पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडदाची डाळ घालावी लागेल बहुधा. प्रमाण जेवढ्यास तेवढ्याने सुरू करून ट्रायल अ‍ॅन्ड एररने ठरवावं लागेल.

ढोकळ्या साठी चण्याचे पिठ घालुन बघ. शेव्/मुरुक्कु साठी उडदाचे पिठ वापर. अगदी थोड्या प्रमाणात करुन बघ.

मला संक्राती साठी काही तरी गोड पदार्थ करायचा आहे पण तीळाचे पदार्थ नको वाटताय कारण इथे सध्या उन्हाळा चालु आहे.

मुला.न्ना आवडेल अशी चिकनची (भाजी/करी) क्रुती द्या! इथे माय्बोलिवर असलेली आणी तुम्ही ट्राय केली आहे अशी असेल तर उत्तमच
(आई घरी चिकन बनवणार याची जाम उत्सुकतता आहे)

प्रिया, सूप बनवत असताना त्यात एखाद चमचा घालून बघ ते पीठ. फोडणीचे वरण करत असताना पण एखादा चमचा घालून उकळव. सगळे एकदम संपणार नाही. पण रोज असेच थोडेथोडे करून संपेल सुनिधीच्या भरडीचं पीठ मी मध्यंतरी असंच करून संपवलं.

साबुदाणा खिचडीला भिजवतो तसा रात्रभर भिजवायचा. सकाळी साबुदाण्याच्या तिप्पट गरम पाणी टाकायचं. जिरे मीठ चवीनुसार घालून उन्हात प्लॅस्टीकच्या कापडावर पळीने पापड्या घालाव्या. कडक वाळल्यावर डब्यात भरून ठेवाव्या वर्षभर टिकतात.

मला १५ जणान्साठी दही वडे करायचे आहेत. पार्टी शुक्रवारी सन्ध्याकाळी आहे. मला परस्पर ओफिस मधूनच जावे लागेल. आदल्या दिवशी दह्यात घातले तर चालेल की त्याच दिवशी सकाळी घालू?

कॅन्ड टुनाचं काय (काय) करता येईल? (सॅन्डविच नको...). इथे शोध घेतला तर दिनेशदांची एक भन्नाट रेसिपी जुन्या मायबोलीवर सापडली. घानात करतात ती टूना भरून शहाळी... तेव्हढं नाही करता येणार... अजून काही?

@दाद, स्प्रीन्ग रोल, फ्रँकी यामध्ये स्प्रीन्ग अनियन सोबत, शिमला वगैरे घालुन वापरता येईल.

दादताई, टुना टिन मधला असेल तर, त्यातले तेल किंवा पाणि काढुन अलगद हातानी कुस्करुन घ्या, त्यात बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरचि, मिठ, मिरपुड, घालुन एक अंड फोडून घाला. मग कटलेट करुन शॅलो फ्राय करा. यात हव असेल तर उकडलेला बटाटा, आणि लिंबु पिळुन पण कटलेट करु शकता.
आवडत असेल तर थोडा मायोनिज सॉस, चिलि सॉस, केचप घालुन अलगद हाताने मिक्स करुन मोनॅको बिस्कीट किंवा वेफर्स वर टॉपिंग्ज म्हणुन पण करु शकता.

ऑफिसमधे ब्रेकच्या दरम्यान/ निघायच्या आधी अर्धा-पाऊण तास वडे दह्यात घालता येतील असं काही जमेल का?

निंबुडे, अगं टूना.. किंवा ट्यूना मासा. हा टिनमधे मिळतो(इथे).
अशू, अंजली, थॅन्क्स. ते कटलेट करून बघते.

लहानपणी आम्ही तिळगुळ द्यायला कागदाचे बॉक्स बनवायचो, कसे ते मी विसरले. कोणाला माहीत आहे का? तो असा दिसायचा
160120131409_0.jpg

हिरव्या ऑलिव्ह्जची एक बाटली भावाकडून गेल्या वर्षी घरी आलीये. (अजून एक वर्ष आहे एक्सपायरी डेटला) एकतर ते ऑलिव्ह्ज वापरायचं माझ्या लक्षातच रहात नाही. तरी काहीवेळा सलाडमध्ये आणि ऑम्लेटवर टॉपिंगसाठी वापरलियेत. अजून कशात वापरावीत? आणि ज्या लिक्विडमध्ये ती ऑलिव्ह्ज ठेवलेली असतात ते नक्की काय असतं? ते पण वापरायचं असतं का?

अल्पना मी लिक्वीड टाकून देते आणि फक्त ऑलिव्स वापरते.
ऑलीव्ज+जीरे+तेलात परतलेली मिरची+मीठ+थोडे तेल+कोथींबीर (ऑलिव्ह ऑईल असल्यास चांगले) मिक्सरम्धून काढून डीप म्हणून वापर किंवा स्प्रेड म्हणून ब्रेडवर लावता येइल.

हो मामी सलादमध्ये वापरलंय २-३ वेळा. ग्रीक सलाद कसं करतात बघायला हवं
टॉमॅटो, ढब्बु मिरच्या, वाफवलेले मक्याचे दाणे, कांदा, काकडी /गाजर, ठेचलेली लसुण पाकळी /चिरलेली लसणीची पात, ऑलिव्ह्ज, मीठ, मीरेपुड, पुदिना पावडर आणि व्हेनेगर घालून करते मी सलाद.

चिन्नु डीपची आयडिया छान आहे.

घरात सगळ्यांना कडा कापुन बनवलेले सँडवीच लागतात. ब्रेडच्या उरलेल्या कडांच काय करायच तेच सुचत नाही. कधी कधी भाजी, कधी कुरकुरीत करुन कधी सुप मध्ये घालुन देते. अजुन काय करता येईल.

माझ्यकडे १ डब्बा भरुन तांदुळ आणि मुग भाजुन केलेले पीठ पडले आहे. >>>पीठ तुपात भाजुन + सा ख र/ गु ळ+dry fruits घा लुन लाडू होतात का बघा ...{ आधी थोडे प्रमाण करुन बघा )

ब्रेडच्या उरलेल्या कडांच काय करायच तेच सुचत नाही. कधी कधी भाजी, कधी कुरकुरीत करुन कधी सुप मध्ये घालुन देते. अजुन काय करता येईल.>>>त्याचा चुरा(crumbs) करुन वापर.

Pages