निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
शोभा, तू कधी पाहिलास?
शोभा, तू कधी पाहिलास?
अय्या, एवढ्या पोस्टीत कुणी
अय्या, एवढ्या पोस्टीत कुणी निसर्गप्रेमीने हेल्पच केली नाय
जास्वंदाची पानं पिवळी होवून गळत आहेत. मदत करा.
वर्षुताय, झ्याक पेंटींग हाय.
चिन्नु, झाडावर पांढरे / काळे
चिन्नु, झाडावर पांढरे / काळे किडे झाले आहेत का ? मूळाशी घुशीने बिळ केले आहे का ? मूळाशी सिमेंट पडले आहे का ?
एरवी सभोवारची जमीन जरा टोकरुन थोड्या प्रमाणात खत घातले तर झाडाची तब्येत सुधारेल.
ह्या कळ्या तुम्ही
ह्या कळ्या तुम्ही ओळखालच.
चिन्नू जास्वंदीला पुरेसे पाणी, त्याचा निचरा, सुर्यप्रकाश मिळतोय का हे पहा.
सावली पामट्री जेंव्हा तुम्ही पिशवीतून काढलत तेंव्हा त्याच्या मातीसकटच कुंडीत लावल ना? लाल माती आणि काळी माती मिक्स झाल्याने झाड मरणार नाही. पण जर झाडाची पुर्ण माती काढून नुसते मुळ ठेउन जर रोप लावले तर रोप मरण्याची शक्यता असते. म्हणून फक्त साईडने पिशवी कापून मातीसकट रोप कुंडीत लावायचे असते. त्यामुळे झाडाच्या मुळाला इजा होत नाही.
चिन्नु, धन्यु.. जागु छान टिप
चिन्नु, धन्यु..
जागु छान टिप दिलीस..
दिनेश दा..लहानपणी उज्जैन ला गेले असता तिथे खूप मोर पाहिले होते रस्त्यावरच्या झाडांवर , असेच आपले रस्त्यांवर इकडून तिकडे फिरणारे मोर पाहून साश्चर्य आनंद वाटला होता.. आता हे दृष्य दिसत असेल कि नाही ही शंकाच आहे..
ह्या कळ्या तुम्ही
ह्या कळ्या तुम्ही ओळखालच.>>>>जांभूळ आहे ना?
उडणार्या मोराचा एक फोटो
उडणार्या मोराचा एक फोटो मायबोलीकर गिरीविहारकडे आहे.
चिन्नू जास्वंदीच्या पानांच्या
चिन्नू जास्वंदीच्या पानांच्या खाली बारीक कण(ते किडे असतात) दिसतातका ते पहा. तसे असेल तर पुढे कळ्यांचीही वाट लागते. माझ्याकडे तसेच झाले आहे. कितीही फवारे मारले तरी ते येतातच परत. आता अनंतावरही झालेत ते किडे.
ह्या कळ्या तुम्ही ओळखालच. >>
ह्या कळ्या तुम्ही ओळखालच. >> जाम ?
दिनेशदा, जागु, जो धन्स. हो,
दिनेशदा, जागु, जो धन्स.
हो, प्रकाश-पाणी योग्य मिळतयं. कीड होती आधी. त्या फांद्या मी कापून टाकल्या. कळ्या तश्या गळून पडत होत्या. आता एखादे फूल तग धरतंय. पण पानगळ थांबत नाहीये.
खाली व आजुबाजु सर्व साफ केलेले. खताचं बघते आता. थँक्स
जो_एस ,चिन्नू -
जो_एस ,चिन्नू - १०-१२दिवसापुर्वी आमच्याकडे जास्वंदवर पांढरे काळे किडे होऊन पानगळ सुरु झाली होती , सरळ बेगॉन स्प्रे ची फवारणी केली, दोन दिवसांनी पांढरे काळे गायब, आता नवीन धुमारे फुटत आहेत, पण हा स्प्रे मारणे किती योग्य आहे माहीत नाही कदाचीत जाणकार सांगु शकतील.
नितीन, हा स्प्रे झाडासाठी
नितीन, हा स्प्रे झाडासाठी तीव्र आहे. झाड जगलेय हेच नवल. नाहीतर पाने जळून गेल्यासारखी होतात.
ते बारीक किडे मुंग्या "पाळतात". मुंग्या कमी केल्या तर ते किडे जगू शकत नाहीत.
हो वर्षू, भारतात निदान मोरांची संख्या कमी झालेय, अशी बातमी नाही.
.
.
दा त्या झाडावर मोजकीच पाने
दा त्या झाडावर मोजकीच पाने शिल्लक होती, मी तर झाडाची अपेक्षा सोडली होती, अगदी जीवावर येऊन स्प्रे केला, आणि झाडालाच विनंती केली जगण्याची दोन दिवसांनी किडे दिसेनासे झाले आणि मग झाडाला पाण्याने आंघोळच घातली पण आहे आता ते जगल आहे.
पिवळी जास्वंद
सुदुपार,
सुदुपार,
नितिन तुझी विनंती ऐकली बरं
नितिन तुझी विनंती ऐकली बरं का त्याने.
एक किस्सा ( इंगळहाळीकरांनी लिहिलेला ) आपल्याकडे तंबाखूच्या झाडाजवळ वाढणारी एक परजीवी वनस्पति असते. खरे तर ते तंबाखुवरचे बांडगुळच म्हणायला हवे कारण त्या झाडाच्या मूळावर ते वाढते. या झाडाला
सुंदर जांभळी फुले येतात. पण हे झाड तसे दुर्मिळ आहे. त्यांना ते सापडत नव्हते. पण त्यांना एकदा वांग्याच्या
शेतात ते दिसले. असे एका झाडावर अवलंबून असणारे झाड दुसर्या झाडावर जगणे कठीण असते. पण त्या शेतात
भरपूर निळे / जांभळे तुरे होते. त्या शेतकर्याने कधी तंबाखुची शेती पण केली नव्हती... फक्त एक केले होते, ते
म्हणजे वांग्यावरची किड नियंत्रण करताना, तंबाखुचे पाणी फवारले होते. आणि त्यासोबत त्या तणाचे बी पण
आले होते.
या तणावर लोकसत्ता मधे एक उल्लेख आलाय. तण पिकाच्या सावलीत वाढत नाहीत. त्यानाही उन लागतेच.
जर भाताचे पिक शेतात असतानाच गहू वा बार्ली पेरले, तर त्या पिकात तण वाढत नाही. गहू आणि बार्ली मात्र, तांदळाच्या सावलीत उगवू शकतात. अनिल ला हे नीट समजेल.
सुंदर आहे फुलाचा रंग दिनेश
सुंदर आहे फुलाचा रंग
दिनेश दा.. छान माहिती सांगताय
वर्षू, असंच.. इथे वाचतात ना
वर्षू, असंच.. इथे वाचतात ना म्हणून लिहित राहतो. काहीतरी नवीन वाचले कि लिहावेसे वाटते.
शंकासूर / संकेश्वर नावाचे पिवळ्या / गुलाबी / केशरी फुलांचे झाड अनेकांनी बघितले असेलच. त्याची पाने चिमण्या मुद्दाम खातात... का, तर मलेरीयापासून बचाव व्हावा म्हणून. जेव्हा त्या थरथर कापत असतात, त्यावेळी बहुतेक त्यांना मलेरीया झालेला असावा. आणि हे औषध त्यांच्यातल्या, इब्लिसाने सांगितले असावे.
जागू,मला पण जांभूळकळ्याच
जागू,मला पण जांभूळकळ्याच वाटताहेत !
हो जांभळाच्याच कळ्या आहेत.
हो जांभळाच्याच कळ्या आहेत. आता त्याची फुले उमलली आहेत.
हो जांभळाच्याच कळ्या आहेत.>>>
हो जांभळाच्याच कळ्या आहेत.>>> चला मी बरोबर ओळखल फक्त लिहीताना भुळ लिहायच राहील
नितीन
नितीन
दा - आपण सुद्धा खाऊ शकतो का
दा - आपण सुद्धा खाऊ शकतो का शंकासूराची पाने मलेरीया झालातर.
केशरी शंकासूर / संकेश्वर
(ह्यातील गुलाबी आणि पिवळा पच्छिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकावर फलाट क्र .२,३ ची मालाडकडील बाजुस पहायला मिळेल)
दा आजचा लेख ना.. मी पण वाचला
दा आजचा लेख ना.. मी पण वाचला आणि सगळ्यांची आठवण काढली
नितीन, संशोधन झाले पाहिजे. (
नितीन, संशोधन झाले पाहिजे. ( हा उल्लेख बहुतेक प्रा. घाणेकरांनी केलाय.) आपल्याकडे हे झाड नव्याने आलेय त्यामूळे आयुर्वेदात उल्लेख नाही.
वैशाली, ते लोकसत्तामधले नवीन सदर छानच आहे. आजच्या लोकप्रभात पण संशोधन आणि शिक्षण यावर छान लेख आहेत. एका तिसरीतल्या मुलाने आपल्या आईचे हात राठ का याची काळजी करत, विहीरीवरच्या रहाटात केलेली सुधारणा.. हा किस्सा अगदी वाचण्यासारखा आहे. इथे पेस्टच करतो तो.
अनेक घरांमध्ये लहान मुले आईचा हात हातात घेऊन झोपी जातात. तसाच भारताच्या दुर्गम खेडय़ामध्ये असलेला एक लहान मुलगा आईचा हात हातात घेऊन झोपी जायचा. या घटनेत वेगळेपण काहीच नाही. पण तो मुलगा इतरांपेक्षा वेगळा होता, त्याला प्रश्न पडायचे. आईचा हात हातात घेऊन का झोपायचे? तर तिचे मऊसूत हात हातात घेऊन झोपल्यावर छान झोप लागते किंवा परी स्वप्नात येते वगैरे असेच काही तरी त्याच्या मनात होते. कारण त्याला शाळेत सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींतील आईचे हात नेहमीच मऊसूत असायचे. मग त्याने आईला विचारले की, तुझे हात मऊसूत का नाहीत? आई म्हणाली, अरे बाळा मी नेहमी काम करते म्हणून माझे हात मऊ नाहीत. मग त्याला प्रश्न पडला गोष्टीतील आई आपल्या आईसारखी काम करत नाही की, कमी काम करते? या सर्व प्रश्नांचा शोध घेताना त्याने आई करते त्या कामांचे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. आईबरोबर सर्व ठिकाणी हा तिसरीतला मुलगा जाऊ लागला. त्याला लक्षात असे आले की, आई आणि तिच्या बरोबर असलेल्या सर्व महिला या विहिरीवरून पाणी भरताना त्यांना पाण्याने भरलेली घागर वरती खेचावी लागते. कोणताही एक हातच एका वेळी सोडून ती वर खेचावी लागते. दोन्ही हात सोडले तरी भरलेली घागर पुन्हा खाली जाते किंवा थोडा हात ढिला पडला तरीही ती खाली जाते. त्यामुळेच अनेक महिलांच्या हाताला त्या दोराचे घट्टे पडले आहेत. मग त्याने त्या रहाटाचे निरीक्षण केले तेव्हा त्याला असे लक्षात आले की, घागर वरती खेचली की, हात सुटल्यावर परत खाली जाते. ती तिथेच राहील आणि मग आणखी वर खेचता येईल, अशी यंत्रणा हवी. तिसरीतील मुलगा काय विचार करणार? मग त्याला एका मित्राने सांगितले की, आठवीतील शिक्षक कदाचित काही सांगू शकतील, त्याने शिक्षकांशी जाऊन चर्चा केली. गुरुत्त्वाकर्षण समजून घेतले आणि त्यानंतर रहाटावर लावलेल्या छोटय़ा गोल फिरणाऱ्या चाकाला खिट्टी बसवली. त्यामुळे घागर वर खेचली ती त्या खिट्टीमुळे ती खाली जायची नाही. ती खिट्टी स्टॉपर प्रमाणे काम करत असे. मग दोन्ही हात सोडले तरी चालतील.. अशा खिट्टी बसविलेले रहाटावरचे गोल फिरणारे चाक त्याने कल्पकतेने विकसित केले. या मुलाला भारत सरकारचा इनोव्हेऽशनसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि त्याच्या कल्पक शोधाला पेटंट. इनोव्हेऽशन हे असे थेट तुमच्या जीवनाला भिडणारे असते.
दिनेशदा आणि वर्षू ......
दिनेशदा आणि वर्षू ...... छान आहेत पेन्टिन्ग्ज! लगे रहो!
चिन्नू माझ्याही लिंबाची अचानक पानगळ झाली. दिनेशदांच्या म्हणण्याचा (थंडी) विचार केला तर खरंच संक्रांतीनंतर थोडा जो काही उन्हाळा सुरू झाला होता, त्यानंतर आत्ता गेले १०/१५ दिवस अचानक खूपच थंडी पडली होती. त्यामुळे गळली असतील पाने बहुतेक. पण फक्त लिंबाचीच.
बाकी सध्या थोडाच वेळ येते इथे त्यामुळे माझा वाचायचा स्पीड कमी पडतोय...आणि धागाही पळतोय. पण मस्त चाललंय! वाचतेय.
दा प्रा. घाणेकरांची ३
दा प्रा. घाणेकरांची ३ महीन्यांपुर्वी भेट झाली होती ४ तास गप्पांत कसे गेले कळलेच नाही त्यांच्याशी बोलताना तुमची, शांकलीजी आणि शशांकजी एकंदर नि.ग. ची खुप आठवण आली, त्यांच्याकडे एका ऑर्किडचा प्रचि होता फारच दुर्मिळ त्याच्या मध्यभागी एक हिरा (नक्षी) होता.
खिट्टी बसविलेले रहाटावरचे गोल फिरणारे चाक त्याने कल्पकतेने विकसित केले.
अरे वा तो आधुनिक श्रावणबाळच, तळागाळातल्या लोकांना अशाच शोधांची गरज आहे.
(ह्यातील गुलाबी आणि पिवळा
(ह्यातील गुलाबी आणि पिवळा पच्छिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकावर फलाट क्र .२,३ ची मालाडकडील बाजुस पहायला मिळेल)
ईनमीन तीन,
छान फोटो !
याची झाडे किती वर्षापासुन पाहतोय पण याच नाव,उपयोग आता कळालं ..(
यात लालभडक रंग देखील असतो ना ? पाहिल्यासारख वाटतं
रहाटावरच्या गोल फिरणार्या
रहाटावरच्या गोल फिरणार्या चाकाची गोष्ट अमेझिंग आहे..
दा प्रा. घाणेकरांची ३
दा प्रा. घाणेकरांची ३ महीन्यांपुर्वी भेट झाली होती ४ तास गप्पांत कसे गेले कळलेच नाही >>>>> मी गरवारेत शिकत असताना (१९७७-८३) सानेमॅडमबरोबरच घाणेकर सरदेखील बॉटनी शिकवत असत - सरदेखील सर्व विद्यार्थ्यांचे खूप आवडते होते - बॉटनीबरोबरच दुर्गभ्रमण हा सरांचा आवडता विषय - गरवारे कॉलेजमधे त्यावेळेस एकेक जबरी शिक्षक होते - वाटवेसर - मायक्रो, सानेमॅडम - बॉटनी, गरुडसर-मॅथ्स, गरवारे कॉमर्सला द. मा. मिरासदार, फिजिक्स - लागूसर, काळेसर, भटसर इ., झूलॉजी- रानडेसर, शिरगोपीकर मॅडम - ही सर्व मंडळी त्यांच्या विषयात पारंगत होतीच पण त्याबरोबर इतरही अनेक विषयात रस घेणारी होती- उदा. - शिरगोपीकर मॅडम या संगीतज्ञ होत्या. (सुप्रसिद्ध नानासाहेब शिरगोपीकरांच्या त्या सुकन्या).
वाटवेसर - तर मायक्रोबरोबर - मराठी भाषा, तत्वज्ञान, इकॉलॉजी, संगीत - (शास्त्रीय व सुगम), लेखन, वक्तृत्व, बॅडमिंटन, संशोधन अशा अनेक विषयात गती असलेले ....
Pages