Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18
इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?
सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.
ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.
उदाहरणार्थः What's up? / Wassup?
शब्दशः काय आहे वर?
भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?
या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'
आलं लक्षात? मग करूया सुरू..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन ज्ञाती! तुमचं
अभिनंदन ज्ञाती!
तुमचं बक्षिसः
लोकहो, जेवण करून, वामकुक्षी
लोकहो, जेवण करून, वामकुक्षी घेऊन, टवटवीत होऊन या. मग पुढचं वाक्य देऊ.
मी एक लहान, छोटं, गोंडस बाळ
मी एक लहान, छोटं, गोंडस बाळ आहे.
मी लहान आहे अजून, आणि सर्वांचं लाडकं बाळं आहे.
लोकहो, पुढचं वाक्य - May I
लोकहो, पुढचं वाक्य -
May I have the pleasure of this dance with you?
चपखल बरोबर की चपलख
चपखल बरोबर की चपलख ??????????????????
May I have the pleasure of
May I have the pleasure of this dance with you?
.
आपल्या बरोबर नृत्य करण्याचा आनंद घेउ शकतो का ?
.
.
भवाने ...........नाचतेस का माझ्या बरोबर .....?...
आपल्या बरोबर हे नृत्य करायचा
आपल्या बरोबर हे नृत्य करायचा आनंद मी घेऊ शकतो का ?
तू माझ्याबरोबर हा नाच करायला आलीस तर मला फार आनंद होईल.
तुमच्या बरोबर नाच करण्याचा
तुमच्या बरोबर नाच करण्याचा आनंद मी घेऊ शकतो/ते का?
तुझ्या वांगडा नाचीनसा दिसता.. नाचू काय?
काय मी आहे आनंदी नृत्य करुन
काय मी आहे आनंदी नृत्य करुन बरोबर तुझ्या?
अगं रानी माझ्या खळ्यामंदी नाचशील काय?
वैभ्या........... ए डिपाडी
वैभ्या...........
ए डिपाडी डिपांग
एडीबाडी डिपांग
एडीबाडी डिच्चीबाडी डिपांग..टुडु...:)
तुझ्या सोबत नृत्य करायचा आनंद
तुझ्या सोबत नृत्य करायचा आनंद मी घेऊ शकतो का ?
गोमू... संगतीन माझ्या तू नाचशील काय?
घेउ शकतो/शकते का मी आनंद ह्या
घेउ शकतो/शकते का मी आनंद ह्या नॄत्याचा तुझ्यासोबत ?
एकत्र डान्स करुया का ?
कुठे आहेत सगळे?
कुठे आहेत सगळे?
वैभव, काय आणलस?
वैभव, काय आणलस?
मी तुझ्याबरोबर नाचाचा आनंद
मी तुझ्याबरोबर नाचाचा आनंद लुटू का?
येतेस का ना चा य ला?
ह्या नाचाचा मी तुमच्या बरोबर
ह्या नाचाचा मी तुमच्या बरोबर आनंद घेउ शकतो काय?
चल ना, जरा नाचु अन मजा करु या!
May I have the pleasure of
May I have the pleasure of this dance with you?
कदचित मी घेऊ मजा या नाचाची बरोबर तुझ्या???
चल ना जरा ढिंगचिका नाचु या ना
मी तुझ्या/तुमच्या बरोबर नृत्य
मी तुझ्या/तुमच्या बरोबर नृत्य करण्याचा आनंद घेऊ शकते/तो का?
तू माझ्याबरोबर नाच करशील का?
May I have the pleasure of
May I have the pleasure of this dance with you?
मला मिळु शकतो का आनंद तुझ्यासोबत नाचायचा ?
चल ना, नाचु या !
मला तुझ्याबरोबर या नाचाचा
मला तुझ्याबरोबर या नाचाचा आनंद मिळू शकेल ़ का?
आपण मिळून ह्या संगीतावर नाचुयात का?
भवाने ...........नाचतेस का
भवाने ...........नाचतेस का माझ्या बरोबर .....?...>>>>
अगो, अभिनंदन!
अगो, अभिनंदन!
लोकहो, पुढचं वाक्य - Have a
लोकहो, पुढचं वाक्य -
Have a nice weekend!
तुम्हाला चांगला आठवडा मिळो या
तुम्हाला चांगला आठवडा मिळो
या आठवड्याचा शेवट चांगला जावो.
(मायबोली भाषेत: शुभ वीकांत)
आठवड्याचा शेवट छान होऊ
आठवड्याचा शेवट छान होऊ दे.
शनिवार रविवार मजेत घालवा.
तुमचा आठवडा चांगला जावो. मस्त
तुमचा आठवडा चांगला जावो.
मस्त मजा करा शनिवार, रविवारी.
मिळो चांगला सप्ताहांत! शुभ
मिळो चांगला सप्ताहांत!
शुभ सप्ताहांत!
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
सप्ताहांत छान होवो. शनिवार,
सप्ताहांत छान होवो.
शनिवार, रविवारी खा, प्या, मस्त मजा करा.
मिळो एक चांगला सप्ताहांत! मजा
मिळो एक चांगला सप्ताहांत!
मजा करा लेकानो , खावा, पिवा, ढोसा सुट्टीच्या दिवशी!
Pages