Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वेज मंचुरीयन बॉल्स आणि
मला वेज मंचुरीयन बॉल्स आणि सेजवान चटणीची रेसीपी हवीये
गोभी मांचुरियन
गोभी मांचुरियन
शेझवान सॉस
शेझवान सॉस
कोणाला घरी काटेरी हलवा कसा
कोणाला घरी काटेरी हलवा कसा करतात ते माहीत आहे का?
कोणाला घरी काटेरी हलवा कसा
कोणाला घरी काटेरी हलवा कसा करतात ते माहीत आहे का? >>>> मला पण हवंय याचं उत्तर!
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/46717.html?1200538475
ईथे पहा हलव्या साठी.
बेडगि प्लेन आणि शंकेश्वरी
बेडगि प्लेन आणि शंकेश्वरी स्प्रींग सारखि असते ना >>>नाही. बेडगी/ब्याडगी खूप सुरकूतलेली आणि शंकेश्वरी प्लेन असते.
http://www.elteegroup.com/super-quality-byadgi-red-chili-1172852.html
प्रॅडी, ते पेज मी आधीच
प्रॅडी, ते पेज मी आधीच पाहिलंय, पण तिथे हलव्याची कृती नाहीये. मी या महिन्यातच कुणीतरी हलव्याच्या कारखान्यात कसे हलवे बनवतात, याची पोस्ट लिहीली होती, ती ही शोधत होते, पण सापडत नाहीये.
सापडली कारखान्यावाली हलव्याची
सापडली कारखान्यावाली हलव्याची पोस्टः http://www.maayboli.com/node/40243
घरच्या हलव्याची कृति त्यात
घरच्या हलव्याची कृति त्यात थोडक्यात आहेच. माझी आई करायची पुर्वी. त्यासाठी दूध पाण्यात साखर भिजत घालून त्याचा पाक करत ठेवायची आणि मग त्यात थोडे ताक ओतायची. असे केल्यावर साखरेतली मळी वर वेगळी होत असे. ती झार्याने काढली कि खाली शुभ्र पाक असे. तोच वापरत असे ती.
तिळाबरोबर, खसखस, लवंग, काकडीच्या बिया, लवंग यांचा पण हलवा करत असे. असा हलवा खायलाही छान लागे.
हा हलवा पहाटेच करावा लागे कारण काटा यायला थंडी आवश्यक असे. पाकही गरमच ठेवावा लागे. पण सगळी कृति एका दिवशी करायची गरज नसे. दोन तीन दिवशी ( पहाटे ) करत असे ती.
चंदनबटव्याची भाजी कशी करतात
चंदनबटव्याची भाजी कशी करतात ते कोणी सांगु शकेल का?
कांदालसूण घालून परतून करता
कांदालसूण घालून परतून करता येते.
धन्यवाद.
धन्यवाद.
काविळीच्या रुग्णाला पथ्याचे
काविळीच्या रुग्णाला पथ्याचे पदार्थ सुचवाल का?
फक्त पिष्टमय पदार्थ खा, तेल-तूप-मसाले-प्रोटीन्स वर्ज्य, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मऊ भात, पेज, मूग डाळीची सौम्य खिचडी, उसाचा रस, आमसुलाचे सार, कोरडे फुलके, बिनसायीचे ताक... यांखेरीज अजून पदार्थ आहेत का?
माझी आई मला फुलके आणि
माझी आई मला फुलके आणि निरनिराळी भरीतं द्यायची. उकडलेला बटाटा/ ग्रीम बीन्स/भोपळा + दही (बिनासायीचं) +मीठ + साखर
केलची (kale ) भाजी कोणी करतं
केलची (kale ) भाजी कोणी करतं का? असल्यास कशी?
मी केल कधीच केलं नाहीये पण
मी केल कधीच केलं नाहीये पण एकाने किनोआ आणि केल चं काही प्रकरण करून आणलं होतं पॉटलक ला त्यावरून आणि ऐकीव माहितीवरून केल ही नाजूक भाजी नाही आणि त्याची चवही उग्र असते तेव्हा मस्टर्ड ग्रीन्स् सारखं ट्रीट करावं लागेल असं वाटतंय ..
हल्ली केल चिप्स् हेल्दी स्नॅक्स् म्हणून पॉप्युलर आहेत असं ऐकतेय ..
केल ची भाजी मी चण्याचि
केल ची भाजी मी चण्याचि डाळ,कांदा,लसुण,थोडा गरम मसाला घालुन कोरडि करते, किंवा बटाट्याबरोबर सुद्धा चांगली लागते. Swiss chard, collard greens या भाज्या सुद्धा अशाच बनवते. नुसता कांदा,लसुण, थोडा गरम मसाला,लाल मिरचि घालुन कोरड्या भाज्या छान लागतात पोळि बरोबर.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/19806
इथे सुलेखाताईंनी दिलेली रेसिपी सापडली केलची.
धन्यवाद सशल, प्रिया, बिल्वा
धन्यवाद सशल, प्रिया, बिल्वा
धन्यवाद सशल, प्रिया, बिल्वा
धन्यवाद सशल, प्रिया, बिल्वा
http://www.webmd.com/food-rec
http://www.webmd.com/food-recipes/indian-spiced-kale-and-chickpeas?ecd=w...
केलची ही भाजी मी करते. कांदा पण परतून घेते.
ओके कल्पु थॅन्क्स! तिथे
ओके कल्पु थॅन्क्स!

तिथे उजवीकडे न्युट्रिशन इन्फो मध्ये कॅलसियम चा उल्लेख पण केला नाहीये
पण केल मध्ये ते भरपूर असतं असं मी नक्की वाचलं होतं त्यामुळे तिथे सर्च केलं तर आख्ख एक आर्टिकल केल च्या सद्गुणांवर लिहिलेलं सापडलं. तर मुद्दा असा की तिथे रेसिपीशेजारी येणार्या न्युट्रिशन इन्फो वर भरोसा ठेवू नका
प्लीज मला मदत करा. मिश्र
प्लीज मला मदत करा.
मिश्र कडधान्यांच्या रेसिप्या सुचवा. लेकीच्या शाळेत पालकांसाठी पाककला स्पर्धा ठेवली आहे व मिश्र कडधान्याचा कोणताही पदार्थ करून आणायला सांगितला आहे. स्पर्धा १० तारखेला आहे. पदार्थ त्याआधी एकदा करून बघितला म्हणजे बर पडेल ना. सो प्लीज मला पदार्थ सूचवा.
उजू अडाई (डाळीचे डोसे) बनवू
उजू अडाई (डाळीचे डोसे) बनवू शकतेस.
मेघना , कावीळी साठी ऊसाची
मेघना , कावीळी साठी ऊसाची काकवी मिळते का बघ कुठे .. काकवी सारखे उत्तम औषध नाही काविळीला.
ओके, धन्यवाद शुम्पी आणि दिपु.
ओके, धन्यवाद शुम्पी आणि दिपु.
Meghana I used to eat cooked
Meghana I used to eat cooked green veggies with jeera powder, and fulka or bhakri + tak
biscuits, churmera
almost 6 months I had this.
मिश्र कडधान्ये वाफवून त्यांचे
मिश्र कडधान्ये वाफवून त्यांचे बास्केट चाट, किंवा स्प्राऊट भेळ, मिक्स स्प्राऊट पुलाव, मिक्स स्प्राऊट - मेथीची ताहिरी / बिर्याणी, मिक्स स्प्राऊट पोहे असेही प्रकार करता येतील.
आणि या तरला दलालच्या मिक्स स्प्राऊट्स वापरून बनवलेल्या विविध रेसिपीज.
मिश्र कडधान्ये वाफवून त्यांचे
मिश्र कडधान्ये वाफवून त्यांचे बास्केट चाट >>
अकु
तुम्ही मलाही मधे एक बास्केट चाट चा पदार्थ सुचवला होता, तेव्हा विचारायचं राहिलं..
बास्केट कशी करायची घरी? शेवेची करतात ना.. की विकत मिळते?
Pages