पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निंबुडा - हो बरोबर.

धिरडं - कणकेचे पीठ दोश्याच्या पीठासारखे भिजवून डोसे घालायचे, झाकण घालून शिजवायचे. चवीला मसाला मीठ, ह. ती. को. घालतात यात.

धिरडं - कणकेचे पीठ दोश्याच्या पीठासारखे भिजवून डोसे घालायचे, झाकण घालून शिजवायचे. चवीला मसाला मीठ, ह. ती. को. घालतात यात.
>>
हा प्रकार एकदा ट्राय केला होता मी. गच्च गोळा झाला. उलटता नाही आला. Sad

मी स्वतः कधीही नाही केला अजून. नेहेमी आई आजीच्याच हातचे खाल्लेत. लागतात मात्र जबरी...

निंबे, नुस्त्या कणकेच्या पिठाची धिरडी गिच्चच होणार. त्यात थोडंसं बेसन घालायचं. किंवा ज्वारीचं पीठ, कणीक, थोडं तांदुळाचं पीठ, बेसन अशी असतील ती पिठं एकत्र करून घ्यायची. बेसन असलं की उचलता येतात उलथण्यावर. आणि नॉनस्टिकवर केली तर आणखी सोपी. तेलही पीत नाहीत फार.

धिरड्याचे पीठ आंबवत नाहीत.
ताकात भिजवतात. हि मि, कोथिंबीर, मीठ घालतात.

मी कणकेच्या पिठाचे एक धिरडे टाइप पण गोडाचे प्रकरण करते. त्यात इतर काही नसते. गिच्च बिच्च होत नाही. पीठ, गूळ किंवा साखर, दालचिनीचे बारीक तुकडे/ पावडर, पाणी + आंब्याच्या दिवसात आंब्याचा रस किंवा तत्सम ऑप्शनल.
अर्धातास भिजवायचे फक्त आणि तव्यावर टाकायला लागायचे.

माझा एक मध्यप्रदेशीय सहकारी दुपारच्या जेवणात फोडणीचे दही आणायचा. ते खूपच स्वादिष्ट असायचे चवीला. कोणाला माहीत आहे का ते कसे करतात?

अरुंधती, धन्यवाद. मला वाटते मी म्हणतोय त्यात कांदा नसावा. पण ती अल्पनाची पाकृ करून बघीतल्याशिवाय कळणार नाही तीच का. Happy
(पण आजपर्यंत जे प्रयत्न केले त्यात काही अपवाद सोडल्यास पहिल्याच प्रयत्नात हवी ती चव कधी जमली नाही.)

मी मेथी चे sprouts आणलेत...त्याचे सलाद सोडुन काय करता येइल?
डाळ पालक करतो तसे केले तर कडवट लागेल का डाळ?

अनुराधा५, ईथे तुला http://www.maayboli.com/node/36992?page=2
मनीने मेथीचे स्प्राउट कसे करायचे आणि त्याची भाजी कशी करायची याची उत्तम माहीती दिली आहे त्यावरचे प्रतिसाद ही वाच, तुला बरेच इतर प्रकारही मिळतील. माझ्या मेथीच्या घावणाची पाककृतीही मिळेल.

मिक्स व्हेज चि रेसेपि कुनि देइल का?

त्याला लागनारे मसाले / ग्रेव्हि सांगितलि तरि चालेल

इन्ना, माझी आई या पद्धतीने लेकुरवाळी भाजी करते : (माबोवर लिंक शोधली, पण कुठं स्पेसिफिक कृती मिळाली नाही) जरा जास्त तेलाच्या फोडणीत मोहरी, हिंग, हळद, त्यात गाजर, वांगं, मटार, पावटा, छोटे बटाटे, पापडी, हरभरा घालून वाफेवर शिजवायचं, त्यात गोडा मसाला, तिखट, मीठ, जिरं - खोबरं वाटून, दाणे कूट, (तीळ कूट आवडत असल्यास), थोडं ओलं खोबरं व थोडासा गूळ घालायचा, पाणी - रस अंगाबरोबरच ठेवायचा व वरून कोथिंबीर.... भाजी शिजताना अधून मधून सारखी हालवत राहायचे व मंद आचेवर शिजवायची. सोबत तीळ लावलेली गरमागरम भाकरी व ताजे लोणी... अहाहा!! (हे सर्व आयते खायला मिळते आहे यासारखे दुसरे स्वर्गसुख नाही! :फिदी:)

हो, तीच ती.

माझ्यामते फार रेसिपी अशी नसते. मिळतील तश्या जास्तीत जास्त प्रकारच्या भाज्या घ्याव्यात. ह्या मोसमात बर्‍याच वेगवेगळया भाज्या स्वस्त आणि ताज्या मिळतात.
या भाजीला खोबर वाटून लावावं. आणि तीळ अवश्य घालावेत.
माझी गेल्या वर्षीची भाजी :

lekurvali.jpg

@अल्पना, हो, तीळकूट घालतात.... मला व घरच्यांना त्याची चव तितकी आवडत नाही म्हणून मग नो तीळकूट! त्या ऐवजी भाकरीसोबत तिळाची चटणी! Wink

माझ्यकडे १ डब्बा भरुन तांदुळ आणि मुग भाजुन केलेले पीठ पडले आहे. रवाळ आहे एकदम बारिक नाहिये, त्यामुळे थालीपिठामधे नाहि घालता येत.मुलगा लहान होता तेंव्हा त्याला ते बनवुन द्यायचे. आता मुलगा वरण भात खातो त्यामुळे पीठ तसेच पडले आहे. काय करता येईल पीठाचे.पीठात ओवा,जिरे मिठ सुद्धा आहे.

appe karun bagh

थँक्स नी,निवा, विद्या.
धीरडि टाकुन बघितली पण सगळि तुटली तव्यावरच. मला वाटते भाजुन पीठ केले त्यामुळे चिकटपणा राहिला नाहिये पिठाला.
ढोकळा,शेव, आप्पे करायला सुद्धा असाच प्रोब्लेम येईल का? त्यात काय टाकले तर निट जमतिल धिरडि ,आप्पे किवा ढोकळा?

Pages