Submitted by अवल on 18 March, 2013 - 00:08
वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा हा फोटो दाखवला
आणि विचारले असे करता येईल का? आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात
नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते.
मग जरा स्वतःचेच डोके चालवले. थोडे प्रयोग केले, थोडी उसवाउसव झाली पण प्रयत्न सोडला नाही. जमलेले डिझाईन मग वंदनाला बक्षिस म्हणुन पाठवले.
मला त्या फोटोतल्या प्रमाणे मॉडेल मिळाले नाही. मग मी आपले ते सोफ्यावरच चढवले.
या डिझाईनची गंमत अशी की हे दोन पद्धतीने घालता येते. वर दाखवलेय तसे व्हि नेक चे किंवा खाली दाखवलेय तसे बोट नेक चे
पूर्ण उलगडले की पोंचू असा दिसतो
बघा बरं तुम्हीच सांगा जमलेय का ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आरती मला विणकाम, क्रोशातले
आरती मला विणकाम, क्रोशातले काही कळत नाही, पण मला हे आवडलयं. जागु प्रमाणे तू पण अष्टपैलु आहेस, आणी मनापासुन रस घेऊन करतेस सर्व.:स्मितः
धन्यवाद टुनटुन
धन्यवाद टुनटुन
फार फार सुंदर!!! मी तर तुझा
फार फार सुंदर!!! मी तर तुझा पंखा झालेय हे सांगायलाच नको...
निव्वळ फोटो बघून विणायचं,
निव्वळ फोटो बघून विणायचं, म्हणजे खरे कौशल्य ! सुंदरच जमलाय.
मानसी, वरच्या पोंचूतल्या
मानसी, वरच्या पोंचूतल्या डिझाईनमधला पंखा का धन्स ग
दिनेशदा त्यातच सगळी गम्मत आहे ना
निव्वळ फोटो बघून विणायचं,
निव्वळ फोटो बघून विणायचं, म्हणजे खरे कौशल्य >>>+++१११११११११११
अप्रतीम...
अवल, तुला
अवल, तुला _________________/\__________________.
तुझ्या विद्यार्थीनीचे कौतुक आणि अभिनंदन! अशी विद्यार्थीनी मिळाळ्याबद्दल तुझेही अभिनंदन!
वॉव्...सही दिसतायत! कसलं
वॉव्...सही दिसतायत! कसलं बारीक पण सफाईदार काम आहे हे! किती दिवस लागतात गं अशा कामाला?
बादवे,तुला एक आठवण करुन द्यायची होती. माझा वादि येतोय ६ महिन्यांनी!
सुंदरच जमलाय.
सुंदरच जमलाय.
दंडवत
दंडवत
अवल,
अवल, _________________/\_________________
रच्याकने, जे विद्यार्थी नसतील, व या जन्मी होण्याची आशा नाही त्यांचेही कौतुक करतेस का? नाही म्हणजे कशासाठी कौतुक करु शकतेस ते सांगुन ठेव
धन्यवाद सर्वांना आर्या,
धन्यवाद सर्वांना
आर्या, वंदनाने हे डिझाईन मला पाठवले, ११ मार्च ला. १३ मार्च ला मी डिझाईनचे चित्र पूर्ण तयार केले. आणि त्यानंतर विणायला घेतले. काल १७ मार्च ला पोंचू तयार. अर्थात हा माझ्या स्पिड्ने. नवीन शिकणा-याला किमान १०-१५ दिवस लागतील.
तेव्हा तुझ्या वाढदिवसाला अजून लईच उशीर हाय
निव्वळ फोटो बघून विणायचं,
निव्वळ फोटो बघून विणायचं, म्हणजे खरे कौशल्य >>>+++ १ लाख.
अप्रतिम!!!!!!!!
केवळ अप्रतिम !!! हे खरे
केवळ अप्रतिम !!!
हे खरे कौशल्य
अवल, मला पाहिजे हा पोंचू :
अवल, मला पाहिजे हा पोंचू : भोकाड पसरलेली बाहूली :
खूप्पच सुंदर......
रच्याकने, जे विद्यार्थी नसतील, व या जन्मी होण्याची आशा नाही त्यांचेही कौतुक करतेस का? नाही म्हणजे कशासाठी कौतुक करु शकतेस ते सांगुन ठेव >>>>>> हो अवल, मलापण सांग गं साधा धाव दोरा घालताना दमछाक होते माझी, त्यामुळे हे सगळ ह्याजन्मीतरी शक्य नाही
अवल्,अगदी तंतोतंत जमले आहे
अवल्,अगदी तंतोतंत जमले आहे पोंचु.विद्यार्थ्याने विचारलेले गुरु ला जमलेच पाहिजे्.असाच सिद्धांत आहे ना ग !! त्यासाठी तुझी चिकाटी आणि कौशल्य दोन्हीला सलाम !!!
अवल...खूप सुंदर जमलाय. नवीन
अवल...खूप सुंदर जमलाय.
नवीन शिकणा-याला किमान १०-१५ दिवस लागतील.>>>मला अगदी बेसिक येते....रुमाल, स्टोल असे. तरी पण हे करायला २-३ महिने लागतील
ग्रेट!
ग्रेट!
_____/\_____.................
_____/\_____.................बस्स्स... इतकंच करू शकते....
धन्यवाद सर्वांना विनार्च, हा
धन्यवाद सर्वांना
विनार्च, हा माझ्या सुनेसाठी केलाय. पण तुला हवा असेल तर सांग, रंग, लोकर की दोरा? साधारण ३००-३५० खर्च येईल.
सुरेखा, अगदी खरं, धन्यवाद ग
छान दिसतोय ... नाजूक
छान दिसतोय ... नाजूक
नाजूक , बारीक , सफाईदार काम ,
नाजूक , बारीक , सफाईदार काम , खूपच छान.
वा! अवल काय कला आहे तुझ्या
वा! अवल काय कला आहे तुझ्या बोटात! सुंदर, अप्रतिम मस्त झाला आहे पोंचू .
क्या बात है
क्या बात है जानेमन........जियो !!
कमाल आहेस यार तू !!
सुपर्ब!!!! नुसता फोटो बघुन
सुपर्ब!!!!
नुसता फोटो बघुन केलास त्याबद्दल _______/\______
हा माझ्या सुनेसाठी केलाय <<< कित्ती प्रेमळ सासू आहेस अशी सासू सर्वांना मिळो
मस्तच जमलेय!
मस्तच जमलेय!
धन्यवाद सर्वांना >>>हा माझ्या
धन्यवाद सर्वांना
>>>हा माझ्या सुनेसाठी केलाय>>> सून म्हणजे भाचे सून, बहिणीची सून माझी यायला अजून किमान ८-१० वर्षे :स्वप्न रंजनात गेलेली बाहुली : माझी सगळी मुलीची हौस त्या सुनेवर तर भागवायचीय
अरे सही, एकदम मस्त. लोकरीचा
अरे सही, एकदम मस्त. लोकरीचा पोंचो मस्त दिसेल आणि थंडीत वापरायलाही सही.
सून म्हणजे भाचे सून, बहिणीची
सून म्हणजे भाचे सून, बहिणीची सून <<< मग तर आणखिनच कौतुक
तुझी सून सून येवो
रुनी हा लोकरीचाच केलाय लाजो
रुनी हा लोकरीचाच केलाय
लाजो
नको ग, तिला जरा मजा करू दे लग्ना आधीची, अजून शिकत असेल, मग नोकरी, थोडी मौज मजा मग लग्न
Pages