डिझाईन मग वंदनाला बक्षिस म्हणुन पाठवले.

मला त्या फोटोतल्या प्रमाणे मॉडेल मिळाले नाही. मग मी आपले ते सोफ्यावरच चढवले.

DSC_0925.jpg

या डिझाईनची गंमत अशी की हे दोन पद्धतीने घालता येते. वर दाखवलेय तसे व्हि नेक चे किंवा खाली दाखवलेय तसे बोट नेक चे

DSC_0927.jpg

पूर्ण उलगडले की पोंचू असा दिसतो

DSC_0928.jpg

बघा बरं तुम्हीच सांगा जमलेय का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती मला विणकाम, क्रोशातले काही कळत नाही, पण मला हे आवडलयं. जागु प्रमाणे तू पण अष्टपैलु आहेस, आणी मनापासुन रस घेऊन करतेस सर्व.:स्मितः

अवल, तुला _________________/\__________________. Happy
तुझ्या विद्यार्थीनीचे कौतुक आणि अभिनंदन! अशी विद्यार्थीनी मिळाळ्याबद्दल तुझेही अभिनंदन! Happy

वॉव्...सही दिसतायत! कसलं बारीक पण सफाईदार काम आहे हे! किती दिवस लागतात गं अशा कामाला?

बादवे,तुला एक आठवण करुन द्यायची होती. माझा वादि येतोय ६ महिन्यांनी! Wink

अवल, _________________/\_________________
रच्याकने, जे विद्यार्थी नसतील, व या जन्मी होण्याची आशा नाही त्यांचेही कौतुक करतेस का? नाही म्हणजे कशासाठी कौतुक करु शकतेस ते सांगुन ठेव Wink

धन्यवाद सर्वांना Happy
आर्या, वंदनाने हे डिझाईन मला पाठवले, ११ मार्च ला. १३ मार्च ला मी डिझाईनचे चित्र पूर्ण तयार केले. आणि त्यानंतर विणायला घेतले. काल १७ मार्च ला पोंचू तयार. अर्थात हा माझ्या स्पिड्ने. नवीन शिकणा-याला किमान १०-१५ दिवस लागतील.
तेव्हा तुझ्या वाढदिवसाला अजून लईच उशीर हाय Proud

अवल, मला पाहिजे हा पोंचू : भोकाड पसरलेली बाहूली :
खूप्पच सुंदर......
रच्याकने, जे विद्यार्थी नसतील, व या जन्मी होण्याची आशा नाही त्यांचेही कौतुक करतेस का? नाही म्हणजे कशासाठी कौतुक करु शकतेस ते सांगुन ठेव >>>>>> हो अवल, मलापण सांग गं Happy साधा धाव दोरा घालताना दमछाक होते माझी, त्यामुळे हे सगळ ह्याजन्मीतरी शक्य नाही Sad

अवल्,अगदी तंतोतंत जमले आहे पोंचु.विद्यार्थ्याने विचारलेले गुरु ला जमलेच पाहिजे्.असाच सिद्धांत आहे ना ग !! त्यासाठी तुझी चिकाटी आणि कौशल्य दोन्हीला सलाम !!!

अवल...खूप सुंदर जमलाय.

नवीन शिकणा-याला किमान १०-१५ दिवस लागतील.>>>मला अगदी बेसिक येते....रुमाल, स्टोल असे. तरी पण हे करायला २-३ महिने लागतील

_____/\_____.................बस्स्स... इतकंच करू शकते.... Happy

धन्यवाद सर्वांना Happy
विनार्च, हा माझ्या सुनेसाठी केलाय. पण तुला हवा असेल तर सांग, रंग, लोकर की दोरा? साधारण ३००-३५० खर्च येईल.
सुरेखा, अगदी खरं, धन्यवाद ग Happy

क्या बात है जानेमन........जियो !!
कमाल आहेस यार तू !!

सुपर्ब!!!!

नुसता फोटो बघुन केलास त्याबद्दल _______/\______

हा माझ्या सुनेसाठी केलाय <<< कित्ती प्रेमळ सासू आहेस Happy अशी सासू सर्वांना मिळो Wink

धन्यवाद सर्वांना
>>>हा माझ्या सुनेसाठी केलाय>>> सून म्हणजे भाचे सून, बहिणीची सून Happy माझी यायला अजून किमान ८-१० वर्षे :स्वप्न रंजनात गेलेली बाहुली : माझी सगळी मुलीची हौस त्या सुनेवर तर भागवायचीय Wink

रुनी हा लोकरीचाच केलाय Happy
लाजो Happy
नको ग, तिला जरा मजा करू दे लग्ना आधीची, अजून शिकत असेल, मग नोकरी, थोडी मौज मजा मग लग्न Happy

Pages