हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, किती बारीक सारीक गोष्टी लक्षात आहेत तुम्हा लोकांच्या. मी दहाही बोटं तोंडात घातली असती पण मग टाईप करता येणार नाही म्हणून तो बेत रहित केला.

हर्मायनी असते बहुधा. सगळ्यात हुशार म्हणून. बेल्बी म्हणजे स्लगहॉर्नला त्याचे वडील आणि मिनिस्टर ऑफ मॅजिक मित्र आहेत असं वाटत असतं पण तो त्यांचं पटत नाही म्हणून सांगून स्लगहॉर्नच्या ब्लॅकलिष्टीत जातो तो.
झाबिनीची आई म्हणजे सुंदर आणि धनाढ्य विच.

माझ्याबाबतीत सांगायचे तर प्रसंग जवळजवळ सगळे आठवतात पण कमी वेळा उल्लेख केलेली पात्रं, जागा, स्पेल्स यांची नावं वगैरे सगळे काही जसेच्या तसे आठवत नाही.. थोडेसे गुगल केले तर भराभर आठवायला लागतं.

स्लगहॉर्नच्या पार्टीत हर्मायनी असते असे मलाही वाटतेय.

माझा प्रश्न : पोर्टकी म्हणून कोणकोणत्या गोष्टी आणि कोणत्या वेळी वापरण्यात आल्या?

रिकामा सोडा कॅन मोठ्या क्विडिच्च गेमच्या वेळेस वापरल्याचा आठवतो. विजली फ्यामिली, हॅरी, हरमायनी, सेड्रिक आणि त्याचे वडिल हे सगळे बूट पोर्टकी म्हणून वापरुन क्विडिच गेम पाशी असलेल्या शामियान्यापाशी पोहोचतात.
पुढे ट्रायविजार्ड कप पोर्ट की म्हणून वापरला जातो, स्मशाणात जायला अन तिथून पुढे परत यायला. अजूनही काही वेळा वापर झालाय असं वाटतय.

सातव्या भागात बरोमध्ये पोचण्यासाठी -
हॅग्रिड आणि हॅरी - कंगवा
रिकामा ऑइलकॅन - रॉन आणि टॉन्क्स (जी ते मिस करतात)
वाकलेला कोट हँगर - हर्मायनी आणि किंगस्ली

कमाल आहे श्र! दंडवत. हे असे प्रश्न अवघड असतात कारण एकाच भागा बद्दल नसून बर्‍याच भागांमध्ये उल्लेख असतो. मान गये! आता नुकतीच वाचली असतील पुस्तकं तरी अवघड आहे पण बराच वेळ झाला असेल वाचून तर खरच कमाल आहे!

वैद्यबुवा :-), मी लिहिलेलं सातव्याच भागातलं आहे. चौथ्या भागापासून पोर्टकीचे उल्लेख येतात. त्यातलं नाही आठवलं चटकन. सातव्यातलं आठवलं ते लिहिलं.

चौथ्या भागात रॉनच्या घरून सक्काळी सक्काळी हॅरी, रॉन, हर्मायनी, रॉनचे भाऊ इ. सगळे गावाबाहेरच्या टेकडीवर जातात. तिथून ते ट्रायविझार्ड कॉम्पिटिशन करता जाणार असतात. तिथे त्या टेकडीवर एक जुनी हॅट असते, ती पण पोर्टकी असते. तिला पकडूनच ते व्हेन्युवर पोहोचतात.

वा वा, न गुगलता आठवणीतून लिहिलंय. चुभुद्याघ्या.

पुस्तकं वाचून ५-६ की अधिक वर्षं झालीत.

बरोबर बूट असतो पोर्ट की म्हणून,
तिथून ते ट्रायविझार्ड कॉम्पिटिशन करता जाणार असतात >>> क्विडिच वर्ल्डकप करता.

इथे बर्याचश्या ट्रिवियाच्या फोरम्सवरुन असे जाणवते.. की कौन बनेगा करोडपती मध्ये जर निवड झाली फोन घेण्यासाठी श्रद्धाला रिक्वेस्ट करायला हरकत नाही , मायबोली एक्स्पर्ट म्हणुन.

टॉम रिडलच्या आजोबांचे नाव सांगा.
आजोबांच्या घराचे नाव सांगा.
त्यांच्या घरी मिनिस्ट्री ऑफ मॅजिक नी एक माणूस पाठवला होता, तो का पाठवला ते सांगा. त्या माणसाचे नाव सांगा?
त्या माणसाची आणि आजोबांची झटापट सुरु व्हायच्या वेळी त्या माणसानी कुठला जिंक्स/कर्स वापरला?
(अर्थातच हे सगळं मी पुस्तकातून वाचून विचारतोय, का? सहज) Happy

मि.वीझ्लींवर डिपार्टमेंट ऑफ मिस्टरीज मध्ये हल्ला झाल्याचे हॅरीला कळते तेव्हा शाळेतली सगळी वीझली भावंडे + हॅरी डंबलडोरच्या ऑफिसमधून सिरियस ब्लॅकच्या घरी जाण्यासाठी एक किटली पोर्ट-की म्हणून वापरतात.

1. Marvolo Gaunt
2. House of Gaunt
3. मिनिस्ट्रीचा माणूस त्याच्याकडे येतो कारण त्याचा मुलगा मगल्ससमोर खुशाल मॅजिक वापरत असतो. आणि त्यावेळेस बहुधा टॉम रिडल सीनियरवर त्यानं जिंक्स वापरलेला असतो.

त्या मिनिस्ट्री ऑफिशियलचं नाव आणि त्याने वापरलेला स्पेल थोडा विचार करून आठवेल.

त्या पार्टीत हर्मायनी असतेच.. शिवाय हॅरी लुना लवगुड ला बरोबर घेउन जातो ना.. अन फिल्च ने पकडुन आणलेला ड्रॅको पण..

श्रद्धा, ग्रेट आहेस Happy

नावं आठवत नाहियेत.. एक मगलबॉर्न, ग्रीन हाउस मधे जो हॅरी गृपला तो स्वतःची ओळख करुन देताना मगलबॉर्न असल्याचं सांगतो तो.. हफलपफ वाला कदाचीत.. हा बाथरुमबाहेर पाणी आलेलं असतं त्यात बॅइलिस्कला बघतो

तो फर्स्ट इयरचा फोटोग्राफर, जो क्विडिच प्रॅक्टिसच्या वेळी फोटो काढत असतो.. कॅमेर्‍यातुन बघतो

नंतर मिसेस नॉरिस, घोस्टच्या मधुन बघते.. ग्रिफिन्डरचा घोस्ट असतो वाटतं..

हर्मायनी - आरश्यामधुन..

कॉलिन क्रीव्ही - कॅमेर्‍यातून, जस्टिन फिंच - हेडलेस निकमधून, हर्मायनी - आरश्यातून , मिसेस नॉरिस - गर्ल्स बाथरूमच्या बाहेर साचलेल्या पाण्यात

फर्स्ट इयर फोटोग्राफर कॉलिन क्रीवे.
मिसेस नॉरिस पाण्यात पाहते.
हर्मायनीबरोबर पेनलोपी क्लीअरवॉटर पण असते.
निकमधून पाहणारा जस्टिन. (तोच तो मगल बॉर्न असल्याचं सांगतो तो)
निक तर थेट पाहतो पण तो पुन्हा मरू शकत नाही.

बरोबर.

रॉन त्याच्या वाढदिवसाला चुकून लव्ह पोशन घातलेली चॉकलेटं खातो ती कुणी दिलेली असतात?

युगंधर Lol

रोमिल्डा ने ती चॉकलेट्स हॅरी ला दिलेली असतात.. हॅरी च्या बॅगमधुन ती मॅप बाहेर काढताना पडतात.. रॉन ला ते त्याच्या गिफ्ट्स मधुन पडलय असं वाटुन तो खातो..

युगंधर, सगळ्याच विद्यार्थ्यांना. (आणि फिल्चकडे जाऊन तक्रारी करत असते.) Proud म्हणून बॅसिलिस्कलासुद्धा पाण्यात पाहायला जाते नि तिला चांगली शिक्षा मिळते. Happy

Pages