Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/19456 ही एक हमखास यशस्वी रेसिपी आहे हेल्दी बनाना ब्रेडची.
व्हॅनिला वेफर्स मिळतात इथे त्याच्या पॅकवर एक केळे वापरुन करायची कृती असते पुडिंग की काय आठवत नाही.
हैला बनाना ब्रेडला कशी विसरले
हैला बनाना ब्रेडला कशी विसरले म्या?? बरं झालं आठवणे केलीस्....आता शोधते रेस्पि...ते पुरणाचं पण पाहायला हवं...
फेसप्~अक...
सिंडिची हेल्दी रेसिपी आहे...वॉव..
वेका, ही माझी रेसिपी नाही.
वेका, ही माझी रेसिपी नाही. मनःस्विनीची आहे. स्पष्ट करुन सांगितलेलं बरं नाही तर तू पुन्हा माझ्यासाठी रिक्षा स्टँडचा धागा योग्य आहे असं म्हणशील. तर आता रेसिपी बघ, कर आणि भरपेट ढेकर दे. कसं ?
आणि मी तीच लिंक दिली आहे बरं
आणि मी तीच लिंक दिली आहे बरं का.
बनाना क्रिम पाय, बनाना बर्फी,
बनाना क्रिम पाय, बनाना बर्फी, बनाना पराठा, मिल्क शेक/स्मुदी,बनाना ओट्स स्वेअर्स करता येईल. सगळ्याच्या रेसिपि गुगल करुन मिळतिल.
नवर्याने (माझ्या) कुरमुरे
नवर्याने (माझ्या) कुरमुरे आणण्याएवजी जाडे पोहे उचलून आणले. मग घाबरून(केलेल्या चुकीने मला घाबरून) लपवून ठेवले, रीसीट फाडून मोकळा झाला. मला नंतर लक्षात आले की परवा ह्याला कुरमुरे आणायला सांगितलेले, विचारल्यावर मग गपचुप पोहे काढून दिले. वर हे सांगून मोकळा झाला की रीसीट मिळत नाही.(खूप खोदल्यावर सत्य बाहेर आले की फाडली ते
).
तर आता मुद्दा हा की(हुश्श! रामकथा सांगून..),
इतक्या पोह्यांचे काय करायचे?? जरा मदत करा... प्लीज.
१)कांदेपोहे कोणालाच आवडत नाही(मला सुद्धा. आधी खायचे कोणी दिलेच तर, आता खाल्ले की डोके भणभणते.).
२)चिवडा नकोय
३)डोसे, अंबोळ्या घरात कोणीच खात नाही(मी सोडून)
मग उरलेले ऑप्शन सुचवा...
झंपी, हा एक पदार्थ आहे.
झंपी, हा एक पदार्थ आहे. पोह्याचे वडे पण करतात . रेसिपी माहित नाही.
नाहीतर सरळ त्याचं डांगर (पीठ) बनव.
http://www.spicy-aroma.com/20
http://www.spicy-aroma.com/2012/05/poha-vada-recipe-flattened-rice-fritt...
हे बघ झंपी. हे पोह्याचे वडे. दिसायला तरी चांगले दिसताहेत. करून पाहिलेले नाहीत.
बिल्वा आणि प्रॅडी
बिल्वा आणि प्रॅडी धन्यवाद.
पोह्याची उकड बघेन करून. वडे म्हणजे तळणं.. तेव्हा विचार करेन.
दूध, गूळ, पोहे... उत्तम
दूध, गूळ, पोहे... उत्तम ब्रेफा.
कोळाच्या पोह्यांसाठीही जाडे पोहे. स्वातीने कृती लिहिलीये बहुतेक कोळाच्या पोह्यांची. चिंच, नारळाचे दूध आणि गूळ लागेल. http://www.maayboli.com/node/38055 ही स्वातीने दिलेली कृती.
धन्यवाद नीधप. मला जाडे पोहे,
धन्यवाद नीधप.
मला जाडे पोहे, ओला खोबर्याचा चव, गूळ, वेलची , जरासे दूध पोहे ओले करायला मस्त वाटते.
पण बाळसे धरेन मी म्हणून टाळते. थोडे थोडे कधीतरी करून खपवेन.. दोन पौंडाचे खायचे आहेत.
दही-पोहे, पौष्टिक पोहे,
दही-पोहे, पौष्टिक पोहे, पोह्याचे पॅटिस, पोह्यांचे थालिपीठ, पोह्याची चटणी.
कसली रिक्षा गं??? असो दोघिंनी
कसली रिक्षा गं??? असो दोघिंनी सेम रेस्पि दिली आहे हे आत्ता आलं धेनात.
मनस्विनीच्या रेस्पित कणीक असल्याने विकांताला ट्राय करेन...इतर सगळ्या पाकॄ साठी समद्यांचे आभार्स
शेगावची कचोरी मिळते हल्ली
शेगावची कचोरी मिळते हल्ली त्याची रेस्पी माहित आहे का कोणाला?
स्वाती, तश्या प्रकारची एक
स्वाती, तश्या प्रकारची एक कचोरी इकडे आहे बघ - http://www.maayboli.com/node/34604
धन्स मंजु.... ते बटर स्टिक
धन्स मंजु....
ते बटर स्टिक म्हणजे काय पण? आय मीन... एक स्टिक म्हणजे किती?
प्रतिसाद वाच, रूनीची पोस्ट
प्रतिसाद वाच, रूनीची पोस्ट आहे तपशीलात.
ओके... वाचली पोस्ट
ओके... वाचली पोस्ट
रगडा पॅटिस चा रगडा करायला
रगडा पॅटिस चा रगडा करायला छोल्यांच्या ऐवजी काय वापरता येइल??
इथे रगड्याचे पांढरे वाटाणे मिळत नहित
त्यामुळे छोले वापरुनच रगडा बनवतो... पण अजुन काहि दुसरा ऑप्शन सुचतोय का???? बटरबीन्स/फव बीन्स वगैरे वापरुन बघितल्या आहेत का कुणी?
आपले साधे हरभरे (चैत्रातल्या
आपले साधे हरभरे (चैत्रातल्या हळदीकुंकवासाठी भिजवतात ते)?
ते हरभरे रगड्यासाठी लागतात
ते हरभरे रगड्यासाठी लागतात तसे मेणचट मऊ शिजत नाहीत कितीही पराक्रम गाजवले तरी...
लाजो, चवळी (पांढरी असते ती, पटकन शिजते) ती चालावी माझ्यामते. तुझ्याइकडे मिळते का माहिती नाही.
हिरवे सुके वाटाणे किंवा
हिरवे सुके वाटाणे किंवा टिनमधले वाटाणे वापरता येतील. रंग हिरवट पिवळा येतो एवढेच. त्यासोवत मी चण्याची डाळ पण वापरली होती.
मी मुंबईत धनश्रीचे कढी मिक्स
मी मुंबईत धनश्रीचे कढी मिक्स घेतले होते. काल त्याची कढी केली. ती पावडर आहे, नुसती पाण्यात मिसळून उकळायची. चव मात्र अगदी घरगुति कढीसारखी.
त्यातले घटक बघता, बटरमिल्क फॉर्म्यूला असा एक घटक आहे. असे काही उत्पादन भारतात मिळायला लागलेय का ? म्हणजे मिल्क पावडर असते तशी ताक पावडर ? असेल तर छान सोयीचे होईल. कुणाला दिसली का कधी कुठल्या दुकानात ?
मंजूडी, दिनेशदा, धन्यवाद
मंजूडी, दिनेशदा, धन्यवाद
मंजूडी, चवळी मिळते इथे. घरात आहेच.
दिनेशदा, हिरवे वाटाणे आहेत घरात. थोडा रगडा उद्या बनवुन बघते.
पुढच्या शनिवारी पाहुणे येणार आहेत त्यंच्यासाठी रगडा पॅटिस चा बेत आहे. थोडा थोडा रगडा एकदा चवळी आणि एकदा वाटाणा वापरून करुन बघते...
नी, तुला पण थॅंकु :दिनेशदा, ती इन्स्टंट इकढीची आयडिया भारी आहे. मुंबईत कुठे मिळते ते कढी मिक्स?
ती इन्स्टंट इकढीची आयडिया
ती इन्स्टंट इकढीची आयडिया भारी आहे. मुंबईत कुठे मिळते ते कढी मिक्स? >>>
Dhanashree Foods
35 / B1, Vrindavan Soc.
Thane 444601 India
+91 98-69-200449
लाजो, त्यांची खुप उत्पादने
लाजो, त्यांची खुप उत्पादने आहेत. प्रसादाच्या शिर्यापासून, अळूच्या पातळ भाजीपर्यंत. आणि पॅकेट्स छोटे असले तरी तयार पदार्थ भरपूर होतो. बहुतेक पदार्थ पाण्यात मिसळून गरम करायचे, अश्याच प्रकारातले आहेत.
मोग्यांबो, धन्यवाद दिनेशदा
मोग्यांबो, धन्यवाद
दिनेशदा धन्यवाद
मला माहित नव्हते हे नाहीतर यंदाच्या भारतवारीत घेऊन आले असते २-४ पाकिटं......
अशी मराठमोळी उत्पादने पण
अशी मराठमोळी उत्पादने पण परदेशातील दुकानात उपलब्ध झाली पाहिजेत. आणि मराठी ग्राहकांनी आग्रह धरला पाहिजे. हि सगळी उत्पादने कोरड्या स्वरुपात आहेत. ( टिन्स मधे नाहीत.) परदेशातील कडक चाचण्यांना, खात्रीने पार करु शकतील.
माझा मूळ प्रश्न होता, कि भारतात असे ताकाचे रेडी मिक्स मिळायला लागले का ?
मी घरुन दह्याची फ्रिज ड्राईड पावडर आणली होती, त्याचा चांगला उपयोग होतोय. आता रोज दुपारी जेवताना, आपल्या चवीचे ताक असते. सकाळी इगल व्हॅक्यूम बॉटल मधे, दही + मीठ + हिंग + थोडी साखर + बर्फाचे खडे असे मिक्स केले आणि जेवताना नुसते शेक केले कि मस्त ताक तयार.
कधी त्यात पुदीना पावडर ( गल्फ मधली ) तर कधी केशर पण असते.
fresh mozzarella cheese cya
fresh mozzarella cheese cya recipes kunala mahiti aslyas sanga please.
फ्रेश मोझरेल्ला - - पिझ्झा
फ्रेश मोझरेल्ला -
- पिझ्झा वर सॉस लावुन त्यावर फ्रेश मो चे तुकडे आणि फ्रेश बेसिलची पाने...
- टोस्टेड बगेट्स / ओपन टोस्टेड सँडविचेस,
- सॅलड्स
- पास्ता
- रोस्टेड/ग्रिल्ड चिकन ब्रेस्ट्स विथ मोझरेला + पाईन नट्स + बेसिल / बेसिल पेस्टो किंवा बेसिल+ सनड्राईड टोमेटो पेस्टो.
नेट वर भरपूर रेस्प्या आहेत.
Pages