Submitted by आनंदयात्री on 18 February, 2013 - 04:52
दूर असु दे, पण तिथे असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की
शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?
कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की
चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की
तू जलाशय, मी तुला थेंबाप्रमाणे!
हा फरक केव्हा मला पटणार नक्की?
पावलांना चालण्याची ओढ नाही
वेस ओलांडूनही थकणार नक्की!
भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!
वाट मी पाहीन कायम, वेळ घे तू!
आज नाही तर उद्या सुचणार नक्की!
एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!
नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/02/blog-post_18.html)
(या गझलेला मायबोलीकर 'दाद' यांनी लावलेली चाल - http://www.maayboli.com/node/41714)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टांगलेला चंद्र जास्त
टांगलेला चंद्र जास्त आवडला.....
सुंदर गझल.
फारच सुंदर
फारच सुंदर
सुंदर गझल
सुंदर गझल
अतिशय उत्तम गझल नचिकेत. तू
अतिशय उत्तम गझल नचिकेत. तू चांगल लिहितोसच त्याबद्दल वादच नाही पण ही गझल म्हणजे कडेलोट आहे.
एकाही शेरात खुसपट काढता येणार नाही
सुरेख गझल.. शब्द अपुरे, चंद्र
सुरेख गझल..
शब्द अपुरे, चंद्र आणि एकदा केव्हातरी हे शेर सर्वाधिक आवडले.
टांगला हो चंद्र, पण पुढचं
टांगला हो चंद्र, पण पुढचं नक्की ना?

चंद्र आवडेश, भार आणि बाकी वाट पाहीन म्हणते, तुला सुचणार ना नक्की
सर्व दोस्तांचे मनापासून
सर्व दोस्तांचे मनापासून आभार!
चिन्नु

कित्ती दिवसांनी दिसत्येस!!
श्यामली, भापो...
अतिशय सुंदर रचना !! शब्द
अतिशय सुंदर रचना !!
शब्द अपुरे आणि पावलांना हे शेर तर खूपच आवडले. सगळेच शेर छान आहेत ! आनंदयात्री हे नाव पाहून क्लिक केल्याचं (नेहमीप्रमाणे) सार्थक झालं.
चंद्र एखादा या शेराची मांडणी आवडली नक्की, पण त्यातला अपेक्षित अर्थ मला न समजल्याने संपूर्ण आनंद घेता येत नाहीये (हा माझा दोष समजावा ). अर्थात समजून घेण्याचे प्रयत्न चालूच आहेत
हा अनामिक गझलवेडा म्हणजे आपले
हा अनामिक गझलवेडा म्हणजे आपले सर्वांचे लाडके प्रा. सतीश देवपूरकर आहेत हे दिलेल्या पर्यायावरून मी खात्रीशीररित्या सांगू शकतो
(शितावरून भाताची परीक्षा स्मित)
अनामिक गझलवेडा | 28 February,
अनामिक गझलवेडा | 28 February, 2013 - 11:00
आमचे परममित्र कवी सतीश यांचे लोकाग्रहास्तव पुनरागमन! आगतम स्वागतम सुस्वागतम!
कळावे गं स
वैवकु आणि गं स <<<
वैवकु आणि गं स <<<
गझल आवडली !
गझल आवडली !
(No subject)
चंद्र एखादा तरी टांगून
चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की सुरेख......
एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की! सह्ज आनि thet bhidanara ,mla vatat ya sheravar mi ajun kuthe tari pratikriya dileli aahe ,fb var pan post keli hoti ka hi gazal? marathi typingla khup adchan yete mhanun madhyach english.
सर्वांचे आभार! योगितापाटील,
सर्वांचे आभार!
योगितापाटील, हो. fbवरही होती.
विस्मया, विशेष धन्यवाद
सुंदर!!!
सुंदर!!!
माझी पोस्ट गुल्ल.. खूप खूप
माझी पोस्ट गुल्ल..
खूप खूप आवडली ही गझल. का कुणास ठाऊक पण वाचतानाच सुरात उमटली मनात.
अगदीच वेचायचा झालाच तर्...चंद्र आणि शब्दं अपुरे...
जियो.. आनंदयात्री.
(ही सुरात इथे देण्याचा प्रयत्नं नक्की करणार)
Nehmipramane chaaan gazal...
Nehmipramane chaaan gazal...
ही गझल मी वर म्हटल्याप्रमाणे
ही गझल मी वर म्हटल्याप्रमाणे वाचल्याक्षणी सुरांसह मनात उमटली.. इतकी तीव्र की इथे दिल्याशिवाय डोकं अन मन शांत होणार नाही ह्याची खात्रीच झाली.
सुरांवर, शब्दांवर प्रेम आहे माझं... पण मी गायक नाही. तेव्हा ह्या नितांतसुंदर गझलला न दुखवता काही सुरांत ढ्ळलं असेल तर... वाचले... नाहीतर समजून घ्या माझा वेडेपणा.
ह्या गझल मधली ही "नक्की"पणाची समज, खात्री... ही आयुष्याच्या संध्याकाळची वाटते मला. आयुष्याच्या त्या समजुतदार अन समृद्ध गोरजवेळी... काही सांगायचय अशी मनाची भावना आहे. अनुभवसंपन्नतेनं काठिण्य आलेल्या हृदयातही मग हलतं काहीतरी. काय? ते कसच सांगता न ये... तरीही सांगून गेलीये ही अप्रतिम गज़ल.
गोरखकल्याण ह्या रागावर आधारित ही धून... संध्याकाळच्या ह्या रागाचं प्रयोजन वगैरे बैठकीवरच्या जाणकारांच्या गोष्टी आहेत. माझ्यासाठी शब्दं वाचता वाचता डोक्यात सुरू झालेल्या ह्या सुरांची ही मैफिल आहे.... जशी आहे तशी.
हा आगाऊपणा करायला परवानगी दिल्याबद्दल नचिकेतचे मनापासून आभार.
http://soundcloud.com/baabulamoraa/dur-asude-marathi-gazal
सुंदर.. चाल आणि आवाज दोन्हीही
सुंदर.. चाल आणि आवाज दोन्हीही ...आवडले... ताल असता तर मजा अजून वाढली असती.
अभिनंदन आणि शुभेच्छा... मस्तच जमलंय!!
(No subject)
जबरदस्त आहे गझल.चंद्राचा आणि
जबरदस्त आहे गझल.चंद्राचा आणि नात्यांचा शेर विशेष भावला
नचिकेत..दादची सुरमयी दाद जबरी
नचिकेत..दादची सुरमयी दाद जबरी आहे रे...... अभिनंदन
शब्द अपुरे वाटती आहेत आता काय
शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?
तू जलाशय, मी तुला थेंबाप्रमाणे!
हा फरक केव्हा मला पटणार नक्की?>>>>>>>>> क्या बात... आवडल
आज पाहिली
वा क्या बात है दाद.
वा क्या बात है दाद. नचिकेतच्या ह्या सुंदर गझलेला दिलेले स्वर रुप खुप आवडल.
नचिकेत,
सगळी गझल मस्त आणि
चंद्र एखादा तरी टांगून ठेवा एकदम पर्फेक्ट.
सुंदर गझल आनंदयात्री! दाद
सुंदर गझल आनंदयात्री!
दाद धन्यवाद...
आवडली
आवडली
आवडली म्हणजे खूपच आवडली, अगदी
आवडली म्हणजे खूपच आवडली, अगदी नक्की!
काय बोलू..शब्द नाहीत..काहीतरी
काय बोलू..शब्द नाहीत..काहीतरी सहज तरीही सकस वाचल्याची जाणीव मनाला होतीय..
या पामराचा एक शेर..
रे तुझी चालूच दे 'आनंदयात्रा'
शब्द ते अमुच्या मनी ठसणार नक्की...!
अभिनंदन आणि आभार.!
एवढी सुरेख गझल दिल्याबद्दल...
मनःपूर्वक धन्यवाद दोस्तहो
मनःपूर्वक धन्यवाद दोस्तहो
सुशांत
Pages