हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.
खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.
ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल.
तर मग करायची सुरवात?...
अरे अजून एक महत्वाचा उल्लेख
अरे अजून एक महत्वाचा उल्लेख राहीला...खूपच महत्वाचा
ग्रिंडेलवाल्ड बथिल्डा
ग्रिंडेलवाल्ड बथिल्डा बॅगशॉटचा भाचा असतो ना? ग्रिंडेलवाल्ड बथिल्डा कडे रहायला येतो आणि डंबलडोअर आणि ग्रिंडेलवाल्डची ओळख होते.
हायला हे वाचल्याचे आठवत
हायला हे वाचल्याचे आठवत नव्हते
Pages