चंद्र एखादा तरी...

Submitted by आनंदयात्री on 18 February, 2013 - 04:52

दूर असु दे, पण तिथे असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की

शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?

कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की

तू जलाशय, मी तुला थेंबाप्रमाणे!
हा फरक केव्हा मला पटणार नक्की?

पावलांना चालण्याची ओढ नाही
वेस ओलांडूनही थकणार नक्की!

भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!

वाट मी पाहीन कायम, वेळ घे तू!
आज नाही तर उद्या सुचणार नक्की!

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!

नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/02/blog-post_18.html)

(या गझलेला मायबोलीकर 'दाद' यांनी लावलेली चाल - http://www.maayboli.com/node/41714)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूर असु दे, पण तिथे असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की
>>
वाह!

भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!
>>>
वाह! आहा! मस्तच!
अनेकदा वाचला हा शेर

आवडलीच!
सुंदर!

दूर असु दे, पण तिथे असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की>> साधा आणि थेट...

शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?>> हाह्ह आणि व्वाह... फार खास अभिव्यक्ती..

कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की>> अभिनव!! फाsssर सुंदर उतरलाय शेर

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की>> भ न्ना ट! क्लासी... टांगून ठेवा., वा वा..

तू जलाशय, मी तुला थेंबाप्रमाणे!
हा फरक केव्हा मला पटणार नक्की?>> एक एक शेर चढत्या क्रमाचे.. हा खूप आवडला.

पावलांना चालण्याची ओढ नाही
वेस ओलांडूनही थकणार नक्की!>> Happy छानच

भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!>> अरे, एक एक शेर आवडतच जातोय... हवीत ना मी नाती सांभाळायला, सांभाळेन... उद्या माझा मी न राहिल्याची तक्रार नको मग... सुंदर

वाट मी पाहीन कायम, वेळ घे तू!
आज नाही तर उद्या सुचणार नक्की!>> हे गज़लेच उल्लेखून का? तसं असल्यास समजलंय, आवडलंय

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!>> हा नसेल तरी चालेल की, काय विशेष सांगण्यात येतंय, शाश्वत सत्य जशास तसं आहे.सहज आहे शेर हे मात्र खरं

पण ऑल न ऑल, गज़ल उत्तमच...वाचताना, क्या बात, पुढे काय, वाटायला लावणारी Happy

धन्यवाद आणि शुभेच्छा...

शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की

तू जलाशय, मी तुला थेंबाप्रमाणे!
हा फरक केव्हा मला पटणार नक्की?

भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!<<<

सुंदर शेर व सुंदर गझल.

धन्यवाद.

सगळे शेर आवडले एकापेक्षा एक आहेत तरी चंद्र सर्वाधिक आवडला

वाटती आहेत>> इथे एकदा 'वाटती' म्हटल्यावर 'आहेत' चे प्रयोजन उरते का असा प्रश्न पडला .. मराठी भाषिकांमध्ये असे कुठे बोलले जाते का असाही प्रश्न पडलाय

कवी यात्री,

आपल्या अलीकडच्या गझलांना येत असलेला गांभीर्याचा व परिपक्वतेचा सुगंध आम्हास मोहीत करत आहे.

तो आधीही असेलही, पण संधिप्रकाशात पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण अमान्य करून हवेत उड्या मारण्याच्या आपल्या दृष्य छंदाच्या गर्दीत आम्हाला जाणवला नसावा.

कळावे

गं स

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की

छान.

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!

बढिया. हा खरा गझलेचा शेर आहे.
मानवी जीवनातील हतबलता अचूक हेरली आहे.

शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की

<< क्या बात !

धन्यवाद दोस्तहो.. Happy

बागेश्री???? एवढा भरभरून प्रतिसाद!! गझल धन्य झाली माझी Wink थँक्स गं Happy
रच्याकने, तुझा आयडी हॅक नाही ना झाला? Wink Light 1

संधिप्रकाशात पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण अमान्य करून हवेत उड्या मारण्याच्या आपल्या दृष्य छंदाच्या गर्दीत
>> Rofl दोन सेकंद झेपलंच नाही मला हे... गंभीर, आपण विनोदही करता की!! Wink

वाटती आहेत मध्ये 'आत्त्त्त्त्ता, या क्षणी' हे प्रकर्षाने जाणवतं... वाटती म्हणजे हल्ली वाटते, कधीकधी वाटते वै.

धन्यवाद!

वाहवा.... सुरेख गझल..

दूर असु दे, पण तिथे असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!

जबरदस्त शेर......

शेवटचा शेर तर लोकोक्ती होणार....

अभिनंदन

क्या बात है...

नितांतसुंदर गझल.

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!...... वाहवा... अत्तिशय सुरेख शेर..

आवडली गझल.

<<<कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की>>> व्वाह!!!

<<<वाट मी पाहीन कायम, वेळ घे तू!
आज नाही तर उद्या सुचणार नक्की!>>> हा जास्त जवळचा वाटला Happy

मस्त गझल Happy

शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की? >> सुरेख! जियो!

भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की! >> बात है!

आवडली गझल, नचिकेत! Happy

जबरदस्त यार....!!

कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की............हे तर जामच आवडेश Happy

एक नितांत सुंदर गझल अनुभवायला दिलीस रे तू !!

कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की >>

आवडेश !!

काय हे एकेक हो...अहाहा....काय बोलू!?
पण,
चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की..

व्वा किती सौदर्य..सगळ्यात उठून दिसणारा शेर...
पुलेशु

कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की..
भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!

सुंदर..

Pages