हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.
खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.
ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल.
तर मग करायची सुरवात?...
हॉगवर्ट्सच्या चार हाऊसच्या
हॉगवर्ट्सच्या चार हाऊसच्या भुतांची नावे सांगा. <<<
१. नीअरली हेडलेस निक (ग्रिफिंडर)
२. फॅट फ्रायर (हपलपफ)
३. ग्रे लेडी (रॅवेनक्लॉ)
४. ब्लडी बॅरॉन (स्लिथरीन)
माझा प्रश्नः सॉर्टींग हॅटने ग्रिफिंडर म्हणून निवडलेला हॅरीच्या बॅचचा पहिला विद्यार्थी कोण?
राऊलींगबाईच महान अनुमोदन.
राऊलींगबाईच महान
अनुमोदन.
अॅबॉट हना??
अॅबॉट हना??
नाही.
नाही.
ग्रिफिंडॉर-नियरली हेडलेस निक
ग्रिफिंडॉर-नियरली हेडलेस निक
स्लिदरिन-ब्लडी बॅरन
रॅवनक्लॉ-द ग्रे लेडी
हफलपफ-फॅट फ्रायर
यु नो हू. पुस्तकात तसंच
यु नो हू. पुस्तकात तसंच लिवलय. पान क्रमांक ८९
प्रत्येक आवृत्तीत वेगवेगळे
प्रत्येक आवृत्तीत वेगवेगळे आहे की काय?
माझ्याकडच्या आवृत्तीत वेगळंच आहे.
सॉरी, तुमचा प्रश्न पूर्ण
सॉरी, तुमचा प्रश्न पूर्ण वाचलाच नव्हता. ग्रिफींडॉर म्हणून फिनिंगन सोर्ट होतो. (त्यात परत नेट कनेक्शनने घोळ घातला) एक्डाव माफी द्या (आवडाकेडावरा कर्स वापरू नका हं प्लीज)
Finnigan
Finnigan
सॉरी, तुमचा प्रश्न पूर्ण
सॉरी, तुमचा प्रश्न पूर्ण वाचलाच नव्हता. ग्रिफींडॉर म्हणून फिनिंगन सोर्ट होतो. (त्यात परत नेट कनेक्शनने घोळ घातला) एक्डाव माफी द्या (आवडाकेडावरा कर्स वापरू नका हं प्लीज)
Finnigan << हेही चूक.
पुढचा प्रश्न द्या.
पुढचा प्रश्न द्या.
नाही ना नंदिनी... अजिबात
नाही ना नंदिनी... अजिबात वाचवत नाहिये ते कॅजुअल वॅकन्सी
समोर पुस्तक असून चूक केली मी.
समोर पुस्तक असून चूक केली मी. यु नो हू पुढचा प्रश्न विचारा...
नंदिनी ओपन बुक टेस्ट घेतेयेस
नंदिनी ओपन बुक टेस्ट घेतेयेस का?
ड्रॅको मॅल्फॉयच्या आजोबांचं
ड्रॅको मॅल्फॉयच्या आजोबांचं नाव काय?
युनोहु, किती तो उत्साह लगेच
युनोहु, किती तो उत्साह लगेच पुस्तकाचा फोटु-बिटु काढून डकवलाय.
ड्रॅको मॅल्फॉयच्या आजोबांचं
ड्रॅको मॅल्फॉयच्या आजोबांचं नाव काय?
>> अब्राक्सास
रुणुझुणू, नंदिनीने अगदी
रुणुझुणू, नंदिनीने अगदी पृष्ठक्रमांक वगैरे दिल्यावर मग ....
ड्रॅको मॅल्फॉयच्या आजोबांचं नाव काय? <<< अब्राक्सास माल्फॉय.
माझा प्रश्न : डंबलडोरांनी शिक्षकाची नोकरी नाकारूनही व्होल्डमार्ट त्याचा एक हॉरक्रक्स त्याच्याच शाळेत लपवून ठेवण्यास कसा यशस्वी होतो?
डंबलडोरांनी शिक्षकाची नोकरी
डंबलडोरांनी शिक्षकाची नोकरी नाकारूनही व्होल्डमार्ट त्याचा एक हॉरक्रक्स त्याच्याच शाळेत लपवून ठेवण्यास कसा यशस्वी होतो?>>>>> तो डम्बीला भेटायला येतो तेव्हा येताना की जाताना त्या इन्व्हिजिबल रूम मधे रॅवेन्क्लॉचा मुकुट लपवुन ठेवतो..
उत्तर बरोबर असेल तर पुढचा
उत्तर बरोबर असेल तर पुढचा प्रश्न विचारेन
चिमुरी, बरोबर. आणि
चिमुरी, बरोबर.
आणि हाफब्लड्ची पुस्तक लपवून ठेवलेल्या जागेची खूण म्हणून हॅरी तो मुकूट लक्षात ठेवतो.
ज्युपिटरच्या कुठ्ल्या
ज्युपिटरच्या कुठ्ल्या चन्द्रावर ज्वालामुखी असल्याचं हर्मायनी रॉनला सांगते?
ज्युपिटरच्या कुठ्ल्या
ज्युपिटरच्या कुठ्ल्या चन्द्रावर ज्वालामुखी असल्याचं हर्मायनी रॉनला सांगते? <<< लो.
माझा प्रश्नः मिनिस्ट्रीतल्या घुसखोरीनंतर जखमी रॉनवर हर्मायनी काय उपाय करते?
मिनिस्ट्रीतल्या घुसखोरीनंतर
मिनिस्ट्रीतल्या घुसखोरीनंतर जखमी रॉनवर हर्मायनी काय उपाय करते? > डिटनी ?
रिजनरेशन पोशन टाकते जखमांवर?
रिजनरेशन पोशन टाकते जखमांवर?
केदारचे बरोबर आहे वाटतं.
केदारचे बरोबर आहे वाटतं. पुस्तकं वाचून पण १.५-२ वर्ष झाली, फक्त स्मरणशक्ती वापरुन काहीच आठवत नाही. परत वाचायला घ्यायची हिंमत नाही कारण एकदा घेतली की झालं! दुसरं काही वाचन होणं शक्य नाही.
कारण एकदा घेतली की झालं <<<
कारण एकदा घेतली की झालं <<<
केदार, बरोबर. पुढचा प्रश्न दे.
बुवा, उत्तर देणाराच पुढचा
बुवा, उत्तर देणाराच पुढचा प्रश्न देईल असं नाही ना? (की आहे?)
मला वाटते आधीचा प्रश्नकर्ता सोडून उत्तर देणारा किंवा दुसर्या कोणीही पुढचा प्रश्न द्यावा.
बेलाट्रीक्स अझ्काबान मध्ये
बेलाट्रीक्स अझ्काबान मध्ये कुठल्या गुन्ह्यासाठी असते ?
फ्रँक आणि अॅलिस लाँगबॉटम या
फ्रँक आणि अॅलिस लाँगबॉटम या दोघांकडून वोल्डेमोर्ट ची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्यावर क्रुशियाटस कर्स वापरून त्यांचा छळ करून त्यांना वेडं करण्याच्या गुन्ह्यासाठी..
Pages