निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
ही चंदनाच्या झाडाची फुले
ही चंदनाच्या झाडाची फुले दिसली
चंदनाचे झाड ५०-६० वर्षाचे
चंदनाचे झाड ५०-६० वर्षाचे झाल्याशिवाय त्यात सुवास येत नाही. चंदनापासून तयार केलेली कुठलीही वस्तू वापरताना याचा विचार हवा. जसे उदबत्ती, साबण, देवासाठी लेप, शोभेच्या वस्तू....
रावी हे स्पॅथोडिया आहे. अफ्रिकन ट्युलिप. लालभडक रंगाच असत हे फुल.
हा सुकलेल्या फुलांचा फोटो आहे ना? >>>>>>>>>>>>>>>> यात पिवळा रंग सुद्धा असतो का? फूट्बॉल ग्राउंड, कुपरेज याच्या शेजारच्या बागेत आहे. बसमधून जाता-येता पाहीले आहे.
हो दा जवळ जवळ दोन महिन्यांनी
हो दा जवळ जवळ दोन महिन्यांनी दोन दिवस मागची पान वाचुन काढली आणि अखेर आज प्रकटलो
आता दररोज डोकावेनच.
अनिल, चंदनाच्या झाडाच्या
अनिल, चंदनाच्या झाडाच्या पानाला / फुलांना अजिबात तो सुगंध येत नाही. शिवाय हे झाड आजूबाजूच्या झाडांच्या मूळावर आक्रमण करुन, त्यांच्याकडून पोषण मिळवते. आता एप्रिल मे मधे काळसर फळे पण दिसतील. ती मात्र कोकिळा आवडीने खाते.
हो मधु, अगदी पिवळा नाही, केशरी पिवळा असतो रंग. आणि मला तरी वाटते, आपण वापरणार्या बहुतेक सुंगधी वस्तू, कृत्रिम सुगंध वापरून केलेल्या असतात. खरेच चंदनाचे तेल वापरले, तर ती वस्तू खुप महाग होईल.
नितीन, आधी हजेरी लावायची आणि मग वाचन करायचे !
शशांक, माझ्या घरच्या हळदीच्या
शशांक, माझ्या घरच्या हळदीच्या का मागे लागलायेस
चंदन ऐकलं कि वीरप्पन च आठवतो.. बापरे चंदनाची तस्करीच होतेसं दिसतंय..
बंगलोर ला सरकारी एम्पोरियम मधे सर्रास चंदना चा वास असलेल्या मूर्त्या,पावडरी,उदबत्त्या लोकं विकत घेत असतात.. आठेक दिवसात वास गायब!!!
बोरांच्या पानांचा उपयोग खासच!!
दिनेश दा ,'अवांतर' ही मस्त वाटलं वाचून..
यात पिवळा रंग सुद्धा असतो
यात पिवळा रंग सुद्धा असतो का?
हो आहे, पण भगवा जसा सगळीकडे आहे तसा हा नाहिय, खुप रेअर आहे.
मस्त रंगलाएत गप्पा. अनिल,
मस्त रंगलाएत गप्पा. अनिल, तुमच्या मळ्यातले फोटो मस्त आलेत. द्राक्षं एकदम रसरशीत आहेत.
जिप्सी, ह्यांचे पुण्यातले पत्ते....
१. फालसा - तळजाई टेकडीच्या मेन गेटवर.
२. अजानवृक्ष- भांडारकर रोडवर येस बेंकेच्या दारात.
३. किनई - एम्प्रेस गार्डनमधे आणि पुणे युनि.च्या बोटॅनिकल गार्डनमधे.
४. कुंभा - पुण्यात अजून नाही बघायला मिळाला; पण मुळशीला जाताना बरीच, अगदी कुंभमेळा भरल्यागत आहेत.
५. खिरणी - एम्प्रेस गार्डनमधे
६. टेमरू/टेंबुरी (हे म्हणजे टेंभूर्णीच का?) - हो, ते टेंभुर्णीच! पुणे युनि.च्या बोटॅ. गार्डनमधे आणि एम्प्रेस गार्डनमधे.
७. टेटु - ताथवडे उद्यानाच्या मेन गेटकडे पाठ केली की समोरच.
८. टोकफळ (Acrocarpus fraxinifolius) - पुणे युनी.बो.गा., एस.पी कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलच्या दारात.
९. दही वण (Cordia acleodi) - मी अजून पुण्यात बघितला नाही. पण माहिती काढून सांगेन.
१०. नाणा - माहिती काढून सांगेन.
११. पाडळ - कर्वे रोडवर मृत्यंजय मंदिराच्या आतल्या गल्लीत.
१२. पिवळा वारस - स्पायसर कॉलेजच्या बेकरीपाशी.
१३. पेटरा- माहिती काढून सांगेन
१४. बुरगुंड - माहिती काढून सांगेन
१५. वारंग/भेंडक - माहिती काढून सांगेन
बंगलोर ला सरकारी एम्पोरियम
बंगलोर ला सरकारी एम्पोरियम मधे सर्रास चंदना चा वास असलेल्या मूर्त्या,पावडरी,उदबत्त्या लोकं विकत घेत असतात.. आठेक दिवसात वास गायब!!!
हो... मीही अनुभव घेतलाय..
Cordia alliodora शांकली हे
Cordia alliodora शांकली हे आहे काय Cordia acleodi. कारण Cordia acleodi गुगलुन काहीच मिळेना
साधना, बहुधा जिप्सीचं
साधना, बहुधा जिप्सीचं लिहिताना स्पेलिंग चुकलं असेल. मी त्याची लिस्ट इथे कॉपी पेस्ट केली.
बाय द वे, जिप्सी, तू पुण्यात
बाय द वे, जिप्सी, तू पुण्यात झाडं बघायला आणि त्यांचं फोटो सेशन करायला येतोएस की काय? येणार असलास तर जरूर कळव.
शांकलीजी -वरील १५ पैकी फक्त
शांकलीजी -वरील १५ पैकी फक्त कुंभाच माझ्या ओळखीचा आहे बाकी नाव माझ ज्ञान.
जिप्सी पुण्याला लवकर जाऊन आला तर बरेच आहे.
हे झाड ओळखा पाहु
ईनमीन तीन हे रातांब्याचे
ईनमीन तीन हे रातांब्याचे (कोकम) झाड आहे ना?
अरे मी एकदम सोपा प्रश्न दिला
अरे मी एकदम सोपा प्रश्न दिला वाट्त उत्तर बरोबर आहे.
उत्तर बरोबर
उत्तर बरोबर आहे.>>>>>>>>>>>लहानपणी खाल्लेल्या पानांची आणि फ़ळांची चव अजून जिभेवर आहे.
नि.ग.चा धागा नुसता धावतोय.
नि.ग.चा धागा नुसता धावतोय. एखादा दिवस गॅप पडली तर पुर्ण वाचेपर्यंत खूप धावपळ करावी लागते. शिवाय प्रतिसाद पण वेळच्यावेळी देत येत नाहीत, ते वेगळेच.
वरिल सर्व फोटो फारच छान. इनमीनतीन हळदीचा फुलोरा मस्तच !
अनिल, सांगलीला खरंच एक गटग करूच.
दिनेशदा, मी दिलेली हळद कशी आहे? की मुंबईतच ठेवून गेलात?
शांकली, मी भांडारकर रोडवरूनच जाते. आता ही येस बँक नक्की कोठे आहे? (मी कॅनॉलरोडवरून गुडलक चौकापर्यंत नंतर आपटेरोडवरून शिवाजीनगरला जाते.)
आफ्रिकन ट्युलिपच्या कळ्यांमधे
आफ्रिकन ट्युलिपच्या कळ्यांमधे मस्त पाणी असतं..टुचुक फोडली की फवारा उडतो..
हाय लोक्स. सर्वप्रथम नविन
हाय लोक्स. सर्वप्रथम नविन भागाच्या शुभेच्छा. उशीर झालाय ना. पण मोबाईलवरुन विंग्रजीत टायपायचा कंटाळा केला नी पीसी वरुन आज अॅक्सेस करतेय.
सर्व पोस्ट वाचल्या, मस्त. वर्षूतै चायनीज नव वर्ष सिरीज पण मस्त गो. भाग ४ व ५ तर छानच.
सर्व फोटो व माहिती अप्रतीम. (अर्थात इथे येउन काहीतरी नयनरम्य वा वाचनीय नसले तरच नवल )
आता प्रश्ण, मधे डिसेंबरात -
आता प्रश्ण, मधे डिसेंबरात - सिताफळाच्या चवीचे, सयामी जुळी सिताफळे असेल असे दिसणारे, मात्र सिताफळाच्या बीयांचे नामोनिशाण नसलेले, हनुमानफळ नावाचे फळ मिळालेले व खाल्लेहि.
याबद्दल कोणी अजुन माहिती देउ शकेल काय? हे त्याआधी वा नंतरही कुठे दिसले नाही. त्यावेळी नवर्याने ठाणा मार्केट मधुन हे आणले होते.
मोनाली माझ्या माहेरी लव फळ
मोनाली माझ्या माहेरी लव फळ आहे.
अनिल शेतातील पिके पाहुन धन्य वाटले.
मोनालिप थांकु गं.. इथेही
मोनालिप थांकु गं..
इथेही सीताफळ सदृष्य एक मोठं फळ मिळतं. आत बिया जवळ जवळ नाहीच पण रवाळ असा भरपूर गर असतो. त्याला सीताफळाची चव असते . बघते आज जमलं तर फ्रूट शॉप मधून घेऊन येईन..
हनुमानफळ पहिल्यांदाच नांव ऐकलं.. रामफळ ही ऐकलंय पण पाहिलं मात्र नाही अजूनही..
कांदिवली बाजारात फळवाला
कांदिवली बाजारात फळवाला "हनुमानफळ" म्हणून ओरडत होता. पण फळाचे आकार पाहून घ्यावेसे वाटले नाही. चुकलेच माझे, घेऊन पहायला हवे होते. आता दिसत नाही.
ही शेताकडे रस्त्याने जाताना,
ही शेताकडे रस्त्याने जाताना, बांधावर दिसलेली काही फुले.
बहुतेक नावे माहित नाहीत, यासाठी जाणकारांनी मदत करावी
१) आम्ही याला विलायती चिंच (गोरखचिंच ?) अस म्हणतो,
२) याच नाव ओळखा ?
३) ही झाडे खुप आहेत्,या बियांचा उपयोग शाळेत असताना रंगात बुडवुन याचे शिक्के मारुन चित्रात छान नक्षिकाम करायचो,नाव सांगा.
४) नाव माहित नाही.
५) ही घाणेरीची फळं/बिया
६) ही गोविंदी
७) ही बाभुळ (प्रकार लक्षात नाही) त्याच्या शेंगा
बाभळीच फुल पाहिलं, त्यावर एक भुंगा ही दिसला,त्यावर खुप भरभर फिरत होता
८) ही वेल-फळे बाभळीच्या झाडावरच दिसल्या, पण वेगळी वेल असेल ना ?
९) हळदीच शेत नांगरताना हे बगळे बैलांच्या मागे जोमाने चालत होते, नांगरलेल्या मातीतुन ते चोचीत खायला टिपत होते
जिप्सी, साधना, ते cordia
जिप्सी, साधना, ते cordia macleodii आहे. एम चुकून राहिला असेल. ह्या दहिवणाची एक गंमत कालच ऐकायला मिळाली ती अशी; सारंग सोसायटीजवळ श्री.बापट नावाचे गृहस्थ रहातात. ते मूळचे खानदेशातले. ते काल सांगत होते की "तिकडे दहिकुडी म्हणून एक प्रकारचे झाड असते, शेळीचं दूध आम्ही काढलं की दुसरा एकजण दहिकुडीच्या झाडावर कोयतीनं घाव घालून एक खाच पाडायचा. की त्यातून चीक बाहेर यायचा. त्या चिकाचे काही थेंब शेळीच्या दुधात टाकले की कवडी दही एका मिनिटात तयार व्हायचं"......
हे ऐकून मी अवाकच झाले. दहीकुडी म्हणजे दहिवण! आणि हे झाड जास्तकरून त्याच भागात बघायला मिळतं.
अनिल, गोविंदीचे फोटो छान आलेत. आणि ती गोरखचिंच नसून विलायतीचिंचच आहे. ते पांढरं फूल पडवळाचं आहे का? (जागू नक्की सांगू शकेल.)
हनुमानफळ नावाचं फळ असतं हे ऐकून आहे, पण प्रत्यक्षात बघितलं नाहीये.
आज (१७ फेब्रु.) सकाळी मी व
आज (१७ फेब्रु.) सकाळी मी व अंजू (शांकली) कात्रज घाटात गेलो होतो - तिथे दिसलेला हा वृक्षराज - फुलावर आलेला असल्याने पूर्णपणे पाने झडून गेलेला व फुला-फळातून आपले वैभव प्रकट करणारा -
आज कात्रजला पाहिलेले अजून
आज कात्रजला पाहिलेले अजून काही -
आहा.. सुर्रेख, मखमली फूल आणी
आहा.. सुर्रेख, मखमली फूल आणी राजेशाही रंग!!!
( असेच इंटरनेट पकडणारे झाड
( असेच इंटरनेट पकडणारे झाड हवे होते )>>>>>>>>>
हो ना! माझं इंटरनेट सध्या संपलंय म्हणून हपिसात स्टाफ गेला की येते आपली माबोवर..........(र्रिचार्ज करेपर्यंत!)
अनील खूप छान फोटो आहेत. हळदीचे तर मस्त! आणि अनीलच्या शेतात गटगला माझं अनुमोदन!
शशांक काय मस्त मख्मली फूल!
माझ्या अंगणात चंदनाचं झाड होतं. ते काही कारणांनी (लुईचा पिंजरा आणि काही बांधकामासाठी) काढलं. त्याला छान काळी छोटी फळं यायची. आणि खूप को़कीळाही यायच्या.
पण वास वगिअरे नव्हता. पण त्याचा बुंधा मात्र ३/४ मोठे ओंडके स्वरूपात एका कोपर्यात उभे आहेत बरीच वर्षं.
त्याचे चंदनी खोड बनवणे वगैरे अजून काही केलं नाही. आता तसंही किती लोक गंध उगाळत असतील?
वर्षू बोरं वेगळीच आहेत. आता इथेही जायंट साइज बोरं मिळतात. अगदी छोटी पण चविष्ट बोरं इथं मिळतात ती मला प्रचंड आवडतात. त्याला बोली भाषेत एक घाणरडं नाव आहे. असो......................
सकाळी ६.३० च्या आसपास जॉगिंग
सकाळी ६.३० च्या आसपास जॉगिंग पार्कातलं बदामाचं झाड अगदी सोन्याचं झालं होतं. सगळ्या ब्रॉन्झ कलरच्या पानांमागून सूर्य चमकत असल्याने! पण फोटो सेलफोनातला असल्याने इतका छान नाही.
<
सुर्रेख, मखमली फूल आणी
सुर्रेख, मखमली फूल आणी राजेशाही रंग!!! >>>>
शशांक काय मस्त मख्मली फूल! >>>> नाव सांगा नाव.......
Pages