निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
व्यंकटेश माडगूळकरांची स्केचेस
व्यंकटेश माडगूळकरांची स्केचेस आठवताहेत का ? त्यावेळी फोटो नसायचे पण त्यांच्या नेमक्या रेषा, तो प्राणी / पक्षी / माणूस / निसर्ग सगळे नेमकेपणाने डोळ्यासमोर ठेवायचा !
जागू कुठे गायब झाली ? या
जागू कुठे गायब झाली ? या दरम्यान ऑफिस जॉईन करणार होती.
व्यंकटेश माडगूळकरांची स्केचेस
व्यंकटेश माडगूळकरांची स्केचेस आठवताहेत का ? त्यावेळी फोटो नसायचे पण त्यांच्या नेमक्या रेषा, तो प्राणी / पक्षी / माणूस / निसर्ग सगळे नेमकेपणाने डोळ्यासमोर ठेवायचा ! >>>> अग्दी अग्दी - रेषांवर अशी हुकुमत फार क्वचितच दिसते....
जिप्सी सुंदर प्रचि सनबर्डतर
जिप्सी सुंदर प्रचि सनबर्डतर खासच
ही घंटाफुले.
गेल्या रविवारी हा पक्षी वेताळ
गेल्या रविवारी हा पक्षी वेताळ टेकडी जवळ दिसला होता. कोणता आहे हा?
आणि हा माझ्या घराजवळ दिसला होता काहि दिवसांपुर्वी
जो - पहिला फोटो - व्हाईट
जो -
पहिला फोटो - व्हाईट रम्प्ड शामा असावा.
दुसरा फोटो - स्पॉटेड मुनिया आहे.
घंटाफुलं सुरेख ! आणि जो_एस नी
घंटाफुलं सुरेख ! आणि जो_एस नी पोस्टलेला पक्षी पण. नाव अर्थात्च माहीत नाही.
पुन्हा एकदा नाकतोडा. नाकतोडा हा कीटक इतका सुरेख असू शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.
http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20130217/5453733969423637652.htm
घंटाफुलं सुंदर आहेत्..पिवळा
घंटाफुलं सुंदर आहेत्..पिवळा रंग किती मस्त ब्राईट आहे..
जो-एस वॉव.. घराजवळ असे पक्षी दिसणं किती छान आहे..
नि.ग.वर सगळेच छान!!!
नि.ग.वर सगळेच छान!!! मस्त!!!!
आता पुन्हा आमच्याकडे सुर्यपक्षी दिसू लागला आहे. सुमधुर आवाज आणि सुंदर दिसणे. काल पाणी प्यायला गॅलरीत आला होता. डोळ्याचे पारणे फिटले.
वर्षु नील मस्त आलय चित्र.
वर्षु नील मस्त आलय चित्र. अजून बघायला आवडतील.
टिकोमाला मराठीत घंटाफुले असे
टिकोमाला मराठीत घंटाफुले असे नाव आहे का ? समर्पक आहे.
शकुन, डॉ. उज्ज्वला दळवी यांच्या, "सोन्याच्या धुराचे ठसके" या पुस्तकात, सौदीमधली लहान मुले, टोळधाडीतले टोळ कसे खातात, याचे छान वर्णन आहे. ( त्या मायबोलीवर आहेत.)
त्या सध्या लोकप्रभा मधे पण लिहितात. DNA चा उपयोग करुन, माहिती कशी अमर्याद काळापर्यंत साठवता येईल, याबद्दल सुंदर लेख होता त्यांचा. शेवटी आय टी क्षेत्राला, निसर्गानेच सोल्यूशन दिले, असे म्हणावे लागेल.
जिप्सी, आणि सर्वांनीच हि एका
जिप्सी, आणि सर्वांनीच हि एका मिनिटात केलेली जगाची सफर बघाच..
http://www.youtube.com/watch?v=-BrDlrytgm8
http://www.youtube.com/watch?v=-uQ9nE1Kmm8&NR=1&feature=endscreen ( हि आहे युरपची टूर )
जो_एस,ईनमीन तीन छान फोटो आणि
जो_एस,ईनमीन तीन
छान फोटो आणि नविन माहिती मिळाली.
आहे आहे मी आले. एका
आहे आहे मी आले. एका नात्यातल्या लग्नात बिझले होते आणि दोन दिवस श्रावणीची तब्बेत बिघडली होती. आता ठिक आहे. त्यात आमच्या एम.टि.एन.एल. च्या लाईन्स बंद होत्या.
काल आमच्याकडे एक गंमत दिसली. धामण आणि मुंगुस एकत्र फिरताना पाहीले. आम्हाला पहिला तो साप वाटला पण नंतर सर्पमित्र आल्यावर त्यांना फोटो दाखवल्यावर ती धामण असल्याचे त्यांनी सांगितले. ह्याचा मी वेगळा धागा टाकणार आहे म्हणून सध्या हे फोटो.
जागु आली... निग वर तुझी आठवण
जागु आली... निग वर तुझी आठवण काढतच होतो आम्ही सारखं.. आलीस ती एकदम धांसू फोटो हाताशी घेऊनच..
नमस्कार लोक्स. एक प्रश्न
नमस्कार लोक्स.
एक प्रश्न आहे.
रविवारी मी दोन पाम ट्री घेऊन आले. घरात लावायला. पण दोनच दिवसात ते अगदी सुकायला आलेत. आल्यावर लगेच त्यांना कुंडीत लावले. माती त्या नर्सरीमधुनच घेतली होती पण ती लाल माती होती.
मागच्या वेळी आणलेले पाम पण असेच दोन आठवड्यात सुकून गेले.
घरात व्यवस्थित ऊन येतेय पण पूर्ण दिवसभर उनही नाहीये. नक्की काय प्रॉब्लेम असावा?
पामला पाणी किती घालावे?
लवकर मदत करा नाहीतर हे ही पाम सुकणार आहेत.
सुप्रभात निगकर्स जागूचे
सुप्रभात निगकर्स
जागूचे स्वागत
सध्या पाषाण तलावावर बरेच पाहुणे पक्षी आले आहेत अशी बातमी कुठल्यातरी चॅनेलवर दाखवत होते, पहायला पाहिजे जाऊन....
सावली, कुंडीत लावलेलेच पाम
सावली, कुंडीत लावलेलेच पाम आणायला हवे होते. तसे पाम वाढवायला सोपे असतात. मला मातीबद्दल शंका वाटतेय. त्या मातीत बाकी काहि झाडे वाढताहेत का, ते बघावे लागेल. कदाचित ती खालच्या थरातली माती असेल.
इनडोअर पाम असेल, तर थोडे उन पुरते. दोन दिवसातून एकदा पाणी घातले तरी पुरेल.
मागच्या वेळेस त्याने कुंडीत
मागच्या वेळेस त्याने कुंडीत लावुन दिले होते. पण ते ही सुकून गेले. म्हणुन यावेळेस मी लावले तर ते ही सुकतेय.
पामच्या भोवतीची माती काळी आणि चिकट होती. बाकी कुंडीत घातलेली माती मात्र लाल. त्यामुळे असेल का?
पण मग काय करायला लागेल आता म्हणजे ते जगेल?
जो_एस, Tufted Duck आले आहेत.
जो_एस, Tufted Duck आले आहेत. http://www.google.co.in/search?q=black+and+white+tufted+duck&hl=en&tbm=i...
परदेशी नसला तरी, डार्टर पण दिसला. जो नेहमी तीथे नसतो म्हणे.
तुम्ही बातमी कुठे पाहिली? लिंक देऊ शकाल का?
वा, स्वाती तुम्ही पाहिलेत का
वा, स्वाती तुम्ही पाहिलेत का ते पक्षी. ती बातमी बहुतेक साम किंवा मी मराठी वर पाहिली होती.
असे डक्स मी वेताळ टेकडीवरच्या खाणीतल्या पाण्यातही पाहिले आहेत. त्यांची पिल्ल पाण्यावरून पळताना खासच दिसतात.
जो_एस, तुम्ही वेताळ टेकडीवर
जो_एस, तुम्ही वेताळ टेकडीवर जाता का फिरायला ? माझा मुलगा पण तिथे सध्या संध्याकाळी फिरायला/व्यायामाला जातो .:) दोन-तिनदा त्याला डॉ. श्रिराम लागू तिथे दिसले.
तेथे मोर पण असतात ना ? मी एकदा पाहिले होते.
घंटाफुलांचा रंग कसला मस्त आलाय.
जागू, छान फोटो !
बाकीचे पण सर्व फोटो मस्त आहेत.
हो मी कधी कधी रविवारी जातो.
हो मी कधी कधी रविवारी जातो. श्रीराम लागू येतात असं मी ही ऐकलय. माझ्या मुलाने त्यांच्याबरोबर फोटो काढून आणला होता एकदा.
मोर तर आहेतच पण सध्या इतरही अनेक पक्षी आहेत तिथे.
सावली, पामची ती जात इनडोअर
सावली, पामची ती जात इनडोअर प्लांट म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे ( पानांचा पिवळा दांडा )
पाण्याचा निचरा नीट होतोय का ? मूळाजवळची माती चांगली आणि बाकी माती निकस असे झालेले दिसतेय.
जमिनीतून उपटून नर्सरी वाल्याने कुंडीत लावलेले दिसतेय.
पुर्ण कुंडी चांगल्या कम्पोस्ट ने भरुन बघता येईल. या पामच्या बिया ( सुपारी वर्गातल्या ) असतात. त्या रुजवता आल्या तर प्रश्नच नाही.
सॅगो पाम ( जाड बुंधा आणि सभोवार पाने ) पण घरात वाढू शकेल. या झाडाच्या बुंध्यात भरपूर स्टार्च असतो आणि परदेशी मिळणारा सॅगो याच झाडापासून करतात. आपला साबुदाणा मात्र कसावा पासून करतात.
कसाव्याचे झाडही शोभिवंत असते. पण त्याची मूळे खुपच मांसल असल्याने कुंडीत वाढणार नाही.
जो_एस, व्यंकटेश माडगूळकर
जो_एस, व्यंकटेश माडगूळकर मोरांना, सोगेवाले मोर म्हणत असत. धोतराचा सोगा संभाळावा तसा पिसारा संभाळावा लागतो त्यांना. उडणारा मोर मात्र खुपच सुंदर दिसतो. ( असा एक फोटो नेटवर होता ) पण तसा फोटो
मिळणे फार कठीण असते.
हो दिनेशदा मी उडणारा मोर
हो दिनेशदा मी उडणारा मोर पाहिला आहे तिथेच, पण फोटो काढणं अवघड.
हो दिनेशदा मी उडणारा मोर
हो दिनेशदा मी उडणारा मोर पाहिला आहे तिथेच, पण फोटो काढणं अवघड.>>>>>>>>>मी पण तिथेच पाहिलाय.
पुर्ण कुंडी चांगल्या कम्पोस्ट
पुर्ण कुंडी चांगल्या कम्पोस्ट ने भरुन बघता येईल >> ओके बघते. होपफुली तोपर्यंत पाम जिवंत राहिल.
सुदुपार निगकर्स, हो दिनेशदा
सुदुपार निगकर्स,
हो दिनेशदा मी उडणारा मोर पाहिला आहे तिथेच, पण फोटो काढणं अवघड.
कठिण आहे, पण तसा प्रयत्न करुन बघाव म्हणतो गावी गेल्यावर ..
खरेच कुणालातरी मिळाला पाहिजे
खरेच कुणालातरी मिळाला पाहिजे तसा फोटो.
अनिल, कोल्हापूर - सांगली रोडवर तसेही खुप मोर दिसतात. ( पिकांचे नुकसान नाही का करत ?)
Pages