निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या... >>> काही वाटतं का तुला आमचं अज्ञान असं उघडयावर पाडायला !! Proud
मला माहीत होतं वेल म्हणून पण मला वाटलं वर झाड लिहिलंय तर आपण ही बर्‍याबोलाने झाड म्हणावं Lol

मला माहीत होतं वेल म्हणून पण मला वाटलं वर झाड लिहिलंय तर आपण ही बर्‍याबोलाने झाड म्हणावं >>> वर्षु, चांगले झाड त्याला. Lol

मोनालिप.. तुझ्या आज्ञेला पडत्या फळाची मानून गेले धावत फ्रूट शॉप मधे..
बघा आता..
या फळाला मी रामफळ समजत होते ,पण आता ते हनुमानफळ आहे का आणिक कुठलं ते सांगा पाहू..

या फळाचं नांव ही कळलं नाही.. ही वरून थोडी टणक कवचाची असली तरी आतला गर मऊ असतो. बिया थोड्या मोठ्याश्या,चपट्या

हे ग्रेपफ्रूट ( पपनस म्हंजे हेच का??? )
आतमधे मोसंबीसारख्या फोडी पांढर्‍या रंगाच्या असतात. इंडोनेशियाला लाल आणी पांढर्‍या अश्या दोन वरायटी मिळत असत..

ड्रॅगन फ्रूट

स्टार फ्रूट

मँगुस्तिन

ही छोटुकली संत्र्याच्या परिवारातली फळं..
स्वच्छ पाण्याने धुवून, पुन्हा मिठाच्या पाण्यात एक अर्धा तास बुडवली कि त्यावरचे जीवजिवाणु नष्ट होतात असं समजून अखी,सालासकट तोंडात टाकायची.. चवीला गोड-आंबट असतात. गोड जास्त आणी आंबट कमी..

मी जवळजवळ ३५ वर्षांनी काल ब्रश हातात घेतला. किती रंग घ्यायचा / पाणी किती मिसळायचे / ब्रश किती कोनात धरायचा... सगळेच विसरलो होतो. तरीपण हा पहिला प्रयत्न, नि.ग. ला अर्पण.

वॉव्..अप्रतिम कला आहे तुमच्या हातात.. खरंच कधी कधी साध्या गोष्टी ही हाताशी असून आपण करत नाही.. आता हरवलेला आनंद गवसला कि असं म्हणावसं वाटत असेल.. इतकी वर्षं मधे का जाऊ दिली..!!
सेम पिंच..
मिडियम कोणते वापरलेत??

वर्षू, काय रसरशीत फळे आहेत. ग्रेपफ्रुट पेक्षा पपनस मोठे असते. साल जाड पांढरी आणि गर गुलाबी. तोरंजन पण म्हणतात ( मेक्सिकन भाषेतही हाच शब्द आहे.)

रामफळाची साल याच्यापेक्षा स्मूथ असते. रंग लालसर पिवळा. आपल्याकडे महाशिवरात्रीलाच जास्त करुन मिळतात. ते लाल आहे त्याला इकडे, चायनीज पीयर्स म्हणतात Happy

ती शेवटची संत्री कुमक्वॅट्स ना ? ती तशीच शिजवली तरी चालतात. ( पण मला कच्चीच आवडतात.)

साधे वॉटर कलर्स ! आणि साधा ए४ पेपर.
भारतात स्टेशनरीच्या दुकानात गेलो आणि राहवले नाही. इतके मस्त वाटले ना, ते रंग बघून आणि तो ओळखीचा वास घेऊन ! ( चित्र काही खास नाहीये, पण सुधारेन आता . )

खूप छान आहे निसर्ग चित्र.. मला पोर्ट्रेट्स आणी निसर्गचित्रं काढायला खूप आवडतात.. म्हणून म्हटलं सेम पिंच
रोज करू करू म्हणता कित्येक वर्षं गेली मधे Sad

हो,कुम्क्वेट्सच.. मलाही तशीच आवडतात.. कच्ची.. शिजवलेली खाल्ली नाहीत कधी.. इथे रसाळ आणी गोड असतात ही फळं

वर्षू, अगदी फळ बाजार समोर उभा केलास की. आणि कधीही न बघीतलेली फळे दाखवलीस. धन्यवाद! Happy
दिनेशदा, मस्त आलय चित्र. आता "आप आगे बढो, हम आपके पिछे है" Lol (चित्र बघायला :स्मित:)

शोभा, जास्त कवतिक केलं तर खरेच चित्र काढायला लागीन बरं मी !

वर्षु, ती कुमक्वॅट्स शिजवली कि जरा कडवट होतात. खास करुन चिकन / मीट बरोबर शिजवतात. भारतात बघायलाही मिळत नाहीत.

लेबनानी संत्री खाल्ली आहेत का ? आपल्या लिंबाएवढीच असतात, साल पातळ असते पण कमालीची गोड असतात. ती बाजारात येतात ती देठ आणि पानासकट. भडक केशरी रंग आणि हिरवीगार पाने, बघायलाच मस्त वाटतात. संत्री अशी देठासकट खुडली तर बराच काळ ताजी राहतात. कारण ओलावा टिकून राहतो.

शोभा, जास्त कवतिक केलं तर खरेच चित्र काढायला लागीन बरं मी !>>>>>>>शुरू हो जा! Happy
वर्षू, आले समोर. बोल आता. Happy

खूप छान आहे निसर्ग चित्र.. मला पोर्ट्रेट्स आणी निसर्गचित्रं काढायला खूप आवडतात.>>>>>>>>मला फक्त पहायलाच आवडतात. :स्मित:(येतातच कुठे काढायला? Sad )

पुन्हा मिठाच्या पाण्यात एक अर्धा तास बुडवली कि त्यावरचे जीवजिवाणु नष्ट होतात असं समजून अखी,सालासकट तोंडात टाकायची. >>>> अग्दी समजून - उमजून खातेस म्हण की ... वर्षु Happy

दिनेशदा - तुम्ही दरवेळेस तुमच्या नवनवीन कलेचा आविष्कार पेश करत असता त्यामुळे तुम्हाला "नवीनदा" का म्हणू नये ??? Wink Happy -
बाकी तुम्ही याही कलेमधे(पेंटिंग्ज) काहीतरी भारी भारी पेश करणार याची चुणुकच दाखवून दिलीत की ......

बयो - तुमाखमै Happy
या फळाला मी रामफळ समजत होते ,पण आता ते हनुमानफळ आहे का आणिक कुठलं ते सांगा पाहू..>>>
रामफळ दिनेशदांनी सांगीतलेय तसे लालसर असते. फरक इतकाच (वरुन दिसतेय त्याप्रमाणे) की हे ओबडधोबड नसलेले सिताफळ दिसत आहे. माझ्याकडचे जोड-गोळीसारखे एकमेकांना चिकटलेले होते.

तु नुसतेच फोटो काढलेत का विकत पण घेतलेस? घेतले असलेस तर फोड, परत फोटो काढ मग खा व इथे चव कशी आहे त्याचे रसभरीत वर्णन करुन (जिप्स्याला) जळव. Wink (तो पण आपल्याला सुतावरुन स्वर्गात नाहि पण वेलीवरुन झाडावर लोटतो)

बाकी फळे पण तोंपासु Happy

रचाकने, तो फळवाला / ली पुढच्या वेळी तुला दुकानात घेईल ना?

अगा.. खाऊन पाहिलंय पूर्वी..मला ते सीताफळरुपी फळ अजिबात आवडत नाही.. तो नुस्ताच गिचमिच गर खावासा वाटत नाही , पण चव अहुतांशी सीताफळाशी मिळतीजुळतीच आहे..
काही फळं घेतली गं..बाकीच्यांचे नुस्ते फोटूच काढले..
आमचा फळवाला ओळखीचाये.. नुसते फोटो काढू दिले की मला त्याने Wink

ह्म्म्म.. हा पपनस, पौर्णेमेच्या चंद्रासारखा दिसतोय की गोल-गरगरीत!!! Happy

पण चव अहुतांशी सीताफळाशी मिळतीजुळतीच आहे..>>> असे तर मग यावर शिक्कामोर्तब करायला हरकत नाही.

माझ्याकडे ते जुळे मिळाले की म्या पन फोटु डकवीन. Happy

हा आहे पपनस अगदी झाडावरचा, अगदी फुटबॉलच्या आकाराएवढा मोठा होतो.>>>>>>>>>>किती वर्ष झाली हे फळ पाहून आणि खाऊन. Sad लहानपणी ह्याच झाड दारातच होत. बघणे-खाणे दोन्ही व्हायचे. Happy

शशांक, उत्साह किती टिकतोय बघतो.
पपनसाचे नाव काढल्यावर साधना येणारच. ( अजून कशी नाही आली ? )

नितीन, साखरप्याचे का ? माझ्या आजोळी पण होते हे झाड. लागली तर इतकी लागतात कि खाउन संपत नाहीत. कुणीही यावे आणि मागून घ्यावे, असे होते.

शशांक्..अरे समजून उमजून कसली खाते.. असं केलं कि (मेंटली) इम्युनिटी स्ट्राँग होत असावी..कारण मग त्या जीवजिवाणुंच्या शंकाकुशंकाही मनात येत नाहीत Lol

दा साखरप्याच्या बाजुचेच ( घाटीवळयाचे) Happy
इतकी लागतात कि खाउन संपत नाहीत. कुणीही यावे आणि मागून घ्यावे, असे होते. अगदी आताशी माकड पण तोंड लावत नाहीत.

माकडांना ती सोलणे अवघड जात असेल.
आता आपल्याकडे कात उद्योग जवळजवळ बंदच झाला आहे ना ? माझ्या मामीच्या माहेरी करत ( हरचिरी ) पण आता नाही. तेवढी झाडे मिळत नाहीत म्हणे.

या काथाला आपल्याकडे बदनाम केलेय. पण खदिरांगादी तेल, इर्‍यामिर्‍यादी तेल अशी अनेक आयूर्वेदीक औषधे
खैरापासून करतात. घश्याच्या विकारावर तो चांगलाच.

याचे लाकूड मजबूत असते. पुर्वी बैलगाडीवर या लाकडापासून केलेला चरक ( फक्त लाकडापासून, धातू नाही )
बसवलेला असे. गाडीच्या चाकाच्या गतिवर किंवा हाताने फिरवून या चरकातून उसाचा रस काढत. ८/१० वर्षांपूर्वी ठाण्यातही असे गाडीवरचे चरक होते.

पपनस............................................ मस्त आहे फोटो.. पण अस्सल चीज बरेच वर्षात मिळाली नाहीय.. जे काही आंबटढाण मिळतं ते मी गोड मानुन खाते.

वरचे हनुमानफळ, जागुच्या भाषेत लवफळ मी एकदा बाजारात पाहिलेलं. त्याचं रुपडं पाहुन बहुतेक कोण्या बिचा-या सिताफळाला भरपुर रासायनिक खते घालुन त्याला असे फुगवलेय असा माझा समज झाला आणि मी त्याच्यापासुन दुर पळाले. .. Happy अगदीच बेढब दिसतं..

रामफळ मला खुप वर्षांपुर्वी खाल्लेले. तेव्हा आवडलेले. मागे एकदा एपिएम्सीत मोठा ढिग दिसलेला. उत्सुकतेने विकत घेतले आणि निराश होऊन ते चवहीन, वासहीन फळ टाकुन दिले. कच्ची असतानाच झाडावरुन तोडलेल्या फळांमध्ये काहीच मजा नाही.

हल्ली अमरफळेही दिसतात बाजारात. नेहमीच्या फळवाल्याला किंमत विचारल्यावर त्याने 'उगीच घेऊ नका, अजिबात चव नाहीय' हा सल्ल्ला दिला....

लागली तर इतकी लागतात कि खाउन संपत नाहीत. कुणीही यावे आणि मागून घ्यावे, असे होते.

देवा, मला ह्यातले एक झाड दे, मग मी तुझ्याकडे काहीही, अगदी काहीही मागणार नाही..........

गाडीच्या चाकाच्या गतिवर किंवा हाताने फिरवून या चरकातून उसाचा रस काढत. ८/१० वर्षांपूर्वी ठाण्यातही असे गाडीवरचे चरक होते.

हल्ली आलेत हे परत, नव्या मुंबईत सर्सास दिसतात. आता सुरू होतील गाड्या. फोटो टाकेन इथे.

जुनपर्यंत इथे राहतात ही मंडळि आणि पाऊस सुरू झाला की परत जातात शेतावर. बहुतेक सगळ्या गाड्यांवर नवरा, बायको आणि एखादा तरुण मुलगा असे कुटूंब दिसते.

Pages