माझं लग्न होऊन मी नवी नवरी बर्वे कुंटुंबात आले तेंव्हा, खूप माणसांची वर्दळ होती. सुरवातीला वाटलं लग्नघर आहे म्हणून असेल. पण नंतर बरीच वर्षे ते तसच सुरू होतं. माणसं चर्चा करायला यायची. बाबांच्या हस्ताक्षराचं कौतुक करायची, त्यांचं लिखाण वाचायची. कधी अर्धा अर्धा दिवस बाबांची व आलेल्या पाहुण्यांची चर्चा चालायची. तेंव्हा मला आश्चर्य वाटायचं, काय ही माणसं बडाबडा करीत बसतात. लक्ष देत नसल्याने विषयही डोक्यावरून जायचे. बाबांचं वाचन दांडगं होतं. संदर्भही ते पटापट द्यायचे. आपले मुद्दे हिरहिरीने मांडायचे. मला, आईंना ते वितंडवाद वाटायचे. काय मिळतं हे सगळं करून असं वाटायचं.
आज जेंव्हा एखादा विचार माझ्या डोक्यातून सुटता सुटत नाही, चर्चा करून माझा मुद्दा कुणी खोडून प्रतिवाद करीत नाही तोपर्यंत मनाला चैन पडत नाही. उत्तरं सापडत नाहीशी झाली की बाबांची खूप आठवण येते. मला वाचायला आवडत नसे, बाबा सांगत खूप पुस्तके वाच. आताशा त्यांचं म्हणणं पटतं.
कुटुंब, नवरा बायकोचे नाते, बदलती समाजव्यवस्था ह्या विषयाला धरून असणारी पुस्तके वाचताना गोंधळून जायला होतं. परस्पर विरोधी, तर कधी कालविसंगत. बुध्दीला पटणारी पण मन आणि संस्कार यांच्याविरोधी जाणारी मते वाचली की संभ्रमावस्था निर्माण होते. कुणाचं म्हणणं योग्य कुणाचं अयोग्य. काय स्विकारावं काय त्याज्य मानावं. हे समजेनासं होतं. मुळात व्यक्ती व्यक्तीप्रमाणे वेगळे होत जाणारे विषय हे मतांतरे घडवतात. एखाद्या कौटुंबिक समस्येला एक असं प्रोटोटाइप उत्तर असू शकत नाही. व्यक्ती, कुटुंब ह्याप्रमाणे ते बदलत जातं.
पाळणाघर आणि वृध्दाश्रम हे दोनही निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही हा विचार संस्कारक्षम मनाला पटतो पण त्याच बरोबर बुध्दीला त्याची अपरिहार्यताही विचार करायला भाग पाडते.
संजना आणि तिचे यजमान हे दोघे नोकरी करतात. ओल्ड गोवा येथे फ्लॅटमध्ये राहतात. दोघांना एक गोंडस मुलगी आहे. तिघांचं सुखी कुटुंब. मुलीला शाळेत न्यायला आणायला गाडी आहे. शाळेतून आल्याबरोबर इतर मुलांनाही सोबत घेऊन येणारा ड्रायव्हर संजनाच्या मुलीला पाळणाघरात सोडतो. मुलगी आई वडिल यापैकी जो कोणी संध्याकाळी लवकर पोहोचेल त्याच्याबरोबर पाळणाघरातून फ्लॅटवर येते. दोघही दमलेली असतात. मुलीसाठी द्यायला गुणात्मक वेळ आणि शारिरीक क्षमताही नसते. धकाधकी जास्तच झाली तर मानसिक क्षमताही उरत नाही.
पालक शिक्षक मेळाव्यात संजना बराच वेळ बोलायला भेटली. त्यांचं गावाकडे मूळ घर आहे. मोठं एकत्र कुटुंब आहे. संजनाचं जावांशी पटत नाही. एकत्र कुटुंबात देवाणघेवाण दोनही बाजुने झाली पाहिजे, पण तसं होत नाही. नेहमीची भांडणं आणि कटकटी. त्यातून होणारी चिडचिड. हे सगळं टाळण्यासाठी स्वतंत्र राहणं तिला भाग होतं. फ्लॅट कर्ज काढून घेतलाय. संजनाच्या यजमानाच्या पगारातून हफ्ते, टेलिफोन, लाईट, पाणी, अन्न, धान्य हे सगळे खर्च भागत नाहीत म्हणून संजनाने नोकरी धरली आहे.
शाळेतला वेळ सोडला तर शिल्लक राहणारा वेळ मुलीचं काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा राहिला तेंव्हा "पाळणाघर" हा एकच पर्याय समोर होता. कर्ज फेडण्यासाठी खर्च मर्यादित ठेवायचे, दोघांनी काम करायचं. संजनाचं हे प्रातिनिधिक उदाहरण थोड्याफार फरकाने कित्येक कुटुंबांचं आहे. संसारवेलीवर उमलणारं फूलदेखिल दोघांच्या प्रेमाचं प्रतिक न होता आजकाल आर्थिक नियोजनाने दिलेल्या होकाराचा परिणाम होतय. पती पत्नीमधले नाते तणावपूर्ण होत चालले आहे.
पाळणाघरातून आणल्यावरही मुलीला कुणी संभाळायचं यावरून वाद होत आहेत. मुलीला आई बाबा दोघेही हवीत. लहान मुलांना त्यांना हवी तेंव्हा आई बाबा जवळ हवी असतात. केवळ तडजोड म्हणून चिमुरडी पोरं पाळणाघर स्विकारतात. संध्याकाळी तरी आई बाबा एकत्र आपल्यासोबत असतील म्हणून मुलं हपापलेली असतात. कामावरचे वाढते ताण, वाढत्या अपेक्षा यानी मेटाकुटीला आलेला जीव कधी एकदा अंथरुणावर घालतो असं दोघांना होऊन जातं. मुलीला खेळायला हवं असतं आणि आई वडिलांना विश्रांती हवी असते. पालकत्वाचं ओझं होतं.
ओळखीचे जोशी दांपत्य आहे. एकूलता एक मुलगा. उच्चशिक्षित. नोकरीनिमित्त अमेरिकेत. लग्न झाल्यावर सपत्नीक अमेरिकेत स्थायिक झालेला. इथे ही दोघे एकटीच. श्री. जोशींना मधुमेह व ब्लडप्रेशरचा त्रास तर सौ. जोशींचे संधीवाताने गुढगे दुखतात. त्यांच्याकडे पहायला शुश्रुषा करायला कुणीही नाही म्हणून त्यांनी वृध्दाश्रम जवळ केलाय. निदान तिथे औषधपाणी तरी वेळेवर होते. "असंख्य नवस सायास करून, व्रतवैकल्ये आचरून झालेला एकुलता एक मुलाचा फक्त आवाज ऐकू येतो. हल्ली कानाना ऐकूही कमी येतं" हे सांगताना जोशी दांपत्याच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा साचलेलं प्रचंड दु:ख देवून जातात.
खरी समस्या खूप गंभीर आहे. प्रश्न केवळ आर्थिक समस्येचा नाही, त्याहूनही पुढचा येवू घातलेल्या सामाजिक, कौटुंबिक मुल्यांच्या ऱ्हासाचा आहे. ही सगळी परिस्थिती अस्थिरतेकडे निर्देश करते. आम्हाला आईवडिलही नको आहेत आणि मुलही नकोशी होऊ लागली आहेत. जुनाट, परंपरावादी, जोखडीची म्हणून आश्रमव्यवस्थेचा आम्ही त्याग केला. एकत्र कुटुंबातल्या अनेक दुष्परिणामावर बोट ठेवून त्यापासून आम्ही दूर झालो. परिणामी कुटुंबव्यवस्थेवरचा आमचा विश्वासच उडालाय. यातूनच सहजीवन म्हणजे लग्न न करताच एकत्र राहण्यासारखे प्रयोग होऊ लागले आहेत व यशस्वीही होत आहेत.
लग्न करून त्याच्यातल्या सगळ्या "कॉम्प्लिकेशन" पासून फारकत घेत, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यावर तोडगा म्हणून "लिव्ह इन रिलेशनशिप" म्हणजे लग्नाशिवाय सहजीवनाकडे लोकं वळू लागली आहेत. अशा सहजीवनामध्ये भावनिक गुंतागुंत नसते. पाळायला बंधने नसतात आणि टाळायला जवाबदारीही नसते. जोडीदार एकमेकावर अवलंबून नसतात. हॉस्टेलवर रूम शेअर करून राहणाऱ्या रूम पार्टनर सारखी ही संकल्पना आहे. पटेल तेवढावेळ एकत्र रहा, न पटेल तेंव्हा मार्ग मोकळा. या अशा सहजीवनाचं कायदेशीर स्वरूप अजून माझ्या वाचनात आलं नाही. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, यातून निर्माण होणाऱ्या संततीचे भविष्य काय हे देखिल कुठे वाचनात आले नाही.
आपल्याकडे सोळा संस्कारापैकी एक मानलेला गेलेला लग्न हा संस्कार, त्यातल्या गुण दोषांसकट स्विकारायचा की असं लिव्ह इन रिलेशनशिप स्विकारायची हा ज्याचा त्याचा पर्याय आहे. तौलनीक विचार करता, प्रस्थापित लग्न किंवा कुटुंबव्यवस्थेच्या दोषावर तोडगा म्हणून हा सहजीवनाचा मार्ग म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर असा आहे. नवराबायकोचं एकत्र राहणं म्हणजे दोन शरिरांचं एकत्र वास्तव्य असा अर्थ नाही. त्याला अनेक पदर असतात, अनेक पैलू असतात. भावनांची जिथे ओढ नाही आणि ज्याला संस्कारांची जोड नाही ते कसलं एकत्र राहणं?
पुढच्या पिढीवर संस्कार करणारी मागची पिढी दुरावली आहे. या दोन पिढ्यांच्यातली मधली पिढी हा खरा दोन पिढ्यांना सांधणारा दुवा आहे. नातवंडांचं बोट आजी आजोबांच्या थरथरणाऱ्या हातात देणारे आई वडिल हवे आहेत. पर्याय म्हणून लग्नाशिवाय सहजीवन स्विकारण्याऐवजी पिढ्यांच्यामधला हरवलेला दुवा सांधणं जास्त योग्य नाही का?
सौ. वंदना बर्वे
ओके सातीताई, मी ते फारसे
ओके सातीताई, मी ते फारसे सिरिअसली लिहिले नव्हते, फेसबूक शेअर म्हणून डिक्लेअर केले त्यातच ते आले म्हणा, फक्त धाग्याला सेंटीमेंटल टच द्यायचा प्रयत्न केला. एखाद्या गरीबाने वाचले तर बिचारा तेवढ्यावरच खूष
विषय आणि विषयाला अनुकूल
विषय आणि विषयाला अनुकूल प्रतिकूल मतेही वाचली.
वारंवार 'वृद्धाश्रम' आणि 'पाळणाघर' हे दोन विषय जालावरच नव्हे तर वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्या, साप्ताहिके, मासिके, इतकेच काय दूरदर्शन या माध्यमातील नित्यनेमाने पटलावर येणारे विषय असल्याने 'मायबोली' वर त्यांचे अवतरण क्रमप्राप्त मानावे लागणार. असो.
मी यातील 'वृद्धाश्रम' संकल्पनेशी अशासाठी जोडला गेलो आहे की शासनाकडून या वृद्धाश्रमांना ठराविक असे अनुदान मिळत असते [ते किती ? आणि पुरेसे असते का? हा या बाफचा विषय नसल्याने, शिवाय शासकीय अनुदानालाही मर्यादा येतात, त्या कारणाने त्यावर चर्चा नकोच] त्याबाबतच्या फाईल्स माझ्या नजरेखालून गेल्या आहेत.
युती सरकारच्या काळात 'मातोश्री वृद्धाश्रम' अस्तित्वात आले असले तरी त्यानंतरच्या राजकीय उलथापालथीत कोणत्याही मुख्यमंत्र्याने वृद्धाश्रम संकल्पनेला विरोध केलेला नाही, उलटपक्षी अनुदान चालू तर ठेवलेच शिवाय त्या त्या भागातील जिल्हाधिकारी याना विशेष असे अधिकार देवून तेथील कारभार [प्रत्येक वृद्धाश्रमाकडे ९ सदस्यांचे एक संचालक मंडळ असते....याना वेतन मिळत नाही. एक सामाजिक कार्य म्हणून ही मंडळी यात कार्यरत असतात] सुयोग्यरित्या चालतो की नाही हे पाहाण्यास सांगितले जाते.
कोल्हापूरातील एका वृद्धाश्रमाच्या संचालक मंडळाच्या अरेरावीविरूद्ध तेथील ८५ वृद्धांनी [स्त्री-पुरुष] एकदा वृद्धाश्रम ते थेट कलेक्टर ऑफिस.....सुमारे ८ किलोमीटर अंतर आहे.... धडक मोर्चा तर काढलाच पण जिल्हाधिकारी दौर्यावर असल्याचे पाहून मग पुढील सलग तीन दिवस त्यानी त्यांच्या कार्यालयासमोर तंबू ठोकूनच धरणे धरले होते. खूप गाजले होते 'वृद्धांचा मोर्चा' प्रकरण कोल्हापूरात. तीन दिवसानंतर जिल्हाधिकारी स्वतः त्या ८५ वृद्धांना {शासकीय भाषेत त्याना "इनमेट्स" असे म्हणतात} भेटले, त्यांच्या तक्रार अर्जावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासनही त्यानी दिल्यावर मग ही आजोबाआजी मंडळी पुन:श्च वृद्धाश्रमाकडे परतली.
सांगायचा मुद्दा असा की वेळ पडली तर ही मंडळी एकी दाखवून रस्त्यावरदेखील येतात आणि आपल्या न्याय मागण्या मिळवितात. सरकार याना 'मोफत पोसते' अशी समजूत वृद्धाश्रमाच्या संचालक मंडळींनी कधी घेऊ नये हाच संदेश हा मोर्चाने दिला.... कारण जर सरकार स्वतःहून यांच्यासाठी अनुदान देत असेल तर अन्यांनी तक्रार करण्यात हशील नसते.
अर्थात मिळत असलेले अनुदान हे नित्यनेमाने 'तुटपुंजे' च असते....जशी अन्य घटकांना मिळत असलेली अनुदाने... त्यामुळे महिनाअखेर गाठता गाठता संचालक मंडळांच्या कपाळी घाम फुटतो. त्याला उपाय म्हणून मग ही मंडळी गावातील दानशूर व्यक्ती/संस्था यांच्याशी संपर्कात असतात. त्यांच्याकडून या ना त्या निमित्ताने प्राप्त होणार्या सक्रीय मदतीने वृद्धाश्रमाची गाडी वंगण कमी पडले तरी चालत राहते.
सांगायला हरकत नाही....पण मी पाहिले आहे की शहरातील अशाप्रकारच्या दानशूर मंडळीत प्रामुख्याने 'गुजराथी' आणि 'सिंधी' मंडळी आघाडीवर आहेत {याची अधिकृत नोंदही वृद्धाश्रमाच्या दप्तरी आहेच}. या दोन गटांच्या घरी विवाह, जन्म, वाढदिवस, नूतन वास्तू, नूतक कारभार, दिवाळी....आदी कार्यक्रमाच्यावेळी न चुकता १०० लोकांना पुरेल इतका शिधा [तयार आणि रॉ देखील] स्वतःच्या टेम्पोतून 'मातोश्री वृद्धाश्रमा' कडे रवाना केला जातो. अर्थात त्याची आदल्या दिवशी संचालक मंडळाला दिली असल्याने तिथे इनमेट्सना नोटीसही मिळते की 'उद्याची मेजवानी अमुकतमुक यांच्याकडून तमुकअमुक कारणासाठी आहे....". त्या भोजनाचा आनंद घेताना मग ही वृद्ध मंडळी त्या फॅमिलीच्या नावाने प्रार्थना करतात, त्याना दुवा देतात....काही प्रसंगी दाता सपत्नीक हजर असतो.
वर एके ठिकाणी वृद्धाश्रम चार्जेसबद्दल विचारणा झाली आहे. डॉक्टरांनी तेथील सेवा ही बहुतांशी मोफत असली असे म्हटले असले तरी "मोफत" फक्त कॉमन हॉलमध्ये राहाणार्या इनमेट्सना मिळते. म्हणजे जवळपास ४० पुरुष एका मोठ्या हॉलमध्ये व ४० स्त्रिया दुसर्या हॉलमध्ये आपापल्या सामानांसह राहतात.
पण पुण्यामुंबईकडील अशाही काही फॅमिलीज आहेत की ज्यानी आपल्या आईवडिलांना इथल्या वृद्धाश्रमात ठेवले असले [कारणमीमांसा देत नाही, गरजही नाही] तरी त्याना वाटले की आपल्या आईवडिलांना स्वतंत्र रूम मिळायला हवी, तर तशी सोय संचालकांनी केलेली आहे. अशा दहाबारा सर्व सुविधांनी युक्त अशा स्वतंत्र रूम्स आहेत....त्याला अर्थातच भाडे असून ते माझ्या माहितीप्रमाणे रुपये १०००/- प्रती माह इतके आहे.
राहाण्याची स्वतंत्र सोय असली तरी या रूम्समध्ये राहाणार्यांना अन्य इनमेट्ससमवेतच कॉमन मेस हॉलमध्ये जेवण करावे लागते. त्यानी रूममध्ये जेवण घेणे संचालकांना मान्य नाही. यामुळे ही मंडळी स्वतःला इतरांपेक्षा वेगळे मानत नाहीत...हे चांगलेच.
"वृद्ध" आणि "आश्रम" म्हटले की सर्वसामान्यांच्या नजरेसमोर काहीतरी 'दया' मिश्रीत भाव येतात. पण आज अशा आश्रमात लाईट, थंड गरम पाणी, टेलिफोन, बाग, खेळ, रेडिओ, टेपरेकॉर्डर्स, आदीशिवाय चक्क डिश टीव्ही...तेही मिनी थिएटरटाईप...सोय असल्याने ही मंडळी अगदी हसतखेळत एकत्रित "झी सारेगामा" वरील आर्या, केतकी, मुग्धा, कार्तिकी....याना कौतुकाने पाहात ऐकत आपल्या नातवंडांची आठवण काढीत मजेत राहतात.
अशोक पाटील
अशोक पाटील > मस्त माहिती.
अशोक पाटील > मस्त माहिती.
...त्यानंतरच्या राजकीय
...त्यानंतरच्या राजकीय उलथापालथीत कोणत्याही मुख्यमंत्र्याने वृद्धाश्रम संकल्पनेला विरोध केलेला नाही, उलटपक्षी अनुदान चालू तर ठेवलेच शिवाय...
<<
पाटील सर,
चांगली माहिती.
गरीबांसाठी वृद्धाश्रम आहेत, हे सांगण्याच्या उद्देशाने मातोश्री वृद्धाश्रमचा उल्लेख आला.
(ते सरकार युतीचे असले, -ज्यांना माझा राजकीय व तात्विक विरोध आहे,- तरीही त्यांनी व्हिजुअलाइज केलेली ती एक चांगली पॉलिसी डीसिजन होती. पण इम्प्लिमेंटेशनमधे स्थानिक 'नेते' अन 'कार्यकर्ते' हे सरकारी फाईल पुशर्सच्या मदतीने चांगल्या योजनांची कशी वाट लावतात ते झुणकाभाकरच्या निमित्ताने सगळ्यांनाच ठाऊक झाले आहे, म्हणून ते उदाहरण दिले होते.
केंद्र व राज्य शासनाच्या असंख्य योजना (त्या कुणाच्या शासनकाळात आल्या हे गौण) लोकांना ठाऊकही नसतात. या योजनांची माहिती असणारे, व त्यावरूनच्या ग्रॅंट्स गिळंकृत करायला मदत करणारे अनेक मोठाले एजंट्स नॉर्थ साऊथ ब्लॉक पासून जिल्ह्यांतल्या झेडप्या अन पंचायत समित्यांपर्यंत पसरलेले आहेत हे ही बर्यापैकी ओपन सिक्रेट आहेच.
असो. मूळ विषयाशी बर्यापैकी अवांतर होत या बाफवर राजकारण घुसडल्या सारखे होतेय. सबब या विषयावरील अधिक चर्चा अपेक्षित असेल त्यांनी नवा बाफ काढावा हे. वि.)
पाळणाघर, व्रुद्धाश्रम, लिव्ह
पाळणाघर, व्रुद्धाश्रम, लिव्ह इन रिलेशन्शिप या गोष्टी कालसापेक्ष आहेत. त्या काल नव्ह्त्या, आज आहेत, उद्या कदाचित असतील-नसतीलही. पण लेखातील एक विचार सार्वकालिक आहे << एखाद्या कौटुंबिक समस्येला एक असं प्रोटोटाइप उत्तर असू शकत नाही. व्यक्ती, कुटुंब ह्याप्रमाणे ते बदलत जातं. <<
आपली समाज व्यवस्था व्यक्ति केन्द्रीत नसून समाज केन्द्रित आहे. चिरंतन टिकणा-या समाजाच्या भल्याचा विचार करून अनेक गोष्टी आपल्याकडे रूढ केल्या गेल्या आहेत. समाजाच स्वास्थ्य टिकवण्यासाठी व्यक्तिने आपल्या आवडी-निवडी, आग्रह, आचार्-विचार, स्वभाव याला गरजेनुरुप आवर घालावा हे अभिप्रेत होतं. म्हणूनच पूर्विचे लोक एखादी रूढी, परंपरा, रिवाज, कुलाचार यांना मोडण्यास धजावत नसत. या सर्व बाबिंचा अतिरेक झाला, त्यामध्ये काहि दोष उत्पन्न झाले तेव्हा त्याविरुद्ध बंड सुरु झालं आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा जयजयकार सुरु झाला. अर्थात समाज स्वास्थ्यं हे केन्द्रस्थानी नं रहाता व्यक्तिस्वातंत्र्य केन्द्रस्थानी आलं. याच प्रक्रियेतील एक टप्पा म्हणजे "लिव्ह इन रिलेशन्शिप".
"लिव्ह इन रिलेशन्शिप" ला विरोध होतो तो यामुळेच कि त्यामध्ये समाजाच स्वास्थ्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी आवश्यक मूलभूत बाबि नाहित. उदा. ती नैसर्गिकरित्या "व्यवस्था" म्हणून जन्माला आलेली आणि विकसित झालेली नाहि. आपल्याला दुस-या व्यक्तिच्या सांगण्यावरून आपल्या स्वभावाविरुद्ध्- मनाविरुद्ध वागायला लागू नये किंवा तडजोडी कराव्या लागू नयेत, दीर्घकाळ एकाच व्यक्तीचा सहवास मान्य करावा लागू नये, जबाबदारीपासून मुक्तता मिळावी या व्यक्तिकेन्द्रीत विचारांतून हा पर्याय जन्माला आलेला आहे असे वाटते. तसेच हा पर्याय त्यातील व्यक्तींना वयाच्या कोणत्या मर्यादेपर्यंत उपलब्ध आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. जसं लग्नं झालेली जोडपी आयुष्यभर (मरेपर्यंत) एकमेकांची साथ देतात तसं लिव्ह इन रिलेशन्शिप मधिल व्यक्ति एकमेकांना वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत साथ देणार आहेत आणि त्यातून मोकळं झाल्यावर त्यांची जबाबदारी कोण घेणार याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.
>>>"लिव्ह इन रिलेशन्शिप" ला
>>>"लिव्ह इन रिलेशन्शिप" ला विरोध होतो तो यामुळेच कि त्यामध्ये समाजाच स्वास्थ्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी आवश्यक मूलभूत बाबि नाहित. उदा. ती नैसर्गिकरित्या "व्यवस्था" म्हणून जन्माला आलेली आणि विकसित झालेली नाही<<<
बरोबर. आदीमानव आणि त्याच्या पुढील काही पिढ्यांच्या लग्नसमारंभांची, वधूमाय वल्कले सांभाळत पंगतीत हरणाचे मांस वाढत असतानाची, अंतरटोळीय लग्न आई-बापास अमान्य म्हणून काहीवेळा पळून जाऊन देवळात लग्न लावून घेतल्याची गुहाचित्रे नुकतीच उजेडात आल्यामुळे या आपल्या उदारणाला भक्कम पुरावा मिळालेला आहे.
सगळे प्रतीसाद वाचायला वेळ
सगळे प्रतीसाद वाचायला वेळ नाही मिळाला. पण अशोक सरांकडुन चांगली माहिती मिळाली. त्यांचे प्रतीसाद मी मागे एका बाफावर म्हंटल्याप्रमाणे खरोखर आदबशीर भाषेत आणी योग्य ती माहिती देणारे असतात, त्याबद्दल खरच धन्यवाद.
मी नताशा ने चांगला पर्याय दिलाय. त्याबद्दल तिचे मनापासुन कौतुक. खरच भविष्यात निदान एकाच मोठ्या भागात वृद्धाश्रम आणी बंगल्याच्या किंवा त्या इमारतीच्या दुसर्या भागात पाळणाघर अशी सोय केली तर त्या आजी आजोबांना पण विरंगुळा वाटेल. अर्थात तशा सवलती आणी सोयी पण उपलब्ध व्हायला हव्यात, कारण काही वृद्धाश्रम हे शहरापासुन लांब वसलेले पाहीलेत. हायवेने जाताना दिसतातच. त्यामुळे पाळणाघर असे लांब ठेवणे पालकाना शारीरीक आणी मानसीक दृष्ट्या जमणार नाहीच.
"लिव्ह इन रिलेशन्शिप" ला
"लिव्ह इन रिलेशन्शिप" ला विरोध होतो तो यामुळेच कि त्यामध्ये समाजाच स्वास्थ्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी आवश्यक मूलभूत बाबि नाहित
दोन सज्ञान व्यक्तींनी पूर्ण विचार करून काही दिवस एकमेकाबरोबर रहायचा निर्णय घेतला तर समाजस्वास्थ कसे बिघडेल?
>>जसं लग्नं झालेली जोडपी आयुष्यभर (मरेपर्यंत) एकमेकांची साथ देतात
घटस्फोट ऐकले आहेत?
>>तसं लिव्ह इन रिलेशन्शिप मधिल व्यक्ति एकमेकांना वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत साथ देणार आहेत आणि त्यातून मोकळं झाल्यावर त्यांची जबाबदारी कोण घेणार याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.
विनापत्य वृद्ध, ज्यांची मुले अकाली निधन पावली आहे असे लोक, ज्यांचे विवाह काही कारणाने झाले नाहीत किंवा ज्यांनी अविवाहीत रहायचा पर्याय निवडला आहे असे लोक यांची जबाबदारी कोण घेतं?
बदल अपरिहार्य आहे. आजकाल लग्न झाल्यावरही सलवार, जीन्स वगैरे सुटसुटीत पोशाख घालणार्या महिला पाहून याच महाराष्ट्रात एकेकाळी "सकच्छ कि विकच्छ" हा वाद "वाचाकांची पत्रे" सदरात गाजला होता यावर विश्वास बसत नाही.
या लेखात बर्याच गोष्टींचा
या लेखात बर्याच गोष्टींचा विचार करणे राहून गेले आहे असे वाटते. उदाहरणार्थ, एखाद्या जोडप्याला दोन्ही मुलीच आहेत ज्या लग्न करून परदेशी राहत आहेत आणि या जोडप्याला परदेशी राहणे मंजूर नाही. अश्या परिस्थितीत त्यांनी काय करावे? आता यात त्या मुलींची सुद्धा काय चूक? शिवाय त्या मुलींच्या मुलांना पाळणाघरात रहावेच लागणार आहे कारण दुसरा पर्याय नाही. या सगळ्यावरचा उपाय म्हणून त्या मुलींच्या नवर्यांनी मुळातच परदेशी जायला नको होते असे म्हणायचे का मग?
एखाद्या जोडप्याला मुलेबाळेच नसतील तर त्यांना म्हातारपणी कदाचित अश्याच एखाद्या आश्रमाचा सहारा घ्यावा लागेल. अश्या वेळी असे आश्रम उपलब्ध असणे हे चांगलेच नाही का?
.
@ रिमा... [प्रतिसादाबद्दल
@ रिमा... [प्रतिसादाबद्दल व्यक्त केलेल्या भावना पोचल्या...धन्यवाद.]
"...कारण काही वृद्धाश्रम हे शहरापासुन लांब वसलेले पाहीलेत...."
योग्य निरिक्षण आहे. पण खुद्द शासनानेच ही योजना राबविताना तो दृष्टिकोण मुद्दाम ठेवला होता. वाढत्या शहरीकरणासमवेत राक्षसासारखा अक्राळविक्राळ प्रश्न पुढे येऊन ठाकतो तो नित्यदिनी बिघडत जाणार्या वा बिघडलेल्या पर्यावरणाचा. वाढते प्रदूषण ही डोकेदुखी जर तरूणवर्गाची असेल तर तिचा उपद्रव अगोदरच प्रकृतीने हलाखीच्या अवस्थेत असणार्या वृद्धांना किती होऊ शकेल याचा साकल्याने विचार करूनच सरकारने वृद्धाश्रमाची स्थापना अगदी गावाबाहेर, शांत माळरानावर करण्याचे योजिले होते ते योग्यच म्हणावे लागेल. अर्थात त्या ठिकाणी शुद्ध पाण्याची सोय, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन, पोस्टपेटी, पूरक रस्ते, सायंकाळी या वृद्धांना किलोदोनकिलोमीटर मोकळ्या हवेत फिरायला मिळावे अशी विस्तृत नीरव जागा.... तसेच अॅम्बुलन्सची सोय सर्वप्रथम प्राधान्याने करण्यात आली आणि मगच इनमेट्सची नावनोंदणी सुरू झाली होती.
[अॅम्बुलन्स तसेच त्यासाठी ट्रेन्ड वाहक २४ तास 'अटेन्शन' अवस्थेत ठेवणे संचालक बोर्डाला अनिवार्य करण्यात आलेले असते.]
अशोक पाटील
प्रतिसाद १०१. >>> पण खुद्द
प्रतिसाद १०१.
>>>
पण खुद्द शासनानेच ही योजना राबविताना तो दृष्टिकोण मुद्दाम ठेवला होता.
<<<
सर, प्लीज, उच्च्या देऊ नका.
गावाबाहेर जागा स्वस्तात मिळते हे एकमेव कारण होते. सगळ्या मातोश्री आश्रमांना फुकट मिळाली आहे जागा, अन जी मिळालिये ती अॅबसोल्यूट पडीक अन यूसलेस जागा आहे. चुकुन कुठे हायवे जवळ आहे, हे सगळे सरकारी परवानगीने. झुणका भाकरला गावातल्ल्या मोक्याच्या जागा देऊन मग तिथे इतर धंदे सुरू केले त्याची पार्श्वभूमी आहे गावा बाहेरच्या जागा घ्यायला. गावात भरपूर सरकारी जागा असतात. अगदी एस्टी ष्ट्यांडावर तिसरा मजला बांधून वृद्धाश्रम उभारता येऊ शकतो. गावा बाहेरच्या आश्रमात म्हातार्याला अॅटॅक आला तर सिव्हिलित नेऊन टाकायला कोणते अँबुलन्स अन ट्रेण्ड वाहक २५ तास अटेन्शनात दारू पिऊन तर्र असतात, ते किमान मला तरी सांगू नका
मगच इनमेट्सची नावनोंदणी सुरू
मगच इनमेट्सची नावनोंदणी सुरू झाली होती. >>> अशोक. इनमेट्स शब्द योग्य नाही वाटत वृद्धाश्रमासाठी ,तुरुंगातल्या कैद्यांचा भास होतो.
@ डॉक्टर..... नाईलाज आहे, पण
@ डॉक्टर.....
नाईलाज आहे, पण प्रथमच मी तुमच्या वरील मताशी असहमती व्यक्त करीत आहे. माझ्या पाहण्यातील तीन जिल्ह्यातील सात वृद्धाश्रमांसाठी सरकारने विकत वा ताब्यात घेतलेली गावाबाहेरील जागा अगदी शेत लागवडीसाठी योग्य होती....पडीक तर मुळीच नव्हती. शिवाय तिथे नित्यनेमाने ऊसतोडणी हंगामात पाले ठोकणार्यांनाही त्या त्या ग्रामपंचायतींनी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत....ज्याची रितसर नोंद तहसिलदार कचेरीत आजही पाहाण्यास मिळेल.
एस.टी.स्टॅण्ड परिसरातही वृद्धाश्रम उभा करता येईल का ? ठीक आहे, वादाकरीता हेही होकाराथी उत्तर देवून मान्य करू. पण ते मग खाजगी पातळीवर - योग्य ते शुल्क घेऊन - होऊ शकेल. सरकारी अनुदान हवे असेल तर तुम्हाला गावाबाहेरील उपलब्ध जागेवरच अशा आश्रमांची उभारणी करणे क्रमप्राप्त आहे.
"झुणका भाकर केन्द्र", त्यामागील राजकारण आणि केन्द्रांची लागलेली विल्हेवाट हा विषय सर्वस्वी वेगळा असून त्याची लक्तरे 'वृद्धाश्रमा' च्या धाग्याला गुंडाळणे योग्य ठरणार नाही. अशामुळे सरकारचे 'अ' धोरण फसले म्हणजे 'ब' ही त्याच कप्प्यात गेले अशी भावना वाचणार्याचा मनी वसते.
"...अँबुलन्स अन ट्रेण्ड वाहक २५ तास अटेन्शनात दारू पिऊन तर्र असतात...." - हा तुम्हाला आलेला प्रत्यक्षातील अनुभव असेल तर प्रश्नच मिटला. मी पाहिलेले ड्रायव्हर्स अशा स्थितीत मला कधीच आढळले नाहीत. संचालक मंडळातील काही लोक शासकीय पदावर कार्यरत असतात [निदान मी तरी अशा तिघांना अगदी अरेतुरेच्या भाषेत ओळखतो] आणि अशा पदावरील व्यक्तीसमोर कुणी ड्रायव्हर - अन् तोही अॅम्बुलन्सचा - मदिराप्राशन करून ड्युटीवर हजर राहीत असेल ही बाब केवळ असंभवनीय.
@ श्री....
मान्य. पण 'इनमेट्स' असाच इंग्लिशमध्ये असलेल्या Day Care Centres and Clubs: Maintenance & Welfare of Parents & Senior Citizens Act मध्ये उल्लेख असल्याने मीही त्याचेच योजन केले. असे असले तरी आजकाल 'ज्येष्ठ नागरिक' हे नाम समाजात चांगलेच रुळले गेले आहे याची प्रचिती सहजीच येते.
अशोक पाटील
आदीमानव आणि त्याच्या पुढील
आदीमानव आणि त्याच्या पुढील काही पिढ्यांच्या लग्नसमारंभांची, वधूमाय वल्कले सांभाळत पंगतीत हरणाचे मांस वाढत असतानाची, अंतरटोळीय लग्न आई-बापास अमान्य म्हणून काहीवेळा पळून जाऊन देवळात लग्न लावून घेतल्याची गुहाचित्रे नुकतीच उजेडात आल्यामुळे या आपल्या उदारणाला भक्कम पुरावा मिळालेला आहे.
>>
मी हसुन कोसळले कसे नाही खुर्चीतुन..
जोक्स अपार्ट, मुद्दा अतीशय बरोबर आहे. विवाह हीदेखील मानवनिर्मित संस्था आहे.
सौ बर्वे आज्जी - तुमची वेळ
सौ बर्वे आज्जी - तुमची वेळ आली आहे का वृध्दाश्रमात जायची?
लोकहो, आपण सारेजण इथे
लोकहो,
आपण सारेजण इथे बालवाडी आणि वृद्धाश्रामावर चर्चा करताहोत. अर्थात बाफचा विषयच मुळी तो आहे. मात्र या दोहोंचा भार ज्या लोकांवर पडतो त्या गृहस्थाश्रमास चर्चेत प्रतिनिधित्व मिळालं नाहीये. ते मिळावं असं माझं मत आहे.
आजच्या गृहस्थाची (निदान मुंबईसारख्या महानगरातला तरी) उर्जा प्रामुख्याने कार्यालयापर्यंत जाण्यायेण्यात खर्च होते. तो सूर्य उजाडण्याच्या अगोदर घरातून बाहेर पडलेला असतो. परततो तेव्हा रात्रीचे आठ वाजलेले असतात. हा केवळ तग धरून राहण्याचा संघर्ष आहे. साहजिकच तो (वा ती) गृहस्थ (वा गृहस्था) बालक आणि वृद्धांकडे अपेक्षित लक्ष देऊ शकत नाही.
आज कमावत्या लोकांना घरच्यांबरोबर प्रफुल्लकाळ (क्वालिटी टाईम) का मिळत नाही? माझ्या मते लोकांनी मरमर राबायचं आणि कोणीतरी लोणी खायचं ही भ्रष्ट व्यवस्था याचं मूळ आहे.
अधिक चर्चा व्हावी.
आ.न.,
-गा.पै.
प्रफुल्लकाळ (क्वालिटी
प्रफुल्लकाळ (क्वालिटी टाईम)
<<
प्रफुल्लकाळचं मर्हाटी भाषांतर हॅप्पी टाईम असं होईल भौतेक. क्वालीटीचं ट्रान्स्लेशन दर्जेदार वै होऊ शकतं.
ऑन अ सिरियस नोट,
>> माझ्या मते लोकांनी मरमर राबायचं आणि कोणीतरी लोणी खायचं ही भ्रष्ट व्यवस्था याचं मूळ आहे. <<
ये बात कुछ हजम नही हुई.
म्हणजे घरचे कमावते नवरा बायको मर मर कष्ट करताहेत, अन लहान मुले, तसेच घरातले रिटायर्ड म्हातारे आईबाप लोणी खाताहेत, असे सुचवायचे आहे का तुम्हाला?
इब्लिस, >> म्हणजे घरचे कमावते
इब्लिस,
>> म्हणजे घरचे कमावते नवरा बायको मर मर कष्ट करताहेत, अन लहान मुले, तसेच घरातले रिटायर्ड
>> म्हातारे आईबाप लोणी खाताहेत, असे सुचवायचे आहे का तुम्हाला?
नाही हो! लोणी खाणारे स्विस बँकांमध्ये खाती बाळगून असतात.
आज दिवसभर राबणार्या भारतातल्या दोन हातांना जेवण जेमतेम सुटतं. तर त्याच युरोपीय हातांना तेव्हढेच (किंवा कमी) श्रम करून तुलनेने जास्त पैसा मिळतो. हा भारतीयांना राज्यकर्त्यांनी लुटल्याचा परिणाम आहे.
आ.न.,
-गा.पै.
हा भारतीयांना (कोणत्या)
हा भारतीयांना (कोणत्या) राज्यकर्त्यांनी लुटल्याचा परिणाम आहे.(?)
- प्रश्न अन उत्तर एकत्र.
>>माशाला काय मासे हवेत का ?
>>माशाला काय मासे हवेत का ? >>
@ साती , नाही हो , मी शाकाहारी आहे.
मी गोव्याचा संदर्भ एवढयाचसाठी दिला होता की गोव्याचेही बरेच प्रश्न आहेत. माईनिंग् /जमीन/ पर्यावरणाचे प्रश्न खूप गंभीर आहेत. अंमली पदार्थ व ईतर अवैध गोष्टी आहेत. भाषेचा प्रश्न आहेच. स्थानिक संस्कृतीवर होणारे विदेशी आक्रमण आहे. लहान उद्योगांचे प्रश्न आहेत. स्वतःची अशी खाद्यसंस्कृती आहे. गोव्यात राहणारी सजग व सुजाण व्यक्ती या व अश्या अनेक गोष्टींवर लिहू शकेल. गोव्याबाहेरच्या लोकांना ही बाजूही कळेल. एक आय आय टीयन व हिन्दुत्ववादी पक्षाचा नेता ख्रिश्नन बहुल प्रदेशात दुस-यांदा मुख्यमंत्री होतो याचेही मला नवल वाटले होते. हे अवांतर व विषयबाह्य व अस्थानी आहे. त्याबद्दल जाहीर माफी.
पण मराठी लेखिकांनी कोषातून बाहेर पडून लिखाणाच्या कक्षा रुंदावाव्यात असे वाटते.
अर्थात काय लिहायचे याचे स्वातंत्र्य बर्वे काकूंना आहेच .
(पकवून घ्यायचे की नाही याचेही स्वातंत्र्य वाचकाला आहेच की) . सतत तेच ते दळण्याचा कंटाळा येतो.
आणखी एक - बहूसंख्येने स्वीकारलेल्या व्यवस्थेबद्दल (पाळणाघर/वृद्धाश्रम) मग ती नाईलाजाने असेल वा आपल्या ईच्छेने असेल - सतत टीका करून काय होते ? प्रत्येक व्यवस्थेत काही त्रुटी असतात. कुठलीही व्यवस्था १०० % चांगली वा वाईट नसते. पांढ-या व काळ्या रंगामध्येही ब-याच शेड्स असतात.
माझ्या माहितीतले एक वृदध स्वतःच्या मर्जीने मुलगा सुनेपासून वेगळे राहतात. मुलाशी कोणतेही भांडण नसताना (व मुलाची एकत्र राहण्याची ईच्छा असताना). एकत्र राहिले की मुलांच्या रुटीन मध्ये स्वतःचे रुटीन कोंबावे लागते. दोन्ही पक्ष आपापल्या घरात समाधानाने रहात असले तर ते निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही काय ? काही घरात सामाजिक दबावाने एकत्र राहतात, पण कोणीच समाधानी नसते , हे निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण आहे काय ? काही वेळा आज्जी आजोबा दिवसभर अखंड मेलोड्रामिक मालिकांचा रतीब घालत असतात, ते नातवंडांच्या वर काय संस्कार करणार ?
जगण्याच्या संघर्षात प्रत्येक जण आपापल्या सोयीने , झेपेल व जमेल तशी स्वतःपुरती एक व्यवस्था उभी करतो. त्याला सरसकट दुस-याने नावे ठेवणे चूक वाटते. नेहमीच जुने ते सोने नसते व नवीन सगळेच काही पितळ नसते. काही गोष्टी काळाच्या प्रवाहात स्वीकारार्ह व्ह्यायला हव्यात. अर्थात तशी वैचारिक स्वागतशीलता आपल्याकडे हवी.
अहो, किती वेळा एडिट करता? पण
अहो, किती वेळा एडिट करता?
पण पोस्ट चांगली आहे. या पोस्टवर ही चर्चा (आणि वंदनाताईंचे आगामी या पठडीतले लेख) थांबायला हरकत नसावी.
स्वाती_आंबोळे + १०१ > जसं
स्वाती_आंबोळे + १०१
> जसं सुचलं तसं एडिट करत गेले हो .
पोस्ट चांगली आहे. >>++
पोस्ट चांगली आहे. >>++
सर्व प्रतिसादांना मनापासून
सर्व प्रतिसादांना मनापासून धन्यवाद.
यद्रोचते तत ग्राह्यं, यन्नरोचते तत्त्याज्यं.
एवढीच नम्र विनंती.
सौ. वंदना बर्वे
वाचला हा धागा.
वाचला हा धागा.
मुलीसाठी द्यायला गुणात्मक वेळ
मुलीसाठी द्यायला गुणात्मक वेळ आणि शारिरीक क्षमताही नसते. धकाधकी जास्तच झाली तर मानसिक क्षमताही उरत नाही.>>>>>>>>>>> नाही हो वंदनाताई! लहानपणी मुलांना झोपेतून उठवताना,आंघोळ घालताना थोडा वेळ बोलून स्पर्शाद्वारे माया पोहोचवू शकतो.क्वालिटी टाईम निश्चितच अशा छोट्या छोट्या
गोष्टींतून त्यांना देऊ शकतो.आता एकदम हायली+बिझी शेड्यूलच्या आईबाबांना वेळ कमी असतोही.पण
एक सांगू का घरी रहाणार्या आया असा वेळ कितीसा देतात ? थोडक्यात जागरुक पालक ,मग नोकरी करण्यारे/ न करणारे असोत,मुलांकडे लक्ष देतातच.
माझ्या आईने ,आजीला आमचा त्रास होऊ नये म्हणून स्वतः शाळेच्या वेळा बद्लून आम्हाला स्वतःसोबत आणणे इ.करून नोकरी व्यवस्थित केली. दोन्ही बाजूचा समन्वय साधला.तिला त्यावेळी आमच्या एक नातेवाईक म्हणायच्या की नोकरी करणार्या बायकांचे घरात लक्ष नसते.(त्यांच्या घरी पूजा असेल तर त्याच बाई
पूजेच्या दिवशीच दळण आणायला निघायच्या! हे अवांतर झाले.)
माझ्या मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पालकसभेत एकदा म्हणाल्या की' कृपया गैरसमज नसावा.पण माझ्या निरिक्षणानुसार घरात रहाणार्या आईपेक्षा नोकरी करणार्या आईचे मुलांकडे जास्त लक्ष असते'.
तीच गोष्ट आजी-आजोबांची! त्यांना नातवंडात आता खरोखरीने रमायला आवडेल की थोडा आराम (त्यात त्यांची space.,छंद आलेच) करायला आवडेल? आज कितीतरी आजी-आजोबा मनापासून नातवंडाचे करतील? ज्यांचा ईलाज नाही त्यांचा नाईलाज आहे.थोडावेळ सांभाळ ठीक आहे हो!
तीच गोष्ट वृद्धाश्रमाची! हल्ली आयुर्मान वाढत चालले आहे.त्यानुसार आजीची मुलगी /मुलगा ६० च्या घरात जाते/जातो.शारीरिकदृष्ट्या त्यांनाही झेपले पाहिजे! माझीच एक कझिन्,तिच्या आईला अमेरिकेत वृद्धाश्रमात
ठेवताना हैराण झाली होती. आई अल्झायमर पेशंट ,घरी लहान मुलगी, सासूशी फारसे न पटणारा जावई व
नोकरी यात तिची वाट लागली होती! आम्हाला आता काय करु म्हणून फोन केल्यावर तिचा वृद्धाश्रमाचा पर्याय
बरोबर आहे.सांगितल्यावर तिचाही guilt कमी झाला.
तुमच्या लिखाणात प्रामाणिकपणा+ भाबडेपणा +आदर्शवाद यांचा मिलाफ आहे.चांगले आहे.पण मित्रत्वाच्या नात्याने एक सांगू? एवढे संसारात गुंतू नका! तो तर होतच असतो .त्याहीपलीकडे बरच काही असतय..नाहीतर आपल्या बर्याच गोष्टी राहून जातात.Good Luck!
प्रतिसाद देणार्यांना ......एखाद्याला प्रोत्साहन द्यायचे नसेल तर नका देऊ.पण एकदम खच्चीकरणही नसावे हो! वंदनाताई लिहित आहेत. त्यांना लिहिते होऊ दे!
येळेकर प्रतिसाद अगदी सुरेख
येळेकर प्रतिसाद अगदी सुरेख आणि अॅप्ट आहे
वंदना बर्वे, पुढच्या पिढीवर
वंदना बर्वे,
पुढच्या पिढीवर संस्कार करणारी मागची पिढी दुरावली आहे. या दोन पिढ्यांच्यातली मधली पिढी हा खरा दोन पिढ्यांना सांधणारा दुवा आहे. नातवंडांचं बोट आजी आजोबांच्या थरथरणाऱ्या हातात देणारे आई वडिल हवे आहेत. पर्याय म्हणून लग्नाशिवाय सहजीवन स्विकारण्याऐवजी पिढ्यांच्यामधला हरवलेला दुवा सांधणं जास्त योग्य नाही का?
> > >
१००% खरे आहे.
लहानपण पाळणाघरात, किशोर - अरुण पण हॉस्टेलमध्ये, तरुण पण नोकरीत वा व्यवसायात, बायको ही खांद्याला खांदा देऊन ह्याच मार्गांवर, म्हातरपण वृद्धाश्रमात, .
भारतात कुटुंबे किती काळ खर्या अर्थाने एकत्र राहातात हे इतरत्र पाहुन दिसतेच आहे.
ही रेस आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे ह्याचा क्लु नाहिये कोणालाच.
एका दृष्टीने बरे आहे, एकमेकांबद्दल जास्त आसक्ति राहिली ह्यामुळे.
नमस्ते.
बरेच दिवस झाले.. वंदनाकाकु
बरेच दिवस झाले.. वंदनाकाकु दिसल्या नाहीत कुठे..
छान मांडलंय. प्रतिसादांचं
छान मांडलंय.
प्रतिसादांचं काही समजत नाही बाई !
Pages