निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, कांडोळ/कहांडोळ का? (घोस्ट ट्री) >>>> काय पर्फेक्ट सांगितलंय जिप्सी तू ...... पैकीच्या पैकी मार्क्स..

आता कोणीतरी त्या मखमली मागील रहस्याबद्दलही सांगावे .....

शशांकजी फारच सुंदर फुले आहेत.

अनिल २ नंबरचे तोंडलीचे आहे ना फुल?

तुम्ही ज्याला गोविंदी म्हणता त्यला आमच्याकडे मासतोडी म्हणतात. कारण ह्याचा काटा लागला की हमखास मास तोडतो. पण गोविंदी हे नाव छान आहे. Happy

अरे वा.. मखमली फुलाचं नांव ही समजलं..

मानुषी.. ,' त्याला बोली भाषेत एक घाणरडं नाव आहे. असो......................' Lol अगदी !!अगदी!!
पण मलाही तीच्च खूप जास्त आवडतात..
ही मोठ्ठी बोरं एक, दोन च्या वर खाववत नाहीत.. Happy

मस्त फोटो.. शशांकने टाकलेले पिवळे फुल सोनसावर आहे ना?

मखमली फुल खुपच छान.. पण मखमलामागचे रहस्य काय आहे?? फुल तर खुप उंचावर दिसत्ये त्या मुळे गोखरुसारखे गुराढोरांच्या अंगाला चिकटुन प्रसारकार्य झाडाला जमणार नाही.. मग इतकी मखमल कशाला???

सुप्रभात !

अनिल २ नंबरचे तोंडलीचे आहे ना फुल?
जागु,
मला ती वेल नीट दिसली नाही,त्यामुळे नाही ओळखता आलं..

शशांकने टाकलेल्या फोटोत एक शाल्मलीचं झाड आहे ना? >>>> बरोबर लाल -गुलाबी फुल शाल्मली/ काटेसावर आहे - Bombax ceiba

शशांकने टाकलेले पिवळे फुल सोनसावर आहे ना? >>>>> ते Cochlospermum religiosum म्हणजेच गणेर

कांडोळाच्या मखमलीमागील रहस्य ????

हनुमान फळाबद्दल - जरुर घेउन खाण्यासारखे आहे. मलाही आता कुठे मिळत नाहिये. Sad
वर्षु तुला मिळाले की फोटो डकव.
जागू लव फळाचे फोटो देना ईकडे Happy
शशांक मस्त फोटो. १ मेल पाठवले आहे. चेक करणार का?

बरोबर लाल -गुलाबी फुल शाल्मली/ काटेसावर आहे - Bombax ceiba >>>>>>> चला थोडी तरी प्रगती आहे.. Happy

ती मखमल म्हणजेच परागकण असलेले तंतु आहेत का?

मोनाली, तो काटेफणस. आपल्याकडे आता आता बाजारात मिळायला लागला. थायलंड / फिलिपीन्स मधला ज्यूस मिळतो आपल्याकडे त्या फळाचा.

शशांकने गुगली टाकलीय. ते मखमली फुल नसून फळ आहे. त्याच्यावरचे कूस भयंकर टोचते. पण ते भाजुन त्यातला बिया खाता येतात.

शांकली, पत्ते शोधण्याचे कष्ट घेतलेत खरे पण जिप्स्याला पुण्यातली एवढी माहिती नाही. त्याला सोबत लागेल Happy

दिनेशदा, गुगलले पण त्याचे फोटो काही मिळाले नाही. मी भारतीय व विलायती फणस पाहिलाय आजवर. काटेफणस नाही.
तुमच्याकडे त्याचे विंग्रजी नाव हाय का?

एक - The creamy white flesh – Custard Apple ( Noi-Na) हे मिळाले. पण माझ्याकडे आणलेले ते जुळे सिताफळ असावे असे जोडलेले होते (सगळेच) व त्यात बीया बिलकुल नव्हत्या.
(रच्याकने - थाय फळाचा प्रसाद भारतीय सत्यनारयणाला चालला असेल ना Wink , कारण त्यांच्या रामायणाच्या कथेत गाईडने सांगीतले प्रमाणे हनुमानाने लग्न केलेय. अर्थात पट्टायात तेथील मुली पाहिल्यावर यावर विश्वास ठेवावासा वाटला Uhoh )

हाताच्या ओंजळीसारखे असते ना फळ ते. मग काटेफणसच तो. सिताफळासारखेच पण वरुन तितके ओबडधोबड नसणारे, ( ते खरे कष्टर्ड अ‍ॅपल ) पण आपल्याकडे मिळते कधी कधी. त्याचे इंग्रजी नाव शोधतो.

English: Brazilian pawpaw, soursop, prickly custard apple, Soursapi मोनाली हि नावे त्याची.
Annona muricata हे शास्त्रीय नाव. ( हेच ना ? )

मी खाल्लय हनुमान फळ ! चवीला छान असते, आणि मुख्य म्हणजे सीताफळात जशा बिया असतात तशा ह्यात नसतात. महाग असते पण खूप गर मिळतो. ! कोणाला परत मिळाले तर जरूर टेस्ट करा . वरून रामफळासारखे दिसते, त्याचे हनुमानफळ हे नाव त्याच्या आकारावरून ठेवले असावे (जंबो आकार) असे वाटते.

ईनमीन तीन , वर लिहील्याप्रमाणे हा मिरीचा वेल आहे. एक उघडून पाहिले तर आतमध्ये मिरीची पांढरी बी दिसेल .

ईनमीन तीन,
ते मिरीचच झाड आहे अस वाटतं..
पान तर 'नागवेली' सारखी वाटली, नागवेलीला अशी फळ/बिया खुप क्वचित असतील..

हनुमान फळाचा फोटो टाका कुणीतरी,निदान ओळखता येईल नंतर

काल वेताळ टेकडी आणि बाजूच्या वन विभागात मस्त थंडगार हवा होती. पक्षी तर इतक्या प्रकारचे होते. तिथून हलूच नये असे वाटले.
तिथे एका झाडाला बोरा सारखी लाल फळं लागली होती आणि त्या फळांना देठाच्या विरुध्द बाजूला डाळींबाला असतो तसा गोल भाग होता. कसली असावी ती फळं. फोटो काढलेत टाकेनच.

तो ओल्या मिरीचा गढ आहे का? ही लिंबाच्या रसात टाकुन ठेवतात. अगदी बरेच महिने टिकते. ज्या कशात आपण लिंबाचा रस टाकतो त्यात या दाण्यांसकट तो टाकायचा तिखट आंबट मिरी मस्त लागते Happy

दा - http://www.flickriver.com/photos/adaduitokla/6295315302/ - असे काहिसे पण सिताफळाएवढे गाठाळलेले नव्हते व काटेफणसा इतका रफ सरफेस पण नव्हता. शिवाय त्यात एकही बी नव्हती.

वर्षू अब एक तेरा ही सहारा Sad मी फोटो नाही काढला तेव्हा, आता तुच टाक तुझ्याकडच्या फळाचा फोटो. माझ्या रामभक्त लेकाने पुजा आटोपताच २ ही फळे आम्हाला चवीपुरता देऊन फस्त केली Sad फोटो काढण्याइतकी उसंत मला नव्हती.

प्रज्ञा तुलाही मिळाले तर बघ परत. मी पण शोधात आहे.

हो मोनाली, तोच हा काटेफणस. यात थोड्या बिया असतात. आणि त्यातून सहज रोपे तयार होतात.
प्रज्ञा म्हणतेय ते कष्टर्ड अ‍ॅपल.

Pages