हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉगवर्ट्सच्या चार हाऊसच्या भुतांची नावे सांगा. <<<

१. नीअरली हेडलेस निक (ग्रिफिंडर)
२. फॅट फ्रायर (हपलपफ)
३. ग्रे लेडी (रॅवेनक्लॉ)
४. ब्लडी बॅरॉन (स्लिथरीन)

माझा प्रश्नः सॉर्टींग हॅटने ग्रिफिंडर म्हणून निवडलेला हॅरीच्या बॅचचा पहिला विद्यार्थी कोण?

सॉरी, तुमचा प्रश्न पूर्ण वाचलाच नव्हता. ग्रिफींडॉर म्हणून फिनिंगन सोर्ट होतो. (त्यात परत नेट कनेक्शनने घोळ घातला) एक्डाव माफी द्या (आवडाकेडावरा कर्स वापरू नका हं प्लीज)

Finnigan

सॉरी, तुमचा प्रश्न पूर्ण वाचलाच नव्हता. ग्रिफींडॉर म्हणून फिनिंगन सोर्ट होतो. (त्यात परत नेट कनेक्शनने घोळ घातला) एक्डाव माफी द्या (आवडाकेडावरा कर्स वापरू नका हं प्लीज)
Finnigan << हेही चूक.

रुणुझुणू, नंदिनीने अगदी पृष्ठक्रमांक वगैरे दिल्यावर मग .... Lol

ड्रॅको मॅल्फॉयच्या आजोबांचं नाव काय? <<< अब्राक्सास माल्फॉय.

माझा प्रश्न : डंबलडोरांनी शिक्षकाची नोकरी नाकारूनही व्होल्डमार्ट त्याचा एक हॉरक्रक्स त्याच्याच शाळेत लपवून ठेवण्यास कसा यशस्वी होतो?

डंबलडोरांनी शिक्षकाची नोकरी नाकारूनही व्होल्डमार्ट त्याचा एक हॉरक्रक्स त्याच्याच शाळेत लपवून ठेवण्यास कसा यशस्वी होतो?>>>>> तो डम्बीला भेटायला येतो तेव्हा येताना की जाताना त्या इन्व्हिजिबल रूम मधे रॅवेन्क्लॉचा मुकुट लपवुन ठेवतो..

चिमुरी, बरोबर.

आणि हाफब्लड्ची पुस्तक लपवून ठेवलेल्या जागेची खूण म्हणून हॅरी तो मुकूट लक्षात ठेवतो.

ज्युपिटरच्या कुठ्ल्या चन्द्रावर ज्वालामुखी असल्याचं हर्मायनी रॉनला सांगते?

ज्युपिटरच्या कुठ्ल्या चन्द्रावर ज्वालामुखी असल्याचं हर्मायनी रॉनला सांगते? <<< लो.

माझा प्रश्नः मिनिस्ट्रीतल्या घुसखोरीनंतर जखमी रॉनवर हर्मायनी काय उपाय करते?

केदारचे बरोबर आहे वाटतं. पुस्तकं वाचून पण १.५-२ वर्ष झाली, फक्त स्मरणशक्ती वापरुन काहीच आठवत नाही. परत वाचायला घ्यायची हिंमत नाही कारण एकदा घेतली की झालं! दुसरं काही वाचन होणं शक्य नाही. Happy

बुवा, उत्तर देणाराच पुढचा प्रश्न देईल असं नाही ना? (की आहे?)
मला वाटते आधीचा प्रश्नकर्ता सोडून उत्तर देणारा किंवा दुसर्‍या कोणीही पुढचा प्रश्न द्यावा.

फ्रँक आणि अ‍ॅलिस लाँगबॉटम या दोघांकडून वोल्डेमोर्ट ची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्यावर क्रुशियाटस कर्स वापरून त्यांचा छळ करून त्यांना वेडं करण्याच्या गुन्ह्यासाठी..

Pages